निकालपत्र :- (दि.27.09.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी त्यांच्या व्यवसायाकरिता शाहू क्लॉथ मार्केट येथील दुकानगाळयामध्ये विद्युत कनेक्शन घेतले आहे. त्याचा ग्राहक क्र.266510373421 असा आहे. सामनेवाला विद्युत कंपनीने सदर मिटरमध्ये कोणताही बदल केलेला नाही अगर मिटर टँम्परींग केलेले नाही असे सांगून तक्रारदारांना फसवून सहया घेतल्या व रुपये 27,560.28 पैसे इतक्या रक्कमेची विद्युत देयक दिलेले आहे. अशा प्रकरणे वारेमाप बिलाची मागणी सामनेवाला करीत आहेत. याबाबत सामनेवाला यांना कळविले आहे. तसेच, वकिलामार्फत नोटीसही पाठविलेली आहे. परंतु, सामनेवाला यांनी त्याची दाद घेतलेली नाही. सदर देयक मागणी करणेचा सामनेवाला यांना कोणताही अधिकार नाही याबाबत आदेश व्हावेत व बंद केलेले कनेक्शन चालू होवून मिळावे याबाबतच आदेश व्हावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस व तक्रारदारांना आलेले बिल इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला यांचे भरारी पथक, रत्नागिरी यांनी तक्रारदारांचे दुकानास दि.23.05.2006 रोजी भेट दूवन वीज मिटरची पाहणी करुन त्यांचेसमोर तपासणी केली असता तक्रारदारांचे इलेक्ट्रिक मिटरची सील्स, वायर्स इत्यादी तुटलेल्या स्थितीत आढळली. याबाबत तक्रारदारांना विचारणा केली असता त्यांना त्याबद्ल समाधानकारक खुलासा देता आला नाही. तक्रारदारांचा मंजूर विद्युत भर हा 7 के.डब्ल्यु. इतका असून प्रत्यक्ष वीज वापर 9.2 के.डब्ल्यू. इतका आहे. तसेच, तक्रारदारांचे मिटरमधील मिटर उलट फिरवता येवू नये याकरिता असलेल्या सिस्टीममध्येही फेरफार केलेला आढळला. त्यामुळे तक्रारदारांचे जुने मिटर काढून त्या ठिकाणी नविन मिटर बसविले व भरारी पथकाने केलेल्या असेसमेंटप्रमाणे रुपये 27,560.28 पैसे चे देयक तक्रारदारांना दिलेले आहे. याबाबत तक्रारदारांना वस्तुस्थिती कळविलेली आहे. सदर देयक न भरता खोटया मजकूराची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येवून सामनेवाला यांना रुपये 5,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत भरारी पथकाने दि.29.06.2006 रोजी दिलेले पत्र, दि.23.06.2006 रोजीचा रिपोर्ट, पंचनामा असेसमेंट शीट, मिटर बदल अहवाल, दि.29.06.06 रोजी तक्रारदारांना बिल भरणेबाबत दिलेले पत्र, दि.06.12.07 ची तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीस सामनेवाला यांनी दिलेले उत्तर, दि.21.04.2008 रोजीचा अहवाल, तक्रारदारांची दि.24.10.08 रोजीची उत्तरी नोटीस, सामनेवाला यांचा दि.15.12.08 रोजीचा प्रतिखुलासा, सी.पी.एल्. इत्यादीबाबतच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून घेतलेले विद्युत कनेक्शन हे वाणिज्यिक प्रयोजनासाठी घेतलेला आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला विद्युत कंपनीच्या भरारी पथकाने तक्रारदारांच्या मिटरची केलेली तपासणी, घटना स्थळाचा पंचनामा, स्पॉट इन्स्पेक्शन इत्यादीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी मिटर टँपरिंग केलेले आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. प्रस्तुत मुद्दयाचा विचार करता तसेच, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदीचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नसल्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |