// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :242/2014
दाखल दिनांक : 13/11/2014
निर्णय दिनांक : 08/04/2015
श्री. राजेंद्र त्र्यंबक तळोकार
वय 51 वर्षे, धंदा - व्यापार
रा. पिंपळोद, ता. दर्यापुर
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- महिंद्रा टू व्हिलर्स लि. (कस्टमर केअर) तर्फे
व्यवस्थापक, रा. डी-1 ब्लॉक, प्लॉट नं. 18/2 (पार्ट)
एम.आय.डी.सी. चिंचवड, पुणे
- गद्रे ट्रॅक्टर्स, महिंद्रा टू व्हिलर्स शोरुम तर्फे
- , राजापेठ चौक, अमरावती
जि. अमरावती
- वनराज मोटर्स तर्फे व्यवस्थापक
रा. रेल्वे स्टेशन चौक, दर्यापुर रोड,
अंजनगांव सुर्जी, ता. अंजनगांव सुर्जी,
जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. रामेकर
विरुध्दपक्ष 1 तर्फे : अॅड. गायकवाड
विरुध्दपक्ष 2 तर्फे : अॅड. लखोटीया
विरुध्दपक्ष 3 तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 08/04/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 3 कडून महिंद्रा कंपनीची सेंच्युरो वाहन खरेदी केले. तक्रारदाराने दुचाकी वाहना मधे तांत्रिक बिघाड असल्याबाबत व मुळ दस्तऐवज पुरविण्याबाबत दि. १५.५.२०१४, ६.६.२०१४ व ९.७.२०१४ फोन व्दारे तसेच लेखी विनंती केली. परंतु विरुध्दपक्षाने योग्य सेवा पुरविली नाही व दोषपुर्ण सेवा दिली म्हणून हा तक्रार अर्ज नुकसान भरपाईकरीता दाखल केला.
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..3..
3. तक्रारदाराने वि. मंचासमोर प्रार्थना केली की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराची फसवणुक केल्यामुळे, सदर वाहनाची मुळ किंमत रु. ५६,२००/- द.सा.द.शे. १७ टक्के दराने व्याजासह परत मिळावे. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. ५०,०००/-, पोलिसाकडून झालेल्या दंडामुळे नुकसान भरपाई रु. २५,०००/-, तक्रार खर्च रु. १५,०००/- विरुध्दपक्षाकडून मिळावे तसेच संपूर्ण रकमेवर, रक्कम देय दिनांकापर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के दराने व्याजासह मिळण्यात यावी अशी विनंती केली. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 17 दाखल केले आहेत.
4. विरुध्दपक्ष क्र. 3 यांना सदर नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्यामुळे, त्यांचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचा लेखी जबाब निशाणी 16 ला दाखल करुन तक्रारीतील परिच्छेद 1 ते 2 मधील सर्व म्हणणे अंशतः मान्य करुन, परिच्छेद 3 व 4 वर भाष्य
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..4..
करण्यास नकार दिला. पुढील परिच्छेद 5 ते 9 मधील म्हणणे नाकबुल करुन अतिरिक्त जबाबात कथन केले की, ग्राहकाला दुरुस्तीच्या सेवा त्यांचे अधिकृत एजंट देतात. तसेच सदर वाहनात निर्मीती दोष असेल तर त्याचे निवारण करण्याची जबाबदारी कंपनी म्हणजे विरुध्दपक्ष क्र. 1 ची असते व इतर कामे म्हणजे R.T.O. Passing किंवा इन्सुरन्सची जबाबदारी अधिकृत डिलरची असते व विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत डिलर आहेत, परंतु विरुध्दपक्ष क्र. 3 हे सब डिलर असल्याचे अमान्य केले.
6. सदर गाडी विकतांना कोणताही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करण्यात आला नसुन तक्रारदाराने स्वतःच्या मर्जीनुसार खरेदी केली. तक्रारदाराने दिलेल्या सर्व्हीस बुक प्रमाणे गाडीच्या सर्व्हीसिंग वेळेवर केलेल्या नाहीत व गाडी किती कि.मी. चालली हया विषयी कोठेही उल्लेख न करता मुद्दामच सत्य परिस्थिती वि. मंचाकडून लपवुन ठेवण्यात आली. तसेच सदर गाडीमध्ये निर्मीती दोष असल्याचा कोणताही
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..5..
कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. सदर गाडीचे दि. १२.५.२०१४ च्या जॉब कार्डनुसार तपासणी केली असता त्यात कोणताही दोष आढळून आला नाही. तसेच सदर गाडी ही दि. १०.७.२०१४ च्या जॉब कार्डनुसार 84 कि.मी. प्रतिलिटर चालत असल्याचे दिसुन येते. वरील विवेचनावरुन तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असून ती खर्चासह फेटाळण्याची विनंती वि. मंचाकडे केली. विरुध्दपक्ष 1 ने निशाणी 17 प्रमाणे दस्त 1 ते 4 दाखल केले आहेत.
7. विरुध्दपक्ष क्र. 2 ने त्यांचा लेखी जबाब निशाणी 18 ला दाखल करुन तक्रारीतील परिच्छेद 1 ते 2 मधील सर्व म्हणणे अमान्य करुन, परिच्छेद 3 हा अंशतः मान्य केला. पुढील परिच्छेद 4 ते 11 मधील सर्व म्हणणे नाकबुल केले. विरुध्दपक्ष क्र. 2 ने अतिरिक्त जबाबात नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत एजंट असल्याचे मान्य करुन, विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे सब एजंट होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 3 विरुध्द, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे व त्यांचे आर्थिक व्यवहार योग्य
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..6..
नसल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 हेच सर्व ग्राहकांना सेवा देऊन त्यांचे समाधान करीत असल्याचे म्हटले व विरुध्दपक्ष क्र. 3 कडे असलेले सब डिलरशिप काढून घेतल्याचे म्हटले. तसेच तक्रारदार यांना गाडीचे योग्य कागदपत्र विरुध्दपक्ष क्र. 3 ने न पुरविल्यामुळे त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 3 हेच जबाबदार आहे. त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 चा काहीही संबंध येत नाही.
8. विरुध्दपक्ष क्र. 2 ने पुढे अधिक स्पष्टीकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 प्रमाणेच जबाब सादर करुन, तक्रारदाराला योग्य सेवा दिल्याचे म्हटले व तक्रारदाराने वि. मंचाकडून सत्य गोष्टी लपवुन ठेऊन ते स्वच्छ हाताने वि. मंचाकडे न आल्याचे म्हटले व अशा प्रकारे तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती वि. मंचाकडे केली.
9. तक्रारदाराने निशाणी 22 प्रमाणे प्रतिउत्तर दाखल करुन, विरुध्दपक्ष 1 व 2 चे लेखी जबाबातील सर्व म्हणणे नाकबुल करुन, त्यांच्या मुळ तक्रारीतील कथनाचा पुर्नरुच्चार केला.
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..7..
10. वरील प्रमाणे तक्रारदाराचा अर्ज व सादर केलेले दस्त, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब व सादर केलेले दस्त, तक्रारदाराचे प्रतिउत्तर, उभय पक्षकारांच्या वकीलांचा लेखी व तोंडी युक्तीवाद, यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारात घेतली.
मुद्दे उत्तर
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी
केल्या आहेत का ? ... होय
- तक्रारदार हा नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहे का ? ... होय
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
11. विरुध्दपक्ष 1 तर्फे अॅड. गायकवाड यांनी त्यांच्या लेखी व तोंडी युक्तीवादात त्याच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन काही सायटेशन दाखल केले आहेत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..8..
12. विरुध्दपक्ष 2 तर्फे अॅड. श्री. लखोटीया यांनी तोंडी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन कथन केले की, तक्रारदाराच्या गाडीचे रजिस्ट्रेशन व इतर कागदपत्रे देणे हे विरुध्दपक्ष 3 चे कर्तव्य असुन विरुध्दपक्ष 2 त्यासाठी जबाबदार नाही तसेच विरुध्दपक्ष 2 ने विरुध्दपक्ष 3 विरुध्द इतर ब-याच तक्रारी प्राप्त झाल्यामुळे व चुकीच्या आर्थिक व्यवहारामुळे त्यांची सब डिलर शिप रद्द केल्याचे म्हटले व त्यासाठी निशाणी 24 प्रमाणे दस्त सादर केले. सदर तक्रार विरुध्दपक्ष 2 विरुध्द रद्द करण्याची मागणी केली.
13. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. रामेकर यांनी तोंडी युक्तीवादात त्यांच्या मुळ तक्रारीतील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन कथन केले की, सदर गाडी आजही नादुरुस्त अवस्थेत असुन तिचा तक्रारदाराला काहीही उपयोग नाही व विनंती मधील प्रार्थने प्रमाणे मागणी मान्य करण्याची विनंती वि. मंचाकडे केली.
14. मुद्दा क्र. 1 चा विचार करता तक्रारदाराने सदर गाडी निशाणी 2/11 प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दि. १९.४.२०१४ रोजी रु. ५०,०००/- व दि. २४.४२०१४ रोजी रु. ६,२००/- असे एकूण
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..9..
