(मा.सदस्य अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून कर्ज रकमेचा हिशेब मिळावा, सामनेवाला यांनी अर्जदार यांचे मालकीचे वर नमूद केलेले वाहन एम एच 15 सी डी 9274 हे जप्त करु नये असा आदेश द्यावा, सामनेवाला कडे कर्ज रकमेपोटी भरलेली जास्तीची रक्कम अर्जदार यांना परत देण्याबाबत आदेश व्हावा, अर्जदार यांनी घेतलेल्या कर्ज रकमेवर सरळ व्याज आकारण्याबाबत आदेश व्हावेत, तक्रारीचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. अर्जदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेणेस पात्र आहे काय? असे आदेश दि.28/03/2012 रोजी करण्यात आलेले आहेत. अर्जदार हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. अर्जदार यांनी पान क्र.1 लगत तक्रार अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र, पान क्र.3 चे यादीसोबत पान क्र.4 ते 8 लगत कागदपत्रांच्या मुळ अस्सल प्रती दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांचे तक्रार अर्ज विनंती कलम 11 मधील मागणी व तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील संपुर्ण कथन याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून कर्जाऊ रकमेबाबतचा हिशेब मागीत आहेत तसेच कर्जाचेपोटी भरलेली जास्तीची रक्कम परत मागीत आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार यांनीच पान क्र.4 सोबत कर्जाऊ रकमेबाबतचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. या स्टेटमेंटचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना कर्जाऊ रकमेबाबतचे हिशेबाचे स्टेटमेंट दिलेले आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. या स्टेटमेंटमध्ये व्याजाचा हिशेबही दिलेला आहे असे दिसून येत आहे. पान क्र.4 ते पान क्र.6 लगतच्या स्टेटमेंटचा विचार होता अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द दाद मागण्यास कारणच राहीलेले नाही हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी सेवेत कोणत्या प्रकारची कमतरता केलेली आहे याबाबतची कोणतीही दाद अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये मागीतलेली नाही. अर्जदार हे हिशेबाबतची व जादा भरलेली रक्कम परत मिळावी याबाबतची मागणी करीत आहेत. ही बाब तक्रार अर्जातील मागणीवरुन स्पष्ट झालेली आहे म्हणजेच अर्जदार हे सामनेवाला यांचेविरुध्द दिवाणी स्वरुपाची दाद मागत आहेत असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. जरुर तर अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द योग्य त्या दिवाणी कोर्टात दाद मागावी असेही या मंचाचे मत आहे याबाबत मंचाचे वतीने पुढील प्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 2(2011) सिपीजे महाराष्ट्र राज्य आयोग पान 55 दयाराम भिका अहिरे नाशिक विरुध्द कोटक महिंद्रा बँक लि.शाखा नाशिक अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, मंचाचे वतीने आधार घेतलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. |