Maharashtra

Nagpur

CC/10/343

Ramesh Shriramji Marbate - Complainant(s)

Versus

Maharashtra Vehicles Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Lanjewar

16 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/343
 
1. Ramesh Shriramji Marbate
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra Vehicles Pvt. Ltd.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Lanjewar, Advocate for the Complainant 1
 
श्री. समीर एस. अडकर, (गैरअर्जदार क्र.2 तर्फे).
गैरअर्जदार क्र.1 एकतर्फी.
......for the Opp. Party
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 16/11/2011)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दि.05.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.                प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार त्‍याने स्‍वतःचे व कुटूंबाचे उपजिवीकेकरीता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून क्रुजरगामा ट्रॅक्‍स गाडी क्र. एमएच-40/9258 मोबदला देऊन खरेदी केली. सदर रकमेपैकी रु.3,80,000/- एवढी रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 कडून कर्जापोटी घेतली व नियमानुसार तक्रारकर्त्‍यास दि.17.08.2007 पासुन प्रतिमाह रु.11,918/- प्रमाणे 30 महिन्‍यापर्यंत म्‍हणजे दि.21.01.2010 पर्यंत व तयानंतर प्रतिमाह रु.10,918/- प्रमाणे 17  महिन्‍यापर्यंत म्‍हणजे दि.21.06.2011 पर्यंत गैरअर्जदारांना अदा करावयाचे होते.
 
3.          सप्‍टेंबर-2009 या महिन्‍यात सदर गाडीला अपघात झाला त्‍याच्‍या दुरुस्‍तीचे तक्रारकर्त्‍यास रु.80,000/- खर्च आला व सदरची गाडी तीन महिने चालु शकला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांकडे किस्‍त भरु शकला नाही, सदर घटनेची माहिती गैरअर्जदारांना असतांना देखील त्‍यांनी दि.30.11.2009 रोजी कुठलीही सुचना न देता जबरदस्‍तीने गाडी जप्‍त केली. तक्रारकर्त्‍याने जानेवारी-2010 पर्यंत किस्‍त भरण्‍याची तयारी दर्शविली परंतु गैरअर्जदारांनी एकाच वेळेस रु.2,87,000/- गैरकायदेशिररित्‍या तक्रारकर्त्‍यास भरायला सांगितले. तक्रारकर्ता नियमाप्रमाणे किस्‍त भरण्‍यांस तयार असतांना देखील गैरअर्जदारांनी सदरचे वाहन बळजबरीने नेले व अद्यापही ते त्‍यांचे ताब्‍यात आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थीक नुकसान होत आहे,ही गैरअर्जदारांची कृति सेवेतील कमतरता आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
 
4.          मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्‍यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस प्राप्‍त झाल्‍याबद्दल पेपर पब्‍लीकेशन रिपोर्ट दाखल असुन त्‍यांचा पुकारा केला असता ते मंचात हजर झाले झाले नाही, त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
4.          गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍याने सदरचे कर्ज त्‍याच्‍याकडून घेतल्‍याचे व त्‍याबाबत करार झाल्‍याचे मान्‍य केले आहे, परंतु तक्रारकर्त्‍याचे इतर सर्व आरोप अमान्‍य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे मते सदर करारास लवादाच्‍या अटींची बाधा येते, तसेच गैरअर्जदारांचे कथनानुसार तक्रारकर्ता हा 2.80 हेक्‍टर जमीनीचा मालक असुन त्‍याचेकडे किराणा दुकान आहे व तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन व्‍यावसायीक हेतुने घेतलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नसल्‍याचे नमुद केले आहे.
5.          तक्रारकर्त्‍याने कर्जाच्‍या हप्‍त्‍यांची नियमीतपणे परतफेड केली नाही, ब-याच महिन्‍यांपर्यंत तक्रारकर्त्‍याने मासिक हप्‍ते भरले नाही दि.30.11.2009 रोजी सदर वाहन गैरअर्जदार क्र.2 कडे जमा केले व सदर पत्रावर पैसे नसल्‍यामुळे वाहन जमा करत असल्‍याचे लिहून सही करुन आंगठा मारला आहे, तसेच ही बाब मंचापासुन लपवुन ठेवली. तक्रारकर्ता जानेवारी-2010 पर्यंतचा हप्‍ता भरावयास तयार होता हे म्‍हणणे खोटे असुन यासंबंधात एकही पुरावा सादर केला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍याला थकीत बकाया रक्‍कम भरण्‍यासाठी वारंवार नोटीस देऊनही तक्रारकर्त्‍याने उर्वरित रक्‍कम भरली नाही. तक्रारकर्त्‍यास कंपनीचा करार मोडावयाचा असल्‍यास रु.82,285.83/- जमा करुन रद्द करावा.
 
6.          वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्‍या सेवेत कुठलीही कमतरता नाही. तसेच तक्रारकतर्याने खोटी तक्रार दाखल केली म्‍हणून सदरची तक्रार नुकसान भरपाईसह खारिज करण्‍यांत यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचास केलेली आहे. 
 
7.          सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्‍तीवादाकरीता दि.16.11.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष गैरहजर, तक्रारकर्त्‍याचा युक्तिवाद मंचाने यापूर्वीच ऐकला होता, गैरअर्जदारांना युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊनही ते गैरहजर असल्‍यामुळे प्रकरण निकालाकरीता ठेवण्‍यांत आले. तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
8.          सदर प्रकरणातील वस्‍तुस्‍थीतीवरुन या मंचाच्‍या असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र.1 कडून क्रुजरगामा ट्रॅक्‍स गाडी क्र. एचएच-40/9258 विकत घेतली होती व त्‍यासाठी रु.3,80,000/- एवढया रकमेचे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कर्जसहाय्य घेतले होते. उभयपक्षांमध्‍ये ठरल्‍याप्रमाणे दि.17.08.2007 ते 21.01.2010 पर्यंत रु.11,918/- व त्‍यानंतर दि.21.06.2011 पर्यंत रु.10,918/- प्रतिमाह याप्रमाणे 47 हप्‍त्‍यांमध्‍ये सदर कर्जाची परतफेड करावयाची होती. तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने काही हप्‍त्‍यांची परतफेड केली नाही म्‍हणून त्‍यांना थकीत देय रकमेचा भरणा करावा म्‍हणून गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास वारंवार नोटीस पाठविलेली दिसुन येते. दि.30.11.2009 च्‍या पत्रावरुन तक्रारकर्त्‍याने सदरचख्‍े वाहन गैरअर्जदारांकडे जमा केल्‍याचे दिसुन येते.
9.          गैरअर्जदारांच्‍या कथनानुसार तक्रारकर्त्‍याकडे देय असलेली थकीत हप्‍त्‍यापोटीची रक्‍कम त्‍याने दिलेल्‍या विहीत मुदतीत जमा न केल्‍यामुळे करारानुसार तक्रारकर्त्‍याचे वाहन जमा करुन घेतले. गैरअर्जदारांची ही कृति जरी योग्‍य असेल तरी नैसर्गीक न्‍यायाला अनुसरुन तक्रारकर्ता जर आतापर्यंतची हप्‍त्‍यांची थकीत रक्‍कम भरावयास तयार असेल व तक्रारकर्त्‍यास ही रक्‍कम एका वेळेस देणे शक्‍य नसेल तर एका महिन्‍यात दोन हप्‍ते याप्रमाणे सदरची रक्‍कम भरण्‍यांस तक्रारकर्त्‍यास सवलत द्यावी. गैरअर्जदारांनी ही रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर तक्रारकर्त्‍यास त्‍याचे वाहन परत करावे. या व्‍यतिरीक्‍त काही रक्‍कम देय असल्‍यास तक्रारकर्ता कराराप्रमाणे हप्‍ते भरण्‍यांस जबाबदार राहील.
 
            वरील सर्व बाबींचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. 
      -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्ता जर आतापर्यंतची      हप्‍त्‍यांची थकीत रक्‍कम भरावयास तयार असेल व तक्रारकर्त्‍यास ही रक्‍कम एका  वेळेस देणे शक्‍य नसेल तर एका महिन्‍यात दोन हप्‍ते याप्रमाणे सदरची रक्‍कम  भरण्‍यांस तक्रारकर्त्‍यास सवलत द्यावी. व रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर तक्रारकर्त्‍यास       त्‍याचे वाहन परत करावे. या व्‍यतिरीक्‍त काही रक्‍कम देय असल्‍यास तक्रारकर्ता कराराप्रमाणे हप्‍ते भरण्‍यांस जबाबदार राहील.
3.    उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सोसावा.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.