जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक: 02/03/2010. आदेश दिनांक : 11/10/2010. ग्राहक तक्रार क्रमांक : 88/2010. निर्मला रामलिंग शेंडे, वय 40 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. उभी काडादी चाळ, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 89/2010. महानंदा रामलिंग शेंडे, वय 55 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. उभी काडादी चाळ, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर (चेअरमन), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. 4/28, विद्यानगर क्र.2, सिव्हील हॉस्पीटलचे मागे, पाथरुट चौक, सोलापूर - 3 (जि. सोलापूर). 3. श्री. विशाल विलास लडगे (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. नरेंद्र गोविंद काळे (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. न्यू संतोष नगर, विजापूर रोड, सोलापूर, जि. सोलापूर. 5. श्री. राजेंद्र कांतीलाल कोठारी (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. सौ. मृदुला औदुंबर तळेकर (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 7. श्री. रामेश्वर ज्ञानदेव लोंढे (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. चौधरी प्लॉट, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 8. श्री. नवनाथ काशीनाथ आतकर (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. जिजामाता नगर, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. श्री. पोपट बनाजी हनवते (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. भांबुरे वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 10. श्री. काकासाहेब आप्पासाहेब पाटील (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 11. श्री. संजय सुब्राव राऊत (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूर. 12. श्री. विष्णू नरसू अनंतकवळस (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर. 13. श्री. जावेद दस्तगीर आतार (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. भगवंत कॉम्प्लेक्स, राज मोबाईल शॉपी, बार्शी, जि. सोलापूर. 14. सौ. स्मिता धनंजय शहाणे (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मंगळवार पेठ, क्लासिक ऑफसेट, माढा, ता. माढा, जि. सोलापूर. 15. श्री. संजय संभाजी कुटे (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. 16. श्री. संतोष आनंद शेलार (मॅनेजर - कुर्डुवाडी शाखा), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 17. प्रशासक, (संचालक), महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.एम. पलसे विरुध्द पक्ष क्र. 2 ते 7, 11, 13 व 15 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये अनुक्रमे मासिक व्याज प्राप्ती योजना व मुदत ठेव पावती क्र.004507 व 036880 द्वारे अनुक्रमे रु.50,000/- गुंतवणूक केलेले आहेत. ठेवीची मुदत अनुक्रमे दि.6/11/08 व 8/2/09 रोजी संपलेली आहे. मुदतीनंतर तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. तक्रारदार यांना त्यांच्या औषधोपचाराकरिता व उदरनिर्वाहासाठी ठेव रकमेची नितांत आवश्यकता आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविल्या असता नोटीस प्राप्त होऊनही रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र. 2 ते 7, 11, 13 व 15 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व ठेवीदारांनी एकाचवेळी ठेव रकमेची मागणी केलेली आहे आणि संस्थेच्या कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांना ठेव परत करण्याचे काम चालू होते. दि.4/7/09 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे संस्थेचा कामकाजामध्ये त्यांना भाग घेता येऊ शकत नाही आणि त्यांना तक्रारीतून वगळण्यात यावे, असे त्यांनी नमूद केले आहे. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. उर्वरीत विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये मुदत ठेव व मासिक व्याज प्राप्ती योजनेमध्ये अनुक्रमे रु.50,000/- रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते आणि त्याविषयी विवाद नाही. त्यांच्या औषधोपचाराकरिता व उदरनिर्वाहासाठी ठेव रकमेची निकड भासल्यामुळे मुदतीनंतर त्यांनी ठेवीची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतंसंस्थेच्या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्याप्रमाणे संचालकांना प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये मासिक व्याज प्राप्ती योजना व मुदत ठेवीमध्ये अनुक्रमे रु.50,000/- रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांच्या औषधोपचाराकरिता उदरनिर्वाह खर्चासाठी ठेव रकमेची आवश्यकता असल्यामुळे वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मासिक व्याज प्राप्ती योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेस माहे फेब्रुवारी 2009 पासून व्याज मिळत नसल्याचे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. त्यामुळे मासिक व्याज प्राप्ती योजनेची रक्कम माहे फेब्रुवारी 2009 पासून व्याजासह मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 8. विरुध्द पक्ष क्र.16 व 17 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे अनुक्रमे मॅनेजर व प्रशासक आहेत. ठेव रक्कम परत करण्याची त्यांची जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांना जबाबदार धरता येत नाही. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. ग्राहक तक्रार क्र.88/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र. 1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मासिक व्याज प्राप्ती योजना पावती क्र.004507 ची ठेव रक्कम रु.50,000/- दि.1/2/2009 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ग्राहक तक्रार क्र.88 व 89/2010 चे आदेश.... 2. ग्राहक तक्रार क्र.89/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र. 1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती पावती क्र.036880 ची ठेव रक्कम रु.50,000/- दि.8/1/2008 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/111010)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |