श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी वि.प.पतसंस्थेत मुदतठेवी अंतर्गत रक्कम जमा केल्यामुळे, त.क. वि.प.चे ग्राहक आहेत. वि.प.पतसंस्थेमध्ये मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम योग्य त्या देयलाभ व व्याजासह परत मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे. त.क. यांनी पुढे असे नमुद केले की, यातील वि.प.क्रं 1 हे माजी व वि.प.क्रं 17 हे सध्याचे वि.प.पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव आहेत आणि वि.प.क्रं 2 ते 11 हे पतसंस्थेचे माजी संचालक आहेत, पैकी क्रं 2 हे माजी अध्यक्ष होते व वि.प.क्रं 12 ते 21 पतसंस्थेचे कार्यरत नविन सभासद आहेत. 2. त.क.यांनी तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे वि.प.सहकारी पतसंस्थेत गुंतवणूक म्हणून ठेवींचे रकमांचा तपशिल "परिशिष्ट-अ" नुसार( तसेच प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रती वरुन ) खालील प्रमाणे आहे. " परिशिष्ट-अ "
अक्रं | ठेवीदार/ त.क.चे नाव | ठेव दिनांक | खाते क्रमांक | खाते पत्र क्रमांक | ठेव रक्कम | देय दिनांक | देय रक्कम | प्राप्त रक्कम | शिल्लक रककम | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 1 | प्रमोदराव काळे | 21.08.06 | 3499 | 49/14 | 50,000/- | 21.02.07 | 52,500/- | 15,000/- | 37,500/- | | | | | | | | | | |
CC/93/2011 3. त.क.यांनी मुदतठेवीची रक्कम परिपक्व झाल्या नंतर वि.प.कडे मागणी केली असता, ती त्यांना देण्यात आली नाही. रक्कम परिपक्व झाल्या नंतर देय रक्कम देण्याची जबाबदारी वि.प.चीं होती परंतु त्यांनी त.क.ची पूर्ण देय रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त.क.यांचे सततचे पाठपुराव्या नंतर वि.प.पतसंस्थेनी दिनांक 22.11.2010 रोजी रुपये-5000/-, दिनांक 18/05/2011 रोजी रुपये-10,000/- असे मिळून रुपये-15,000/- एवढी आंशिक रक्कम त.क.यांना परत केलेली आहे परंतु अद्यापही शिल्लक रक्कम रुपये-37,500/- परत केलेली नाही. त.क.यांनी वकिला मार्फत दिनांक 06.07.2011 रोजी वि.प.नां नोटीस पाठवून व्याजासह रकमेची मागणी केली परंतु उपयोग झाला नाही. शेवटी मे-2011 मध्ये त.क.यांनी वि.प.नां पत्र पाठवून रकमेची मागणी केली परंतु सदर पत्राचे उत्तर देण्यात आले नाही. 4. त.क.नीं वेळोवेळी रकमेची मागणी केली परंतु वि.प.संस्था रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत म्हणून प्रस्तुत प्रस्तुत तक्रारीस कारण सातत्याने घडत आहे.तक्रार मंजूर व्हावी व प्राथने नुसार रक्कम , नुकसान भरपाई व कोर्टखर्च मिळावा अशी प्रार्थना केली आहे. 5. त.क.ने तक्रारी सोबत पान क्रं-12 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवज दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये, प्रामुख्याने मुदत ठेव पावती प्रत व रकमेची मागणी करणारी वि.प.पतसंस्थेस पाठविलेली नोटीस प्रत, रजिस्टर पोस्टाची पावती प्रत इत्यादीचा समावेश आहे.
6. वि.प.नां न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. पैकी, वि.प.क्रं 2 ते 6 व क्रं 8 ते 11 यांनी न्यायमंचा समक्ष दिनांक 27.12.2011 रोजी प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब दाखल केला. त्यांनी लेखी जबाबात नमुद केले की, त.क. हे त्यांचे ग्राहक होत नाहीत आणि त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त.क.यांचे तक्रारअर्जातील अन्य विपरीत विधाने त्यांनी अमान्य केलीत. त.क.यांची कोणतीही नोटीस त्यांना प्राप्त झालेली नाही. वि.प.क्रं 2 ते 6 व क्रमांक 8 ते 11 हे वि.प.पतसंस्थेत सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत, त्यामुळे वि.प.पतसंस्थेच्या व्यवहारात त्यांना हस्तक्षेप करता येत नाही, त्यामुळे त्यांचेशी त.क.चे ग्राहकाचे नाते संपुष्ठात आलेले आहे.
CC/93/2011 7. वि.प. क्रं 2 ते 6 व क्रं 8 ते 11 यांनी पुढे असेही नमुद केले की, प्रस्तुत तक्रारीत सन 2007 ते 2010 पर्यंत वि.प.पतसंस्थेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वि.प.म्हणून जोडलेले नाही, त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. वि.प.पतसंस्थेची वसुली सुरु असून क्रमाक्रमाने ठेवीदारांच्या रकमा परत करीत आहे. सबब वि.प.क्रं 2 ते 6 व 8 ते 11 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये व त्यांना प्रस्तुत प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली. 8. वि.प.क्रं 20 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष दिनांक 04.11.2011 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिनांक 28.04.2011 रोजी दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांकम 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे व त्या संबधी पुराव्या दाखल दस्तऐवज दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली . 9. वि.प.क्रं 1 पतसंस्थे तर्फे संस्थेचे व्यवस्थापक शेषराव पुंडलीकराव कान्हेकर यांचे वतीने अधिवक्ता श्री जे.पी.देशमुख यांनी वकिलपत्र दाखल केले. तसेच वि.प.संस्थेचे संचालक मंडळा पैकी, वि.प.क्रं 12 ते 19 ने संस्थे तर्फे प्रस्तुत न्यायालयीन प्रकरण चालविण्या करीता शेषराव पुंडलीकराव कान्हेकर यांना लिहून दिलेल्या अधिकारपत्राची प्रत दाखल केली. सदर वि.प.तर्फे दिनांक 21.01.2012 रोजी संस्थेची वसुली झाल्या नंतर रक्कम देण्यात येईल अशा आशयाचा अर्ज मंचा समक्ष करण्यात आला व कार्यालयीन टिपणी श्री शेषराव पुंडलीकराव कानेकर, व्यवस्थापक यांनी शपथपत्रावर दाखल केली, सदर प्रतिज्ञालेखावरील कार्यालयीन टिप्पणी हा संस्थेचा लेखी जबाब म्हणून ग्राहय धरण्यात येत आहे. सदर टिप्पणीद्वारे वि.प.पतसंस्थेच्या माजी संचालकानी अवैधरित्या वाटलेल्या कर्जामुळे संस्था आर्थिकदृष्टया डबघाईस आल्याचे नमुद केलेले आहे. CC/93/2011 10 त.क.यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, वि.प.यांचे प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजी पुरावे यांचे सुक्ष्मपणे वाचन करण्यात आल्या नंतर न्याय निर्णयान्वित करण्या करीता न्यायमंचा समक्ष पुढील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर 1) त.क.हे वि.प.चे ग्राहक होतात काय? होय 2) वि.प.नी त.क.ची मुदतठेवीची रक्कम मागणी करुन देखील व वेळेच्या आत परत न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. 3) काय आदेश? अंतिम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं -1 11. मंचा समक्ष तक्रारकर्त्यानीं, त्यांनी वि.प.कडे जमा केलेल्या मुदतठेव रकमेच्या पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. वि.प. क्रं 12 ते 21 (वि.प. क्रं 20 वगळता) हे पतसंस्थेचे सद्य कार्यरत संचालक आहेत हे त.क.चे विधान त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि प्रतिज्ञालेखावरील लेखी पुरावा तसेच वि.प.क्रं 12 ते 21 यांनी (वि.प.क्रं 20 वगळता) त.क.चे सदर विधानास कोणताही विरोध केला नसल्यामुळे सिध्द होते आणि म्हणून न्यायमंच ग्राहय धरते की, वि.प.क्रं 1 पतसंस्थे तर्फे वि.प.क्रं 12 ते 21 (वि.प.क्रं 20 वगळता) यापुढे वि.प. क्रं 12 ते 21 (वि.प.क्रं 20 वगळता) म्हणजे "वि.प."असे वाचण्यात यावे, हे वि.प.संस्थेचे संचालक असून तक्रारकर्ते हे त्यांचे ग्राहक आहेत आणि त.क.नीं त्यांच्या मुदतठेवी वि.प.क्रं-1 पतसंस्थेत जमा केल्या बद्यल मुदतीठेवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. मुद्या क्रं -2 व 3 12. वि.प.क्रं 20 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष दिनांक 04.11.2011 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांक 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे.
CC/93/2011 त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली आणि म्हणून वि.प.क्रं 20 यांनी दाखल केलेल्या पुराव्या वरुन त्यांचा वि.प.पतसंस्थेचा संचालक पदाचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचे विरुध्दची प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच वि.प.क्रं 2 ते 6 व क्रमांक 8 ते 11 हे वि.प.पतसंस्थेत सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत, त्यामुळे वि.प.पतसंस्थेच्या व्यवहारात त्यांना हस्तक्षेप करता येत नाही, त्यामुळे त्यांचेशी त.क.चे ग्राहकाचे नाते संपुष्ठात आलेले आहे, असे या वि.प.चें विधान मान्य करणे योग्य व कायदेशीर राहिल असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे म्हणून त.क.हे वि.प.क्रं 2 ते 6 व क्रमांक-8 ते 11 यांचे ग्राहक नाही. तसेच वि.प.क्रं 7 ने लेखी जबाब प्रकरणात दाखल केलेला नाही परंतु वि.प.क्रं 7 सुध्दा माजी संचालक आहेत असे स्पष्ट होते. सबब त्यांचे विरुध्द सबळ पुराव्या अभावी प्रकरण खारीज करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
13. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, संस्था आणि वि.प.यांनी वि.प.पतसंस्थेचा कार्यभार स्विकारल्या नंतर तक्रारकर्ते व इतर ठेवीदारांची रक्कम, थकीत कर्जदारांकडून वसुल करुन, ती ठेवीदारांना परत करण्याची प्राथमिक जबाबदारी वि.प.पतसंस्था आणि तीचे कार्यरत संचालकांवर आहे. म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 1 पतसंस्था आणि वि.प.यांनी त.क.ला त्यांची मुदतठेवीची जमा रक्कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 14. वि.प. क्रं 1 पतसंस्थेकडे जमा रक्कम मागणी नुसार ठेविदारास परत मिळणे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त.क.नीं मागणी केल्यावर, त्यानुसार त.क.चीं रक्कम त्यांना परत करणे क्रमप्राप्त होते परंतु असे झालेले दिसून येत नाही आणि म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 1 पतसंस्था आणि तिचे तर्फे वि.प.क्रं 12 ते 21 (वि.प. क्रं 20 वगळता) यांनी त.क.ला त्यांची मुदतठेवीची जमा रक्कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 15. तसेच त.क. यांनी, आपल्या मुदत ठेवीची व्याजासह मागणी केलेली आहे. आणि म्हणून संस्था व वि.प. हे त.क.ची मुदतठेवीची रक्कम देयलाभ आणि व्याजासह त.क.यांना परत करण्यास वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. CC/93/2011 16. त.क.ने मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्तव रकमेची असल्याने ती मागणी नुसार मान्य करता येऊ शकत नाही.परंतु त.क.शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-1000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-1000/- मिळण्यास वि.प.कडून पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार संस्था व वि.प.क्रं 12 ते 21 (वि.प.क्रं 20 वगळता) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) संस्था व वि.प.यांनी त.क.चीं मुदतठेवींची देयलाभांसह जमा रक्कम, त.क.नां मागणी करुनही परत न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3) संस्था व वि.प.यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ची आदेशातील परिच्छेद क्रं-2 मधील"परिशिष्ट-अ" नुसार घेणे असलेली मुदतठेवीची रक्कम मुदतठेव परिपक्व तारखे पासून ते संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.4 टक्के दराने व्याजासह त.क. यांना देय करावी. वि.प.नीं त.क. यांना काही रक्कम परत केली असल्यास वा त.क.कडून काही रक्कम वि.प.पतसंस्थेला घेणे असल्यास तिचे योग्य ते समायोजन करावे. 4) संस्था व वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-1000/-(अक्षरी रुपये- एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी- रुपये एक हजार फक्त) नुकसान भरपाई दाखल त.क.यांना देय करावे. 5) सदर आदेशाचे अनुपालन, संस्था व वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात आदेशाची प्रत मिळाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्यथा, शेवटच्या परिपक्व तारखेस देय रक्कम आदेश दिनांक-31.01.2012 पासून ते संपूर्ण रक्कम चुकती होई पर्यंत द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याजासह संस्था व वि.प. हे त.क.यांना देण्यास जबाबदार राहतील. 6) वि.प. क्रं-2 ते 11 आणि वि.प.क्रं-20 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
CC/93/2011 7) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |