तक्रारदार त्यांचे वकील श्री. यु.एन.उपाध्याय सह हजर.
आदेश- श्री. एम.वाय. मानकर अध्यक्ष,
तक्रारदार यांच्या वकीलांना तक्रार दाखल कामी ऐकण्यात आले .
तक्रार व त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदारानी अंतरीम परीहारासाठी वेगळा अर्ज दाखल केला. तक्रारदारांनी सा.वाले यांच्याकडून इनव्हा मोटरवाहनाकरीता कर्ज घेतले होते व व्याजाच्या रकमेवरून व इतर सेवेबाबत वाद उत्पन्न झाल्यामूळे ही तक्रार दाखल करण्यात आली. सदरहू वाहनाची किंमत रू. 15,75,870/-, आहे. व त्याबाबतची टॅक्स इनवाईस पृ.क्र 19 वर दाखल आहे. तक्रारदारानी प्रार्थना क्लॉज ‘ए’ प्रमाणे 5,00,000/-,ची मागणी केलेली आहे व प्रार्थना क्लॉज ‘बी’ प्रमाणे अंतरीम परीहाराची विनंती केली आहे. अंतरीम अर्जामध्ये तक्रारदारानी प्रार्थना कलम ‘डी’ प्रमाणे मे. 2016 पासून दरमहा 5,00,000/-,मागणी केली आहे. ही तक्रार दि. 30/11/2016 ला दाखल करण्यात आली आहे. मागणी केलेल्या दरानी सात महिन्याकरीता ही रक्कम रू. 35,00,000/-,होते. तक्रारदारानी मागणी केलेली रक्कम व वाहनाची किंमत विचारात घेता ती 50,00,000/-,पेक्षा जास्त होते. ग्रा.सं.कायदयाच्या कलम 11 प्रमाणे ही तक्रार या मंचाच्या पिक्युनरी अधिकार क्षेत्रात समाविष्ट होत नाही. त्यामुळे या मंचास ही तक्रार चालविता येत नाही. सबब खालील आदेश.
आदेश
1 तक्रार क्र 506/2016 ही पिक्युनरी अधिकार क्षेत्राभावी परत करण्यात येते.
2. तक्रारदारानी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा. आयोगात/मा.न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावे.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-