जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 666/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 20/05/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/04/2014
डॉ.सुरेखा शामलाल तोतला,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.मारवाडी गल्ली, जुने पोस्ट ऑफीस जवळ, एरंडोल,
ता.एरंडोल,जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. महेश मर्चंट को ऑप क्रेडीट सोसायटी लि,भुसावळ,
तर्फे व्यवस्थापक विमल एल काबरा,
मुख्य कार्यालय, प्रोफेसर कॉलनी, जामनेर रोड,
भुसावळ,ता.भुसावळ,जि.जळगांव व इतर 16. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
--------------------------------------------------
नि.क्र.1 वरीलआदेशव्दाराःश्रीमतीपुनमनि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे मे,2012 पासुन नेमलेल्या पुढील तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे जुलै,2009 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे विधिज्ञांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली
काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 01/04/2014.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.