जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1538/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 20/11/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 12/01/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/08/2009
1. श्री.प्रदीप जयनारायण बेहेडे,
उ.व. सज्ञान, धंदाः विमा व्यवसाय,
2. सौ.मंगला प्रदीप बेहेडे,
उ.व. सज्ञान, धंदाः घरकाम व विमा व्यवसाय,
दोघे रा. 4 ब, हरेश्वर नगर, रिंगरोड, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. महेश नागरी सहकारी पतपेढी लि, जळगांव,
रा.47 प्रतापनगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
( सदर सामनेवाला क्र. 1 ची नोटीस / समन्स ची बजावणी
सामनेवाला क्र. 2 यांचेवर करण्यात यावी.)
2. श्री.दिलीपकुमार आनंदराम लढढा (चेअरमन)
2.रा.आनंद, व्यंकटेश मंदीराजवळ, जळगांव, जि.जळगांव.
3. श्री.विनोद पन्नालाल न्याती (व्यवस्थापक)
रा. 190/1, प्लॉट नं.4, निसर्ग कॉलनी, पिंप्राळा,
जळगांव, ता.जि.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री विजयकुमार एस.काबरा वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 व 3 तर्फे सौ.रेणुका आर.माहेश्वरी वकील हजर.
सामनेवाला क्र. 2 तर्फे कु.प्रिती दि.लढढा वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्या ठेवी स्विकारणे, त्यावर व्याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्था असल्याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | खाते क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 21/104 | 21/04/2007 | 12,321/- | 21/04/2007 |
2 | 22/306 | 01/08/2007 | 20,444/- | 01/08/2008 |
3 | 21/106 | 17/04/2007 | 35,585/- | 17/04/2008 |
4 | 20/253 | 03/02/2007 | 17,698/- | 03/02/2008 |
5 | 21/107 | 03/04/2007 | 30,433/- | 03/04/2008 |
6 | 20/252 | 15/02/2007 | 16,056/- | 15/02/2008 |
7 | 22/219 | 10/07/2007 | 13,924/- | 10/07/2008 |
8 | 22/220 | 10/07/2007 | 12,893/- | 10/07/2008 |
9 | 22/215 | 26/06/2007 | 45,382/- | 26/06/2008 |
10 | 22/216 | 11/06/2007 | 30,943/- | 11/06/2008 |
11 | 22/218 | 03/06/2007 | 18,808/- | 03/06/2008 |
12 | 22/217 | 07/06/2007 | 12,544/- | 07/06/2008 |
13 | 22/223 | 29/07/2007 | 12,321/- | 29/07/2008 |
14 | 21/105 | 26/04/2007 | 15,873/- | 26/04/2008 |
15 | 21/104 | 21/04/2007 | 12,321/- | 21/04/2008 |
16 | 22/221 | 29/07/2007 | 12,321/- | 29/07/2008 |
17 | 21/103 | 21/04/2007 | 12,321/- | 21/04/2008 |
18 | 21/101 | 21/04/2007 | 11,348/- | 21/04/2008 |
19 | 22/222 | 29/07/2007 | 12,321/- | 29/07/2008 |
20 | 21/100 | 21/04/2007 | 11,348/- | 21/04/2008 |
21 | 21/102 | 26/04/2007 | 12,321/- | 26/04/2008 |
22 | 22/325 | 01/10/2007 | 10,000/- | 01/10/2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर , सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रमांक 1 व 3 तसेच सामनेवाला क्र. 2 यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होऊन खुलासा सादर केलेला आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी दि.12/9/2008 रोजी अध्यक्षपद सोडलेले असल्याने तक्रार अर्जास मिस जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीची बाधा येते. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नसुन संस्थेचा सभासद आहे. तक्रारदाराने संस्थेकडे ठेवलेल्या ठेवी हया स्वतःच्या फायदयाकरिता ठेवलेल्या आहेत. सामनेवाला पतसंस्थेस सहकार चळवळीतील गत 25 वर्षाचा उज्वल असा इतिहास आहे. सामनेवाला पतसंस्थेचे कामकाज सुरळीत चालु असतांना अचानक अफवाजनक लाटेमुळे ठेवीदार सभासद यांनी त्यांचे ठेवी काढुन घेण्यास सुरुवात केल्यामुळे संस्थेची आर्थिक रोख तरलता संपलेली आहे. संस्थेकडे होणा-या कर्ज वसुलीतुन सभासद ठेवीदारांची रक्कम देण्यास संस्था तयार आहे. सभासदांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक सभासदास त्याच्या ठेवीची रक्कम एकाच वेळी पुर्णपणे संस्था देऊ शकत नाही म्हणुन कामकाज सुरळीत चालु करण्याचे प्रयत्न संस्था करीत आहे. वरील संपुर्ण परिस्थितीची जाणीव तक्रारदारास करुन देऊन देखील त्यांनी सामनेवाला विरुध्द विनाकारण प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. सबब तक्रारदाराचा अर्ज सामनेवाला विरुध्द खर्चासह रद्य करावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 3 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 2 यांची चेअरमन पदाची कारकिर्द दि.12/9/2008 रोजी संपली. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 संस्थेचे चेअरमन नसल्यामुळे सामनेवाला क्र. 2 यांची सदर कामी कायदेशीर जबाबदारी ठरु शकत नाही. तक्रारदाराने त्याचे संपुर्ण तक्रारीतील कथन योग्य त्या पुराव्यासह शाबीत करावे. सामनेवाला क्र. 2 हे संस्थेचे चेअरमन नसतांना सुध्दा त्यांना प्रस्तुत कामी गोवण्यात आलेले असल्याने त्यांना तक्रारीतुन वगळण्यात यावे व सामनेवाला क्र. 2 विरुध्द तक्रार रद्य करुन तक्रारदाराकडुन सामनेवाला यास रु.15,000/- नुकसान भरपाई दाखल मिळावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 2 यांनी केली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
6. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
7. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्रा दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
8. उचित सेवा न देणे किंवा सेवेतील त्रुटी / कुचराई याबाबतीत सामनेवाला यांचा विचार करावयाचा झाल्यास, सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांची प्राथमिक जबाबदारी ठरते की, त्यांनी तक्रारदार काय किंवा इतर ठेवीदारांच्या ठेवी, संबंधीतांच्या ठेवीच्या मुदती संपल्यानंतर किंवा संपण्याआधी मागणी केल्यास त्या वेळचेवेळेवर परत करणे हे सामनेवाला यांचे नैतिक किंवा आवश्यक कर्तव्य आहे. कारण ठेवीदारांनी सदरील ठेवी हया सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांचेवर विश्वास ठेऊन ठेवलेल्या असतात. म्हणून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहेत की, सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ हे स्वतंत्ररित्या व संयुक्तरित्या तक्रारदार यांच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत करणेस जबाबदार आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक आदेश क्रमांक 1 मध्ये नमुद केलेप्रमाणे मॅच्युअर्ड झालेली असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 5 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 3 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. 1 ते 3 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( फ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव