जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
दरखास्त तक्रार क्रमांक – ५३/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २७/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/११/२०१३
१. श्री. अनिल सिध्देश्वर अतवाड
उ.व. ४७ धंदा – नोकरी
रा.६०, नंदनवन सोसायटी
नकाणे रोड देवपुर धुळे ता.जि. धुळे ................ तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या
उप कार्यकारी अभियंता सो.
म.रा. विदयुत वितरण कंपनी मर्या.
शहर – ११ उपविभाग देवपूर धुळे
ता.जि. धुळे. ............ जाबदेणार
तडजोड निकालपत्र
तक्रारदार व जाबदेणार यांच्यात आपसात समजुत झालेली असून त्याबाबत पान क्र.१३ लगत तडजोड पुरसीस दाखल केलेली आहे. मंचासमोर तक्रारदार व जाबदेणार व त्यांचे प्रतिनिधी तसेच दोघांचे वकील हजर आहेत. दोन्ही पक्षकारांनी तडजोड पुरसीस मधील मजकूर मान्य केलेला आहे. पुरसीस मधील तडजोड खालीलप्रमाणे आहे.
१. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात समझोता होऊन तक्रारदार हे आज दि.२३/११/२०१३ रोजी रू.३०००/- भरणार आहेत व रू.३५६०/- दि.३०/११/२०१३ पर्यंत भरणार आहेत.
२. तक्रारदारने शारीरीक, मानसिक, आर्थिक व अर्जाचा खर्चापोटीची रक्कम सोडून दिलेली आहे.
तडजोड पुरसीसला अनुसरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. प्रस्तुत तक्रार अर्जातील तक्रारदार यांनी उर्वरित विजबिल रक्कम रूपये ६५६०/- देयकापोटी जाबदेणार यांना आज दि.२३/११/२०१३ रोजी रूपये ३०००/- भरावे व उर्वरित रू.३५६०/- दि.३०/११/२०१३ पर्यंत भरावे.
२. तक्रारदार व जाबदेणार यांनी या अर्जाचा खर्च ज्याने त्याने आपआपला सोसावयाचा आहे. .
वरीलप्रमाणे तडजोड निकालपत्र जाहीर करण्यात आले.
धुळे.
दि.२३/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.