1. उपरोक्त नमुद त.क. हे औरंगाबाद येथील कायम रहिवासी आहेत म्हणून त्यांनी खास मुखत्यार पत्र दिनांक 27.04.2011 अन्वये मृणाल संतोष सोनी यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये मुखत्यार म्हणून नेमलेले आहे. यातील वि.प.क्रं 1 ही सहकार कायदया खालील नोंदणीकृत संस्था आहे तर वि.प.कं 2 ते 12 हे कार्यरत संचालक आहेत 2. त.क.यांनी वि.प.सहकारी पतसंस्थेत गुंतवणूक म्हणून ठेवींचे रकमांचा तपशिल "परिशिष्ट-अ" नुसार( तसेच प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रती वरुन ) खालील प्रमाणे आहे. " परिशिष्ट-अ "
अक्रं | ठेवीदार/ त.क.चे नाव | खाते पत्र क्रमांक | खाते क्रमांक | रक्कम | मुदती नंतर मिळणारी रक्कम | रक्कम ठेवल्याचा दिनांक | रक्कम परत करण्याचा दिनांक | 1 | 2 | | | | 6 | 7 | | 1 | मोनीता सुनिलकुमार सेठठी | 154/8 | 1854 | 5000/- | 10,000/- | 31.10.2001 | 31.07.2007 | | | | | | 13,900/- | | 31.07.2009 | | | | | | | | | | | 142/7 | 1576 | 2500/- | 5000/- | 31.01.2001 | 31.10.2005 | | | | | | 5,500/- | | 31.10.2006 | | | | | | 7,645/- | | 31.10.2009 | | | | | | | | | | | 150/12 | 2736 | 1,00,000/- | 2,00,000/- | 31.07.2004 | 31.01.2010 | | CC/70/2011 | | | | | | | 2 | मेघना निरजकुमारजी बडजाते | 149/12 | 2735 | 1,00,000/- | 2,00,000/- | 31.07.2004 | 31.01.2010 | | | 42/09 | 2018 | 5000/- | 10,000/- | 30.03.2002 | 30.12.2006 | | | | | | 13,900/- | | 30.12.2009 | | | 40/09 | 2016 | 5000/- | 10,000/- | 30.03.2002 | 30.12.2006 | | | | | | 13,900/- | | 30.12.2009 |
वरील मुदत ठेव रक्कम पैकी, खाते क्रमांक 2016 त.क.क्रं 2 हिने तिची मुलगी नामे खुशी एन.बडजाते हिचे नावानी ठेवले होते व ती अज्ञान आहे. 3. त.क.यांनी उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे वि.प.पतसंस्थेत मुदतठेवी अंतर्गत रक्कम जमा केल्यामुळे, त.क. वि.प.चे ग्राहक आहेत. त.क.नीं रक्कम परिपक्व झाल्या नंतर मागणी केली असता, ती त्यांना देण्यात आली नाही. परिपक्व झाल्या नंतर रक्कम देण्याची जबाबदारी वि.प.चीं होती परंतु त्यांनी त.क.ची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून वि.प.कडून शारिरीक मानसिक त्रासा बद्यल उभय त.क. प्रत्येकी रुपये-25,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- मिळण्यास त.क.पात्र आहेत आणि देय तारखे नंतर रक्कम न दिल्याने वि.प.संस्थेकडून देय रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो व्याज व इतर अनुषंगीक दाद मिळण्यास पात्र आहे. 4. त.क.नीं वेळोवेळी रकमेची मागणी केली परंतु वि.प.संस्था रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रस्तुत तक्रारीस कारण हे जेंव्हा त.क.चीं मुदतठेव दिनांक 31.07.2009, 31.10.2009, 30.12.2009, 31.01.2010 रोजी पूर्ण झाली अशा तारखांना घडत आहे आणि त्यानंतरही तक्रारीचे कारण जेंव्हा त.क.नीं खास मुखत्यार मार्फत वि.प.नां दिनांक 09.05.2011 रोजी मुदत ठेव रक्कम परत मिळण्या करीता विनंती अर्ज केले परंतु वि.प.नीं रक्कम परत केली नाही, तेंव्हा पासून सतत घडत आहे. 5. तक्रारकर्त्यांनी तक्रारी सोबत पान क्रं-09 वरील यादी नुसार एकूण 08 दस्तऐवज दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये, प्रामुख्याने मुदत ठेवीच्या पावत्यांच्या प्रती व वि.प.पतसंस्थेला रकमेची मागणी करणारे पत्र व मुखत्यारपत्र इत्यादीचा समावेश आहे. त.क.तर्फे मुखत्यार यांनी पान क्रं 45 वर लेखी पुरसिस दाखल करुन त.क.ची तक्रार ही शपथपत्रा करीता असून, त.क.ची तक्रार हेच शपथपत्र आहे असे समजावे असे नमुद केलेले आहे.
6. वि.प.नां न्यायमंचा तर्फे नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आली. पैकी रजिस्टर नोटीस वि.प.क्रं-1,2,4,5,6 आणि क्रं-8 ते 12 यांचेवर तामील CC/70/2011 होऊनही त्यांचे तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी जबाबही दाखल केला नाही, म्हणून वि.मंचाने त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक 08.11.2011 रोजी पारीत केला. तर वि.प.क्रं 7 यांनी सुचना मिळूनही नोटीस घेण्यास इन्कार केल्या बद्यल पोस्टाचे शे-यासह पॉकिट परत आल्याने वि.प.क्र 7 विरुध्द वि.मंचाने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दि.03.01.2012 रोजी पारीत केला. 7. वि.प.क्रं 3 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष पान क्रं 40 वर दिनांक 03.01.2012 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिनांक 28.04.2011 रोजी दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांकम 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली . 8. वि.प.क्रं 3 सौ.वर्षाताई दि.तडस हयांनी उपरोक्त नमुद आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ्य त्यांचे राजीनामा संबधाने सहायक निबंधक, सहकारी संस्था देवळी यांनी दिनांक 30.04.2011 रोजी वि.प.पतसंस्थेस दिलेले पत्र व वि.प.पतसंस्थेने दिनांक 15.06.2011 रोजी सौ.वर्षाताई तडस यांचा संचालक पदाचा राजीनामा स्विकृत केल्या बाबत सौ.तडस यांना दिलेल्या पत्राची प्रत पान क्रं 42 वर दाखल केली व सौ.तडस हयांचा राजीनामा मंजूर केल्या बाबत वि.प.पतसंस्थेचे दिनांक 14.06.2011 रोजीचे ठरावाची प्रत पान क्रं 44 वर दाखल केली. 09. त.क.यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजी पुरावे यांचे सुक्ष्मपणे वाचन करण्यात आल्या नंतर न्याय निर्णयान्वित करण्या करीता न्यायमंचा समक्ष पुढील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर 1) त.क.हे वि.प.चे ग्राहक होतात काय? होय 2) वि.प.नी त.क.ची मुदतठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. 3) काय आदेश? अंतिम आदेशा नुसार CC/70/2011 :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं -1 10. मंचा समक्ष तक्रारकर्त्यानीं, त्यांनी वि.प.कडे जमा केलेल्या मुदतठेव रकमेच्या पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. वि.प.क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं 3 वगळता ) हे न्यायमंचाची रजिस्टर पोस्टाची नोटीस मिळूनही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी निवेदन न्यायमंचा समक्ष सादर केलेले नाही वा त.क.चे विधानां बाबत कोणताही वाद उपस्थित केलेला नाही. तसेच वि.प. क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं 3 वगळता ) हे पतसंस्थेचे सद्य कार्यरत संचालक आहेत हे त.क.चे विधान त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि प्रतिज्ञालेखावरील लेखी पुरावा तसेच वि.प.क्रं 2 ते 12 यांनी त.क.चे सदर विधानास कोणताही विरोध केला नसल्यामुळे सिध्द होते आणि म्हणून न्यायमंच ग्राहय धरते की, वि.प.क्रं 2 ते 12 ( वि.प.क्रं 3 वगळता ) हे वि.प.संस्थेचे संचालक असून तक्रारकर्ते हे त्यांचे ग्राहक आहेत आणि त.क.नीं त्यांच्या मुदतठेवी वि.प.क्रं-1 पतसंस्थेत जमा केल्या बद्यल मुदतीठेवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. मुद्या क्रं -2 व 3 11. वि.प.क्रं 3 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्यायमंचा समक्ष पान क्रं 40 वर दिनांक 03.01.2012 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद करण्यात आले की, त्या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्मा ज्योतीबा फुले या सहकारी पतसंस्थेच्या संचालीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचेकडे दिला असून, वि.प.संस्थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांक 5 (अ) नुसार मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा वि.प.पतसंस्थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली . 12. वि.प.क्रं 3 सौ.वर्षाताई दि.तडस हयांनी उपरोक्त नमुद आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ्य वि.प.पतसंस्थेने त्यांचा राजीनामा मंजूर केल्या बाबत वि.प.पतसंस्थेचे दिनांक 14.06.2011 रोजीचे ठरावाची प्रत पान क्रं 44 वर दाखल केलेली आहे आणि वि.प.क्रं 3 यांनी दाखल केलेल्या पुराव्या वरुन त्यांचा वि.प.पतसंस्थेचा संचालक पदाचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचे विरुध्दची प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC/70/2011 13. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, वि.प.पतसंस्थेचे संचालक म्हणजे वि.प.क्रं 2 ते 12 ( वि.प.क्रं 3 वगळता ) यांनी वि.प.पतसंस्थेचा कार्यभार स्विकारल्या नंतर तक्रारकर्ते व इतर ठेवीदारांची रक्कम, थकीत कर्जदारांकडून वसुल करुन, ती ठेवीदारांना परत करण्याची प्राथमिक जबाबदारी वि.प.पतसंस्था आणि तीचे कार्यरत संचालकांवर आहे. पैकी वि.प.क्रं 3, तर्फे प्रकरणात त्यांचा राजीनामा मंजूर झाल्या बद्यल सक्षम दस्तऐवज दाखल केल्यामुळे त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करणे योग्य होईल, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे आणि म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 2 ते 12 ( वि.प.क्रं 3 वगळता ) यांनी त.क. नां त्यांची मुदतठेवीची जमा रक्कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 14. वि.प. क्रं 1 पतसंस्थेकडे जमा रक्कम मागणी नुसार ठेविदारास परत मिळणे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त.क.नीं मागणी केल्यावर, त्यानुसार त.क.चीं रक्कम त्यांना परत करणे क्रमप्राप्त होते परंतु असे झालेले दिसून येत नाही आणि म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 1 ते 12 ( वि.प.क्रं 3 वगळता ) यांनी त.क.ला त्यांची मुदतठेवीची जमा रक्कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 15. तसेच त.क. यांनी, आपल्या मुदत ठेवीची व्याजासह मागणी केलेली आहे. आणि म्हणून वि.प.क्रं 1 ते 12 (वि.प. क्रं 3 वगळता) हे त.क.ची मुदतठेवीची रक्कम देयलाभ आणि व्याजासह त.क.यांना परत करण्यास वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 16. त.क.नीं मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्तव रकमेची असल्याने ती मागणी नुसार मान्य करता येऊ शकत नाही.परंतु त.क.शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल प्रत्येकी रुपये-1000/- आणि तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रुपये-500/- मिळण्यास वि.प.कडून पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार वि.प. (वि.प. म्हणजे वि.प.क्रं 3 वगळता क्रमांक-1 ते 12) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.यांनी त.क.चीं मुदतठेवींची देयलाभांसह जमा रक्कम, त.क.नां मागणी करुनही परत न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. CC/70/2011 3) वि.प.यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ची आदेशातील परिच्छेद क्रं-2 मधील"परिशिष्ट-अ" नुसार घेणे असलेली मुदतठेवीची रक्कम मुदतठेव परिपक्व तारखे पासून ते संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.4 टक्के दराने व्याजासह त.क. यांना देय करावी. वि.प.नीं त.क. यांना काही रक्कम परत केली असल्यास वा त.क.कडून काही रक्कम वि.प.पतसंस्थेला घेणे असल्यास तिचे योग्य ते समायोजन करावे. 4) वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल प्रत्येकी रुपये-1000/-(अक्षरी प्रत्येकी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-500/-(अक्षरी प्रत्येकी रुपये पाचशे फक्त) नुकसान भरपाई दाखल त.क.यांना देय करावे. 5) सदर आदेशाचे अनुपालन, वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात आदेशाची प्रत मिळाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्यथा, संपूर्ण आदेशित रक्कम व त्यावरील देय व्याज हे परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.4टक्के ऐवजी द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजासह वि.प. हे त.क.यांना देण्यास जबाबदार राहतील. 6) वि.प. क्रं-3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 7) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |