श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. तक्रारदार हे नाचणगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहेत. यातील वि.प.क्रं 1 ही सहकार कायदया खालील नोंदणीकृत सहकारी संस्था आहे तर वि.प.कं 2 ते 12 हे कार्यरत संचालक मंडळ आहे व वि.प.क्रं 13 ते 22 हे माजी संचालक मंडळ आहे. 2. त.क.यांनी वि.प.सहकारी पतसंस्थेत गुंतवणूक म्हणून ठेवींचे रकमांचा तपशिल "परिशिष्ट-अ" नुसार( तसेच प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रती वरुन) खालील प्रमाणे आहे. " परिशिष्ट-अ "
अक्रं | ठेवीदार/ त.क.चे नाव | खाते पत्र क्रमांक | खाते क्रमांक | रक्कम | मुदती नंतर मिळणारी रक्कम | रक्कम ठेवल्याचा दिनांक | रक्कम परत करण्याचा दिनांक | 1 | 2 | | | | 6 | 7 | | अ | लक्ष्मणराव महादेवराव रणदिवे | 75/10 | 2325 | 40,000/- | 80,000/- | 15.01.2003 | 15.10.2007 | ब | वरील प्रमाणे | 186/11 | 2709 | 28,000/- | 56,000/- | 12.01.2004 | 12.07.2009 |
CC/72/2011 ( टिप- तक्रारअर्जात अक्रं ब ची मुदतठेव गुंतवणूक रक्कम रुपये-28,000/- ऐवजी रुपये-25,000/- दर्शविलेली आहे, जे चुकीचे आहे. उपलब्ध पावतीचे प्रती वरुन ती रक्कम रुपये-28,000/- असल्याने सदर रक्कम विवरणपत्रात योग्य दर्शविण्यात आलेली आहे.) 3. त.क.यांनी उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे वि.प.पतसंस्थेत मुदतठेवी अंतर्गत रक्कम जमा केल्यामुळे, त.क. वि.प.चे ग्राहक आहेत. त.क.नीं रक्कम परिपक्व झाल्या नंतर कार्यरत संचालक मंडळाकडे मागणी केली असता, ती त्यांना देण्यात आली नाही व कोणतीही सुचना न देता मुदतठेवीचा कालावधी वाढवून दिला. वस्तुतः मुदतठेव परिपक्व झाल्या नंतर देय रक्कम योग्य ते व्याज व लाभांसह देण्याची जबाबदारी वि.प.चीं होती परंतु त्यांनी त.क.ची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त.क.यांनी ज्यावेळी मुदत ठेव मध्ये रक्कम गुंतवणूक केली त्यावेळी वि.प.पतसंस्थेचे वि.प.क्रं 13 ते 22 संचालक मंडळावर होते. 4. त.क.नीं वेळोवेळी रकमेची मागणी केली परंतु वि.प.संस्था रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रस्तुत तक्रारीस कारण हे जेंव्हा त.क.चीं मुदतठेव परिपक्व झाली तेंव्हा पासून घडत आहे आणि त्यानंतरही तक्रारीचे कारण वि.प.नीं मुदतठेवीची रक्कम परत केली नाही, म्हणून सतत घडत आहे. वारंवार मागणी करुनही रक्कम परत न केल्यामुळे त.क.यांनी त्यांचे अधिवक्ता यांचे मार्फतीने वि.प.यांना दिनांक 08.07.2011 रोजी नोटीस पाठविली असता, सदर नोटीस प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही वा उत्तरही दिले नाही. तक्रार मंजूर व्हावी व प्रार्थने नुसार रक्कम, नुकसान भरपाई व कोर्टखर्च मिळावा अशी प्रार्थना केली आहे. 5. त.क.यांनी प्रस्तुत तक्रारी सोबत पान क्रं-13 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवज दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये, प्रामुख्याने मुदत ठेवीच्या पावत्यांच्या प्रती व वि.प.नां पाठविलेली रजिस्टर नोटीसची प्रत, पोस्टाची पावती व पोच पावती प्रत इत्यादीचा समावेश आहे. 6. वि.प.नां न्यायमंचा तर्फे नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आली असता वि.प.क्रं 13 ते 17 व वि.प.क्रं 19, वि.प.क्रं 21 व वि.प.क्रं 22 तर्फे लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल करण्यात आला. त्यांनी लेखी जबाबात नमुद केले की, त.क. हे त्यांचे ग्राहक होत नाहीत आणि
CC/72/2011 त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त.क.यांचे तक्रारअर्जातील अन्य विपरीत विधाने त्यांनी अमान्य केलीत. त.क.यांची कोणतीही नोटीस त्यांना प्राप्त झालेली नाही. हे वि.प.पतसंस्थेत सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत, त्यामुळे वि.प.पतसंस्थेच्या व्यवहारात त्यांना हस्तक्षेप करता येत नाही, त्यामुळे त्यांचेशी त.क.चे ग्राहकाचे नाते संपुष्ठात आलेले आहे.
7. वि.प. क्रं- 13 ते 17 व वि.प.क्रं 19, वि.प.क्रं 21 व वि.प.क्रं 22 तर्फे यांनी पुढे असेही नमुद केले की, प्रस्तुत तक्रारीत सन 2007 ते 2010 पर्यंत वि.प.पतसंस्थेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वि.प.म्हणून जोडलेले नाही, त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. वि.प.पतसंस्थेची वसुली सुरु असून क्रमाक्रमाने ठेवीदारांच्या रकमा परत करीत आहे. सबब वि.प.क्रं 13 ते 17 व वि.प.क्रं 19, वि.प.क्रं 21 व वि.प.क्रं 22 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये व त्यांना प्रस्तुत प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली. 8. वि.प.क्रं 4 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष पान क्रं 27 वर दिनांक 22.08.2011 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिनांक 28.04.2011 रोजी दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांकम 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे व त्या संबधी पुराव्या दाखल दस्तऐवज दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. 9. वि.प.क्रं 1 पतसंस्थे तर्फे संस्थेचे व्यवस्थापक शेषराव पुंडलीकराव कान्हेकर यांचे वतीने अधिवक्ता श्री जे.पी.देशमुख यांनी वकिलपत्र दाखल केले. तसेच वि.प.संस्थेचे संचालक मंडळा पैकी, वि.प.क्रं 2, वि.प. क्रं 3 तसेच वि.प.क्रं 5 ते 7 आणि वि.प.क्रं 10 ते 12 ने संस्थे तर्फे प्रस्तुत न्यायालयीन प्रकरण चालविण्या करीता शेषराव पुंडलीकराव कान्हेकर यांना लिहून दिलेल्या अधिकारपत्राची प्रत दाखल केली. सदर वि.प.तर्फे दिनांक 21.01.2012 रोजी संस्थेची वसुली झाल्या नंतर रक्कम देण्यात येईल अशा आशयाचा अर्ज मंचा समक्ष करण्यात आला व कार्यालयीन टिपणी श्री शेषराव पुंडलीकराव कानेकर, व्यवस्थापक यांनी शपथपत्रावर
CC/72/2011 दाखल केली, सदर प्रतिज्ञालेखावरील कार्यालयीन टिप्पणी हा त्यांचा लेखी जबाब म्हणून ग्राहय धरण्यात येत आहे. सदर टिप्पणी नुसार वि.प.पतसंस्थेच्या माजी संचालकानी अवैधरित्या वाटलेल्या कर्जामुळे संस्था आर्थिकदृष्टया डबघाईस आल्याचे नमुद केलेले आहे. 10. वि.प.क्रं 18 यांनी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केला आणि नमुद केले की, ते वि.प.पतसंस्थेमध्ये दिनांक 01.04.1995 ते 31.03.2008 पर्यंत व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते व संस्थेच्या संचालक मंडळाचे आदेशा नुसार कार्य करीत होते, एवढाच त्यांचा संबध होता. सबब त्यांना सदर प्रकरणातुन मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली. 11. त.क.यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजी पुरावे यांचे सुक्ष्मपणे वाचन करण्यात आल्या नंतर न्याय निर्णयान्वित करण्या करीता न्यायमंचा समक्ष पुढील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर 1) त.क.हे वि.प.चे ग्राहक होतात काय? होय 2) वि.प.नी त.क.ची मुदतठेवीची रक्कम मागणी करुन देखील व वेळेच्या आत परत न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. 3) काय आदेश? अंतिम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं -1 12. मंचा समक्ष तक्रारकर्त्यानीं, त्यांनी वि.प.कडे जमा केलेल्या मुदतठेव रकमेच्या पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. वि.प. क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं 04 वगळता) हे पतसंस्थेचे सद्य कार्यरत संचालक आहेत हे त.क.चे विधान त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि प्रतिज्ञालेखावरील लेखी पुरावा तसेच वि.प.क्रं 2 ते 12 यांनी (वि.प.क्रं 04 वगळता ) त.क.चे सदर विधानास कोणताही विरोध केला नसल्यामुळे सिध्द होते आणि म्हणून न्यायमंच ग्राहय धरते की, वि.प.क्रं 1 पतसंस्थे तर्फे वि.प.क्रं 2 ते 12 ( वि.प.क्रं 04 वगळता ) यापुढे "वि.प." म्हणजे संस्था आणि वि.प.क्रं 2 ते 12 ( वि.प.क्रं 04 वगळता ) असे वाचण्यात यावे, हे
CC/72/2011 वि.प.संस्थेचे कार्यरत संचालक असून तक्रारकर्ते हे त्यांचे ग्राहक आहेत आणि त.क.नीं त्यांच्या मुदतठेवी वि.प.क्रं-1 पतसंस्थेत जमा केल्या बद्यल मुदतीठेवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. परंतु वि.प.क्रं 13 ते 17 आणि वि.प.क्रं 19 ते 22 हे वि.प.पतसंस्थेचे माजी संचालक आहेत असे त.क.चे कथन आहे व तसाच सदर वि.प.चां बचाव आहे. या वि.प.नीं नमुद केले की, त्यांचे संस्थेच्या दैनंदिन कार्यात ऐकले जात नाहीत आणि म्हणून ते जबाबदार नाहीत तसेच वि.प.क्रं 18 ने नमुद केले की, ते वि.प.पतसंस्थेत तत्कालीन व्यवस्थापक होते आणि त्यांचे कडून संस्थेने विनाकारण वसुली केलेली आहे.म्हणून ते जबाबदार नाहीत आणि त.क.चे त्यांचे ग्राहक होत नाहीत. मंचाचे मते त.क.हे वि.प.पतसंस्थेच्या माजी संचालकांचे व वि.प.क्रं 18 चे ग्राहक होत नाहीत म्हणून या वि.प.विरुध्दची प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. मुद्या क्रं -2 व 3 13. वि.प.क्रं 04 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष दिनांक 22.08.2011 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांक 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली आणि म्हणून वि.प.क्रं 4 यांनी दाखल केलेल्या पुराव्या वरुन त्यांचा वि.प.पतसंस्थेचा संचालक पदाचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचे विरुध्दची प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 14. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, वि.प. यांनी वि.प.पतसंस्थेचा कार्यभार स्विकारल्या नंतर तक्रारकर्ते व इतर ठेवीदारांची रक्कम, थकीत कर्जदारांकडून वसुल करुन, ती ठेवीदारांना परत करण्याची प्राथमिक जबाबदारी वि.प.पतसंस्था आणि तीचे कार्यरत संचालकांवर आहे आणि म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 1 पतसंस्था आणि वि.प.यांनी त.क.ला त्यांची मुदतठेवीची जमा रक्कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. CC/72/2011 15. तसेच त.क. यांनी, आपल्या मुदत ठेवीची व्याजासह मागणी केलेली आहे. आणि म्हणून संस्था व वि.प. हे त.क.ची मुदतठेवीची रक्कम देयलाभ आणि व्याजासह त.क.यांना परत करण्यास वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 16. त.क.ने मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्तव रकमेची असल्याने ती मागणी नुसार मान्य करता येऊ शकत नाही.परंतु त.क.शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-1000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-1000/- मिळण्यास वि.प.कडून पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार संस्था व वि.प.क्रं-1 ते 12 (वि.प.क्रं 04 वगळता) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) संस्था व वि.प.यांनी त.क.चीं मुदतठेवींची देयलाभांसह जमा रक्कम, त.क.नां मागणी करुनही परत न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3) संस्था व वि.प.यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ची आदेशातील परिच्छेद क्रं-2 मधील"परिशिष्ट-अ" नुसार घेणे असलेली मुदतठेवीची रक्कम मुदतठेव परिपक्व तारखे पासून ते संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.4 टक्के दराने व्याजासह त.क. यांना देय करावी. वि.प.नीं त.क. यांना काही रक्कम परत केली असल्यास वा त.क.कडून काही रक्कम वि.प.पतसंस्थेला घेणे असल्यास तिचे योग्य ते समायोजन करावे. 4) संस्था व वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-1000/-(अक्षरी- रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) नुकसान भरपाई दाखल त.क.यांना देय करावे.
CC/72/2011 5) सदर आदेशाचे अनुपालन, संस्था व वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात आदेशाची प्रत मिळाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्यथा, शेवटच्या परिपक्व तारखेस देय रक्कम आदेश दिनांक-31.01.2012 पासून ते संपूर्ण रक्कम चुकती होई पर्यंत द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याजासह संस्था व वि.प. हे त.क.यांना देण्यास जबाबदार राहतील. 6) वि.प. क्रं-04 व वि.प.क्रं 13 ते 22 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 7) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |