Maharashtra

Nagpur

CC/568/2018

SMT. SHOBHATAI NILKANTHRAO MHAISKAR - Complainant(s)

Versus

MAHI LAND DEVELOPERS & BUILDERS THROUGH PROPRIETOR, SHRI. SANJAY RAMDASJI CHORE - Opp.Party(s)

ADV. MRS. S. K. PAUNIKAR

13 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/568/2018
( Date of Filing : 21 Sep 2018 )
 
1. SMT. SHOBHATAI NILKANTHRAO MHAISKAR
R/O. VIKRAMSHILA NAGAR, WARDHA, UNTAKHANA, MEDICAL CHOWK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MAHI LAND DEVELOPERS & BUILDERS THROUGH PROPRIETOR, SHRI. SANJAY RAMDASJI CHORE
R/O. AASTHA HOSPITAL, H.B. TOWN, OLD PARDI NAKA, BHANDARA MAIN ROAD, NAGPUR/ OFF. AT, DS-2, ABHILASHA APARTMENT H.B. TOWN, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे मौजा घोरपड, पटवारी हलका नंबर १८, खसरा नंबर १०७/१/२/३, तहसिल कामठी, जिल्‍हा नागपूर या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ६६, एकूण क्षेञफळ १५०० चौरस फुट, एकुण रुपये ३,४५,०००/- एवढ्या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक २/७/२०१४ रोजी केला. तक्रारकर्तीने करारनाम्‍याचे दिवशी म्‍हणजे दिनांक २/७/२०१४ रोजी बयाणा रक्‍कम रुपये ८०,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले व बाकी उर्वरीत रक्‍कम रुपये २,६५,०००/- दिनांक २/७/२०१६ पर्यंत देण्‍याचे ठरले. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला रुपये २,६०,०००/- दिनांक २९/१२/२०१५ पर्यंत अदा केले. त्‍यानंतर तक्रारकर्ती रुपये ८५,०००/- घेऊन विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात गेले व विक्रीपञ नोंदनी करुन देण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम स्विकारण्‍यास व विक्रीपञ नोंदनी करुन देण्‍याचे टाळले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने मा. पोलिस उपायुक्‍त, नागपूर यांना तक्रार केली परंतु त्‍याचा काही उपयोग झाला नाही. करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, उर्वरीत रक्‍कम रुपये ८५,०००/- स्वि‍कारुन तक्रारकर्तीला वादातील प्‍लॉट नंबर ६६ चे विक्रीपञ नोंदनी करुन द्यावे व प्‍लॉट चा कायदेशीर ताबा द्यावा किंवा जर विरुध्‍द पक्षाला कायदेशीर विक्रीपञ करुन देणे शक्‍य  नसल्‍यास तक्रारकर्तीला शासकीय रेडी रेकनर नुसार प्‍लॉट ची किंमत व्‍याजासह अदा करावी व मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाला स्‍थानिक वर्तमान पञाव्‍दारे जाहीर नोटीस काढुनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता मंचाने विरुध्‍द पक्ष विरुध्‍द दिनांक १/११/२०१९ रोजी एकतर्फी आदेश पारित केला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज  व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

       अ.क्र.                   मुद्दे                                                        उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवादिली काय ?          होय
  3. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे मौजा घोरपड, पटवारी हलका नंबर १८, खसरा नंबर १०७/१/२/३, तहसिल कामठी, जिल्‍हा नागपूर या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ६६, एकूण क्षेञफळ १५०० चौरस फुट, एकुण रुपये ३,४५,०००/- एवढ्या रकमेत विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक २/७/२०१४ रोजी केला.तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट नंबर ६६ चे खरदीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये ३४५०००/- अदा केली आहे. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्तीला प्‍लॉट नंबर ६६ चे विक्रीपञ नोंदनी करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला वादातील भुखंड क्रमांक ६६ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.

किंवा

     सदर भुखंड क्रमांक ६६ चे नोंदनी करण्‍यास कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर व तांञिक अडचण आल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी १५०० चौ. फुट इतके क्षेञफळ असलेल्‍या भुखंडासाठी मौजा घोरपड, पटवारी हलका नंबर १८, खसरा नंबर १०७/१/२/३ या झोनमधील अथवा नजीकच्‍या  इतर झोनमध्‍ये १५०० चौ. फुटाच्‍या अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्तीला आदेशाच्‍या  दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक २९/१२/२०१५ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.