Maharashtra

Gadchiroli

CC/5/2014

Narayan Hanaji Mhaske - Complainant(s)

Versus

Mahesh Madhavrao Yenpreddiwar - Opp.Party(s)

R.B. Mhashakhetri

29 Jan 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/5/2014
 
1. Narayan Hanaji Mhaske
Age 74 years, At Ramnager Indira Chauk, Ward No.19, Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mahesh Madhavrao Yenpreddiwar
Age about 35 years, Occ. Plot Dealer, At Snehanagar Ward no.15, Appo. Pawar Petrol Pump, Dhanora Road, Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:R.B. Mhashakhetri, Advocate
For the Opp. Party:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2015)

                                      

                  तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून मौजा लांझेडा येथील सर्व्‍हे नं. 35/1 ले-आऊट मधील प्‍लॉट नं.6 आकार पूर्व-पश्चिम बाजू 9.50 मिटर व उत्‍तर-दक्षणि बाजू 16 मिटर किंमत रुपये 6,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौदा केला.  त्‍याबाबत गैरअर्जदाराने दि.11.1.2004 रोजी अर्जदाराकउून 10,000/- बयाणा पंचासमक्ष घेतले.  त्‍यानंतर गेरअज्रदार दि.15.1.2014 रोजी अर्जदाराचे घरी येऊन प्‍लॉट नं.6 आधीच विकला होता, काही कारणाने या प्‍लॉटची नेांदणी स्‍थगीत झाली होती, पुन्‍हा तोच पूर्वीचा ग्राहक घ्‍यावयास तयार झाल्‍याने तुंम्‍हास सदर प्‍लॉट विकत देऊ शकत नाही असे सांगितले.  त्‍याऐवजी, सर्व्‍हे नं.35/2 मधील प्‍लॉट नं.20 घेण्‍याचे सांगितले.  अर्जदाराने होकार दर्शवून त्‍यादिवशी अर्जदाराने गैरअर्जदाराला रुपये 1,40,000/-  साक्षदारासमक्ष देवून दि.11.1.2014 नमूद करुन पूर्वी दिलेले बयाणा रुपये 10,000/- समाविष्‍ट करुन एकूण रुपये 1,50,000/- मिळाल्‍याचे करारनाम्‍यात लिहिले व उर्वरीत रुपये 4,50,000/- दि.3.2.2014 पर्यंत नोंदणी करुन देण्‍याचे ठरले. दि.2.2.2014 रोजी सदर प्‍लॉटची प्रत्‍यक्ष पाहणी व मोजमाप करण्‍यास गैरअर्जदाराने बोलावीले असता, प्‍लॉट नं.20 चा मुळ आकार बदलवून निमुळते व रुंदीने कमी झाल्‍याचे दाखविले.  गैरअर्जदाराने पणलोट क्षेञातील खोलगट भागातील वेगळाच प्‍लॉट दाखवून तो खरेदी करा असा सल्‍ला दिला,  त्‍यामुळे अर्जदाराने हा प्‍लॉट घेण्‍यास नाकारले. गैरअर्जदार अर्जदाराची फसवणूक करीत आहे.  गैरअर्जदार करारनाम्‍याप्रमाणे न वागल्‍याने करार रद्द करुन बयाणादाखल दिलेले रुपये 1,50,000/- परत मागीतले.  गैरअर्जदाराने दाखविलेले ले-आऊट अकृषक झालेले नाहीत. म्‍हणून अर्जदाराने दि.22.2.2004 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठवून बयाणा रक्‍कम 1,50,000/- रुपये 18 टक्‍के व्‍याजासह परत देण्‍याची विनंती केली.  गैरअर्जदाराने अर्जदाराचे नोटीसला उत्‍तर दिले नाही व मुदतीतमध्‍ये बयाणा रककम परत केली नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदाराने करारनाम्‍यातील बयाणा रक्‍कम रुपये 1,50,000/- दि.11.1.2014 पासून 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच, अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 3,000/- व कार्यवाहीचा खर्च, नोटीस खर्च, वकील इत्‍यादीकरीता रुपये 5,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी मागणी केली आहे.

 

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 5 दस्‍ताऐवज, नि.क्र.12 नुसार 2 दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.23 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. 

 

3.          गैरअर्जदाराने नि.क्र.23 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरा‍तील विशेष कथनात नमूद केले आहे की, गैरअर्जदाराने मौजा लांझेडा येथील सर्व्‍हे नं.35/2 मध्‍ये  वडीलोपार्जीत कृषक जमीनीचे एकूण 23 भूखंड पाडून विक्रीस काढले होते.  या भुखंडापैकी गैरअर्जदाराने काही भुखंड विकले आहेत.  अर्जदाराने गैरअर्जदारासोबत भेटून कृषक भुखंड खरेदी करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली.  अर्जदार ही प्रत्‍यक्ष मोक्‍यावर येवून गैरअर्जदाराचे मालकीचे सर्व्‍हे नं.35/2 मधील भुखंडाची पाहणी करुन भुखंड क्र.20 आकारमान 1500 चौ.मी. घेण्‍याचे पसंत केले.  गैरअर्जदाराने अर्जदारास प्रत्‍यक्ष मोक्‍यावर भुखंड क्र.20 ची मोजणी दि.11.1.2014 रोजी कराराचे दिवशी करुन दिली. सदर भुखंड रुपये 400/- चौ.फट या दाराने ठरविण्‍यात येवून एकूण किंमत रुपये 6,00,000/- होत असल्‍याचे अर्जदारास सांगीतले.  अर्जदाराने दि.11.1.2014 रोजी करारनामा लिहून रुपये 1,50,000/- बयाणादाखल व दि.3.2.2014 रोजी उर्वरीत रक्‍कम रुपये 4,50,000/- गैरअर्जदारास देवून विक्री करुन घेईल असे ठरले.  अर्जदार ही सदर भुखंड खरेदी करतेवेळी दलालामार्फत गैरअर्जदाराला भेटली त्‍यामुळे गैरअर्जदारासोबत करार केल्‍याबरोबर दलालास गैरअर्जदारानी भुखंड किंमतीच्‍या 1 टक्‍का म्‍हणजे रुपये 6000/- नगदी दलालास दिले. गैरअर्जदार हा अर्जदारास सदर भुखंड उर्वरीत रक्‍कम घेवून विक्री करुन देण्‍यास तयार आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून जाणिवपूर्वक भुखंड खरेदी करण्‍याचे टाळून विनाकारण वाद उपस्थित केला व स्‍वतःहून कराराचा भंग केला आहे. सदर वाद हा दिवाणी स्‍वरुपाचा असल्‍याने सदर वाद विद्यमान मंचास निकाली काढण्‍याचा अधिकार नाही. अर्जदाराची तक्रार पूर्णपणे खोटी व बनावटी असल्‍याने अमान्‍य आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.  

 

4.          अर्जदाराने नि.क्र.26 नुसार शपथपञ, नि.क्र.30 नुसार 5 दस्‍ताऐवज व नि.क्र.32 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केले.  गैरअर्जदाराने नि.क्र.31 नुसार शपथपञ, नि.क्र. 33 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय.

2)    अर्जदार व गैरअर्जदारामध्‍ये प्‍लॉट संबंधी झालेला व्‍यवहार :  नाही.

वाणिज्‍य स्‍वरुपाचा आहे काय ?

3)    गैरअर्जदाराने अर्जदारास न्‍युनतम सेवा दिली आहे काय ?  :  होय.

4)    अंतीम आदेश काय ?                              : अंतिम आदेशाप्रमाणे

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.          अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून मौजा लांझेडा येथील सर्व्‍हे नं. 35/1 ले-आऊट मधील प्‍लॉट नं.6 आकार पूर्व-पश्चिम बाजू 9.50 मिटर व उत्‍तर-दक्षणि बाजू 16 मिटर किंमत रुपये 6,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौदा केला.  त्‍याबाबत गैरअर्जदाराने दि.11.1.2004 रोजी अर्जदाराकउून 10,000/- बयाणा पंचासमक्ष घेतले.  त्‍यानंतर गेरअज्रदार दि.15.1.2014 रोजी अर्जदाराचे घरी येऊन प्‍लॉट नं.6 आधीच विकला होता, काही कारणाने या प्‍लॉटची नेांदणी स्‍थगीत झाली होती, पुन्‍हा तोच पूर्वीचा ग्राहक घ्‍यावयास तयार झाल्‍याने तुंम्‍हास सदर प्‍लॉट विकत देऊ शकत नाही असे सांगितले.  त्‍याऐवजी, सर्व्‍हे नं.35/2 मधील पलॉट नं.20 घेण्‍याचे सांगितले.  अर्जदाराने होकार दर्शवून त्‍यादिवशी अर्जदाराने गैरअर्जदाराला रुपये 1,40,000/-  साक्षदारासमक्ष देवून दि.11.1.2014 नमूद करुन पूर्वी दिलेले बयाणा रुपये 10,000/- समाविष्‍ट करुन एकूण रुपये 1,50,000/- मिळाल्‍याचे करारनाम्‍यात लिहिले व उर्वरीत रुपये 4,50,000/- दि.3.2.2014 पर्यंत नोंदणी करुन देण्‍याचे ठरले, ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्‍द होते.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-

 

6.          गैरअर्जदार यांनी त्‍याचे लेखी उत्‍तरात असे कबूल केले आहे की, त्‍यांनी मौजा लांजेडा येथील सर्व्‍हे नं.35/2 या वडीलोपार्जीत कृषक जमीनीचे ले-आऊट पाडून विक्रीस काढले होते.  सदर सर्व्‍हे नं.35/2 मध्‍ये एकूण 23 भुखंड पाडले होते, या भुखंडापैकी गैरअर्जदाराने काही भुखंड विकलेले आहेत, यावरुन असे सिध्‍द होते आहे की, गैरअर्जदाराने सदर भुखंड विक्री करण्‍याचा व्‍यवसाय केले होते व सदर भुखंडापैकी एक भुखंड खरेदी विक्रीकरीता अर्जदार व गैरअर्जदारामध्‍ये व्‍यवहार झाला होता.  सबब, गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे की, अर्जदारामध्‍ये झालेला भुखंड खरेदी-विक्री व्‍यवहार वाणीज्‍य  स्‍वरुपाचा होता हे ग्राह्य धरण्‍यासारखे नाही. कारण अर्जदाराने सदर भुखंड स्‍वतःचे वापराकरीता गैरअर्जदाराकडून खरेदी करण्‍याचा करार केला होता. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-  

 

7.          गैरअर्जदाराचे त्‍याचे लेखी बयाणात नि.क्र.23 वर ही बाब कबूल केली आहे की, दि.3.2.2014 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास सदर प्‍लॉटची विक्री करुन दिली नाही.  गैरअर्जदाराची सदर तक्रार मंचाचे मता प्रमाणे अर्जदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शवितो.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  

                       

मुद्दा क्रमांक 4 बाबत :-  

 

8.          मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.       

                 

अंतिम आदेश  -

 

(1)   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.  

(2)   गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली रक्‍कम रुपये 1,50,000/- कराराचा दि.11.1.2014 पासून 8 टक्‍के व्‍याजासह आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.  

(3)   गैरअर्जदाराने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.

(4)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 

गडचिरोली.

दिनांक :- 29/1/2015  

 

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.