Maharashtra

Sangli

CC/13/207

PANDURANG AAKARAM PATIL - Complainant(s)

Versus

MAHARASHTRA STATE SEEDS CORPORATION LTD. ETC. 2 - Opp.Party(s)

ADV. M.M. SUHASE

21 Oct 2015

ORDER

                                

                                         नि. 34

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या - सौ वर्षा नं. शिंदे

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 207/2013

तक्रार नोंद तारीख   :  17/12/2013

तक्रार दाखल तारीख  :   18/04/2011

निकाल तारीख         :    21/10/2015

 

पांडुरंग आकाराम पाटील

रा.भिलवडी, ता.पलूस जि. सांगली                             ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

1. महाराष्‍ट्र स्‍टेट सीड्स कार्पोरेशन लि.

   महाबीज भवन, कृषीनगर, अकोला

2. प्रोप्रायटर मे. सिसाळ अॅग्रो एजन्‍सी

   मेन रोड, पलूस ता.पलूस जि. सांगली

   पिन 416 310                                       ...... जाबदार

                         

तक्रारदार  तर्फे : अॅड एम.एम.सुहासे

                                    जाबदार क्र.1 व 2 तर्फे      :  अॅड श्री के.ए.मुरचिटे 

 

- नि का ल प त्र -

 

द्वारा : मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 खाली दाखल केली आहे.

 

2.    थोडक्‍यात हकीकत अशी की, मौजे भिलवडी, ता. मिरज जि. सांगली येथील गट नं. 658/अ, क्षेत्रफळ 0.36 आर, गट क्र.685/ब चे  क्षेत्र 0.24 आर, 658/क चे क्षेत्र 0.21 आर हया त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या मालकी वहीवाटीच्‍या असून गट 659 चे क्षेत्र 0.81 आर त्‍यांनी जहांगीर मोहम्‍मद हुसेन जमादार, रा.भिलवडी यांचेकडून कसण्‍याकरीता घेतली आहे व अशा रितीने ते अंदाजे 4 एकर जमीन कसत असून सदरची जमीन भुवनेश्‍वरी लिफ्ट इरिगेशन मिल यांच्‍या ओलीताखाली आहे.  तक्रारदारांनी सन 2010-11 या हंगामामध्‍ये या जमीनीत भुईमुग शेंग हे पीक घेण्‍याचे ठरविले.  त्‍याकरिता दि.16/05/2010 रोजी जाबदार क्र. 2 सिसाळ अॅग्रो एजन्‍सी यांचेकडून G-G20, महाबीज लॉट नं. 3409/1/5401 प्रत्‍येक बॅगेचे वजन 20 किलो, प्रत्‍येकी किमंत रुपये रु.1,400/- चे भुईमुगाचे बी खरेदी केले. सदर बियाणांना योग्‍य ते औषधे लावून त्‍यांची टोकणी दि. 17/06/10 रोजी सदर शेतजमीनीमध्‍ये योग्‍य खते देवून केली होती.  त्‍या पिकांचा कालावधी 4 महीन्‍यांचा असुन त्‍यास लागणारे पाणी व औषधे यांची वेळोवेळी फवारणी केली होती. सदर मिळकतीत रोग खतेही टाकली होती. सदरचे बियाणे हे निमपस-या व उपडया जातीचे होते.  परंतु सदर पिकांची पुर्ण वाढ झाल्‍यानंतर केवळ 8 ते 10 व त्‍याही न भरलेल्‍या खराब शेंगा लागलेल्‍या दिसून आल्‍या. साधारणतः भुईमुगाच्‍या प्रत्‍येक झुडपास सुमारे 40-45 शेंगा लागतात. परंतु तक्रारदाराने विक‍त घेतलेले सदर बियाणे हे भेसळयुक्‍त असून एक जातीचे नसल्‍याने प्रत्‍येक झुडपास अत्‍यंत अल्‍प प्रमाणात शेंगा लागल्‍या. त्‍यामुळे तक्रारदारांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. तक्रारदाराने एकूण एकरी 20 पोते असे एकूण 80 पोते शेंगा त्‍यांची किंमत जवळपास रु.1 लाख होते इ‍तके नुकसान झाले आहे. त्‍याबाबत तक्रारदाराने जाबदार क्र.1 व 2 यांचेकडे योग्‍य त्‍या तक्रारी देखील दाखल केल्‍या आहेत.  सदरचे खराब बियाणे त्‍यास विकून जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांची सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. म्‍हणून त्‍यास प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे.  अशा कथनांवरून तक्रारदाराने जाबदार क्र.1 व 2 यांचेकडून नि‍कृष्‍ट दर्जाचे भुईमुगाचे बियाणे त्‍यास विकून त्‍यांची फसवणूक केल्‍याबददल नुकसान भरपाई म्‍हणून रु.1 लाख व त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रू.50,000/- व कोर्ट खर्च म्‍हणून रक्‍कम रू.20,000/- वसूल करुन मिळावेत अशी मागणी केलेली आहे. आपल्‍या तक्रार अर्जातील कथनांच्‍या पृष्‍ठयर्थ तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.2 ला दाखल केले असून नि.4 या फेरिस्‍त सोबत एकूण 14 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्‍यामध्‍ये जाबदार क्र.1 यांचेकडून विकत घेतलेल्‍या बियाणांचे लेबल, जाबदार क्र 2 यांचे कडून बियाणे विकत घेतल्‍याची मुळ पावती, तक्रारदारांच्‍या वरील शेतामध्‍ये उगवण झालेल्‍या व काढलेल्‍या भुईमुगाच्‍या रोपांची स्थिती दाखविणारे फोटो व इतर नमुद केलेल्‍या शेतजमीनीचे सात-बारा उतारे, प्रभारी अधिकारी यांचे तसेच शेती अधिकारी यांचेकडे तक्रारदारांने शेंगा न लागल्‍याबाबत दिलेल्‍या तक्रार अर्जाची प्रत तसेच शेती अधिकारी, पलूस पंचायत समिती, पलूस यांचेकडे दिलेला दि. 27/10/10 रोजीचा तक्रार अर्ज, स्‍वतःचा वैदयकीय तपासणी अहवाल व निवडणुक आयोगाचे ओळखपत्र इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

2.    प्रस्‍तुत प्रकरणात जाबदार हजर होऊन त्‍यांनी नि.16 ला आपली एकत्रित लेखी  कैफियत दाखल केली असून त्यांनी तक्रारदारांचे सर्व आरोप स्‍पष्‍टपणे नाकबूल केलेले आहेत. तक्रारदाराची संपूर्ण कथने त्यांनी आपमतलबी व चुकीची आहेत व खोटी आहेत असे कथन करून नकारलेली आहेत. तक्रारदार जवळजवळ 4 एकर जमीन कसत असल्‍याचे जाबदारांनी अमान्‍य केलेले आहे. जाबदारांच्‍या कथनानुसार तक्रारदार म्‍हणतो, त्‍याप्रमाणे शेंगा बियाणांच्‍या 2 बॅग्‍ज मधील 4 एकर क्षेत्रात  लावणी करण्‍यास मुळीचा पुरेसे नाही शास्‍त्रोक्‍त मापणाप्रमाणे किमान एकरी 30 किलो बीज पेरणीकरीता वापरणे आवश्‍यक आहे ही बाब विचारत घेता तक्रारदारांने  घेतलेल्‍या बियाणांच्‍या 2 बॅग्‍ज केवळ 1 ए‍कर 10 गुंठे क्षेत्रात पुरण्‍याइतपत आहेत. तक्रारदार म्‍हणतो त्‍याप्रमाणे त्‍याने विकत घेतलेले शेंगा बीज  निमपस-या व उपडया जातीचक होते हे खरे नाही. जाबदारांच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे शेंगा बिजांची प्रेरणी अथवा टोचणी केल्‍यानंतर त्‍यांच्‍या वेली जमीनीवर 1 फुट उंची पर्यंत झुडूप पदधीतीन उगवतात.  जर पाण्‍याची मात्रा आधिक झाल्‍यास त्‍या 2 फुटापर्यंत जमिनीवर वाढतात. उगवणी नंतर साधारणतः 45-50 दिवसांत त्‍या वेलींना वरच्‍या बाजूस फुले फुटतात व त्‍यानंतर  8-10 दिवसांनी त्‍या फुलांचे रूपांतर कोबांमध्‍ये होते व जे जमिनीच्‍या दिशेने वाढू लागतात.  4-5 दिवसांत अशा कोबांचामातीशी संर्पक येणे अत्‍यंत जरूरीचे असते. हा कालावधी वाढल्‍यास कोबांचे फलीकरण होत नाही. भुईमुग शेंगाच्‍या अशा विशिष्‍ट पदधतीच्‍या नैसर्गिक पदधतीमुळे शेंगाच्‍या वाढीस उगवणी नंतर फुले लागल्‍यावर प्रत्‍येक वेळेस खालून भरपूर माती लावणे अत्‍यंत आवश्‍यक असते तसेच फुलाचे कोंब  जमिनीत जावेत म्‍हणून वेलीवर मोकळा बॅरल फिरवीला जाणे आवश्‍यक असते. ज्‍यामुळे फुलांचे बीज जमिनीत जाऊन त्‍यांचे फलीकरण्‍ होत असते.  तक्रारदारांचे म्‍हणणे नुसार शेंग बीजांची उगवण उत्‍तम झाल्‍याचे दिसते व त्‍यांची उंची देखील भरपूर वाढल्‍याचे दिसते. अशा परिस्थितीत सदर वेलींना फुले सुटल्‍यानंतर तक्रारदारांने वेलींना माती लावण्‍याची प्रकिया पुर्ण केली नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  ज्या फुलांचे कोंब जमिनीच्‍या वर राहले त्‍यांचे फलीकरण झाले नसल्‍याचे  अर्जातील विधानावरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदारांचे कथन असे आहे की,  भुईमुगाच्‍या प्रत्‍येक झूडपास 40-45 शेंगा लागतात, हे मुलतः चुकुचे असून गैरसमजुतीवर आधारलेले आहे.  फलीकरण करण्‍याकरीता आवश्‍यक ती प्रक्रिया वेळेत करणे जरुरीचे असून अन्‍यथा तापमानामध्‍ये वाढ झाल्‍यास फुले करपून जातात व कोंब न झाल्‍याने उत्‍पादनाचे प्रमाण घटण्‍याची शक्‍यता असते त्‍या‍करीता जाबदारांना जबाबदार धरता येऊ शकत नाही .  तक्रारदार म्‍हणतो त्‍याप्रमाणे तक्रारदारांचे कोण आर्थिक नुकसान झाले नाही.

 

 

 

 

3.    जाबदारांचे पुढे असे ही म्‍हणणे आहे की, भुईमुग शेंग बीजाचे टोपण पदधतीने 17/06/10 ला तक्रारदाराने पेरणी केली असल्‍यास भुईमुग शेंगाची काढाणी 120 दिवसांत म्‍हणजे 16/10/10 पर्यंत अपेक्षित होती असे असता त्‍या संर्वधाने तक्रारदारांने जाबदाराकडे कोणतेही लेखी अथवा तोंडी तक्रार केली नाही. जर अशी तक्रार केली असती तर जाबदारांनी  त्‍यांची दखल घेऊन वस्‍तुस्थितीची पाहणी केली असती.  केवळ नुकसान भरपाई  मिळण्‍याच्‍या हेतुने व पश्‍च्‍यात बुध्‍दीने तक्रारदारांने तब्‍बल 2 वर्षांच्‍या कालावधी नंतर प्रस्‍तुतची तक्रार दाखल केले आहेृ  सबब ती खर्चासह फोटाळयास पात्र आहे.  तक्रार अर्जात सोबत दाखल केलेल्‍या फेरिस्‍त मधील अनुक्रमांक 11 ला नमुद केलेली त्‍या तारखेचे कोणतीही तक्रार जाबदारांकडे प्राप्‍त झालेली नव्‍हती व नाही.  तसेच कोणतीही नोटीस तक्रारदारांकडून जाबदारांना प्राप्‍त झालेली नाही.  जर तक्रारदारांने तथाकथित नोटीस किंवा तक्रार दाखल केली असती तर अशा तक्रारारीची दखल घेऊन शेती अधिकारी , पंचायत समिती यांना यांचा तात्‍कालीन पाठपुरावा जाबदारांकडे केला असता परंतु या संर्दभात शेती अधिकारी त‍था‍कथित अर्जाबद्दल कधीही सुचित केले नव्‍हते व नाही. केवळ पुराव्‍या‍‍करीता तक्रारदारांने तक्रारीचा खोटा बनाव केलेला दिसतो अशा कथानावरुन तक्रारदारांच्‍या तक्रारीबाबत तालु‍कास्‍तरावर,कृषिविभागामार्फेत  तक्रार निवारण समिती स्‍थापन केलेली असते त्‍या समितीकडे देखील तक्रारदारांची तक्रार पश्‍चात बुध्‍दीची व लबाडीची असल्‍याचे दिसते. सबब सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यास पात्र आहे.  

 

 

 

4      जाबदाराचे पुढे असे ही कथन आहे की, काययदयाच्‍या तरतुदीनुसार उगवण क्षमतेबाबत हमीची जबाबदारी बीज उत्‍पादकांवर असते परंतु त्‍यांच्‍या उत्‍पादनाबाबत कोणत्‍याही प्रकाराची हमी जाबबदारी उत्‍पादकांवर नसते.  बीजांचे उगवणे नंतर येणारे उत्‍पादन हे अनेक बाबींवर , जसे की, वातावरण, हवेतील उष्‍मा , बाष्‍प ,पाऊस, पाऊसाचे प्रमाण इत्‍यादी वर अवलंबून असते. त्‍यामुळे तक्रारदारांने मागणी केलेल्‍या तथाकथित नुकसानाची जबाबदारी जाबदारांवर मुळीच येत नाही. विकत घेतलेल्‍या बिजांच्‍या उत्‍तम उगवणी बाबत आणि फलीकरणाबाबत तका्रदारांची कोणतीही तक्रार नाही . सबब, तक्रारदारांची तक्रार मुळीच प्रमाणिकपणाची नाही हे  दिसून येते खरीप पीकापासून येणारे उत्‍पादन हे जमिनीच्‍या प्रतीवर देखील अवलंबून असते. पेरणीच्‍या वेळी जमिनीचा पोत किती व कसा होता यावर देखील उत्‍पादन अवलंबून असते.  लागोपाठ एकनंतर एक सलग पिके घेत गेल्‍यास जमिनीचा पोत खालावून निश्चितपणे पिकांच्‍या एकुण उत्‍पानावर परिणाम होतो.  तक्रारदारांच्‍या जमिनीत उसाचे पिक होते हे निर्विवादपणे शबित होते.  उसाच्‍या पिकांमुळे  जमिनीचा पोत मोठया प्रमाणावर खालावला जातो.  अशा परिस्थितीत जमिनीची मशागत करुन तिचे बाष्‍पीकरण झाल्‍याखेरीज तीचे पुढील  पिकांकरीता ती जमिन योग्‍य राहत नाही.  मे महिन्‍यांच्‍या अखेरीस उस पीक गेल्‍यानतंर जर तक्रारदारांने घाईगडबडीत जमिनीची मशागत करुन  अंतपिक म्‍हणुन शेंगाचे पेरणी केली असल्‍यास उत्‍पादनामध्‍ये निश्चितपणे घट होऊ शकते.  वर नमुद केल्‍याप्रमाणे शेंगेच्‍या उगवणी नतंर फुलोरेच्‍या वेळी  पाटाने पाणी देल्‍यास जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो व त्‍यामुळे शेंगेच्‍या फुलो-याला सुटणारे आरे जमिनीच्‍या कठीणपणा मुळे  जमिनीत जाऊ शकत नाही  व त्‍यामुळे होऊ शकत नाही .  तका्रदारांच्‍या सर्व मागण्‍या खोटया व लबाडीच्‍या आहेत.  सबब संपुर्ण तका्र खर्चासह खारीज करणे आवश्‍यक आहे हया व अशा कथानावरून जाबदार क्र 1 व 2 यांनी प्रस्‍तुतची  तक्रार खारीज करावी अशी मागणी केलेली आहे.

 

 

5.    आपले लेखी कैफियतीतील कथनांच्‍या पुष्‍ठयर्थ जाबदारांनी जाबदार क्र.1 चे सांगली जिल्‍हयातील जिल्‍हा प्रभारी अधिकारी श्री सुरेश रामजी मो‍‍हकर यांचे शपथपत्र नि.17 ला दाखल करुन नि 20 सोबत 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

      तक्रारदाराने आपले पुराव्‍याचे शपथपत्र व जाबदारांच्‍या लेखी कैफियतीला काऊंटर अॅफिडेव्‍हीट नि.22 ला दाखल करुन नि.23 या पुरसीस अन्‍वये आपला पुरावा संपविलेला आहे,  तर जाबदारतर्फे श्री सुरेश मोहकर यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.24 ला दाखल केले असून नि.26 ला पुरसीस दाखल करुन जाबदारांनी आपला पुरावा थांबविलेला आहे.  जाबदारांनी आपला लेखी युक्तिवाद नि.27 ला दाखल केला असून तक्रारदाराने आपला लेखी युक्तिवाद नि.28 ला दाखल केलेला आहे. जाबदारांनी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी प्रकाशित केलेले कृषी दर्शन 2007 या माहितीपुस्‍तकातील संबंधीत कागदपत्रांच्‍या नकला व सदर पुस्‍तक या मंचाच्‍या माहितीकरिता सादर केलेले आहे.  याशिवाय आम्‍ही उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांचे मौखिक युक्तिवाददेखील ऐकून घेतला आहे.

 

13.   प्रस्‍तुत प्रकरणी आमच्‍या निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

      मुद्दे                                                           उत्‍तरे

 

1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ?                                      होय.

 

2. जाबदार क्र.1 उत्‍पादित केलेले व जाबदार क्र.2 यांचेकडून विकत घेतलेले

   भूईमूग बियाणे नं.जी 20 हे भेसळयुक्‍त होते व एकजातीचे नव्‍हते,

   ही बाब तक्रारदाराने शाबीत केली आहे काय ?                                                        नाही.

 

3.  सदर भेसळयुक्‍त आणि विविध जातीच्‍या बियाणांमुळे त्‍यास

    अपेक्षेपेक्षा कमी उत्‍पादन मिळाले व त्‍याचे रु.1 लाखचे

    नुकसान झाले हे तक्रारदाराने शाबीत केले आहे काय ?                     नाही.

 

4.  तक्रारदार मागतो त्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणेस तो

    पात्र आहे काय ?                                                    नाही.

 

5. अंतिम आदेश                                                   खालीलप्रमाणे.

 

 

14.   आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

 

 

:-  कारणे  -:

मुद्दा क्र.1  

 

      प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये दि.16/5/10 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.1 या बियाणे उत्‍पादित करणा-या संस्‍थेने उत्‍पादित केलेले जी-20 या प्रकारचे भुईमूग बी ज्‍याचा लॉट नं.3409/1/5401 प्रत्‍येकी 20 किलोची एक बॅग ज्‍याची किंमत प्रत्‍येकी रु.1400 होती अशा दोन बॅग जाबदार क्र.2 यांनी बि-बियाणे विक्रेत्‍यांकडून विकत घेतली होती ही बाब दोन्‍ही जाबदारांनी स्‍पष्‍टपणेमान्‍य केली तथापि तक्रारदाराने सदरची बाब आपल्‍या पुराव्‍या नमूद करुन नि.4 फेरिस्‍त सोबत नि.3 ला दि.16/5/10 ची सदर बियाणे खरेदीची जाबदार क्र.2 ने दिलेली पावती तसेच सदर बियाणाच्‍या विक्रेत्‍यांना जाबदार क्र.1 य उत्‍पादकाने लावलेले लेबल क्र 819133 आणि 818702 या क्रमांकाचे दाखल केले आहे.  त्‍या लेबलवर तक्रारदाराने विकत घेतलेल्‍रूा बियाणांचे नाव व त्‍याचा लॉट क्रमांक सदर बियाणांच्‍या परिक्षणाची व पॅकींगची तारीख सदर बियाणांची वैधता सदर बियाणांची उगवणश्‍क्‍ती भौतिक शुध्‍दता आर्द्रता व निव्‍वळ वजन व किंमत नमूद केलेली आहे.  येथे हे नमूद करणे आवश्‍यक आहे की, सदर लेबलप्रमाणे तक्रारदाराने विकत घेतलेले बियाणे हे मे 2010 महिन्‍यात परिक्षण करुन पॅकींग झालेल होते आण्‍ि त्‍याची वैधता ऑगस्‍ट 2010 पर्यंत होती त्‍याची उगवणशक्‍ती 75 टक्‍क्‍े तर भौतिक शुध्‍दता 98 टक्‍के व त्‍यातील आर्द्रता 5 टक्‍के असल्‍यचे दिसून येते.  वैधतेच्‍या कालावधीतच दि.16/10/10 रोजी तक्रारदाराने हे बियाणे विकत घेतलेले आहे. ही बाब उभ्‍ज्ञय जाबदारांनी मान्‍य केली आहे.  तक्रारदार व उभय जाबदार यांमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे संबंध असल्‍रूाचे उभय जाबदारांनी नाकारलेली नाही.  तथापि वरील सर्व मुद्यांवरुन हे नातेसंबंध बिनतोडपणे या मंचासमोर शाबीत झज्ञलेले आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

 

 

मुद्दा क्र.2

 

 

तक्रारदाराचे कथनानुसार त्‍रूांनी सदर बियाणे त्‍रूाच्‍य ताब्‍यात आलेल्‍रूा व वर नमूद केलेल्‍या 4 एकर जमीन क्षेत्रामध्‍ये योग्‍य ती काळजी घेवून औषध वगैरे लावून सदरचे बियाणे टोचणी  पध्‍दतीने दि.17/6/10  रोजी लावले होते.  त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे पिकाचा कालावधी 4 महिन्‍याचा होता टोचणी केल्‍यानंतर त्‍याने सदर पिकावर लागणारे पाणी व औषधे यांची फवारणी केली होती.  सदर बियाणे हे पस-या व उपडया व निमपस-या जातीचे होते.  व त्‍याचे अपेक्षित उत्‍पन्‍न सरासरी प्रत्‍येक झुडूपाला 40 ते 45 शेंगा इतके होते.  परंतु सदर पिकाची पूर्ण वाढ झाल्‍यानंतर पाहिले असता प्रत्‍येक झुडूपास केवळ पाच/10 व त्‍याही न भरलेल्‍रूा खराब शेंगा लागल्‍या होत्‍रूा आणि सदरचे बियाणे हे भेसळयुक्‍त असल्‍याने व एक जातीचे नसल्‍रूाने पिकास अत्‍यल्‍प प्रमाणात शेंगा लागलेल्‍रूा होत्‍या व त्‍यामुळे त्‍यांचे चार एकर क्षेत्रामधून मोठया प्रमाणात नुकसान झाले आह.  तक्रारदाराने आपल्‍या वरील तक्रारी शाबीत करण्‍याकरिता स्‍वतःचे पुाव्‍याचे शपथपत्र दाखल कलेले असून त्‍या शपथपत्राशिवाय नि.22 तक्रारदाराने इतर कोणताही पुरावा अथ्‍ज्ञवा शास्‍त्रीय परिक्षणाचा पुरावा या मंचासमोर आणलेला नाही.  केवळ कथितरित्‍या प्रत्‍येक झुडूपास अत्‍यल प्रमाणात व न भरलेल्‍या शेंगा लृागल्‍याने सदरचे बी हे भेसळयुक्‍त होते एक जातीचे नव्‍हते म्‍हणून ते खराब बियाण्‍े होते असे तक्रारदाराचे अनुमान आहे.  वास्‍तविक पाहता तक्रारदाराने आपण खरेदी केलेले बियाणे हे अयोग्‍य होते हे शाबत करण्‍याकरिता सदरचे बियाणे ग्राहक संरक्षण कायदा कलम 13अ क अन्‍वये कोणताही मान्‍यताप्राप्‍त अधिकृत प्रयोग शळेकडे पाठवून तपासून घेवून त्‍याचा अहवाल या मंचापुढे दाखल करुन तो शबीत करुन घेणे आवश्‍यक होते केवळ अनुमानावरुन बियाणे अयोग्‍य होते, असे म्‍हणता येत नाही.  बियाणाचे शास्‍त्रीय दृष्‍टया परिक्षण करुन घेवून त्‍यचा अहवाल मंचासमोर हजर करुन शबीत करण्‍याचे महत्‍व मा.राष्‍ट्रीय आयोगाचे समशेर सिुंग विरुध्‍द मे. बागशी बीज भंडार व इतर या 2013(4) CPR 219 NC या प्रकरणात अधोरेखांकीत कलेले आह केवळ उत्‍पादन कमी आले म्‍हणून बियाणे अयोग्‍य होते किंवा भेसळयुक्‍त होते किंवा खरा‍ब होत असे म्‍हणता येत नाही पिकावर मातीची योग्‍यता किंवा त्‍यावर फवारलेली औषध्‍े खते किंवा इतर रासायनिक पदार्थ कमी जास्‍त प्रमाणात वापरणे यावर अवलंबून असतेतसेच बियाणातील दोष हा केवळ बियाणाकडे दृष्‍टीक्षेप करुन ठरविता येत नाही आणि कमी उत्‍पन्‍न हे केवळ बियाणाच्‍या क्षमतेवर अवलंबूननसते असे मत माृ.राष्‍ट्रीा अयागाने  ….. India Ltd Vs. …………….. 2013 (2) CPR 386 NC या प्रकरणात म्‍हटले आहे.  तेच सूत्र मा. रष्‍ट्रीय आयोगाने Janta M Vs. Jay Bharat Bij Co. Etc. या 2013 (2) CPR 703 या प्रकरणात देखील मांडलेले आहे.  मा.राष्‍ट्रीय आयोगाचे ह न्‍यायदंडक या मंचावर बंधनकारक आहेत. 

 

      येथे हे उल्‍ल्‍ेखनीय आहे की, जाबदार क्र.1 ही केवळ बीज उत्‍पादक संस्‍था नसून ती स्‍वतः अधिकृत शासकीय बियाणे परिक्षण प्रयोगशाळा आहे.  याबाबत तक्रारदाराचा कोणताही उजर नाही.  आम्‍ही वर हे नमूद केले आहे की, तक्रारदारानेच नि.4 या फेरिस्‍तसोबत सदर बियाणाच्‍या पिशव्‍यांना लावलेले परिक्षणाचे लेबल याकामी दाखल केलेले आहे.  त्‍यावरुन सदरचे बियाणे हे योग्‍य होते हे स्‍पष्‍टपणे शाबीत होते.  सदरचे बियाणे हे अयोग्‍य व खरा‍ब होते हे शाबीत करण्‍यची जबाबदारी सर्वार्थाने तक्रारदारांवर होती व त्‍याकरिता त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा कलम 13अ खाली योग्‍य ती पावले उचलावयास हवी होती.  हे जरुर आहे की, काही न्‍यायनिवाडयांमध्‍ये असे म्‍हणण्‍यात आले आहे की, बियणे लावताना किंवा पेरणीच्‍या वेळेला शेतकरी नमुन्‍या दाखल किंवा प ुढे प्रयोगशाळेतूनपरिक्षण करुन घेण्‍याच्‍या दृष्‍टीने काही बियाणे राखून ठेवण्‍याची शक्‍यता नसते व शेतक-याचा कल हा विकत घेतलेले बियाणे पूर्णतः वापरण्‍याचा असतो त्‍यामुळे श्‍ेतकरी विकत घेलेले बियाणे पूर्ण्‍पणे वापरुन टाकतो याउलट बियाणे उत्‍पादन करणा-या उत्‍पादकांवर उत्‍पादन केलेल्‍रूा प्रत्‍येक लॉटच्‍या बियाणांचे दोन नमुने राखीव ठेवावेत आणि वादाचा प्रसंग आल्‍यास सदरचे बियाणे मंचासमोर हजर करुन ते प्रयोगशाळेकडे प रिक्षणाकरिता पाठविण्‍याची तयारी दर्शवावी आणि असे उत्‍पादकांनी न केल्‍यास त्‍याविरुध्‍द अनुमान काढता येईल.  कायद्याच्‍या या सूत्राचा मान ठेवून या मंचास असे वाटते की, प्रस्‍तुत प्रकरणाातील बियाणे उत्‍पादन करणारी संस्‍था ही शासकीय संस्‍था असून ती स्‍वतःच एक भारतातील अधिकृत बियाणे परिक्षण करणारी मान्‍यताप्राप्‍त प्रयोगशाळा आहे अशी संस्‍था योग्‍य ते परिक्षण केल्‍याशिवाय उत्‍पादन कलेले बियाणे वितरीत करणार नाही.  याची हमी देता येईल.  जाबदार क्र.1 चा सांगली कोल्‍हापू वि भागाचा जिल्‍हा व्‍यवस्‍थापक सुरेश मोहकर यांनी आपल्‍या पुरावयाचे शपथपत्रामध्‍ये नि.24 सदर बाब मांडली असून सदर प्रकरणातील माहिती देणा-या आपल्‍या फेरिस्‍त नि.29 सोबत दाखल केलेले शपथपपत्र देखील सदरची बाब नमूद केली आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये जाबदारांचेविरुध्‍द प्रतिकूल निष्‍कर्ष काढण्‍याचे (adverse inference) काढण्‍याचे कारण नाही असे या मंचाचे मत आहे. 

