Maharashtra

Wardha

CC/71/2011

VANMLA SANTOSHKUMAR SONI - Complainant(s)

Versus

MAHATMA FULE GRAMIN BIGAR SHETI SAHAKARI PAR SANSTHA THRU.BR.MGR.+11 - Opp.Party(s)

S.R.MISHRA

31 Jan 2012

ORDER


11
CC NO. 71 Of 2011
1. VANMLA SANTOSHKUMAR SONIPULGAON WARDHAWARDHAMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. MAHATMA FULE GRAMIN BIGAR SHETI SAHAKARI PAR SANSTHA THRU.BR.MGR.+11NACHANGAONWARDHAMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani ,PRESIDENTHONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi ,MemberHONABLE MR. Shri Milind R. Kedar ,MEMBER
PRESENT :

Dated : 31 Jan 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्‍यक्ष यांचे कथनानुसार

    ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्‍यांचे संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे :

 

1.    उपरोक्‍त नमुद त.क.  पुलगाव, तालुका देवळी, जिल्‍हा वर्धा येथील रहिवासी असून यातील वि.प.क्रं 1 ही सहकार  कायदया खालील  नोंदणीकृत संस्‍था आहे तर  वि.प.कं 2 ते 12 हे कार्यरत संचालक आहेत

 

2.   त.क.यांनी वि.प.सहकारी पतसंस्‍थेत गुंतवणूक म्‍हणून ठेवींचे रकमांचा तपशिल "परिशिष्‍ट-अ" नुसार( तसेच प्रकरणातील उपलब्‍ध पावत्‍यांच्‍या प्रती               वरुन ) खालील प्रमाणे आहे.

                        " परिशिष्‍ट-अ "

अक्रं

ठेवीदार/ त.क.चे नाव

खाते पत्र क्रमांक

खाते क्रमांक

रक्‍कम

मुदती नंतर मिळणारी रक्‍कम

रक्‍कम ठेवल्‍याचा दिनांक

रक्‍कम परत करण्‍याचा दिनांक

1

2

 

 

 

6

7

 

1

सौ.वनमाला संतोषकुमार सोनी

253/9

2237

6000/-

12,000/-

25.10.2002

25.07.2007

 

 

 

 

 

16,680/-

 

25.07.2010

2

वरील प्रमाणे

16/13

3075

8000/-

16,000/-

26.12.2004

26.06.2010

3

वरील प्रमाणे

170/10

2420

30,000/-

60,000/-

31.03.2003

31.12.2007

 

 

 

 

 

81,622/-

 

31.12.2010

4

वरील प्रमाणे

169/10

2419

20,000/-

40,000/-

31.03.2003

31.12.2007

 

 

 

 

 

55,600/-

 

31.12.2010

5

वरील प्रमाणे

168/10

2418

20,000/-

40,000/-

31.03.2003

31.12.2007

 

 

 

 

 

55,600/-

 

31.12.2010

6

संतोषकुमारजी सोनी (मृतक)

172/10

2422

22,800/-

45,600/-

31.03.2003

31.12.2007

 

 

 

 

 

63,384/-

 

31.12.2010

 

 

 

 

CC/71/2011 

 

      वरील मुदत ठेव रक्‍कम पैकी, खाते क्रमांक 172/10 यामधील रक्‍कम त.क.यांचे पती श्री संतोषकुमारजी सोनी यांनी मुदतठेव म्‍हणून ठेवलेली असून त्‍यामध्‍ये नॉमिनी म्‍हणून त.क.यांना दर्शविलेले आहे. त.क. यांचे पतीचा मृत्‍यू दिनांक 09.12.2005 रोजी झालेला असल्‍याने, त.क.नॉमिनी म्‍हणून सदर रक्‍कम वि.प.कडून मिळण्‍यास पात्र आहेत.

 

3.    त.क.यांनी उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे वि.प.पतसंस्‍थेत मुदतठेवी अंतर्गत रक्‍कम जमा केल्‍यामुळे, त.क.वि.प.चे ग्राहक आहेत. त.क.नीं रक्‍कम परिपक्‍व झाल्‍या नंतर मागणी केली असता, ती त्‍यांना देण्‍यात आली नाही. परिपक्‍व झाल्‍या नंतर रक्‍कम देण्‍याची जबाबदारी वि.प.चीं होती परंतु त्‍यांनी त.क.ची रक्‍कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.

 

4.    त.क.यांनी वेळोवेळी रकमेची मागणी केली परंतु  वि.प.संस्‍था रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत आहे. प्रस्‍तुत तक्रारीस कारण हे जेंव्‍हा त.क.ची मुदतठेव                    परिपक्‍व झाली त्‍या तारखे पासून घडत आहे. त.क. यांनी वि.प.कडे मुदतठेवीची रक्‍कम परत मिळण्‍यासाठी दिनलांक 09.05.2011 रोजी लेखी अर्ज केला परंतु वि.प.यांनी त्‍यावर काहीही कार्यवाही केली नाही आणि सदर मुदतठेवीची रक्‍कम वि.प.यांनी परत न केल्‍यामुळे तक्रारीचे कारण हे सातत्‍याने घडत आहे. तक्रार मंजूर व्‍हावी व प्राथने नुसार रक्‍कम , नुकसान भरपाई व कोर्टखर्च  मिळावा अशी प्रार्थना केली आहे.

     

5.    त.क.यांनी तक्रारी सोबत पान क्रं-10 वरील यादी नुसार एकूण 07 दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत, ज्‍यामध्‍ये, प्रामुख्‍याने मुदत ठेवीच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती व वि.प.पतसंस्‍थेला रकमेची मागणी करणारे पत्र  इत्‍यादीचा समावेश आहे. तसेच पान क्रं 13 वर श्री संतोषकुमार सोनी यांचे मृत्‍यू नंतर त्‍यांचे कायदेशीर वारसदार म्‍हणून नमुद तक्रारदार असल्‍या बद्यलचे शपथपत्र दाखल केले आहे.

 

6.    वि.प.नां न्‍यायमंचा तर्फे नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविण्‍यात              आली. पैकी  रजिस्‍टर नोटीस वि.प.क्रं-2 ते 12 (वि.प.क्रं 3 वगळता)  यांचेवर तामील होऊनही त्‍यांचे तर्फे कोणीही न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा विहित मुदतीत लेखी जबाबही दाखल केला नाही, म्‍हणून वि.मंचाने त्‍यांचे विरुध्‍द विहित मुदती नंतर प्रस्‍तुत प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात             पारीत केला.

 

 

 

 

CC/71/2011 

7.    वि.प.क्रं 1 पतसंस्‍थे तर्फे व्‍यवस्‍थापकानी लेखी जबाब दाखल करुन त.क.ची देणे असलेली रक्‍कम मान्‍य केली आहे परंतु पैकी वेळोवेळी एकूण रुपये-50,000/- दिलेले आहेत. पतसंस्‍था त.क.ची उर्वरीत रक्‍कम एकमुस्‍त देऊ शकत नाही. तसेच संस्‍थे मार्फत कर्जाची वसूली सुरु आहे म्‍हणून त.क.ला रक्‍कम पंधरा ते विस किस्‍तीमध्‍ये देऊ शकेल, संस्‍थेला मुदत द्यावी कारण  पूर्वीचे संचालकांमुळे संस्‍था डबघाईस आलेली आहे. 

 

8.    वि.प.क्रं 3 सौ.वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्‍यायमंचा समक्ष                 दिनांक 03.01.2012 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद  करण्‍यात आले की, त्‍या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्‍मा ज्‍योतीबा फुले या सहकारी पतसंस्‍थेच्‍या संचालीका म्‍हणून कार्यरत होत्‍या. त्‍यांनी त्‍यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, देवळी यांचेकडे दिनांक 28.04.2011 रोजी दिला असून, वि.प.संस्‍थेने दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांकम 5 (अ) नुसार मंजूर करण्‍यात आलेला आहे व त्‍यासंबधी पुराव्‍या दाखल दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा वि.प.पतसंस्‍थेशी व तिचे कामकाजाशी  कोणताही संबध नसून त्‍यांना सदर प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती केली .

 

09.   त.क.यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजी पुरावे यांचे सुक्ष्‍मपणे वाचन करण्‍यात आल्‍या नंतर न्‍याय निर्णयान्वित करण्‍या करीता न्‍यायमंचा समक्ष पुढील मुद्ये उपस्थित होतात.

अक्रं        मुद्या                                 उत्‍तर

 

1)    त.क.हे वि.प.चे ग्राहक होतात काय?                   होय

2)    वि.प.नी त.क.ची मुदतठेवीची रक्‍कम

      मागणी करुन देखील व वेळेच्‍या आत परत

      न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?                                  होय.

3)    काय आदेश?                                अंतिम आदेशा नुसार

 

 

 

:: कारणे व निष्‍कर्ष  ::

मुद्या क्रं -1  

10.   मंचा समक्ष त.क.यांनी, त्‍यांनी वि.प.पतसंस्‍थेमध्‍ये  जमा केलेल्‍या मुदतठेव रकमेच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. वि.प.क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं 3 वगळता) हे न्‍यायमंचाची रजिस्‍टर पोस्‍टाची नोटीस मिळूनही  न्‍यायमंचा  समक्ष


 

CC/71/2011 

उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी आपले लेखी निवेदन न्‍यायमंचा समक्ष सादर केलेले नाही वा त.क.चे विधानां बाबत कोणताही वाद उपस्थित केलेला नाही. तसेच वि.प. क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं 3 वगळता) यापुढे " वि.प." असे वाचण्‍यात यावे, हे       वि.प.क्रं 1 पतसंस्‍थेचे सद्य कार्यरत संचालक आहेत हे त.क.चे विधान त.क.ची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि प्रतिज्ञालेखावरील लेखी पुरावा तसेच वि.प.क्रं 2 ते 12 यांनी त.क.चे सदर विधानास कोणताही विरोध केला नसल्‍यामुळे सिध्‍द होते आणि म्‍हणून न्‍यायमंच ग्राहय धरते की,  वि.प.क्रं 1 पतसंस्‍था आणि तिचे वतीने वि.प.क्रं 2 ते 12 (वि.प.क्रं3 वगळता) हे वि.प.संस्‍थेचे कार्यरत संचालक असून तक्रारकर्ते हे त्‍यांचे ग्राहक आहेत आणि त.क.नीं त्‍यांच्‍या मुदतठेवी वि.प.क्रं-1 पतसंस्‍थेत जमा केल्‍या बद्यल मुदतीठेवी प्रमाणपत्रांच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

मुद्या क्रं -2 व 3

11.  वि.प.क्रं-3 .वर्षाताई दि. तडस यांचे तर्फे वि.न्‍यायमंचा समक्ष                दिनांक 03.01.2012 रोजी लेखी पुरसिस दाखल करुन नमुद  करण्‍यात आले की, त्‍या दिनांक 14.06.2011 पर्यंत वि.प.महात्‍मा ज्‍योतीबा फुले या सहकारी पतसंस्‍थेच्‍या संचालीका म्‍हणून कार्यरत होत्‍या. त्‍यांनी त्‍यांचे पदाचा राजीनामा सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, देवळी यांचेकडे दिला असून, वि.प.संस्‍थेने   दिनांक 14.06.2011 चे ठराव क्रमांक 5 (अ) नुसार मंजूर करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांचा वि.प.पतसंस्‍थेशी व तिचे कामकाजाशी कोणताही संबध नसून त्‍यांना सदर प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती केली आणि म्‍हणून

वि.प.क्रं 3 यांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍या वरुन त्‍यांचा वि.प.पतसंस्‍थेचा संचालक पदाचा राजीनामा मंजूर झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

 

12.    मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, वि.प. यांनी वि.प.पतसंस्‍थेचा कार्यभार स्विकारल्‍या नंतर तक्रारकर्ते व इतर ठेवीदारांची रक्‍कम, थकीत कर्जदारांकडून वसुल करुन, ती ठेवीदारांना परत करण्‍याची प्राथमिक जबाबदारी वि.प.पतसंस्‍था आणि तीचे कार्यरत संचालकांवर आहे म्‍हणून मंचाचे मते वि.प.1 पतसंस्‍था आणि "वि.प."  यांनी त.क.नां  त्‍यांची मुदतठेवीची जमा रक्‍कम मागणी नुसार परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.

 

 

 

 

 

 

CC/71/2011 

13.   त.क.ही तिचे मृतक पतीची जमा रक्‍कम सुध्‍दा वि.प.संस्‍थेकडून कायदेशीर वारसदार व नामनिर्देशित व्‍यक्‍ती म्‍हणून व्‍याजासह वसुल करण्‍यास पात्र आहे.

 

14.    तसेच त.क. यांनी, आपल्‍या मुदत ठेवीची व्‍याजासह मागणी केलेली आहे. आणि म्‍हणून संस्‍था व  "वि.प." हे त.क.ची मुदतठेवीची रक्‍कम देयलाभ आणि व्‍याजासह त.क.यांना परत करण्‍यास वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

15.  त.क.नीं मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्‍तव रकमेची असल्‍याने ती मागणी नुसार मान्‍य करता येऊ शकत नाही.परंतु त.क.शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-1000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-1000/- मिळण्‍यास संस्‍था व वि.प.कडून पात्र आहेत, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                 

16.   वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्‍तुत प्रकरणात न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

दे

1)            त.क.ची तक्रार "संस्‍था व वि.प." (वि.प.क्रं 3 वगळता) विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)      संस्‍था व वि.प.यांनी त.क.ची मुदतठेवींची देयलाभांसह जमा रक्‍कम, त.क.ने मागणी करुनही परत न  देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.

3)      "संस्‍था व वि.प."यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात त.क.ची आदेशातील परिच्‍छेद क्रं-2 मधील"परिशिष्‍ट-अ" नुसार घेणे असलेली मुदतठेवीची देय रक्‍कम शेवटच्‍या मुदतठेव परिपक्‍व तारखे पासून ते संपूर्ण रक्‍कम प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.4 टक्‍के दराने व्‍याजासह त.क. यांना देय करावी. वि.प.नीं त.क. यांना काही रक्‍कम परत केली असल्‍यास वा त.क.कडून काही रक्‍कम वि.प.पतसंस्‍थेला घेणे असल्‍यास तिचे योग्‍य ते  समायोजन करावे.

4)     संस्‍था व वि.प. यांनी वैयक्तिक    आणि संयुक्तिक स्‍वरुपात त.क.यांना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा   बद्यल  रुपये-1000/-(अक्षरी-         रुपये एक हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) नुकसान भरपाई दाखल त.क.यांना देय करावे.


CC/71/2011 

5)      सदर आदेशाचे अनुपालन, संस्‍था व वि.प. यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात आदेशाची प्रत मिळाल्‍या पासून तीस दिवसांचे आत करावे, अन्‍यथा, शेवटच्‍या परिपक्‍व तारखेस देय रक्‍कम आदेश                    दिनांक-31.01.2012 पासून ते संपूर्ण रक्‍कम चुकती होई पर्यंत द.सा.द.शे.7 टक्‍के दराने व्‍याजासह संस्‍था व वि.प. हे त.क.यांना देण्‍यास जबाबदार राहतील.

6)      वि.प. क्रं-3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

7)           उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रमाणित प्रत निःशुल्‍क

        उपलब्‍ध करुन द्यावी.

8)           मंचामध्‍ये मा.सदस्‍यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्‍सच्‍या प्रती

        तक्रारकर्त्‍याने घेवून जाव्‍यात.

 

 

 

 

(रामलाल भ. सोमाणी)

  (सौ.सुषमा प्र.जोशी )

(मिलींद रामराव केदार)

अध्‍यक्ष.

सदस्‍या.

सदस्‍य.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, वर्धा

 


[HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER