- आदेश निशाणी क्र. 1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 5 ऑक्टोंबर 2013)
किरकोळ प्रकरण क्र.2/2013 व सोबत मुळ तक्रार क्र.6/2013 अंतर्गत ना-देय-प्रमाणपञ व मानसिक, शारिरीक, आर्थिक ञासापोटी व तक्रार खर्च मिळण्यासाठी दाखल केली आहे. आदेश खालील प्रमाणे पारीत.
गैरअर्जदारास नोटीस मिळून वकीलांमार्फत हजर झाले. परंतु, सदर विलंब माफीच्या अर्जास उत्तर दाखल केले नाही. सबब गैरअर्जदाराच्या उत्तराशिवाय सुनावणीसाठी अर्ज पुढील तारखेवर ठेवण्यात यावे असे आदेश नि.क्र.1 वर पारीत केले.
सदर आदेश पारीत झाल्यावर गैरअर्जदार व अर्जदार यांनी अनुक्रमे नि.क्र.14 व 15 पुरसीस दाखल केल्याने वरील आदेश मागे घेवून उचित आदेश पारीत करण्यांत आला आहे.
गैरअर्जदाराने नि.क्र.14 प्रमाणे पुरसीस दाखल करुन मुळ तक्रार अर्जात मागणी केलेले मुळ ना हरकत प्रमाणपञ अर्जदाराचे स्वाधीन केल्याचे कळविले आहे.
अर्जदाराने नि.क्र.15 प्रमाणे पुरसीस देवून गैरअर्जदारांकडून तक्रार अर्जात मागणी केलेले मुळ ना हरकत प्रमाणपञ मिळाले असल्याने सदर तक्रार व विलंब माफीचा अर्ज पुढे चालवावयाचा नसल्याचे सांगितले.
अर्जदाराची मागणी गैरअर्जदाराने पूर्ण केली असल्याने व अर्जदारास मुळ तक्रार अर्ज आणि विलंब माफीचा अर्ज पुढे चालविण्याचा नसल्याने विलंब माफीचा अर्ज व मुळ तक्रार अर्ज नस्ती करण्यांत येत आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.
सदर आदेश प्रत अर्जदार व गैरअर्जदार यांना पुरवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 5/10/2013