 

या प्रकरणात आलेल्‍या वस्‍तुस्थितीवरुन असे दिसते की, तक्रारदाराने सदर जमीनीमध्‍ये ऊसाचे पिक घेतले होते व मे 2010 साली ते पीक काढून कारखान्‍याला पाठविल्‍यानंतर आंतरपीक म्‍हणून भुईमूग पीक सदर जमीनीमध्‍ये लावले होते तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यप्रमाणे त्‍याने पूर्ण 4 एकर जमीनीमध्‍ये भुईमूग पिक घेणे करिता 20 किलोच्‍या प्रत्‍येकी दोन बॅग भूईमूग बियाणे विकत घेतले होते.  व ते सर्व बियाणे 4 एकर क्षेत्रावर टोचणी पध्‍दतीने लावले होते  सदरची बी हे उकडया व निमपस-या जातीचे होते.  हे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे.  जाबदारांनी जी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या माहिती पुस्‍तके याकामी हजर केली आहे आणि त्‍याचे साक्षीदार श्री सुरेश रामजी मोहकर जे स्‍वतः बी.एसस्‍सी. अॅग्री असून निरनिराळया बियाणांच्‍या सुधारित व संकरित बियाणे प्रक्रियेमध्‍ये भाग घेवून अभ्‍यास करत असतात.  त्‍यांनी असे सांगितले आहे की, महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रमाणीत केल्‍याप्रमाणे प्रतिहेक्‍टरी निमपस-या जातीच्‍या भुईमूग शेंगेसाठी 80 ते 90 किलो बियाणाचा वापर करण्‍े आवश्‍यक आहे त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे बियाणे कमी वापरल्‍यास सदर शेतामध्‍ये झाडांची संख्‍या कमी होते व शेंगेचे उत्‍पादन कमी मिळते.  तक्रारदाराने 40 किलो बियाणे 4 एकरात टोचणी पध्‍दतीने केल्‍याचे दिसून येते.  परंतु वास्‍तविकतः सदर बियाणे हे केवळ 1.10 एकर क्षेत्राकरिता पर्याप्‍त आहे त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे जे काही भुइमूगाचे उत्‍पादन मिळाले ते केवळ 1.10 एकर क्षेत्रातील प्रमाणीत उत्‍पादन होय.  श्री मोहकर यांनी पुढे असे सांगितले की, म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रमाणीत केल्‍यानुसार बागायत जमीनीमध्‍ये भईमुग पिकास प्रतिहेक्‍टरी 25 किलो  नत्र, नायट्रोजन, व 50 किलो स्‍फुरद अशी रासायनिक खते आवश्‍यक असून पालाश या रासायनिक खताची मात्रा भुईमूग पिकास कोणत्‍याही परिस्थितीत दिली जात नाही.  गरजेपेक्षा जास्‍त नत्र वापरल्‍यास झाडांची फाजील वाड होते व शेंगा अपरिपक्‍व होतात.  तर पालाशचा पुरवठा झाल्‍यास त्‍याचा विपरित परि णाम झाडांवर व उत्‍पादनावर होतो.  व झाडांची फाजील वाढ होवून आ-या कमी सुटतात.  व शेंगा पोकळ होतात.  मोहकर यांनी सदर कथनांच्‍या पुष्‍ठयर्थ भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे शास्‍त्रज्ञ श्री डी.एम.काळे यांनी केलेल्‍य संशोधनाचा आधार घेतला असूनत्‍याबाबतचे साहित्‍य याकामी नि.29 सोबत दाखल केले आहे.  त्‍याच शपथपत्रात श्री मोहकर यांनी असेही कथन केले आहे की, म.फुले कृषी विद्यापीठ यांच्‍या शिफारशीनुसार ऊसाच्‍या लागणीच्‍या वेळी 40 किलो नत्र, 85 किलो स्‍फुरद व 85 किलो पालाश या रासायनिक खतांची मात्रा देणे आवश्‍यक असते सदरची मात्रा ही भुईमूग पिकाला आवश्‍यक असणा-रूा मात्रेपेक्षा 10 पट अधिक असते.  तक्रारदाराची जमीन ही बागायत ऊस पिकाची जमीन आहे याबाबत तक्रारदाराचा कोणताही उजर नाही.  मोहकर यांच्‍या म्‍हणण्‍यानपुसार वारंवार जमीनीत ऊस पिके घेतल्‍यामुळे जमीनीच  पोत वाढत जातो व त्‍यामध्‍ये कॅल्शियमची मात्र साठून राहते, जी भूईमुग पिकाकरिता अत्‍यंत घातक व बाधक असते. अतिरिक्‍त कॅल्यिश्‍यम मुळे भूईमुग शेंग ही पोचट, पोकळ होतात.  तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केल्‍ेल्‍या शेंगा पोकळ झालेल्‍या असल्‍यास तो अतिरिक्‍त कॅल्शियमचा परि णाम असून त्‍याच्‍या बियाणाच्‍या गुणवत्‍तेशी आणि उगवून येणा-या क्षमतेशी काहीही संबंध नाही.  जर बियाणे दोषपूर्ण असतील तर त्‍याची उगवण समाधानकारक होत नाही श्री मोहकर यांनी आपले शपथपत्र असेही सांगितले आहे की, भूईमुग पीक एक फूट उंचीचे झाल्‍यनंतर तयस फुले येतात व ती फुले/आ-या मातीच्‍या संपर्कात आणाव्‍यालागतात  तसेच सदर वेलीस खालून भरपूर माती लागावी लागते व फुलांचे कोंब मातीत जावे याकरिता सदर पिकावरुन रिकामाड्रम एकदोनदा फिरवावा लागतो जेणेकररुन पिकांच्‍या आ-या मातीत जातील व त्‍यांचे फलीकरण शेंगांच्‍या रुपात होती श्री मोहकर ांच्‍या या कथनास म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्‍या वर नमूद केलेल्‍रूा माहिती पुस्‍तकाचा आधार मिळतो सदरची प्रक्रिया तक्रारदाराने राबविलेली होती असे तक्रारदाराने आपल्‍रूा शपथनपत्रात नमूद केलेले नाही.  तक्रारदाराने स्‍वतः या मंचासमोर वकीलांच्‍या युक्तिवादादरम्‍रूान असे निवेदन केले की, ऊसाच्‍या दोन पिकांच्‍या दरम्‍यान खतांच्‍या दृष्‍टीकोनातून त्‍याने आंतरपीक म्‍हणून भूईमुग पीक घेतले होते याचा अर्थ असा की, तक्रारदाराने सदर भूईमुग बियाणांचे पीक हे उत्‍पादनाच्‍या दृष्‍टीने आजिबात घेतलले नव्‍ळते त्‍यमुळे हे सर्व मान्‍यताप्राप्‍त प्रक्रिया तक्रारदाराने अवलंबली असेल असे वाटत नाही.  त्‍यामुळे तक्रारदारास कथि‍तदृष्‍टया नुकसान झाले हे केवळ आणि केवळ त्‍याच्‍याच कृत्‍याने झाले आहे.  त्‍यात बियाणाचा दोष दिसत नाही.  तक्रारदाराने आपण विकत घेतलेले बियाणे हे अयोग्‍य व भेसळयुक्‍त होते हे शाबीत केलेले नाही.  म्‍हणून सबब, आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी दिले आहे.

 

 

 

 

 

मुद्दा क्र. 3 व 4

 

      मुद्दा क्र.2 च्‍या वरील नमूद केलजेल्‍रूा निष्‍कर्षामुळै तक्रारदाराचे काही नुकसान झाले आहे काय झाले असल्‍यास किती व त्‍याची भरपाई जाबदारांकडून त्‍यास मिळसण्‍यास तो पात्र आहे काय असल्‍यास किती हे प्रश्‍न या प्रकरणात उद्भवत नाहीत तक्रारदाराला जाबदारांकडून कोणतहीही नु भ मागण्‍याचा अधिकार नाही.  सबब, मुद्दा क्रृ. 3 व 4 चे उत्‍तर नकारार्थी देत आहोत.

 

      प्रस्‍तुतची तक्रार ही नांजूर करण्‍यास पात्र आहे असा निष्‍कर्ष आम्‍ही काढतो व खालील आदेश पारीत करतो.

 

आदेश

 

 

1.  तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येत आहेत.

 

2.  तक्रारीचा खर्च उभय पक्षकारांनी आपला आपण सोसावयाचा आहे.

 

3.  प्रकरण दफ्तर दाखल करावे.

 

4.  सदर निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

सांगली

दि. 21/10/2015                        

   

 

           ( वर्षा शिंदे )                                ( ए.व्‍ही.देशपांडे )

             सदस्‍या                                        अध्‍यक्ष

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.