जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/185 प्रकरण दाखल तारीख - 20/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य सौ.सत्वशीला भ्र.दिनकर अडकीणे, वय वर्षे 38, धंदा शेती, अर्जदार. रा.मठगल्ली,मुदखेड, रेल्वे जंक्शन, जि.नांदेड. विरुध्द. 1. महिंद्रा ट्रक्टर्स, गैरअर्जदार. महिंद्रा अड महिंद्रा कंपनी, शेतकरी अवजार क्षेत्र नोंदणीकृ, कार्यालय,गट वे बिल्डींग, अपोलो बंदर, मुंबई – 400 001. 2. रेन्बो ट्रॅक्टर्स, सांगवी बु. हिंगोली रोड, नांदेड ता.जि.नांदेड. 3. प्रविण नल्ला, सेल्स मॅनेजर, रेन्बो ट्रॅक्टर्स सांगवी बु. नांदेड ता.जि.नांदेड. 4. मॅनेजर, प्रिमीअर अटो वर्क्स, बाफना मोटर्सच्या समोर, हैद्राबाद रोड,नांदेड. 5. बॉशा लिमीटेड, 79,डॉ.अनी बेझंट रोड, हैद्राबाद रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. संतोष जोगदंड गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील. - अड. शब्बीर पटेल. गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड. मु.अ.कादरी गैरअर्जदार क्र. 4 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. गैरअर्जदार क्र. 5 - एकतर्फा निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्य) अर्जदार ही शेतकरी असुन मुदखेड तालुक्यात तीची शेती आहे. त्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन ट्रॅक्टर घेतले त्या ट्रॅक्टरमधे दिलेले वॉरंटीत अर्जदाराची ट्रॅक्टर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले तो गैरअर्जदार यांनी चालु करुन न दिल्यामुळे अर्जदार हीने सदरील केस मंचा समोर दाखल केली. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हीस मुदखेड तालुक्यात गट नं.340 आणि 341 शेती आहे. अर्जदार हिने आपल्या शेती उपयोगासाठी ट्रॅक्टर घेण्याचे ठरवले. अर्जदाराने रेन्बो ट्रॅक्टर सांगवी बु पोष्ट तरोडा खु हिंगोली रोड नांदेड यांच्याकडुन दि.28/03/2008 रोजी रु.8,78,000/- या किंमतीत खरेदी केले आणि त्याची रक्कम दि.20/08/2008 रोजी अदा केली ज्याचा पावती क्र.395 व इंजिन क्र. एन.पी.एम. यु.664 असा आहे. अर्जदाराने सदरील ट्रॅक्टर बजाज अलाएंन्ज जनरल इंशुरन्स कंपनीकडुन विमा उतरवला होता. ज्याचा हप्ता रु.8,861/- भरला आहे आणि विमा कालावधी 28/03/2008 ते 27/03/2009 च्या मध्यरात्रीपर्यंत होता. सदरील ट्रॅक्टरमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस काही तांत्रिक बिघाड आल्याचे अर्जदाराच्या लक्षात आले ज्यामुळे सदरील ट्रॅक्टर बंद पडले. अर्जदाराने सदरील ट्रॅक्टर बंद पडल्याची तक्रार गैरअर्जदार क्र. 2 रेन्बो ट्रॅक्टरर्स यांचेकडे नोंदविली. तक्रारीवरुन गैरअर्जदार क्र. 2 ने त्यांच्या मेकॅनिक अर्जदाराच्या शेतात ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी पाठवला. सदरील मेकॅनिक अर्जदाराच्या शेतात नादुरुस्त ट्रॅक्टर चालू करु शकला नाही आणि त्याने अर्जदारास ट्रॅक्टरचे बुशपंपसेटमध्ये दोष असल्याचे लक्षात आणुन दिले. मेकॅनिकने अर्जदारास सांगीतले की, सदरील दोष असलेला बुशपंपसेट ट्रॅक्टर शोरुमच्या गॅरेजमध्ये काढुन नेल्याशिवाय दुरुस्त होऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे मेकॅनिकने बुशपंपसेट ट्रॅक्टरमधुन काढले आणि गैरअर्जदार क्र. 2 यांच्या शोरुममध्ये दुरुस्तीसाठी नेले आणि दोन दिवसांच्या आत अर्जदाराचे ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. अर्जदाराने सदरील ट्रॅक्टर वॉरंटीच्या कालावधीत आहे असे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या निदर्शनास आणुन दिले आणि सदरील वॉरंटीचा कालावधी 27 मार्च 2010 मधे संपतो. त्यामुळे सदरील ट्रॅक्टर हे वॉरंटी पिरेडमध्ये असल्याने ते विनामुल्य दुरुस्त करुन द्यावे अशी विनंती केली. परंतु गैरअर्जदार क्र. 2 शोरुमचा मालक यांनी वॉरंटी पिरेडच्या कागदपत्राची पाहणी न करता त्यावर डोळेझाक करुन अर्जदारास दुरुस्तीचा खर्च म्हणुन रु.5,000/- लागतील असे सांगीतले. अर्जदाराच्या शेतात गव्हाचे पिक कापणीसाठी आणि मळणीसाठी आल्याने त्यास सदरील ट्रॅक्टरची मळणयंत्र चालविण्यासाठी अत्यंत आवश्यकता होते. परंतु गैरअर्जदारानी अर्जदाराच्या याचेनेची कोणतीही दखल घेतली नाही. अर्जदारास त्याच्या गव्हाच्या कापणी आणि मळणीसाठी आणि इतर शेतक-याच्या मळणीचा मोबदला म्हणुन रु.5,000/- प्रमाणे आर्थीक नुकसान झाले आणि मिळणारे उत्पन्न होऊ शकले नाही. सदरील बुशपंपसेट गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 4 यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला त्यानुसार गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदाराला दि.13/03/2009 रोजी जॉब कार्ड दिले. गैरअर्जदारांनी पुरविलेला सदोष पंपसेटमुळे अर्जदाराचे ट्रॅक्टर आणि मळणीयंत्र बंद ठेवावे लागले ज्यामुळे अर्जदाराच्या गव्हाच्या पिकाची मळणी वेळेमध्ये करता आली नाही. ज्यामुळे अर्जदाराला मजुरीशिवाय पर्याय राहीला नाही. म्हणुन अर्जदारास त्याच्या पिकाच्या मळणीसाठी खर्च आणि मजुरीसाठी रु.25,000/- आला. अर्जदारास दुरुस्ती खर्च रु.4,242/-, गव्हाच्या मळणीचा आणि मजुरांचा खर्च रु.25,000/-, पेरणी नांगरणी आणि मशागतीचा खर्च रु.25,000/-, मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्यल रु.25,000/- इतर कामाचा मोबदला रु.10,000/- , दाव्याचा खर्च रु.5,000/- अशी एकुण रक्कम रु.94,242/- खर्च आला. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराकडुन नुकसान भरपाई पोटी रु.94,242/- देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1,2, व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मंचासमारे दाखल केले ते असे की, अर्जदारास गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कारण नाही व म्हणुन सदरील तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदाराने मुळ बॉश पंप कंपनीला सदरील तक्रारीमध्ये पार्टी केलेले नाही व ती आवश्यक पार्टी आहे त्यांना पार्टी न केल्यामुळे तक्रार खारीज करावी. गैरअर्जदार क्र. 2 हा महेंद्रा अण्ड महेंद्रा कंपनीचा नांदेडचा डिलर आहे त्यांनी कसल्याच प्रकारचा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही किंवा सेवेमध्ये कमतरता केलेली नाही. म्हणुन सदरची तक्रार टेक्नीकल नाही, करीता तक्रार खारीज करावी. गैरअर्जदार हा महेंद्रा कंपनीचा डिलर आहे व अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन ट्रॅक्टर खरेदी केलेला नाही. अर्जदाराने बजाज अलायंजा कंपनीकडे सदरील ट्रॅक्टरचा विमा उतरविला हे गैरअर्जदारास मान्य आहे. अर्जदाराच्या अर्जाचा विचार करुन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी तत्परतेने प्रयत्न केलेले आहेत. अर्जदाराचे हे म्हणणे बरोबर आहे की, बॉश पंप नादुरुस्त झालेला होता. अर्जदाराचे हे म्हणणे मान्य आहे की,गैरअर्जदाराकडे बॉश पंप दुरुस्तीसाठी दिला होता. अर्जदाराने ट्रॅक्टरचे बॉश पंप दुरुस्तीसाठी आणले व सदरील बॉश पंप गैरअर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 