मुद्दे निष्कर्ष १. सामनेवाले क्र. १ व २ यांनी अर्जदारास सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय २. सामनेवाले क्र. १ व २ अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत काय ? होय ३. आदेश ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ व २ : ६. सामनेवाले क्र. २ हे सामनेवाले क्र. १ यांचे अधिकृत विक्रेता आहे. अर्जदाराच्या वाहनाची चावी दिनांक ०१.०२.२०१६ रोजी रक्कम रु. ५,७००/- अदा करुन अर्जदाराने घेतली. त्यानंतर दिनांक १२.०२.२०१६ रोजी इंजीनचे हेड मध्ये आवाज आल्यानंतर वाहन सामनेवाले क्र. १ यांचे अधिकृत डिलर वाघमारे ऑटो इलेक्ट्रीकल्स यांचेकडे दुरुस्तीचे सामान उपलब्ध नसल्याने सदर सामान दिलीप मोटार रिपेरिंग वर्क्स व वैष्णवी डिझल्स यांचेकडुन विकत घेतले व वाहन दुरुस्त केले. त्यानंतर देखील वाहन नादुरुस्त झाल्याने भगवान ऑटोमोबाईल्स,चंद्रपुर यांचेकडुन सामान विकत घेवुन वाहन दुरुस्त केले. दाखल दस्ताऐवजावरुन अर्जदाराचे वाहन अधिकृत विक्रेत्या खेरीज अन्य ठिकाणी दुरुस्त केल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याने सदर वाहन हमी कालावधीत असल्याबाबत हमी पत्र मंचाने आदेश करून देखील दाखल न केल्याने सदर दुरुस्ती हमी कालावधीत होती किवा नाही याबाबत निष्कर्ष नोंदविणे न्याय्य व उचित नाही. सामनेवाले क्र. १ यांचे अधिकृत विक्रेता सामनेवाले क्र. २ व इतर अधिकृत विक्रेता यांचेकडे मुळ पार्ट नसल्याने अर्जदाराने पार्टची दुसरीकडुन व्यवस्था करुन सदर वाहन दुरुस्त केले. सामनेवाले क्र. १ व २ यांनी सदर वाहन दुरुस्तीसाठी तक्रारदारास दिलेली सेवा त्रुटीपूर्ण आहे, असे मंचाचे मत झाल्याने अर्जदाराने तक्रारीत केलेल्या मागणीस व नुकसान भरपाईस तक्रारदार अंशत: पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ३ : ७. मुद्दा क्र. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. ६०/२०१६ अंशत: मान्य करण्यात येते. २. सामनेवाले क्र. १ व २ यांनी अर्जदारास कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ३. सामनेवाले क्र. १ व २ यांनी, वैयाक्तिक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास वाहन दुरुस्तीसाठी तृटीपूर्ण सेवा दिल्याने व कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारकर्त्यास अदा करावे. ४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती वैद्य (गाडगीळ) श्री. उमेश वि. जावळीकर (सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष) |