न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. वि.प. ही महारयत अॅग्रो प्रा.लि. कंपनी असून तिचा रजिस्ट्रेशन नं. 181327 असा आहे. सदर कंपनीचा सी.आय.एन.नं.- U-121-PN2019PTC181327 असा आहे. सदर कंपनीचे सुधीर शंकर मोहिते हे प्रोप्रायटर असून सदर कंपनी प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती, मत्स्य शेती, कुकुटपालन व शेतीपालन करण्याचा व्यवसाय करते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. कंपनीचे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन दाखल केलेले आहे. वि.प. कंपनीने वृत्तपत्रामध्ये “आधुनिक शेती बरोबर करा कडकनाथ कुक्कुटपालन ” या आशयाची जाहीरात प्रसिध्द केली. सदर जाहीरातीनुसार तक्रारदार यांनी वि.प. कंपनीबरोबर दि.7/5/19 रोजी करार केला. सदर करारानुसार तक्रारदार यांनी कडकनाथ या कुक्कुटपालन प्रकल्पासाठी वि.प. यांना अॅडव्हान्स बुकींग म्हणून पावती क्र. 13005 प्रमाणे रक्कम रु.50,000/- व ता. 16/4/2019 रोजी भरले, तसेच उर्वरीत रक्कम पावती क्र. 13079 प्रमाणे रक्कम रु.1,09,000/- ता. 6/5/2019 रोजी भरले. तक्रारदार यांनी वि.प. यांना करारात ठरलेप्रमाणे संपूर्ण अॅडव्हान्स रक्कम रु.2,40,000/- अदा केली. करारपत्राप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून कडकनाथ पक्षी संख्या 300 इतके ता. 10/5/2019 रोजी दिले व त्याप्रमाणे वि.प. कंपनीने दिलेल्या पक्षांसाठी लस, औषधे, डॉक्टर व्हिजीट, तसेच सदर पक्षांचे खाद्य देण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीवर विश्वास ठेवून त्यांचे नातेवाईक यांचे शेतात पोल्ट्री फार्मची उभारणी केली होती. सदर पक्षी तक्रारदार यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये आणल्यानंतर वि.प. कंपनीने करारात ठरलेप्रमाणे कोणतेही कृत्य केले नाही अगर कराराप्रमाण सेवा देखील दिलेली नाही. त्याकारणाने तक्रारदार यांनी वि.प. यांना विचारणा केली असता वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले 300 पक्षी परत करुन भरलेली रक्कम व नुकसान भरपाई घेवून जाणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 300 पक्षी परत केले. मात्र वि.प. यांनी तक्रारदार यांनी अदा केलेली अॅडव्हान्स रक्कम व नुकसान भरपाई देणेस नकार दिला. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 16/4/2019 रोजी झालेल्या करारपत्रातील अटी व शर्तींची पूर्तता न करुन सदर अटी व शर्तींचा भंग करुन तक्रारदार यांना अॅडव्हान्स रक्कम व नुकसान भरपाई न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. सबब, तक्रारदारांना वि.प. यांचेकडून रक्कम रु. 2,40,000/-, सदर रकमेवर 10 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत करारपत्र, रक्कम अदा केलेच्या पावत्या, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीस परत आलेला लखोटा, तक्रारदार यांचे ओळखपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 यांनी ता. 4/1/21 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. वि.प. क्र.1 यांनी त्यांचे कंपनीमार्फत कुक्कुटपालन योजनेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होता ही बाब मान्य केलेली आहे. परंतु तक्रारदार यांचे तक्रारीनुसार कडकनाथ पक्षी ठराविक रक्कम घेवून दिला असेल तसेच त्यांच्याकडून कंपनीने जर पक्षी मागे घेतला असेल तर त्याची पावती दिली असेल. परंतु हा व्यवहार नक्की झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण सर्व व्यवहाराची कागदपत्रे सांगली आर्थिक गुन्हे शाखेकडे आहेत असे वि.प.क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले आहे. तसेच जामीन झाल्यानंतर सर्व त्या कागदपत्रांची व व्यवहाराची पडताळणी करुन आम्ही संचालक योग्य ती कारवाई करु असे म्हणणे दिलेले असून सदर म्हणण्यावर मंडल तुरुंगाधिकारी, कोल्हापूर मध्यवती कारागृह, कळंबा यांच्या समक्ष सदरचे म्हणणे दिलेले आहे.
4. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांनी याकामी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदार यांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. क्र.1 कंपनीशी वि.प.क्र.2 यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर करार केलेबाबत वि.प.क्र.2 चा काहीही संबंध नाही. वि.प. क्र.1 हे वि.प.क्र.2 यांचा मुलगा असून सदर महारयत अॅग्रो प्रा.लि. हे वि.प. क्र.1 चालवित होते. वि.प.क्र.2 यांचे सदर कंपनीसोबत कोणताही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नसलेने वि.प. क्र.2 यांचे नांव कमी करणे व थांबविणे न्यायाचे होणार असून तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांना कोणतीही रक्कम दिलेली नाही असे म्हणणे वि.प. क्र. 2 यांनी दाखल केले आहे.
5. वि.प. 3 यांना आयोगाची नोटीस लागू झाल्याचा ट्रॅक रिपोर्ट दाखल आहे. वि.प.क्र.3 हे वारंवार पुकारता गैरहजर. सबब, वि.प.क्र.3 यांचेविरुध्द दि. 25/2/22 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प यांचेकडून वि.प. यांनी स्वीकारलेली अॅडव्हान्स रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. वि.प. ही महारयत अॅग्रो प्रा.लि. कंपनी असून तिचा रजिस्ट्रेशन नं. 181327 असा आहे. सदर कंपनीचा सी.आय.एन.नं.- U-121-PN2019PTC181327 असा आहे. सदर कंपनीचे सुधीर शंकर मोहिते हे प्रोप्रायटर असून सदर कंपनी प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती, मत्स्य शेती, कुकुटपालन व शेतीपालन करण्याचा व्यवसाय करते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. कंपनीचे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन दाखल केलेले आहे. वि.प. कंपनीने वृत्तपत्रामध्ये “आधुनिक शेती बरोबर करा कडकनाथ कुक्कुटपालन ” या आशयाची जाहीरात प्रसिध्द केली. सदर जाहीरातीनुसार तक्रारदार यांनी वि.प. कंपनीबरोबर दि.7/5/19 रोजी करार केला. सदर करारानुसार तक्रारदार यांनी कडकनाथ या कुक्कुटपालन प्रकल्पासाठी वि.प. यांना अॅडव्हान्स बुकींग म्हणून पावती क्र. 13005 प्रमाणे रक्कम रु.50,000/- व ता. 16/4/2019 रोजी भरले, तसेच उर्वरीत रक्कम पावती क्र. 13079 प्रमाणे रक्कम रु.1,09,000/- ता. 6/5/2019 रोजी भरले. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदरच्या पावत्यांची झेरॉक्सप्रत दाखल केलेली असून सदर पावत्यांचे अवलोकन करता त्यावर वि.प. कंपनीचे नांव नमूद असून त्यावर वि.प. कंपनीचा शिक्का व सभासदाची सही आहे. सदरच्या पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र. 2 –
8. तक्रारदार यांनी वि.प. यांना करारात ठरलेप्रमाणे संपूर्ण अॅडव्हान्स रक्कम रु.2,40,000/- अदा केली. करारपत्राप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून कडकनाथ पक्षी संख्या 300 इतके ता. 10/5/2019 रोजी दिले व त्याप्रमाणे वि.प. कंपनीने दिलेल्या पक्षांसाठी लस, औषधे, डॉक्टर व्हिजीट, तसेच सदर पक्षांचे खाद्य देण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीवर विश्वास ठेवून त्यांचे नातेवाईक यांचे शेतात पोल्ट्री फार्मची उभारणी केली होती. सदर पक्षी तक्रारदार यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये आणल्यानंतर वि.प. कंपनीने करारात ठरलेप्रमाणे कोणतेही कृत्य केले नाही अगर कराराप्रमाण सेवा देखील दिलेली नाही. त्याकारणाने तक्रारदार यांनी वि.प. यांना विचारणा केली असता वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले 300 पक्षी परत करुन भरलेली रक्कम व नुकसान भरपाई घेवून जाणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 300 पक्षी परत केले. मात्र वि.प. यांनी तक्रारदार यांनी अदा केलेली अॅडव्हान्स रक्कम व नुकसान भरपाई देणेस नकार दिला. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 16/4/2019 रोजी झालेल्या करारपत्रातील अटी व शर्तींची पूर्तता न करुन सदर अटी व शर्तींचा भंग करुन तक्रारदार यांना अॅडव्हान्स रक्कम व नुकसान भरपाई न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
9. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 यांनी ता. 4/1/21 रोजी म्हणणे दाखल केलेले असून सदर म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. क्र.1 यांनी त्यांचे कंपनीमार्फत कुक्कुटपालन योजनेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होता ही बाब मान्य केलेली आहे. परंतु तक्रारदार यांचे तक्रारीनुसार कडकनाथ पक्षी ठराविक रक्कम घेवून दिला असेल तसेच त्यांच्याकडून कंपनीने जर पक्षी मागे घेतला असेल तर त्याची पावती दिली असेल. परंतु हा व्यवहार नक्की झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण सर्व व्यवहाराची कागदपत्रे सांगली आर्थिक गुन्हे शाखेकडे आहेत असे वि.प.क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले आहे. तसेच जामीन झाल्यानंतर सर्व त्या कागदपत्रांची व व्यवहाराची पडताळणी करुन आम्ही संचालक योग्य ती कारवाई करु असे म्हणणे दिलेले असून सदरचे म्हणणे मंडल तुरुंगाधिकारी, कोल्हापूर मध्यवती कारागृह, कळंबा यांच्या समक्ष दिलेले आहे. प्रस्तुतकामी वि.प.क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदार यांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. क्र.1 कंपनीशी वि.प.क्र.2 यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर करार केलेबाबत वि.प.क्र.2 चा काहीही संबंध नाही. वि.प. क्र.1 हे वि.प.क्र.2 यांचा मुलगा असून सदर महारयत अॅग्रो प्रा.लि. हे वि.प. क्र.1 चालवित होते. वि.प.क्र.2 यांचे सदर कंपनीसोबत कोणताही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नसलेने वि.प. क्र.2 यांचे नांव कमी करणे व थांबविणे न्यायाचे होणार असून तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांना कोणतीही रक्कम दिलेली नाही असे म्हणणे वि.प. क्र. 2 यांनी दाखल केले आहे. सबब, सदर म्हणण्याचे अनुषंगाने प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 19 मार्च 2019 रोजी दै.सकाळमध्ये प्रसिध्द झालेली बातमीची प्रत आयोगात दाखल केलेली आहे. सदर दै. सकाळमधील बातमीचे अवलोकन करता वि.प. क्र.2 व 3 हे सदर वि.प. संस्थेच्या पूणे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी सदर संस्थेचे संचालक म्हणून संस्थेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते ही बाब स्पष्टपणे नमूद आहे. वि.प. क्र.2 हे सदर संस्थेचे संचालक नव्हते. या अनुषंगाने वि.प. क्र.2 यांनी म्हणणे व्यतिरिक्त कोणताही कागदोपत्री पुरावा सदरकामी दाखल केलेला नाही. तसेच वि.प. क्र.1 यांनी त्यांच्या म्हणणेमध्ये वि.प. संस्थेचा कुक्कुट पालन योजनेचा खरेदीविक्रीचा व्यवहार होता ही बाब मान्य केलेली आहे. सबब, तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्र व तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.1 ला तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान कडकनाथ कुक्कुटपालन प्रोजेक्टसाठी ता. 7/5/2019 रोजी झालेल्या करारपत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे करारपत्र हे तक्रारदार व वि.प. संस्था यांचेदरम्यान झालेले असून त्यावर वि.प. संस्थेचा शिक्का आहे. सदर करारपत्राचे अवलोकन करता,
- दि. 16/4/2019 रोजी कडकनाथ प्रोजेक्टसाठी पार्टी नं.2 उत्तर आण्ण्णसो पाटील यांनी रु.2,40,000/- अॅडव्हान्स बुकींग भरले आहेत. रोख रकमेची पावती क्र. 13005, 13079 असा आहे.
- सदर प्लॅनची किंमत रु.2,40,000/- असून 6 महिने प्रतिबॅचप्रमाणे 12 महिन्यासाठी दोन बॅच पूर्ण करणे पार्टी नं. 2 ला बंधनकारक आहे. सदर युनिटमध्ये 200 पक्षी तीन महिने कालावधीचा कंपनी शेतक-याला देणार आहे तसेच या 200 पक्षांमधून 60 रु. प्रमाणे प्रतिअंडी असे 8000 अंडी खरेदी करेल.
- ठरलेल्या कराराप्रमाणे या रकमेमध्ये कंपनी 200 पक्षी, लस, औषधे, डॉक्टर व्हिजीट संपूर्ण खाद्य कंपनी देणार आहे. आजार किंवा रोग या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने होणा-या पक्षांच्या मरणासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही तथा पार्टी नं. 2 जबाबदार राहील.
सबब सदर करारपत्रानुसार, युनिटमधील 200 पक्षी तीन महिने कालावधीसाठी विक्रेता या नात्याने शेतकरी ग्राहकांस पालन करणेसाठी दिेल्या असून त्या पक्षापासून उत्पन्न होणा-या प्रत्येकी 60 दराने एकूण 8000 अंडी खरेदी करणेचे वि.प. यांनी मान्य केलेले होते. तसेच सदर पक्षांसाठी लस, औषधे व इतर पक्षांचे खाद्य देणेची जबाबदारी वि.प. कंपनी यांनी स्वीकारलेली होती ही बाब सिध्द होते. तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्रावरुन तक्रारदार यांनी सदर कंपनीवर विश्वास ठेवून नातेवाईकांचा शेतात पोल्टी फार्मची उभारणी गाव शेडशाळ, ता.शिरोळ. जिल्हा कोल्हापूर येथे केली व सदर पक्षी पोल्ट्री फार्ममध्ये आणलेनंतर वि.प. यांनी ठरलेप्रमाणे कोणतेही कृत्य केले नाही अगर सेवा दिली नाही असे कथन केलेले आहे. सबब, ता.16/4/2019 रोजीच्या तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान झालेल्या करारपत्रातील अटी व शर्ती या तक्रारदार व वि.प. यांचेवर बंधनकारक असताना देखील वि.प. यांनी सदर करारपत्रातील अटी व शर्तींचा भंग करुन तक्रारदार यांना कोणतीही सेवा न देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे ही बाब सिध्द होते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांना ता. 7/9/2019 रोजी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस दाखल केलेली असून सदरची नोटीस दि.9/9/2019 रोजी लेफ्ट या शे-यानिशी परत आलेली आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले 300 पक्षी परत करुन भरलेली रक्कम व झालेले नुकसान भरपाई घेवून जाणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 300 पक्षी परत केले. मात्र वि.प. यांनी तक्रारदार यांना अॅडव्हान्सची रक्कम व नुकसान भरपाईची रक्कम आजतागायत अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. वि.पव. क्र.3 यांनी सदरकामी हजर होवून तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली नाही. तसेच वि.प. क्र.3 हे गैरहजर असलेमुळे त्यांचेविरुध्द आयोगाने एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.
मुद्दा क्र.3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांना पावती नं. 13005 ने अॅडव्हान्स रक्कम रु.50,000/- व पावती क्र. 13079 ने अॅडव्हान्स रक्कम रु.1,90,000/- अदा केल्याची पावती दाखल केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 3 यांचेकडून संयुक्तिकरित्या अॅडव्हान्स म्हणून स्वीकारलेली रक्कम रु.2,40,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर ता. 6/5/2019 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदा रयांनी वि.प. यांचेकडून गु्ंतवणूकीवर मिळणा-या नफ्याची देय रक्कम रु. 3,28,700/- ची मागणी आयोगामध्ये केलेली आहे तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा सदर कामी दाखल केलेला नाही. त्याकारणाने पुराव्याअभावी सदरची रक्कम मिळणेस तक्रारदार हे अपात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
11. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून स्वीकारलेली अॅडव्हान्स रक्कम रु.2,40,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 6/5/2019 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 व 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|