रु. ५६,२००/- जमा केल्याचे दिसते व विरुध्दपक्ष क्र. 2 ने रु. ५०,८५०/- ची गाडीच्या मुळ किंमतीची पावती नं. ३१२३ दि. १२.६.२०१४ रोजी तक्रारदाराला दिल्याचे दिसते. याचा अर्थ विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारदाराकडून रु. ५,३५०/- जास्त घेतले. एवढी रक्कम जास्त घेवूनही तक्रारदाराच्या गाडीचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन विरुध्दपक्ष क्र. 3 ने करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराची गाडी पोलिसांनी दोन वेळा चलान करुन तक्रारदाराकडून दंड वसुल करण्यात आला तसेच विना रजिस्ट्रेशनची गाडी रस्त्यावर चालविल्यामुळे नक्कीच तक्रारदाराला शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागला. सदर गाडीचे रजिस्ट्रेशन न केल्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 कडे करुन त्यांनी सुध्दा तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेतली नाही. वास्तविक विरुध्दपक्ष क्र. 3 ने विरुध्दपक्ष क्र. 2 ला तशा सूचना देणे आवश्यक होते. उलट विरुध्दपक्ष क्र. 3 विरुध्दच्या तक्रारीमुळे त्यांची डिलरशीप रद्द करण्यात आली तरी पण विरुध्दपक्ष क्र. 2 हे गाडीचे मुख्य वितरक असल्यामुळे, सदर रजिस्ट्रेशनची जबाबदारी
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..10..
झटकु शकत नाहीत व हया एक प्रकारच्या विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ने केलेल्या सेवेत त्रुटी आहेत.
15. तक्रारदाराच्या तक्रारी प्रमाणे सदर गाडीमध्ये विकत घेतल्यापासुन त्यात दोष आढळुन आलेत. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ने सादर केलेल्या दस्त 17/2 ते 17/4 वरुन असे दिसुन येते की, तक्रारदाराने फ्री सर्व्हीसिंगचा शेडयुल फायदा घेतला नाही व तक्रारीमध्ये गाडी किती कि.मी. चालली हयाविषयी कोठेही उल्लेख केला नाही. परंतु सदर जॉब कार्डवरुन गाडी दि. १०.७.२०१४ पर्यंत १६७९ कि.मी. वापरल्याचे दिसुन येते. परंतु सदर गाडीमध्ये असलेला Vibration & Pickup चा दोष जर आजही अस्तित्वात असेल तर तो विरुध्दपक्ष क्र. 2 ने विनामुल्य काढुन देणे योग्य राहील असे वि. मंचाला वाटते. कारण सदर दोष काढण्यासाठी तक्रारदाराला विरुध्दपक्ष क्र. 2 किंवा विरुध्दपक्ष क्र. 3 कडून योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही असे तक्रारदाराच्या तक्रारी वरुन दिसुन येते. परंतु सदर गाडी मधे निर्मीती दोष होता हे तक्रारदाराने पुराव्यासह सिध्द केले नाही हया विरुध्दपक्ष क्र. 1
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..11..
व 2 च्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात येतो. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 ने सादर केलेले त्यांचे इंजिनिअरचे शपथपत्र यावरुन सिध्द होते की, सदर गाडीमध्ये निर्मीती दोष नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने मागणी केलेली सदर गाडीची पूर्ण रक्कम तक्रारदाराला परत देणे हे न्यायोचित होणार नाही. वरील सर्व विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 व 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
16. विरुध्दपक्ष क्र. 3 यांची सदर डिलरशिप, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी रद्द केल्यामुळे तक्रारदाराच्या गाडीचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन करुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 2 वर येते. वरील सर्व विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराच्या गाडीचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन, तक्रारदाराकडून कोणतीही शुल्क न घेता करुन द्यावे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 242/2014
..12..
- तक्रारदाराच्या गाडी मध्ये Vibration चा दोष असल्यास विरुध्दपक्ष क्र. 2 ने तो विनामुल्य काढून द्यावा.
- तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु. ५,०००/- व तक्रार खर्च रु. २,०००/- असे एकूण रु. ७,०००/- विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तरित्या तक्रारदाराला अदा करावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द काहीही आदेश नाही.
- वरील आदेशाचे पालन, निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे, अन्यता नुकसान भरपाई रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने, तक्रारदार हा व्याज वसुल करण्यास पात्र राहील.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 08/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष