::: नि का ल प ञ::: मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष १. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी, तक्रारदार क्र. १ व २ यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. २. तक्रारदार क्र. १ व २ यांनी सामनेवाले क्र. १ व २ यांचेकडे दि.१८.०१.२०१६ रोजी तक्रारदार क्र. १ व २ यांच्या पानठेला व पाणीपुरीच्या वीजपुरवठासाठी रक्कम रुपये २६५०/- अदा करुन मागणी केली. सामनेवाले क्र. १ व २ यांनी बेकायदेशीरपणे सामनेवाले क्र. ३ यांच्यामुळे तक्रारदार क्र. १ व २ यांना वीजपुरवठा न दिल्याने तक्रारदार क्र. १ व २ यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली असून दंड व खर्चासह तक्रार मान्य करावी अशी विनंती केली आहे. ३. सामनेवाले क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार क्र. १ व २ सामनेवाले क्र. १ व २ यांचे ग्राहक नसून पानठेला व पाणीपुरी व्यवसाय विज पुरवठ्याशिवाय चालवू शकतात असे नमूद करुन तक्रारदार क्र. १ व २ यांनी सामनेवाले क्र. १ व २ यांच्याकडे दि.१८.०१.२०१६ रोजी तक्रारदार क्र. १ व २ यांच्या पानठेला व पाणीपुरीच्या वीजपुरवठासाठी रक्कम रुपये २६५०/- अदा केली आहे. सामनेवाले क्र. १ व २ यांनी सामेनेवाले क्र. ३ यांना कोणताही आक्षेप घेता येणार नाही, असे नमूद करुन तक्रारदार क्र. १ व २ याची पानठेला व पाणीपुरीसाठी असलेली मिळकत सामनेवाले क्र. ३ यांच्या मिळकतीत नाही. सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना वीजपुरवठा देण्यात येऊ नये असा आक्षेप घेतला असल्याने सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना वीजपुरवठा दिलेला नाही. सबब सदर आक्षेपामुळे वीजपुरवठा करणे न्यायोचित नसल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. १ व २ यांनी केली आहे. ४. सामनेवाले क्र. ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार क्र. १ व २ यांनी सामनेवाले क्र. ३ यांचे मिळकती समोरील जागेत वीजपुरवठा मागणी केली असून त्याबाबत सामनेवाले क्र. १ व २ यांच्याकडे आक्षेप नोंदविला असून तक्रारदार क्र. १ व २ यांना सामनेवाले क्र. ३ यांच्या मिळकतीसमोर पानठेला व पाणीपुरी व्यवसायासाठी वीजपुरवठा घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, सबब तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. १ व २ यांनी केली आहे ५. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले क्र. १ व २ यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व सामनेवाले क्र. ३ यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. मुद्दे निष्कर्ष १. तक्रारदार क्र. १ व २ सामनेवाले क्र. १ व २ यांचे ग्राहक आहेत काय ? होय २. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना कराराप्रमाणे वीजपुरवठा सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार क्र. १ व २ सिद्ध करतात काय ? होय ३. सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदार क्र. १ व २ यांना नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत काय ? ४. सामनेवाले क्र. ३ तक्रारदार क्र. १ व २ यांना नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय ५. आदेश ? अंशतः मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ : ६. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ सामनेवाले क्र. १ व २ यांचे ग्राहक नसल्याबाबत आक्षेप घेतला असला तरी सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांच्याकडून दि.१८.०१.२०१६ रोजी तक्रारदार क्र. १ व २ यांच्या पानठेला व पाणीपुरीच्या वीजपुरवठासाठी रक्कम रुपये २६५०/- स्विकारल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सदर रककम स्विकारल्याने तसेच अद्याप सदर रक्कम परत न केल्याने तक्रारदार क्र. १ व २ सामनेवाले क्र. १ व २ यांचे ग्राहक आहेत ही बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. २ व ३ : ७. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांच्याकडून वीजपुरवठ्यासाठी रक्कम स्वीकारून सामनेवाले क्र. ३ यांच्या आक्षेपामुळे तक्रारदार क्र. १ व २ यांना अद्याप वीजपुरवठा न दिल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना सामनेवाले क्र. ३ यांच्या आक्षेपाबाबत लेखी सूचना पाठवून तक्रारदार क्र. १ व २ यांनी अदा केलेली रक्कम परत करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने सामनेवाले क्र. १ व २ यांनी न्यायोचित कारणाशिवाय तक्रारदार के. १ व २ यांना रक्कम स्वीकारून वीजपुरवठा न देऊन कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता वैध वीजपुरवठा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार क्र. १ व २ यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदार क्र. १ व २ यांनी सदर तक्रार वीजपुरवठा करार सेवेबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास वीजपुरवठा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदार क्र. १ व २ यास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ४ : ८. सामनेवाले क्र. ३ यांनी घेतलेल्या आक्षेपाची सूचना तक्रारदार क्र. १ व २ यांना लेखी स्वरुपात दिल्याची बाब कागदोपत्री दाखल नाही. सामनेवाले क्र. १ व २ यांनी सामनेवाले क्र. ३ यांच्या आक्षेपामुळे तक्रारदार क्र. १ व २ यांना वीजपुरवठा दिला नाही असे नमूद केल्याने सदर आक्षेपाबाबत तक्रारदार क्र. १ व २ यांचे म्हणणे कागदोपत्री असणे आवश्यक होते. परतू सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांना हरकतीवर उत्तर दाखल करण्यास संधी न देऊन सामनेवाले क्र. १ व २ यांच्याकडे घेतलेल्या आक्षेपामुळे तक्रारदार क्र. १ व २ यांना नाहक वीजपुरवठापासून वंचित रहावे लागले, ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदार क्र. १ व २ यास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. ४ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. ९. मुद्दा क्रं. १ ते ४ मधील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. ८०/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते. २. सामनेवाले क्र. १ व २ यांनी, तक्रारदार क्र. १ व २ यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार वीजपुरवठा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ३. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार क्र. १ व २ यांच्या शिवा पान पलेस, नागपूर - चंद्रपूर महामार्गाचे बाजूला, भद्रावती, जि. चंद्रपूर येथे या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात वीजपुरवठा सूरू करुन द्यावा. ४. सामनेवाले क्र. १ ते २ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे, तक्रारदार क्र. १ व २ यांना वीजपुरवठा कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन तक्रारदार क्र. १ व २ यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी एकत्रित नुकसानभरपाई प्रत्येकी रक्कम रु. १५,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे. ५. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार क्र. १ व २ यांना तक्रार दाखल खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु. १०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात अदा करावे. ६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ (सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या) |