Maharashtra

Chandrapur

CC/15/70

Sau Thamabai Balaji Kashti, At Khambada - Complainant(s)

Versus

Mahindra And Mahindra Ltd - Opp.Party(s)

Adv. Avinash Thawari

07 Apr 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/70
( Date of Filing : 15 May 2015 )
 
1. Sau Thamabai Balaji Kashti, At Khambada
At khambada Tah warora
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mahindra And Mahindra Ltd
Farm Equipment Sector Swaraj Divison Through managnh Director Phase IV Sahibzada Ajitsingh Nagar District SAS Nagar (Panjab) 160 055
Pnajab
Panjab
2. M/s Anijikar Automobiles Nagpur Road Chandrapur
Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. Branch Manager ICICI Bank Civil Line Nagpur
civil line Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Apr 2018
Final Order / Judgement

::: न्यायनिर्णय :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  उमेश वि. जावळीकर मा. अध्‍यक्ष

१.         गैरअर्जदार यांनी अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार वाहन विक्री व दुरुस्ती कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

 २.        अर्जदार शेतीचा व्यवसाय करते. गैरअर्जदार क्र. १ ट्रॅक्टर, शेतीचे व इतर उपकरणे उत्पादित करून विकण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार क्र. २ चंद्रपूर येथे सदर उपकरणे विक्रीचे अधिकृत विक्रेता आहेत. अर्जदार सन २०१३ मध्ये माहेरी चारगांव  येथे राहत असताना गैरअर्जदार क्र. २ यांनी ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर व इतर शेतीचे उपकरणे, अवजारे विकण्याचा कॅम्प तेथे लावला होता. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडे संपर्क करून ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर घेण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र. २ यांनी स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व शक्तीमान कंपनीचे रोटाव्हेटर विकत घेण्याची विनंती करून त्यावर अनेक योजना, सुविधा, बँकेचे कर्ज तसेच ट्रॅक्टरवर तसेच रोटाव्हेटरचे किंमतीवर भेट वस्तू इत्यादी प्रकारचे आमिष अर्जदार यांना दाखवले. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र. १ कंपनीचा ७४४ – ४८ लाल रंगाचा ट्रॅक्टर व शक्तीमान कंपनीचा रोटाव्हेटर विकत घेण्याचे अर्जदाराने मान्य केले व त्यानुसार दिनांक ०५.१०.२०१३ रोजी सदर ट्रॅक्टर व रोटाव्हेटरची नोंदणी केली. नोंदणी करतेवेळी अर्जदार यांनी रुपये १०,०१०/- गैरअर्जदार क्र. २ कडे भरले होते. त्यानंतर वेळोवेळी अर्जदार यांनी गैरअर्जदार  क्र. २ कडे दिनांक ११.१०.२०१३ रोजी रक्‍कम रुपये ४०,०००/-, दिनांक ०७.१२.२०१३ रोजी रक्‍कम रु. ५०,०००/-, दिनांक ०९.१२.२०१३ रोजी रक्‍कम रु. १०,०००/-, दिनांक १६.१२.२०१३ रोजी रक्‍कम रुपये १०,०००/-, दिनांक २१.०१.२०१४ रोजी रक्‍कम रुपये १०,०००/-, दिनांक १७.०२.२०१४ रोजी रक्‍कम रु. १८,०००/- असे एकुण रक्‍कम रु. १,४८,०००/- आगावु नोंदणी रक्कम म्‍हणुन गैरअर्जदार क्र. २ कडे भरले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ कडे ट्रॅक्‍टर व रोटाव्हेटर नोंदणी करतेवेळी अर्जदार व गैरअर्जदार क्र. २ मध्ये असे ठरले होते की, रक्‍कम रु. १,४८,०००/- आगावु नोंदणी रक्कम म्हणून भरण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील व ट्रॅक्टर व रोटाव्‍हेटरची उर्वरित रक्कम बँकेतर्फे वित्त सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. २ यांची राहील, कारण शेतीचे अवजारांना व उपकरणांना वित्त सहाय्य करणाऱ्या अनेक बँका गैरअर्जदार क्र. २ यांच्या संपर्कात असतात. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. २ यांनी सदर बाबींसाठी वित्त सहाय्य देण्याकरीता संपर्कात असलेल्या बँकेकडुन अर्जदाराला गैरअर्जदार क्र. २ कडून विकत घेतलेल्या ट्रॅक्टर व रोटाव्हेटरसाठी वित्त सहाय्य मंजूर करून दिले. गैरअर्जदार क्र. २ ने अर्जदाराला दिनांक १७.०७.२०१४ रोजी पाठविलेल्‍या पत्रासोबत दिलेल्या वित्त सहाय्य मंजूर पावतीवरून स्पष्ट होते की, ट्रॅक्‍टरची रक्कम रु. ६,८८,०७५/- व रोटाव्हेटरची रक्कम रु. ८९,९००/- दर्शविलेली आहे. म्‍हणजेच, ट्रॅक्‍टर व रोटाव्‍हेटरची एकुण रक्कम रु. ७,७७,९७५/- दर्शविलेली आहे. तसेच, उप परिवहन अधिकारी कार्यालयाचे नोंदणी शुल्‍क रक्‍कम रु. १२,०००/- व बॅंक खर्च रु. ८,३९७/- दर्शविलेले आहे. शेतीची अवजारे/उपकरणे यांना नोंदणी फी माफ असते. गैरअर्जदार क्र. २ यांनी पाठविलेल्‍या छायांकित देयकावरुन ट्रॅक्‍टरची रक्कम रु. ५,७१,४२९/- व रोटाव्‍हेटरची रक्कम रु. ८५,७१४/- व ५ टक्‍के व्‍हॅटची रक्कम  रु. ३२,८५७/- अशी एकुण रक्‍कम रु. ६,९०,००/- नमुद आहे. गैरअर्जदार क्र. २ दिनांक १७.०७.२०१४ च्‍या पत्रात रक्‍कम रु. ७,७७,९७५/- एकुण रक्कम दर्शविलेली आहे. परंतु, ट्रॅक्‍टर व रोटाव्‍हेटरच्या मुळ रक्‍कमेवर रु. ८०,०००/- सुट दिली होती व अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ यांना आगावु नोंदणी रक्कम म्‍हणुन रक्‍कम रु. १,४८,०००/- व गैरअर्जदार क्र. २ यांनी वित्त सहाय्यव्‍दारे दिलेली ट्रॅक्‍टरची रक्‍कम रु. ५,२४,०४५/- व रोटाव्‍हेटरची रक्कम रु. ३९,५५०/- अशी एकुण रक्‍कम रु. ७,११,५९५/- दिली आहे. गैरअर्जदार क्र. २ यांनी दिलेल्‍या छायांकित देयकावरुन एकुण रक्‍कम रु. ६,९०,०००/- आहे, हि बाब स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदार कडुन रक्‍कम रु. २१,५९५/- जास्‍तीचे घेतलेले आहेत तसेच उप परिवहन अधिकारी कार्यालयाचे शुल्‍क रक्‍कम रु. १२,०००/- दिनांक १७.०७.२०१४ च्‍या पत्रात दर्शविलेली आहे. परंतु फक्‍त रक्कम रु. २००/- नोंदणी शुल्‍क व विम्‍याकरीता रु. ९,७५६/- खर्च झाले आहेत त्यावरून गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडुन रु. २,०४४/- जास्‍तीचे घेतलेले आहेत. तसेच छायांकित देयकाच्‍या रक्‍कमेत व दिनांक १७.०७.२०१४ च्‍या पत्रातील रक्‍कमेत फार मोठी तफावत दिसुन येते. यावरुन गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडुन रक्‍कम रु. २३,६३९/- जास्‍तीचे घेतले आहेत, हि बाब सिध्‍द होते. अर्जदाराने दिनांक ३०.०७.२०१४ व १८.०९.२०१४ रोजी पत्र पाठवुन गैरअर्जदार क्र. २ कडे मुळ देयकाची तसेच ट्रॅक्‍टर मधिल तेल गळतीचा दोष काढण्‍यासाठी, सरकारी योजनेच्‍या  लाभाची रक्‍कम परत करण्‍याची तसेच झालेल्‍या नुकसानभरपाईची रक्‍कम इत्‍यादी बाबीची मागणी केली. परंतु गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास सदर रक्‍कम परत न करुन, अर्जदारास सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केला असुन त्‍यामुळे गैरअर्जदार अर्जदारास रक्‍कम रु. ५०,०००/- अदा करण्‍यास पात्र आहेत. तसेच गैरअर्जदार क्र. ३ कडुन घेतलेले कर्ज ट्रॅक्‍टर मधिल दोषामुळे व ट्रॅक्‍टर विनावापर राहिल्‍याने व उत्‍पन्‍न न मिळाल्‍याने कर्जाचे हप्‍ते अर्जदार भरु शकली नाही. गैरअर्जदार क्र. २ यांनी ४५ दिवस ट्रॅक्‍टर शोरुम मध्‍ये ठेवल्‍याने प्रतिदीन रु. १०००/- प्रमाणे रक्‍कम रु. ४५,०००/- नुकसान     भरपाई गैरअर्जदार क्र. २ अर्जदारास देण्‍यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडुन घेतलेली जास्‍तीची रक्‍कम रु.२३,६३९/- अर्जदारास परत करण्‍यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. २ यांनी दिनांक १२.१०.२०१३ पासुन तक्रार दाखल करेपर्यंत ट्रॅक्‍टर मधील दोष न काढल्‍यामुळे ट्रॅक्‍टरचा उपयोग अर्जदार करु शकले नाहीत, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. २ अर्जदारास प्रतिदिन रक्‍कम रु. १,०००/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र.३ यांनी गैरअर्जदार क्र. २ यांच्‍या शिफारशी नुसार अर्जदाराला वित्त सहाय्य दिलेले आहे. अर्जदाराचे गैरअर्जदार क्र.३ यांचे बॅंकेत खाते नसतांना देखील अर्जदारास वित्त सहाय्य मंजुर करुन सदर कर्जाची संपुर्ण माहिती व व्‍याजदर अर्जदारास न कळवुन व्‍यवसायातील अप्रमाणिकपणाचे वर्तन गैरअर्जदार क्र.३ यांनी केलेले आहे. त्‍यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ व ३ यांना दिनांक ३०.१२.२०१४ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवुन नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु गैरअर्जदार क्र. २ व ३ यांनी दिनांक २१.०२.२०१५ रोजी नोटीसचे उत्‍तर पाठवुन सदर मजकुर खोटा व बनावटी असल्‍यामुळे नाकबुल आहे, असे नमुद केले. गैरअर्जदार क्र. २ व ३ यांनी अर्जदारास नुकसानभरपाई अदा न केल्‍याने अर्जदाराने दिनांक ३०.१२.२०१४ रोजी वकिलामार्फत नोंदणीकृत डाकेने पुन्हा नोटीस पाठवुन तसेच दिनांक १०.०२.२०१५ रोजी पुन्हा आपले वकिलामार्फत नोटीस मधिल पुर्तता करण्‍यास कळविले. त्यानंतर देखील, नोटीस प्राप्‍त होवुनही, गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी पुर्तता न केल्‍याने अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.

३.        गैरअर्जदार क्र. १ यांनी तक्रारीतील मुद्दयाचे खंडन करुन,  तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडले नसुन, मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Morgan Stanley Vs Karthik Das (1994) 4 SC 225 या न्‍यायनिर्णयात विषद केलेल्‍या न्‍यायतत्‍वानुसार प्रस्‍तुत तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारीत नमुद वादकथना पृष्‍ठ्यार्थ कागदोपत्री पुरावा दाखल न केल्‍याने मा. राष्‍ट्रीय आयोगाने Sabina Cycle Imporium Vs Thajes Ravi M.R. Pancha (1992) 1 CPC 97 व Classic Automobile Vs Lila Nand Mishra I (2010) CPJ 235 NC या न्‍यायनिर्णयात विषद केलेल्‍या न्‍यायतत्‍वानुसार अर्जदाराने तक्रारीत नमुद वाहनातील निर्मीती दोषाबद्दल कोणताही तज्ञ अहवाल दाखल केला नसल्‍याने तक्रार अमान्‍य करणे योग्‍य आहे. गैरअर्जदार क्र. १ हे वाहन निर्मीती करुन अधिकृत विक्रेता मार्फत विक्री करतात. वाहन विक्री पुर्वी संपुर्ण तपासणी होते. सदर प्रकरणात देखील अर्जदारासमक्ष वाहन तपासणी झाल्‍यानंतरच वाहनाचा ताबा अर्जदाराला देण्‍यात आला आहे. मा. राष्‍ट्रीय आयोगाने M/s Shakum Overseas Ltd. Vs National Insurance Company Ltd. (1993) 1 CPJ 86 (NC) या न्‍यायनिर्णयात नमुद केलेल्या न्‍यायतत्‍वानुसार  अर्जदार स्‍वत:च्‍या चुकीचा फायदा प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन घेवु शकत नाहीत, असे न्‍यायतत्‍व असल्‍याने प्रस्‍तुत तक्रार खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावी. अर्जदाराच्‍या वाहनातील दोष हा निर्मीती दोष नसुन, वाहन वापरातील चुकीमुळे निर्माण झालेला असुन त्‍याची अर्जदाराने वेळोवेळी योग्‍य देखभाल न घेतल्याने व दुरुस्‍ती न केल्‍याने तक्रारादाराच्‍या वाहनास बाधा उत्‍पन्‍न झाली आहे. गैरअर्जदार क्र. १ व २ यांचेमध्‍ये  Principal  to Principal  असे नातेसंबंध असल्‍याने गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास सेवा न दिल्‍यास गैरअर्जदार क्र. १ यांचेवर त्याची कसलीही जबाबदारी येत नाही. सबब, गैरअर्जदार क्र. १ अर्जदारास कोणतीही नुकसानभरपाई देण्‍यास पात्र नसुन तक्रार खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. १ यांनी केली आहे.

४.        गैरअर्जदार क्र. २ यांनी तक्रारीतील मुद्दयाचे खंडन करुन, गैरअर्जदार क्र. १ हे ट्रॅक्‍टर व शेतीचे उपकरणे व इतर उपकरणे तयार करीत असुन व गैरअर्जदार क्र. २  ते विक्री करण्‍याचे अधिकृत विक्रेते आहे. अर्जदाराने दिनांक ०५.१०.२०१३ रोजी ट्रॅक्‍टर व रोटाव्‍हेटरसाठी रक्‍कम रु. १०,०००/- नोंदणीसाठी व रक्‍कम रु. १,४८,०००/- आगावु नोंदणी रक्कम म्‍हणुन जमा केले. या बाबतीत गैरअर्जदार क्र. २ व ३ यांचा परस्‍पर कोणताही संबंध नाही. गैरअर्जदार क्र. ३ ने अर्जदाराला कोणतीही माहिती न देता रक्‍कम रु. ७,११,५९५/- गैरअर्जदार क्र. २ ला दिलेली आहे, हे अर्जदाराचे म्‍हणणे नाकबुल करुन गैरअर्जदार क्र. २ यांनी ट्रॅक्‍टर व रोटाव्‍हेटरचा ताबा अर्जदारास दिला आहे. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराच्‍या ट्रॅक्‍टरमध्‍ये तेल गळतीचा दोष नाही व त्‍याबाबत अर्जदाराने कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. दि. ०२.०१.२०१४ ते दि. १७.०२.२०१४ पर्यंत वाहन नादुरुस्‍त अवस्‍थेत अर्जदाराने रक्‍कम रु. १८,०००/- अदा न केल्‍याने गैरअर्जदार क्र. २ यांचेकडे होते. परंतु दिनांक १७.०२.२०१४ रोजी अर्जदाराने रक्‍कम रु. १८,०००/- गैरअर्जदार क्र. २ यांना अदा केल्‍याने ट्रॅक्‍टरचा ताबा गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराला दिला. गैरअर्जदार क्र. २ यांनी ४५ दिवसानंतरही ट्रॅक्‍टर मधिल तेल गळतीचा दोष काढला नाही, ही बाब अमान्‍य करुन गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडे रक्‍कम रु. ८,०००/- ची अतिरीक्‍त मागणी केली, ही बाब असत्‍य आहे. अर्जदाराचे प्रतिदिन रक्‍कम रु. १,०००/- नुकसान झाले नसुन नुकसान भरपाईची रक्‍कम रु. ४५,०००/- अदा करण्‍यास गैरअर्जदार क्र. २ पात्र नाही. अर्जदाराने आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडुन कर्ज घेतल्‍यामुळे मुळ खरेदी देयक बॅंकेकडे असुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ यांना दिनांक ०९.०५.२०१४ व दिनांक ०९.०७.२०१४ रोजी पाठविलेल्‍या पत्रातील मजकुर अमान्‍य असल्‍याचे पत्र गैरअर्जदार क्र. २ यांनी दिनांक १७.०७.२०१४ रोजी अर्जदाराला पाठविले. शासकीय योजनेमार्फत मिळणारी सबसिडी परस्पर अर्जदाराच्या खात्‍यात जमा होते. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडुन जास्‍तीची रक्‍कम घेतली नसुन रक्‍कम रु. २३,६३९/- जास्‍तीचे घेतले आहे, हे म्‍हणणे अमान्‍य करुन अर्जदाराने दिनांक ३०.०७.२०१४ व दिनांक १८.०९.२०१४ रोजी पाठविलेल्‍या पत्रातील मजकुर असत्‍य असुन गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराची कोणतीही फसवणुक केलेली नाही. अर्जदाराचा ट्रॅक्‍टर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे नोंदणीसाठी नेल्‍यानंतर रस्‍ते शुल्‍क व नोंदणी शुल्‍क भरावे लागते. त्‍याप्रमाणे योग्‍य ती रक्‍कम गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदाराकडुन स्विकारली असुन त्‍याप्रमाणे नोंदणी करुन दिली आहे, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. २ अर्जदारास रक्‍कम रु. ५०,०००/- नुकसान भरपाई व जास्‍तीची रक्‍कम रु. २२,७३९/- परत करण्‍यास पात्र नाही. अर्जदाराने दिनांक ३०.१२.२०१४ रोजी पाठविलेल्‍या पत्रातील मजकुर अमान्‍य असुन गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास दिनांक १७.०६.२०१४ रोजी पाठविलेल्‍या मजकुर सत्‍य  आहे. अर्जदाराने दिनांक १०.०२.२०१५ रोजी पाठविलेल्या नोटीस मधील मजकुर अमान्‍य  असुन प्रस्‍तुत खोटी तक्रार केल्‍याने खर्चासहीत अमान्‍य करण्‍यात यावी. गैरअर्जदार क्र. १ व २ यांचे एकत्रित व वेगवेगळी जबाबदारी आहे, हि बाब अमान्‍य करुन प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडले नसुन प्रस्‍तुत तक्रार मुदतीत नसल्‍याने अमान्‍य  करण्‍यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. २ यांनी केली आहे. अर्जदाराने शेतीच्‍या  व्‍यवसायाकरीता खरेदी व्‍यवहार केलेला असुन अर्जदार हा “ग्राहक” या व्‍याख्‍येत येत नसुन अर्जदार हा स्‍वत: ट्रॅक्‍टर चालवित नसुन अर्जदाराकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. सबब, तक्रार खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. २ यांनी केली आहे.

५.       गैरअर्जदार क्र. ३ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, प्रस्‍तुत तक्रारीतील वाद हा ग्राहक वाद नसुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ व २ यांचे विरुध्‍द त्‍यांचेकडुन खरेदी केलेल्‍या ट्रॅक्‍टरचे गुणवत्तेबाबत तक्रार केली असली तरी, गैरअर्जदार क्र. ३ विरुध्‍द  कोणतेही आरोप केलेले नाही. ट्रॅक्‍टरची कर्ज रक्कम वसुली करण्‍यात येवु नये, असा वाद ग्राहक वाद होवु शकणार नाही. गैरअर्जदार क्र. ३ यांनी अर्जदाराला कर्ज मंजुर करतेवेळी संपुर्ण माहिती देवुन योग्‍य त्‍या स्‍वाक्षरी घेतल्‍या होत्‍या, अर्जदाराच्‍या कथनानुसार अर्जदारास ट्रॅक्‍टरच्‍या वापरातुन प्रतिदिन रक्‍कम रु. १,०००/- कमाई होणार होती, असे नमुद केल्‍याने ट्रॅक्‍टरचा वापर व्‍यापारी तत्‍वानुसार होता व आहे, यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र. ३ यांचा ग्राहक होवु शकत नाही. अर्जदार हि स्त्री असुन तीच्‍या जवळ ट्रॅक्‍टर चालविण्‍याचा परवाना आहे असे अर्जदार चे म्‍हणणे आहे. त्‍याप्रमाणे ट्रॅक्‍टर मध्‍ये  निर्मीती दोष आहे, हे दाखविणारा कोणताही पुरावा किंवा अहवाल अर्जदाराने दाखल केलेला नसुन तज्ञ अहवाल सुध्‍दा दाखल केलेला नाही. वाहन विक्रेता व खरेदीदार यांच्‍या दरम्‍यान झालेल्‍या व्‍यवहाराशी गैरअर्जदार क्र. ३ यांचा कोणताही संबंध नाही. अर्जदाराने शासकीय योजनेचा लाभ मिळविण्‍याकरीता कोणताही अर्ज गैरअर्जदार क्र. ३ कडे केलेला नाही. सबब, तक्रारादाराने कर्ज उचल प्रकरणी या बॅंकेकडे दाखल केलेल्‍या Delivery Memo व Invoice व अगोदर दाखल केलेले कोटेशनच्‍या प्रती अर्जदाराला दिनांक २१.०१.२०१५ रोजीचे पत्रासोबत दिलेले असुन अर्जदार हा “ग्राहक” या संज्ञेत येत नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार अमान्‍य करण्‍यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. ३ यांनी केली आहे.   

६.        अर्जदाराची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र. १ ते ३ यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

 

                  मुद्दे                                                               निष्‍कर्ष 

 

  1. गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास वाहन विक्री

कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर

केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ?                    होय    

   २. गैरअर्जदार क्र. १ व २ अर्जदारास नुकसानभरपाई अदा

करण्यास पात्र आहेत काय ?होय

     ३.  आदेश ?                                                                     अंशतः मान्‍य   

 

 

कारण मिमांसा

 

मुद्दा क्र. १ व २ :

 

 

.        गैरअर्जदार क्र.३ यांनी अर्जदारास वाहन खरेदीसाठी दिलेल्या कर्जाची परतफेड अर्जदार हे नियमित करत असून वाहन कर्ज करारनाम्याविषयी कोणतीही विंनती तक्रारीत नमूद नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.३ यांच्याविरुद्ध कोणतेही आदेश करणे न्यायोचित नाही. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास वाहन विक्री व दुरुस्ती बाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली हि बाब सिद्ध करण्यासाठी अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता, वाहनाच्या विक्री किंमती पेक्षा अधिक किंमत गैरअर्जदार २ यांनी स्विकारल्याची बाब सिद्ध होत आहे. तसेच गैरअर्जदार १ यांनी अर्जदारास विक्री केलेले वाहन वाहनातील दोषामुळे नादुरुस्त होते, हि बाबही दस्तावेजावरून सिद्ध होते. अर्जदारांची, वाहन नादुरुस्त कालावधीत झालेल्या नुकसान भरपाईची मागणी कागदोपत्री पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही. तसेच, वाहनातील तांत्रिक दोषाबाबत तज्ञ अहवाल दाखल नसल्याने त्याबाबत आदेश करणे न्यायोचित नाही. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वाहन विक्रीची सेवा कराराप्रमाणे न केल्याने अर्जदारास अतिरिक्त रक्कम अदा करावी लागली व वाहन दुरुस्त करून घ्यावे लागले. अर्जदाराने नुकसानभरपाईची मागणी वकीलामार्फत नोटीस पाठवून करुन देखील गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी पूर्तता न केल्याने करारातील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. अर्जदाराने तक्रारीत नमूद केलेली वादकथने गैरअर्जदार १ व २ यांनी अंशतः मान्य केल्याची बाब दस्तऐवजावरून सिद्ध होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. १ व २ यांच्याविरुद्ध केलेल्या विनंती पैकी अंशत: विनंती न्यायोचित नसून इतर विनंती बाबत आदेश करणे न्याय व उचित आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदारनी तक्रारीत केलेली विनंतीचे अवलोकन केले असता विनंती क्र. १, ३, ५ व ८ मधील बाबी संबधी कागदोपत्री पुराव्याअभावी सदर विनंती बाबत आदेश करणे न्याय व उचित होणार नाही, असे मंचाचे मत आहे. विनंती क्र.२,४,६,७,९ व १० विचारात घेतल्यास गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी कराराप्रमाणे अर्जदारास वाहन विक्री बाबतची सेवा सुविधा न पुरविल्याची बाब दस्तावेजावरून सिद्ध होते. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी तक्रारीतील वादकथनास घेतलेले आक्षेप अंशत: न्याय्य व उचित नसल्याने अमान्य करण्यात येतात.  त्यामुळे, गैरअर्जदार क्र. १ व २ अर्जदारास विक्री केलेल्या वाहनाच्या विक्री किंमतीपेक्षा अधिक स्विकारलेली विक्री किंमत परत करण्यास करण्यास आणि न्यायोचित नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.

मुद्दा क्र. ३ :

 

८.          मुद्दा क्र. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

 

आदेश  

 

      १.  ग्राहक तक्रार क्र. ७०/२०१५ अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

२.  गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी, अर्जदारास वाहन विक्री कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर     केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

३.  गैरअर्जदार क्र. २ यांनी अर्जदारास विक्री केलेल्या वाहनाच्या विक्री किंमती        पेक्षा स्विकारलेली अधिक रक्कम रु. २३,६३९/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून       ३० दिवसात अदा करावे.

४. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे, अर्जदारास मानसिक,     शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.४०,०००/-    या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे.  

      ५. गैरअर्जदार क्र. ३ यांचे विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. 

           ६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

 

 

 

 

    कल्‍पना जांगडे(कुटे)         किर्ती वैद्य (गाडगीळ)        उमेश वि. जावळीकर

        सदस्या                   सदस्या                    अध्‍यक्ष

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.