Maharashtra

Kolhapur

CC/152/2015

Mrs.Asmita Amol Patil for P.A.H.Sushilkumar Shivaji Randive - Complainant(s)

Versus

Maharashtra State Vidyut Vitran Co.Ltd. S.V.S.Sub-Division Vadgaon for Authorised Officer - Opp.Party(s)

S.G.Shinde / C.D.Deshmukh

04 Jun 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/152/2015
 
1. Mrs.Asmita Amol Patil for P.A.H.Sushilkumar Shivaji Randive
Atpost Randive Galli, Kasaba Bawda
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Vidyut Vitran Co.Ltd. S.V.S.Sub-Division Vadgaon for Authorised Officer
Vadgaon,
Kolhapur
2. Sub-Executive Engineer, Maharshtra State Vidyut Co.Ltd. Sub-Division, Vadgaon
Vadgaon
Kolhapur
3. Maharashtra State Vidyut Vitran Co.Ltd. O.V.M. Division Jaysingpur for Executive Engineer, Jaysingpur
Jaysingpur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रार अर्ज अॅडमिशन स्‍टेजला नि.1 वर आदेश- (व्‍दारा-मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष) (दि . 4-06-2015) 

(1)   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये वि.प. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केल्‍याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे. 

      प्रस्‍तुतची तक्रार स्विकृती करणेवर नेमली आहे.  तक्रारदार तर्फे वकील हजर.  तक्रारदार तर्फे वकिलांचा तक्रार स्विकृत करणेवर युक्‍तीवाद ऐकला.  

(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

      वि.प. नं. 1  ते 3 हे महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्यादित असून, ग्राहकांना वीज कनेक्‍शन देऊन ग्राहकास वीज मीटर देऊन ग्राहकास वीज बिल पाठवून त्‍याची वसुली करणेचे वि.प. कंपनीचे कार्य आहे.  यातील  तक्रारदार यांना वि.प. 2 यांना नोटीस पाठवून वीज कनेक्‍शन खंडीत करणार असलेचे कळविले आहे.  वि.प. 3 यांनी तक्रारदार यांचेकडून वीज कनेक्‍शनकरिता आवश्‍यक ते अर्ज भरुन घेऊन, वि.प. चे मान्‍यतेनुसार त्‍याची पडताळणी करुन घेऊन आवश्‍यक ती रक्‍कम भरुन तक्रारदारांना वीज कनेक्‍शन उपलब्‍ध करुन दिले आहे.  यातील तक्रारदार यांचा गट नं. 192, वाठार, ता. हातकणंगले येथे ‘ओमकार व्‍हेईकल्‍स या नावाची कंपनी असून त्‍याव्‍दारे ते ट्रक खरेदी, विक्री व त्‍यांचे सेवेचा व्‍यवसाय करतात.  ट्रकचे रिपेअरी व ऑफिस कामाकरिता वीजेची निंतात आवश्‍यकता असलेने वि. प.कडून तक्रारदार यांनी त्‍यांच विहित नमुन्‍यातील अर्जात व्‍यावसायिक कारणांकरिता (Commercial Purpose) वीज वापरणार असलेचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले होते.   यातील वि.प. 2 यांनी तक्रारदार यांना “जा.क्र. 3 का/अभि/वडगांव264 दि. 17-01-2015 अन्‍वये आपले औद्योगिक वीज कनेक्‍शन ग्रा.कं. 25022100 2088 फिरते पथक, कोल्‍हापूर यांनी  प्रत्‍यक्ष वीज जोडणीची तपासणी केली असता आपली वीज बिले मात्र औद्योगिक वर्गवारीप्रमाणे गेलेची पत्राने कळविले. त्‍यामुळे पुरवठा दिनांक माहे सप्‍टेंबर 2011 ते नोंव्‍हेबर 2014 पर्यंत वर्गवारीप्रमाणे होणारी फरकाची रक्‍कम रु. 4,49,710/- आपणास देय आहे असे लिहून कळविणेत आले.” तक्रारदारांची काहीही चुक नसताना  “सदर रक्‍कम मुदतीत न भरलेस वीज कनेक्‍शन कोणतीही पुर्वसुचना न देता तात्‍पुरता खंडीत करणेबाबत कळविले.”  तक्रारदारांनी वि.प. यांची आलेली वीज बिले नियमित भरलेली असून कोणतीही रक्‍कम थकीत नाहीत.  वि.प. यांनी जा.क्र.3 का/अभि/वडगांव 264 दि. 17-01-2015 बाबत तक्रारदार यांना त्‍यांची कायदेशिररित्‍या बाजू मांडणेची संधी दिलेली नाही. याउलट रक्‍कम भरणेसाठी वारंवार गैरमार्गाने तगादा लावून वीज कनेक्‍शन बंद करणेची धमकी वि.प. 1 व 2 यांनी दिलेली आहे.  वर नमूद कालावधीतील थकीत रक्‍कम वसुल करण्‍यासाठी वि. प. यांना मुदतीची बाधा येत असताना गैरमार्गाने रक्‍कम वसुल करीत आहेत.

      तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की,  वि.प. यांनी तक्रारदारांना थकीत रक्‍कमबाबत कोणताही खुलासा दिलेला नाही.  तक्रारदार यांनी वि.प. यांची  कोणतीही थकीत रक्‍कम ठेवलेली नव्‍हती.  वि.प. यांचे चुकीमुळे थकीत रक्‍कमेची परतफडीची जबाबदारी तक्रारदार यांची नसून वि.प. यांचेवरच आहे.    तकारदार यांची वि.प. कडे कधीही औद्योगिक कारणासाठी विद्युत पुरवठयाची मागणी केलेली नव्‍हती.  याउलट तक्रारदार यांनी व्‍यावसायिक कारणासाठी विद्युत पुरवठयाची मागणी वि.प. यांचेकडे केलेली होती.  वि.प. कोणते विद्युत कनेक्‍शन तक्रारदार यांना उपलब्‍ध करुन दिले याबाबत तक्रारदार यांना प्रत्‍यक्ष कोणतीही माहिती नाही. वि.प. यांचे दि. 17-01-2015 रोजीचे पत्राने तक्रारदार यांना माहिती झाले.  वि.प. यांनी दि. 21-04-2015 व 25-04-2015 रोजी रक्‍कम भरणेबाबत कळविले व  थकीत रक्‍कम न भरलेस विद्युत पुरवठा खंडीत करणेबाबत धमकी दिली.  वि.प. यांनी तक्रारदार यांचे विद्युत कनेक्‍शन खंडीत केलेस तक्रारदार यांचे मोठे व्‍यावसायिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.   वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन वीज पुरवठा खंडीत करणेची धमकी देऊन बेकायदशिररित्‍या  रक्‍कम वसूली करीत आहेत.  सबब,  वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडून रक्‍कम रु. 4,49,710/- थकीत रक्‍कम वसुल करु नयेत.  तसेच थकीत रक्‍कमेच्‍या वसुलीकरिता ग्राहक क्र. 250221002088 चे तक्रारदारांचे विद्युत कनेक्‍शन बंद करणेत येऊ नये असे आदेश व्‍हावेत.  तसेच वि.प. यांनी तक्रारदारांना नाहक कायदेशीर खर्चासह भाग पाडले त्‍याची नुकसानीची रक्‍कम रु. 50,000/- व मानसिक त्रासाची भरपाईची रक्‍कम रु. 1,50,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 2,00,000/-, तक्रार खर्चासह द्यावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.          

(3)   तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार हे वि. पक्षकार यांचे “ग्राहक होतात का ? हा मुद्दा प्रथम विचारात घेणे आवश्‍यक आहे असे या मंचास वाटते त्‍यास अनुसरुन मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे :-  

        या मंचाने तक्रारदारांचा तक्रार अर्ज दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी वि.प. कडून घेतलेले विद्युत कनेक्‍शन हे व्‍यावसायिक कारणाकरिता(Commercial Purpose) घेतलेले आहे असे तक्रार अर्जात नमूद केलेले आहे.  ग्राहक सरंक्षण कायदा,1986  कलम 2(1)(d) मधील “ग्राहक” ‍व्‍याख्‍या अशी-  d) “consumer” means any person who- (i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or

(ii) 1[hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 1[hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first-mentioned person;

2[Explanation: For the purposes of sub-clause (i), “commercial purpose” does not include use by a consumer of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;]

      वर नमूद कलम 2(1)(d) मधील “ग्राहक” व्‍याख्‍येचा विचार करता, तक्रारदार यांचे कामाचे स्‍वरुप हे ट्रक खरेदी, ट्रकची रिपेअरी व विक्री सेवाबाबत व नफा कमविणेचा उद्देश असून व्‍यापारी (Commercial Purpose) कारणाचे असलेचे सिध्‍द होते व त्‍यासाठी त्‍यांनी वि.प. यांचेकडून विज कनेक्‍शन घेतलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी तक्रार अर्जात व्‍यावसायिक कारणाकरिता (Commercial Purpose) वीज वापरणार असलेचे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे. तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(d) नुसार ग्राहक या व्‍याख्‍येत बसत नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांचा तक्रार अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तक्रारदारांनी त्‍यांचे इच्‍छेनुसार योग्‍य त्‍या न्‍यायालयात आपली दाद मागावी.  सबब, तक्रारदाराची तक्रार अॅडमिशन स्‍टेजला अस्विकृत करणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज अस्विकृत करणेत येतो.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.