कडे दुरुस्तीसाठी योग्य वेळेत पाठवीले परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 ला रु.4,242/- दिले याची माहीती गैरअर्जदारास नाही. गैरअर्जदार हा नांदेड महेंद्रा अण्ड महेंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरचा डिलर असुन त्यांने अर्जदारास अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर विकला होता. सदरील ट्रक्टरचा काही काळ अर्जदाराने उपभोग घेतल्यानंतर ट्रॅक्टरचा बॉश पंप नादुरुस्त असल्याची तक्रार आल्यांनतर गैरअर्जदाराने सदरील बॉश पंप तात्काळ वॉरंटी कालामध्ये कपंनीचे डिलर गैरअर्जदार क्र. 4 कडे दुरुस्तीसाठी पाठविला.गैरअर्जदार क्र. 4 ने सदरील बॉशपंप वॉरंटीच्या काळात सदरील बॉशपंपची तपासणी करुन वॉरंटी टर्म अण्ड कंडशिनमध्ये सदरील बॉश पंप येत नसल्याने व उत्पादनातील दोष मध्ये येत नसल्याने गैरअर्जदार क्र.4 ने बॉश पंप उत्पादकाच्या ठरवून दिलेल्या अटी प्रमाणे बॉश पंप डिलेव्हर वॉल वॉरंटीमध्ये बदलून दिलेले नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराचे सेवेमध्ये कमतरता केलेली नाही. अर्जदाराने जाणुन बूजून बॉश कंपनीच्या मुळ उत्पादक कंपनीला पार्टी न करता व गैरअर्जदाराला काही एक दोष नसतांना त्यास त्रास देण्याचे उद्येशाने चुकीचा तक्रारअर्ज दिला आहे. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळून लावावा. गैरअर्जदार क्र. 4 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हा ग्राहक या व्याखेत बसत नसल्यामुळे त्यांची तक्रार खारीज करावी सदरील प्रकरणांमध्ये अर्जदार व त्यांचे साक्षीदार यांची साक्ष नोंदवीणे व जिरा करणे जरुरी आहे व म्हणुन सन्मानीय मंचास सदरचे प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही व म्हणुन तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदाराने बॉश पंप कंपनीला सदरील तक्रारीमध्ये पार्टी केलेले नाही व ती आवश्यक पार्टी आहे. अर्जदाराने त्यांना पार्टी न केल्यामुळे तक्रार खारीज करावी. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 कडे दि.13/03/2009 रोजी बॉश पंप घेऊन आले होते. गैरअर्जदार क्र. 4 यांनी त्याच दिवशी त्यांचे जॉब कार्ड तयार केले. गैरअर्जदाराने बॉश पंप तपासुन पाहिले असता, गैरअर्जदाराच्या असे निदर्शनास आले की, बॉश पंपचा इलिमेंट डिलेव्हर वॉल काळा झालेला होता व सदरचा इलिमेंट जाम झालेला होता. इलिमेंट डिलेव्हर वॉल काळा पडण्याचे कारण डिझेलमध्ये खराब डिझेल वापरणे, डिझेल फिल्टर वेळेवर न बदलणे किंवा डिझेल मध्ये कचरा येणे. डिझेलमध्ये पाणी येणे किंवा पंपमध्ये डिझेल व्यतिरिक्त फॉरेन मटेरियन येणे असे आहेत. इलिमेंट डिलेव्हरी वॉल काळा होणे व जाम होणे हा उत्पादनातील दोषामध्ये येत नाही. म्हणुन बॉश पंप उत्पादकाने ठरवून दिलेल्या वॉरंटी टर्मस अण्ड कंडशिनमध्ये बसत नाही व म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 यांनी उत्पादकाच्या ठरवून दिलेल्या अटी प्रमाणे बॉश पंप डिलेव्हरी वॉल वॉरंटीमध्ये बदलून दिलेले नाही. अर्जदाराने उत्पादक कंपनी बॉश पंप यांना पार्टी करणे जरुरी आहे आणि त्यांनी मंचासमोर आपली भुमीका मांडली असती व जर त्यांनी पार्ट बदलून दिल्यास गैरअर्जदारास हरकत नाही. पण गैरअर्जदार क्र.4 हा स्वतः होऊन पार्ट बदलून देऊ शकत नाही व जर मंचाने तसे आदेश केल्यास उत्पादक पार्टी नसल्यमुळे त्याचा भुर्दंड अर्जदार क्र. 4 यांच्यावर कोणतेही कारण नसतांना पडेल व म्हणुन उत्पादकास पार्टी करण्याचे आदेशीत करावे. गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन फक्त पार्टचे पैसे घेतलेले आहेत व लेबर चार्जेस घेतलेले नाहीत. सदरचा पार्ट वॉरंटीमध्ये बसत नसल्यामुळे पार्टची किंमत घेण्याचा गैरअर्जदारास अधिकार आहे व गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापार प्रथेचा वापर केलेला नाही म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 5 यांना या मंचाद्वारे नोटीस देण्यात आली, त्यांनी हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यानी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांना दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय ? होय 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार हीने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडुन महिंद्रा अण्ड महिंद्रा कंपनीचे अर्जुन ट्रॅक्टर 30 ऑगष्ट 2008 रोजी घेतले. याबद्यल अर्जदार व गैरअर्जदारामध्ये कुठलाही वाद नाही म्हणुन मुद्य क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 व 3 – अर्जदार ही गेले 20-25 वर्षा पासुन शेती व्यवसायात आहे तीचे स्वतःचे शेत मुदखेड तालुक्यात असुन गट क्र.340 व 341 आहे. अर्जदाराने रेन्बो ट्रॅक्टर सांगवी (बु) हिंगोली रोड यांच्याकडुन दि.28/03/2008 रोजी रु.8,78,000/- या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी केला. सदरील ट्रॅक्टर खरेदीची किंमत अर्जदाराने दि.30/08/2008 रोजी अदा केले. ट्रॅक्टरचे चेसीज क्र. एनएपीयू 664 असा आहे. सदरील ट्रॅक्टरचे अर्जदाराने बजाज अलायंस कंपनीकडे विमा उतरविला होता व ते दर महा रु.8,861/- हप्ता भरत होता. सदरील विम्याचा कालावधी दि.28/03/2008 ते 27/03/2009 च्या मध्यरात्रीपर्यंत होती. दि.30/08/2008 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना ट्रॅक्टरची किंमत दिली. सदरील ट्रॅक्टरमध्ये फेब्रुवारी महिन्या सुरुवातीस उत्पादीत बिघाड झाल्याचे अर्जदाराच्या लक्षात आले. सदरील ट्रॅक्टर बंद पडले म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या मेकॅनिकला अर्जदाराच्या शेतात ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी पाठविले व ट्रॅक्टर चालु झाले नाही. मेकॅनिकने अर्जदाराचा ट्रॅक्टरचा बॉश पंपसेट मध्ये दोष असल्याने सदरील ट्रॅक्टर बॉश पंपसेट काढुन नेल्या शिवाय दुरुस्ती होऊ शकत नाही, असे सांगीतल्यामुळे अर्जदाराने मेकॅनिककडे बॉशापंपसेट काढुन दिले व गैरअर्जदार क्र. 2 रेन्बो ट्रॅक्टर यांचेकडे दुरुस्तीसाठी नेले व दोन दिवसात दुरुस्ती करुन देतो असे सांगीतले. त्यावेळी अर्जदाराने मेकॅनिकच्या लक्षात आणुन दिले होते की, सदरील ट्रॅक्टर हे वॉरंटी कालावधीत आहे. दोन दिवसानंतर गैरअर्जदार क्र. 2 यांच्या मालकाने वॉरंटी कालावधीची कागदपत्राची पाहणी न करता अर्जदाराचे बॉशपंप दुरुस्तीचा खर्च म्हणुन रु.5,000/- ची मागणी केली. अर्जदाराच्या शेतातील गव्हाचे पिक कापणी व मळणीसाठी आल्याने ट्रॅक्टरची अत्यंत आवश्यकता होती तरीही गैरअर्जदार यांनी शेतक-याची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अर्जदाराचे बरेच नुकसान झाले. शिवाय दि.16/03/2009 रोजी रु.4,312/- ट्रकच्या दुरुस्तीचा खर्च म्हणुन अर्जदारास विना कारण भरावे लागले. तसेच अर्जदाराची ट्रॅक्टर चालू नसल्यामुळे मजुरांना रु.25,000/- कामाचा मोबदला द्यावा लागला. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेल्या चुकीच्या सेवेमुळे अर्जदाराचे आर्थीक व शारीरिक झाले. गैरअर्जदार क्र. 5 बॉश लिमीटेड ही कंपनी महत्वाची पार्टी असुन ती बॉश पंपसेटची मुळे उत्पादक आहे. म्हणुन बॉशा पंपसेट बिघडण्यास ते जबाबदार आहेत. चांगल्या कंपनीचे चांगल्या प्रतीचे पंपसेट महिंद्रा अण्ड महिंद्रा बॉश कंपनीकडे सदरील ट्रॅक्टरमध्ये वापरावयास हवे होते. अर्जदाराकडुन घेतलेला खर्च रु.4,312/- हे बेकायदेशिररित्या घेऊन गैरअर्जदारांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे. त्याबद्यल मानसिक त्रास म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 ते 5 कडुन रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. दुरुस्ती खर्च गव्हाची मळणी , मंजुराचा खर्च, नांगरणी आणि मानसिक व शारिरीक त्रासापोटी इतर कामाचा मोबदला द्यावा लागला असे एकुण रु.94,242/- गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदारास द्यावेत, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. सदरील तक्रारीसोबत अर्जदाराने ट्रॅक्टर खरेदीची पावती जोडलेली आहे तसेच त्यांस दिलेले चेकची झेरॉक्स जोडलेली आहे. बजाज एलायंज जनरल इंशुरन्स कंपनीने काढलेला विमा पॉलिसीचे झेरॉक्स जोडलेली आहे. बॉश कंपनीकडुन बॉश पंपसेट दुरुस्त करुन आल्यानंतर अर्जदाराने त्याची पावती जोडलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे मांडलेले आहे, त्यामध्ये अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 यांच्यामध्ये व्यवहार झालेला असल्यमुळे गैरअर्जदार क्र. 1 यांना कुठली घटनेची माहीती नाही. त्यामुळे सदर घटनेशी कुठलाही संबंध नाही व विना कारण दाव्यात गुंतविल्यामुळे त्यांना वीशेष नुकसान भरपाई अर्जदाराकडुन मागीतले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे व शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे बॉश पंप तयार करणारी कंपनी हीला तक्रारीमध्ये पार्टी करणे आवश्यक आहे ती पार्टी न केल्यामुळे सदरील तक्रार रद्य करण्यात यावे व सदरचा दोष हा उत्पादीत दोषनाही व गैरअर्जदार क्र.2 महिंद्रा अण्ड महिंद्रा कंपनी यांनी कुठलाही अनूचीत व्यापार केलेला नाही तसेच बॉश पंप गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 4 कडे दुरुस्तीसाठी पाठविला त्या वेळेस त्यांनी गैरअर्जदार क्र. 5 यांनी रु.4,242/- घेतले याची माहीती त्यांना नव्हती. गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणणे असे की, अर्जदाराने सदरील ट्रॅक्टरचा काही काळ उपयोग घेतलेला आहे. गैरअर्जदार यांनी सदरील बॉश पंप नादुरुस्त झाला अशी तक्रार आल्यामुळे गैरअर्जदाराने सदरील बॉशपंप वॉरंटी कालावधीमध्येच कंपनीचे डिलर गैरअर्जदारक्र. 4 यांचेकडे पाठविला होता. गैरअर्जदार क्र. 4 यांनी सदरील बॉश पंप वॉरंटीच्या कालावधीत तपासणी करुन वॉरंटी टर्म अण्ड कंडीशन मध्ये येत नसल्यामुळे व उत्पादीत दोष या मध्ये येत नसल्यमुळे बॉश पंप डिलर वॉरंटीमध्ये बदलून दिला नाही. म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 यांचे म्हणणे असे की, बॉश पंप हे बॉश पंप कंपनीची उत्पादीत दोष नसल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास त्रुटीयुक्त सेवा दिली नाही. म्हणुन अर्जदाराची तक्रार फेटाळुन लावावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक नाही म्हणुन ही तक्रार गैरअर्जदार क्र. 4 यांच्या विरुध्द चालु शकत नाही. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दि.13/03/2009 रोजी अर्जदार बॉश पंप घेऊन आला होता व त्याच दिवशी त्याचा जॉबकार्ड तयार केला. गैरअर्जदार यांनी बॉश पंप पाहीला असता गैरअर्जदाराचे असे निदर्शनास आले की, बॉश पंपची इलिमेंट डिलीवरी वॉल काळा झालेला होता व सदरचे इलिमेंट जाम झाला होता. इलिमेंट डिलीवरी वॉल काळा पडण्याचे कारण डिझेलमध्ये खराबी डिझेल फिल्टर वेळेवर न बदलणे किंवा डिझेलमध्ये पाणी येणे किंवा डिझेल व्यक्तिरिक्त फॉरेन मटेरियल येणे व जाम होणे हे उत्पादीत दोष या सदरात मोडत नाही म्हणुन उत्पादकाने ठरवून दिलेले वॉरंटी टर्म अण्ड कंडीशनमध्ये बसत नाही. म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 यांना बॉश पंप डिलेव्हरी वॉल वॉरंटीमध्ये बसवुन दिला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडुन फक्त पार्टचे पैसे घेतले आहे लेबर चार्जेस घेतले नाही. म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 यांच्या विरुध्द अर्जदारास काहीही मागण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार यांचे शपथपत्र व लेखी जबाब पहाता, गैरअर्जदार हे त्यांचे वरील जाबाबदारी झटकुन टाकण्याच्या प्रयत्नात आहेत असे वाटते. ट्रॅक्टर खरेदीचा दिनांक व वॉरंटी कालावधी हे दोन्ही गोष्टी अर्जदाराने मंचासमोर आणलेले आहे. बॉश पंप नादुरुस्त होणे हे वॉरंटी कालावधीतच येत आहे हे अगदी स्पष्ट आहे. गैरअर्जदाराने कथन केले की, सदरील बॉश पंप काळा पडला डिझेलमधील खराबी किंवा फॉरेन पार्ट आत जाणे किंवा डिझेलमध्ये पाणी जाणे यामुळे वॉल खराब होतो व कुठलेही यंत्र खरेदीच्या वेळी दिलेली वॉरंटी कालावधी हे महत्वाचे असून त्यात जी खराबी झाली तीची भरपाई करुन देण्याचे कर्तव्य हे गैरअर्जदाराचे निश्चितच आहे. तो पार्ट कोणत्या कारणामुळे खराब झाला हा मुद्या या ठिकाणी गौण आहे. कारण वॉरंटी कालावधीत काही पार्टची खराबी होईल ते भरुन देण्याचे जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. गैरअर्जदार क्र. 4 असे म्हणतात की, ही त्यांचे ग्राहक नाही व महिंद्रा अण्ड महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टर बनवित असतांना बॉश पंप हा पार्ट त्यांनी गैरअर्जदार क्र. 5 यांच्याकडुन घेतलेला आहे व त्यांची दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट हे गैरअर्जदार क्र. 4 यांना गैरअर्जदार क्र. 2 यांनी सांगतीलेले ट्रॅक्टरची खरेदी ही गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे केलेली असल्यामुळे त्याची सर्व जबाबदारी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र.4 हे स्वतःवरची जबाबदारी झटकु शकत नाही. म्हणुन बॉशपंप दुरुस्ती खर्च देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.1,2,4,5 यांची आहे. या निणर्यापर्यंत हे मंच आलेले आहे. बॉश पंप नादुरुस्त झाल्यामुळे अर्जदारास गव्हाच्या पिकाची मळणी, मंजुराचा खर्च, रु.3,000/- इतर कामाचा खर्च रु.2,000/- व दावा खर्च व मानसिक त्रास रु.5,000/- व बॉश पंप दुरुस्ती खर्च रु.4,242/- एवढी रक्कम गैरअर्जदार क्र. 1,24,5 यांनी संयुक्तरित्या अर्जदारास एक महिन्याचे आत द्यावी. अन्यथा 9 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत एक महिन्यानंतर झालेल्या विलंबापर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावी. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदारास गैरअर्जदार क्र.1,2,4,5 यांच्याकडुन रु. 14,242/- एक महिन्याच्याय आंत द्यावे. एक महिन्यानंतर दिल्यास सर्व रक्कमेवर रक्कम फिटेपर्यंत 9 टक्के व्याज गैरअर्जदारानी अर्जदारास द्यावी. 3. उभय पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |