(द्वारा- श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्र.490011265691 द्वारे वीज जोडणी घेतली आहे. सदर वीज जोडणीबाबत वीज वितरण कंपनीने वेळोवेळी दिलेली देयके तिने नियमित भरणा केली. परंतु वीज वितरण कंपनीने अचानक रु.5,960/- चे चुकीचे देयक दिले. दि.16.12.2007 रोजीची रिडींग 6290 अशी असताना वीज वितरण कंपनीने त्या दिवशीची रिडींग 7425 (2) त.क्र.463/10 अशी चुकीची नोंदविली. सदर देयक मिळाल्यानंतर तिने वीज वितरण कंपनीकडे देयकाबाबत तक्रार केली, परंतु वीज वितरण कंपनीने तिला प्रतिसाद दिला नाही. म्हणून नाईलाजाने तिला देयक दि.16.12.2007 मधील रक्कम रु.5,960/- भरावी लागली. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दि.07.07.2009 रोजी तिचे मीटर तपासणीसाठी काढून घेतले त्यावेळी मीटरमधील रिडींग 7338 अशी होती. वास्तविक सदर रिडींग गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने पुर्वीच दाखवून अतिरिक्त रकमेचे देयक देऊन तिच्याकडून अतिरिक्त रक्कम वसुल केली होती. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तिला चुकीची व अवाजवी मीटर रिडींग नोंदवून अतिरिक्त रकमेचे देयक दिले. त्यानंतरही दि.30.06.2010 रोजी वीज वितरण कंपनीने तिला रु.1280/- चे देयक दिले. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तिचे देयक दुरुस्त करुन दयावे, तसेच 2007 मध्ये भरलेली रक्कम व्याजासह परत द्यावी व नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. कंपनीचे म्हणणे असे आहे की, इंदिरा निंबाळकर यांना ग्राहक क्र.490011265691 द्वारे वीज जोडणी देण्यात आली आहे. परंतु प्रस्तुत तक्रार त्यांच्या वतीने दाखल करणारे देविदास वसंत साळी यांचा वीज कंपनीशी काहीही संबंध नाही. सदर देविदास साळी यांनी कोणत्या अधिकाराने ही तक्रार दाखल केली हे स्पष्ट नाही. त्यांनी कोणतेही अधिकारपत्र/ संमतीपत्र दाखल केले नाही. तक्रारदाराने यापुर्वी तक्रार क्र.4/2010 दाखल केली होती, ती तक्रार व प्रस्तुत तक्रार सारख्याच आहेत. पुर्वीची तक्रार दि.24.06.2010 रोजी निकाली काढण्यात आली आहे. तक्रारदार नियमित देयके भरत नाही, तक्रारदाराला कोणतेही चुकीचे देयक देण्यात आलेले नाही, तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही, तक्रारदाराने विनाकारण तक्रार दाखल केली असुन सदर तक्रार खर्चासह फेटाळावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुददे उत्तर 1) तक्रारदाराची तक्रार चालण्यास योग्य आहे काय ? नाही. 2) गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही. (3) त.क्र.463/10 3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुददा क्रमांकः- 1 व 2 – तक्रारदाराच्या वतीने अड ए.एम.मामीडवार आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.अजय कदम यांनी युक्तीवाद केला. प्रस्तुत तक्रारीमधील तक्रारदार श्रीमती इंदिरा निंबाळकर यांनी स्वतः ही तक्रार दाखल केलेली नसुन, त्यांच्या वतीने श्री.देविदास वसंत साळी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सदर देविदास साळी यांना वीज ग्राहक श्रीमती इंदिरा निंबाळकर यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिल्याबाबत श्री.देविदास साळी यांनी काहीही पुरावा दाखल केलेला नाही. श्रीमती इंदिरा निंबाळकर यांच्या वतीने कोणत्या अधिकारानुसार श्री.देविदास साळी यांनी ही तक्रार दाखल केली याचा काहीही खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे यापुर्वी श्री.देविदास साळी यांनी या तक्रारीद्वारे उपस्थित केलेल्या मुददयांबाबत याच मंचात तक्रार क्र.4/2010 दाखल केली होती, ती तक्रार दि.24.06.2010 रोजी निकाली काढण्यात आलेली आहे. त्यानंतर तक्रारदाराने पुन्हा ही तक्रार दाखल करुन मंचाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. वास्तविक तक्रारदाराने दाखल केलेल्या पुर्वीच्या तक्रारीमध्ये दि.16.12.2007 रोजीच्याच देयकांविषयी आक्षेप घेण्यात आलेला होता आणि ही तक्रार देखील त्याच देयकाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आली आहे. यापुर्वी दाखल केलेल्या तक्रारीविषयी तक्रारदाराने कोणताही खुलासा केला नाही व ती बाब लपूवन ठेवली, ही बाब अत्यंत गंभीर असुन तक्रारदार मंचाचा गैरफायदा घेवू इच्छित असल्याचे दिसते. वीज वितरण कंपनीने तक्रारदार इंदिरा निंबाळकर यांना दि.30.06.2010 रोजी दिलेले देयक चुकीचे असल्याचे दिसत नाही त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही असे आमचे मत असुन, दि.16.12.2007 रोजी भरलेल्या देयकाची रक्कम व्याजासह मागण्याचा तक्रारदाराला दि.02.08.2010 रोजी काहीही अधिकार उरलेला नाही. कारण दि.16.12.2007 रोजीच्या देयकाबाबत तक्रारदाराने दि.15.12.2009 पुर्वीच तक्रार दाखल करणे आवश्यक होते, परंतु ही तक्रार मुदतीनंतर दाखल करण्यात आली आहे. म्हणून मुददा क्र. 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. तक्रारदाराच्या वतीने तक्रार दाखल करणारे श्री.देविदास वसंत साळी हे मंचासमोर स्वच्छ हाताने आलेले नाहीत. त्यांनी यापुर्वी दाखल केलेल्या तक्रारीची माहिती (4) त.क्र.463/10 मंचापासुन दवडून ठेवली आणि पुर्वीच्याच तक्रारीमधील मुददे या तक्रारीद्वारे उपस्थित करुन अपेक्षित लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे, ही बाब निश्चितपणे चुकीची असुन श्री.देविदास वसंत साळी हे कलम 26 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार दंडास पात्र आहेत. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारदाराचे प्रतिनिधी श्री.देविदास वसंत साळी यांनी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीला तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- निकाल कळाल्यापासुन एक महिन्याच्या आत द्यावेत. 3) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |