Maharashtra

Solapur

CC/10/37

Shamrao keru Masud - Complainant(s)

Versus

Mahatma Jotirao Phule Patsanstha 2.Avinashlaxmiman mahagaonkar 3.javed dastagir attar 4.somnath kash - Opp.Party(s)

14 Jan 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/37
1. Shamrao keru Masudr/o kalegaon tal brishisolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Mahatma Jotirao Phule Patsanstha 2.Avinashlaxmiman mahagaonkar 3.javed dastagir attar 4.somnath kashtnath atkar 5. popat banaji hanvate 6.sanjay suvrav ravut 7. narandra goavet kale 8.rajendra kantil at& post brloni tal madha solapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 14 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

                                                                   तक्रार दाखल दिनांक:  02/02/2010.  

                                                                   तक्रार आदेश दिनांक : 14/01/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 37/2010.

 

श्री. शामराव केरु मस्‍तुद, वय 63 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. काळेगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर.                              तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. महात्‍मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या.,

   बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

2. श्री. अविनाश लक्ष्‍मण महागांवकर चेअरमन, रा. 4/8,

   विद्यानगर क्र.2, सिव्‍हील हॉस्‍पीटलचे मागे, पाथरुट चौक, सोलापूर.

3. श्री. जावेद दस्‍तगीर अत्‍तार, व्‍हा. चेअरमन, रा. भगवंत कॉम्‍प्‍लेक्‍स,

   राज मोबाईल शॉपी, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.

4. श्री. सोमनाथ काशिनाथ आतकर, सचिव, रा. जिजामाता नगर,

   टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, जि. सोलापूर.

5. श्री. पोपट बनाजी हनवते, संचालक, रा. मु.पो. भांबुरे वस्‍ती,

   कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. श्री. संजय सुब्राव राऊत, संचालक, रा. मु.पो. मानेगाव,

   ता. माढा, जि. सोलापूर.

7. श्री. नहेंद्र गोविंद काळे, संचालक, रा. मु.पो. न्‍यू संतोष नगर,

   विजापूर रोड, सोलापूर.

8. श्री. राजेंद्र कांतीलाल कोठारी, संचालक, रा.मु.पो. टेंभुर्णी,

   ता. माढा, जि. सोलापूर.

9. श्री. संजय संभाजी कुटे, संचालक, रा. मु.पो. टेंभुर्णी,

   ता. माढा, जि. सोलापूर.

10. श्री. विशाल विलास लडगे, संचालक, मु.पो. वडशिंगे,

    ता. माढा, जि. सोलापूर.

11. सौ. स्मिता धनंजय शहाणे, संचालक, मु.पो. मंगळवार पेठ,

    क्‍लासिक ऑफसेट, माढा, ता. माढा, जि. सोलापूर.

12. सौ. मृदुला औदुंबर तळेकर, संचालिका, सुराणा मार्केट,

    मेकॅनिक चौक, मुरारजी पेठ, सोलापूर.                   विरुध्‍द पक्ष

 

13. श्री. नागेश्‍वर ज्ञानदेव लोंढे, संचालक, रा. मु.पो. चौधरी

    प्‍लॉट, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

14. श्री. काकासाहेब अप्‍पासाहेब पाटील, संचालक,

    मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

15. श्री. विष्‍णू नरसू अनंतकवळकस, संचालक,

    मु.पो. कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर.

16. अध्‍यक्ष - प्रशासक मंडळ, महात्‍मा ज्‍योतिराव फुले ग्रामीण

    बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्या., शाखा वैराग,

    ता. माढा, जि. सोलापूर.                                     विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                                सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी

          विरुध्‍द पक्ष क्र. 2, 3, 6 ते 8, 10 ते 14 यांचेतर्फे अभियोक्‍ता : डी.पी. बागल

 

आदेश

सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या वैराग शाखेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

 

ठेव तपशील

रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

मुदत ठेव पावती

40,000

039199

23/6/08

23/3/09

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

20,000

039318

17/11/08

17/5/09

11 टक्‍के

मुदत ठेव पावती

20,000

039368

8/4/08

8/1/09

12 टक्‍के

बचत खाते

10,960

677

31/3/09

--

--

 

2.    मुदतीनंतर तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मागणी केली असता रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे. तक्रारदार यांना त्‍यांच्‍या औषधोपचाराकरिता ठेव रकमेची नितांत आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.10,960/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र. 2 व 3, 6 ते 10, 12 व 13 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सर्व ठेवीदारांनी एकाचवेळी ठेव रकमेची मागणी केलेली आहे आणि संस्‍थेच्‍या कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांना ठेव परत करण्‍याचे काम चालू होते. दि.4/7/09 रोजी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सोलापूर यांनी संचालक मंडळ बरखास्‍त करुन त्‍या ठिकाणी प्रशासकाची नियुक्‍ती केलेली आहे आणि तक्रार करताना ते संचालक नाहीत. त्‍यांचा संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये भाग घेता येऊ शकत नाही आणि त्‍यांना तक्रारीतून वगळण्‍यात यावे, असे त्‍यांनी नमूद केले आहे. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

 

4.    उर्वरीत विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

 

            मुद्दे                                उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                        होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?            होय. 

3. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या वैराग शाखेमध्‍ये मुदत ठेव व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावत्‍यांवरुन निदर्शनास येते आणि त्‍याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांना औषधोपचाराकरिता ठेव रकमेची निकड भासल्‍यामुळे मुदतीनंतर ठेवीची मागणी केली असता रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.

 

7.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या वैराग शाखेमध्‍ये मुदत ठेव व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांच्‍या औषधोपचाराकरिता ठेव रकमेची आवश्‍यकता भासल्‍यामुळे वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. ठेव रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.4 हे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेचे सचिव आहेत. ठेव रक्‍कम परत करण्‍यासाठी त्‍यांची जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना जबाबदार धरता येत नाही.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 व 5 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

     

ठेवीचा तपशील

पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

मुदत ठेव पावती

039199

40,000

23/3/09

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

039318

20,000

17/5/09

11 टक्‍के

मुदत ठेव पावती

039368

20,000

8/1/09

12 टक्‍के

बचत खाते

677

10,960

31/3/2009

बचत ठेवीच्‍या व्‍याज दराने

 

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 व 5 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

(सौ. प्रतिभा प्र. ज‍हागिरदार)                               (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

 (संविक/स्‍व/13111)

 

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT