आदेश (दिः 03/02/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. मुळ तक्रार क्र. 335/2007 या प्रकरणी मंचाने 30/08/2008 रोजी पारित केलेल्या आदेशाच्या पुर्तते संदर्भात सदर दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले. गैरअर्जदारांनी वादग्रस्त गाडीचा कोणताही दुरुस्ती खर्च न आकारता दुरुस्ती करुन द्यावी असा आदेश मंचाने दि.30/08/2008 रोजी पारित केला होता. गैरअर्जदारांनी आपल्या जबाबात नमुद केले की चार कारणांसाठी तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली होती ती कारणे 1.क्लच प्लेट, 2.आर.एच.एस पुलींग ऑफ वेहीकल, 3.ड्रायवर सिट कुशन नॅट ओके, 4.टाईट विन्डोज. 2. तक्रार प्रकरणातील मंचाच्या आदेशानंतर वादग्रस्त वाहनाची दुरूस्ती कोणतेही शुल्क न आकारता त्यांनी करुन दिलेली आहे असे असुनही ज्या गोष्टींचा तक्रार प्रकरणातील आदेशात उल्लेख नाही अशा फायबर बंपर, मडगर्ड, डेस्कबोर्ड याचीही दुरूस्ती, तसेच भाग बदलुन देण्याचा आग्रह तक्रारकर्त्याने धरलेला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटुन गेलेला असल्याने वापरामुळे या भागांची झिज होणे स्वाभाविक आहे हे भाग बदलुन देणे अथवा दुरूस्ती करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची नाही. 3. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद विचारात घेतला तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. त्याआधारे असे स्पष्ट होते की, 2006 साली विकत घेतलेल्या या वाहनात चार दोष निदर्शनास आल्याने अर्जदाराने तक्रार दाखल केली होती. मंचाच्या आदेशात पृष्ट क्र. 2 वर या चार बाबींचा उल्लेख आहे. मंचाने तक्रार मंजुर करुन या दोषांची दुरूस्ती गैरअर्जदारांनी करावी असा आदेश .... 2 .... (दरखास्त क्र. 17/2009(335/2007) पारित केला होता. मंचाचा आदेश 30/08/2008 रोजीचा आहे. त्यानंतर दि.18/11/2008 जॉब कार्ड 7753, 19/01/2009 जॉब कार्ड क्र.11540 व 31/03/2009 जॉब कार्ड 15346यांच्या प्रती गैरअर्जदारांनी जोडल्या आहेत. या जॉब कार्ड मध्ये नमुद केलेल्या मजकुराच्या आधारे ही बाब स्पष्ट होते की ज्या गोष्टींचा उल्लेख मंचाचे आदेशात आहे त्यांच्या दुरूस्तीचे काम गैरअर्जदारांनी केलेले आहे. त्यामुळे आदेशात ज्या बाबींचा उल्लेख नाही अशा दोषांची दुरूस्ती करण्याची जबाबदारी गैरअर्जदारांची नाही. दि.17/10/2008 रोजी विरुध्द पक्षाकडे वाहन दरुस्तीसाठी आणण्यात आले व 09/11/2008 रोजी तक्रारकर्त्याच्या मुलाने वाहन दुरूस्तीनंतर आपल्या ताब्यात घेतले जॉब कार्ड क्र.7753 वर 'सॅटीसफॅक्टरी नोट' या शिर्षकाखाली पंकज उपाध्याय याची स्वाक्षरी आहे. ज्या इतर बाबींचा उल्लेख तक्रारकर्ता करतो ते भाग दीर्घ वापरानंतर आपोआप झिजणारे आहेत व ते बदलवुन देण्याची अथवा दुरुस्त करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची नाही, कारण तसा उल्लेख मंचाच्या आदेशात नाही. 4. सबब, अंतीम आदेश पारित करण्यात येतो की- आदेश 1.मंचाच्या दि.30/08/2008 रोजीच्या आदेशाची पुर्तता गैरअर्जदारांने केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदर दरखास्त प्रकरण खारीज करण्यात येते. प्रकरण निकाली. 2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 03/02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |