ग्राहक तक्रार अर्ज क्र.350/2010
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.24/12/2010
अंतीम आदेश दि.20/10/2011
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.विश्वनाथ मोहन आहेर, तक्रारदार
तर्फे माहितगार इसम श्री.रविंद्र शंकरराव दरोडे, (अँड.पी.बी.खर्डे)
रा.घर नं.2075, दिल्ली दरवाजा, नाशिक.
विरुध्द
श्री.महेंद्र आनंदराव बच्छाव, सामनेवाला
रा.2, हिलटॉप अपार्टमेंट, श्रमिकनगर,
गंगापूर रोड, नाशिक.
ऑफिस-13-14, निर्माण स्कुल व्हयु,
विसे मळा, कॉलेजरोड, नाशिक.
(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार व सामनेवाला यांनी दि.15/06/2011 रोजी संयुक्त सुलेहनामा (पुरसीस) दाखल करुन त्यांचे दोघात पुरसीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपसात तडजोड झाली असून तक्रार निकाली करण्याबाबतची विनंती केलेली आहे. सदर सुलेहनामा तक्रारीत पान क्र.25 लगत दाखल आहे.
अर्जदार व सामनेवाला यांचे तडजोड पुरसीसप्रमाणे पुढीलप्रमाणे तडजोड निकालपत्र जाहीर करण्यात येत आहे.
अं ती म आ दे श
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मंजूर बिल्डींग प्लॅनप्रमाणे तळ मजल्यावरुन सद्यस्थितीत बांधकामयुक्त असलेल्या जिन्याने दुस-या मजल्यापर्यंत जाणेयेणेसाठी खुला करुन देण्याचे आहे.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना दुस-या मजल्यावर जाण्याकरीता लिफ्टची सुविधा दिलेली असून सदर सुविधेमध्ये कुठलाही अडथळा सामनेवाला यांनी निर्माण करण्याचा नाही.
3) सामनेवाला यांनी अर्जदार यांच्या फ्लॅट मिळकतीत त्यांनी दर्शविलेल्या जागी एक
तक्रार क्र.350/2010
4’x 4’ संडास (वेस्टर्न स्टाईल), युरीनल व वॉश बेसीन बांधून देण्याचे आहे.
4) अर्जदार यांनी सामनेवाला यांचे लाभात रु.2,50,000/- मात्र देवून खरेदीखत सहा महिन्याचे आत लिहून व नोंदवून देण्याचे आहे.
5) अर्जदार यांनी सामनेवाला यांना रक्कम रु.2,00,000/- मात्र खरेदीखत नोंदविते वेळी द्यावयाचे आहे व त्यानंतर उर्वरीत रक्कम रु.50,000/- मात्र चेकने दोन महिन्याचे आत देण्याचे आहे.
6) अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द इमारतीचे बांधकाम, मंजूर नकाशा तसेच पुर्णत्वाचा दाखल्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे यापुर्वी पुर्णत्वाचा दाखला मिळालेला नव्हता. आजमितीस झालेल्या सुलेहनाम्याप्रमाणे अर्जदार यांची काही एक तक्रार राहीलेली नसल्यामुळे नाशिक महानगरपालिका, नगररचना विभाग, नाशिक पोलिसस्टेशन, पोलिस आयुक्त व इतर सर्व तक्रारी अर्जदार हे विनाशर्त मागे घेत आहेत. त्या निकाली करण्यासाठी आवश्यक अर्ज, सही, संमती वेगळी लिहून देण्याची आहे.
7) अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द पोलिस स्टेशनला दाखल केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याचा आहे.
8) अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द सदर मिळकतीबाबत केलेल्या सर्व तक्रारी मागे घेण्याचे आहेत. अर्जदार यांची इमारत अथवा त्यांचे ताब्यातील मिळकतीबाबत, इमारत नकाशा, बांधकाम, संबंधीत परवानगी याबाबत कोणतीही तक्रार अथवा हरकत करण्याचे नाही.
9) अर्जदार व सामनेवाला यांनी आपआपसातील सर्व वाद संपुष्टात आणल्याने यापुढे सदर मिळकतीबाबत एकमेकांविरुध्द कुठल्याही तक्रारी करावयाच्या नाहीत व सुलेहनाम्याप्रमाणे उभयतांनी वर्तणूक करावयाची आहे.
(आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-20/10/2011