:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26/06/2013)
1) तक्रारदाराने ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 व 14 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणप्रमाणे.
2) अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचे कडुन जुना ऑटो क्रमांक एम.एच. 34 एम 5009 ही गाडी विकत घेण्याचे ठरविले होते. सदर गाडीवर गैरअर्जदार क्रमांक 1 चे कर्ज होते कर्जदाराने थकीत रक्कम न भरल्यामुळे गाडी जप्त करण्यात आली होती. यासाठी अर्जदाराने दिनांक 5/7/2011 रोजी नगदी रक्कम रुपये 50000/- जमा केले. त्यानंतर गाडी आर.टी.ओ. कर्यालयामध्ये अर्जदाराचे नोंदणी करुन 8 दिवसात देण्याची हमी गैरअर्जदारांनी दिली व सदर ऑटो आपल्या ताब्यात ठेवला. त्यानंतर अर्जदाराने वारंवार गैरअर्जदाराचे कार्यालयात जाऊन ऑटो अर्जदाराचे नावे करुन देण्यास, गाडीचा ताबा देण्यास व कागदपञ देण्याची मागणी केली परंतु गैरअर्जदाराने यास टाळाटाळ केली व कोणतीही दखल घेतली नाही आणि रक्कम रुपये 50000/- सुद्धा परत केले नाही त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली आहे.
3) त.क. ने आपल्या तक्रारी अर्जाचे पृष्ठर्थ कएुण 7 कागदपञे हजर केली आहेत.
4) तक्रारदाराची तक्रार नोंदणीकरुन वि.प. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली सदर नोटीस बजावणी झाली आहे व ती निशानी 5 कडे दाखल आहे. तरीही वि.प. 1 व 2 हे विद्यमान मंचात हजर झाले नाहीत त्यामुळे सदर प्रकरण वि.प. 1 व 2 यांचा विरुद्ध एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश निशानी 1 वर पारीत करण्यात आला.
वि.प. 1 व 2 यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशानी 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कागदपञे तसेच त.क. ची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापञ यावरुन प्रकरण निकाली करणे करीता ठेवणेत आले.
त.क. ची तक्रार, दस्तऐवज व वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालिल कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
5) त.क. ने मुळ तक्रार शपथपञावर दाखल केली आहे व निशानी 7 कडे पुराव्याचे शपथपञ दाखल करुन मुळे तक्रार व त्यासोबतचे शपथपञ हेच पुराव्याचे शपथपञ समजावे असे नमुद केले आहे. त.क. ची तक्रार व त्यासोबत कागदपञे यांचे बारकाईने अवलोकन करता त.क. ने वि.प. 1 व 2 यांचेकडुन जुना ऑटो एम.एच. 34 एम 5009 ही रुपये 50000/- ला विकत घेतली आहे हे निशानी 4/1 कडील वि.प. यांनी दिलेल्या पावतीवरुन दिसुन येते. सदर निशानी 4/1 वरील पावतीवरुन वि.प. यांनी त.क. कडुन सदर वाहन रुपये 50000/- घेऊन विक्री केली असल्याने त.क. हे वि.प. चे ग्राहक ठरतात. सदर व्यवहाराप्रमाणे वि.प.यांनी फक्त रक्कम स्विकारली व 8 दिवसात नोंदणी करुन त.क. यांना देता म्हणुन सदर वाहनाचा ताबा त.क. ला दिला नाही. त्यानंतर वारंवार विनंती करुनही वि.प. यांनी त.क. यांना सदर वाहनाचा नोंदनी करुन ताबा दिला नाही व स्विकारलेले रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली म्हणुन त.क. यांनी आपले वकिलामार्फत वि.प. यांना नोटीस पाठविली सदर नोटीस निशानी 4/2 कडे दाखल आहे. सदर नोटीस निशानी 4/4 प्रमाणे वि.प. यांना मिळाली तरीही वि.प. यांनी त.क. यांना वाहनाचा ताबा दिला नाही किंवा वाहनाचे व्यवहारापोटी घेतलेली रक्कम रुपये 50000/- परत दिली नाही अशाप्रकारे वि.प. यांनीत.क. यांना दुषित व ञुटीची सेवा दिली असल्याचे सिद्ध होत आहे.
वि.प. 1 व2 यांनी त.क. यांचेशी ठरलेला व्यवहार पुर्ण करुन वाहनाचा ताबा देणे गरजेचे होते परंतु तसे न केल्यामुळे वि.प. यांनी दुषित व ञुटीची सेवा देऊ केली आहे व पैसे स्विकारुनही त्यांचा व्यवहार पुर्ण न करणे ही अनुचितव्यापार प्रथा आहे व त्याचा वापर वि.प. 1 व 2 यांनी केला असल्याचे या विद्यमान मंचास वाटते. त्यामुळे वि.प. 1 व 2 यांनीत.क. यांचेकडुन रक्कम स्विकारल्यानंतर ठरलेला व्यवहार पुर्ण करुन एम.एच. 34 एम. 5009 चा वाहनाची त.क. यांचे नावे नोंदणी करुन सदर वाहनाचा ताबा त.क. यांना द्यावा किंवा ते शक्य नसल्यास सदर त.क. यांचेकडुन स्विकारलेली रक्कम रुपये 50000/- स्विकारलेली तारीख म्हणजेच दिनांक 5/7/2011 पासुन द.सा.द.शे. 12% दराने त्यावर पुर्ण रक्कम हातीपडेपर्यत व्याज द्यावे या निर्णयाप्रत हे मंच आले आहे.
त.क. हे आपल्या न्याय हक्कासाठी व ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे गाडीचा ताबा किंवा वि.प. नी स्विकारलेले पैसे व्याजासह परत मिळणेसाठी त.क. हे आटोकाट प्रयत्न करीत आहेत हे उपलब्ध कागदपञावरुन दिसुन येते परंतु वि.प. यांनी त.क. यांना सदर वाहनाचा ताबा तर दिला नाहीच आणि स्विकारलेली रक्कम रुपये 50000/- त.क. यांना परत केली नाही एवढेच नव्हे तार वि. मंचाची नोटीस मिळुनही ते मंचात हजर राहुन आपले म्हणणे मांडण्याची तसदी घेतली नाही. यावरुन वि.प. यांनी नकारात्मक मानसिकता दिसुन येते त्यामुळे त.क. यांनी आपले जवळची रक्कम गुंतवणुक करुनही त्यांना त्यांचा उपभोग घेता आला नाही व त्यांना मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागला त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी वि.प. यांचेकडुन रुपये 4000/- तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2000/- मंजुर करणे योग्य ठरेल असे या मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना सेवा देण्यास न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालिलप्रमाणेआदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) तक्रारकर्ता यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) वि.प. 1 व 2 यांनी गाडी क्रमांक एम.एच. 34, एम. 5009 चा ताबा त.क. चे नावे ट्रान्सफर करुन द्यावा अथवा ते शक्य नसल्यास वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तरित्या त.क. यांचेकडुन स्विकारलेली रक्कम रुपये 50000/- व त्यावर स्विकारलेली तारीख दिनांक 5/7/2011 पासुन संपुर्ण रक्कम हातीपडेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज द्यावे.
3) वरील आदेशाचे पालन 30 दिवसात करावे अन्यथा उपरोक्त कलम 2 मधील नमुद रकमेवर 12% ऐवजी 15% दराने व्याज द्यावे लागेल.
4) वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरीत्या त.क. यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 4000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2000/- द्यावेत.
5) वरील आदेशाची प्रत सर्व पक्षकारांना पाठविण्यात यावे
चंद्रपूर
दिनांक - 26 /06/2013