जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/229. प्रकरण दाखल तारीख - 09/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 08/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमूख, - सदस्या मोदी अग्रो जेनेटीक्स प्रा.लि.नांदेड तर्फे, व्यवस्थापकीय संचालक, श्री. तेजप्रकाश दिलीप मोदी वय, 30 वर्षे, धंदा शेती व व्यापार, रा.नवा मोंढा, नांदेड ता.जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे, विभागीय व्यवस्थापक,मुख्य बसस्थानक, औरंगाबाद 2. मे. बाबा ट्रेडींग कंपनी सोल लायसन्सी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, द्वारा, श्री.साई ट्रान्सपोर्ट अन्ड कोरिअन लि., 1, खूशालनगर, जालना रोड, औरंगाबाद. 3. श्री. साई ट्रान्सपोर्ट अन्ड कोरिअर लि., तर्फे व्यवस्थापक, 1,खूशालनगर जालना रोड, औरंगाबाद. गैरअर्जदार 4. श्री. साई ट्रान्सपोर्ट अन्ड कोरिअर लि., तर्फे व्यवस्थापक, बसस्थानक, परतवाडा. 5. श्री साई ट्रान्सपोर्ट अन्ड कोरिअर लि., तर्फे व्यवस्थापक, मूख्य बसस्थानक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस. भक्कड. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.एस.एल.कापसे गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड.ए.पी.मालानी. गैरअर्जदार क्र.3,4,5 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली असून प्रकरणातील हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारप्रमाणे अर्जदार यांनी अग्रो कृषी केंद्र अचलपूर (परतवाडा) यांचेकडून 456 पॅकेट ब्रम्हा बीजी (II) मोनसॅन्टो कॉटन सीड दर रु.750/- प्रत्येक पॅकेट प्रमाणे विकत घेतलेले सिड नांदेड येथे पाठविण्यासाठी अग्रवाल कृषी सेवा केंद्र अचलपूर परतवाडा यांनी 24 पॅकेटचा एक बॉक्स याप्रमाणे 19 बॉक्स तयार केले व सदरील बॉक्स हे दि.23.05.2009 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांचेमार्फत नांदेडला कूरिअरने परतवाडा येथून पाठविले. दि.29.05.2009 रोजी माला संबंधी अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.5 यांचेकडून चौकशी केली असता आपले बॉक्स आलेले आहेत तेव्हा येऊन शकता असे सांगितले. अर्जदार हे डिलेव्हरी घेण्यासाठी गैरअर्जदार क्र.5 यांचेकडे गेले असता त्यांनी अर्जदारास फक्त 17 बॉक्सची डिलेव्हरी दिली व दोन बॉक्स कमी आले आहेत व जेव्हा येतील तेव्हा आपल्याला देण्यात येतील असे सांगितले. कूरिअरचे चार्जेस म्हणून अर्जदाराकडून रु.565/- पावती नंबर 1473635 द्वारे अर्जदाराकडून घेण्यात आले. यानंतर सतत एक महिन्यापर्यत उर्वरित बॉक्सची विचारणा केली, सदर बॉक्स अर्जदारास मिळाले नाहीत. जून महिना हा सिजन असतो व या वेळीच विक्री होते. त्यामूळे नूकसान भरपाई बददल रु.36,000/- मिळावेत म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. यानंतर वाट पाहून कायदेशीर नोटीस ही पाठविण्यात आली. अर्जदाराची अशीही मागणी आहे की, 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. यात त्यांनी असा आक्षेप घेतला आहे की, वरील प्रकरणा मध्ये त्यांना विना कारण गूंतविले आहे. वास्तवीक पाहता गैरअर्जदार क्र.2 ते 5 यांचे अर्जदाराच्या तक्रारीशी संबंध आहे. परवानाधारक म्हणून 2 ते 5 यांना नेमलेले आहे. त्यामूळे संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. गैरअर्जदार यांचेवर कोणतीही जबाबदारी नसल्यामळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. नियम क्र.22 नुसार पार्सल कूरिअर, पेपर पार्सल विनाधनी सामान इत्यादी बाबतची नूकसान भरपाई बाबतची कार्यपध्दती नमूद केलेली आहे. त्यामूळे पार्सल गहाळ, नूकसान झाल्याचे 48 तासांचे आंत नजीकच्या आगारास कळवून तक्रार परवानाधारकाने नोंदवायची असते. अशी तक्रार अर्जदाराकडून प्राप्त झालेली नाही. पार्सल वाहतूकीसाठी मूख्य ठेकेदार म्हणून बाबा ट्रेडींग कंपनी यांना नेमले आहे त्यांची मूदत ऑक्टोबर 2005 ते 30 सप्टेंबर 2008 पर्यत होती. नंतर त्यांनी न्यायालयाकडून मूदत मागवून घेतली आता त्यांची मूदत दि.30 सप्टेंबर 2009 रोजी संपलेली आहे. साई ट्रान्सपोर्ट कूरिअर यांची जबाबदारी येते. सबब गैरअर्जदाराचे विरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 5 यांना नोटीस तामील होऊनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. गैरअरर्जदार क्र.4 यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 हे हजर होऊन ही त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अग्रवाल कृषी सेवा केंद्र परतवाडा यांनी दि.22.5.2009 रोजी परतवाडा येथून पावती नंबर 4870778 प्रमाणे एकूण डाग 19, वजन 190 किलो हा माल नंतर अकोला येथून नांदेड येथे पाठविण्यात आला. ज्यांचा दि.26.05.2009 असून पावती नंबर 3415983 असा आहे. या पावतीवर एकूण डाग 19 पाठविले, 18 डाग मिळाले, एक डाग शॉर्ट म्हणजे येथूनच त्यांना एक डाग कमी पाठविला गेला. यानंतर या सोबत जे बिल नंबर 78 दिलेले आहे. त्यानुसार पावती नंबर 78 दि.22.05.2009 याप्रमाणे ब्रम्हा बीटी (2) मोनसॅन्टो कॉटन सिड 456 (‘19पेटी) भाव रु.750/- प्रति नग एकूण किंमत रु.3,42,000/- असे बिल दिलेले आहे. नांदेड येथे माल आल्याचे नंतर श्री साई ट्रान्सपोर्ट हे गैरअर्जदार क्र.5 यांनी अर्जदाराकडून दि.29.5.2009 रोजी पावती नंबर 1473635 द्वारे डीलेव्हरी दिली असून यात 19 पैकी 17 डाग त्यांचे कडे डिलेव्हरी दिलेली आहे. या बाबत रु.565/- कूरिअर चार्जेस म्हणून घेतलेले आहेत. म्हणजे दोन डाग शॉर्ट आले हे गैरअर्जदार यांना ही मान्य आहे. आता जेव्हा दोन डाग शॉर्ट आले तेव्हा माल वाहतूकीची जबाबदारी वाहतूक कंपनीची आहे. तेव्हा माल कमी आल्यास नूकसान भरपाई देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. एक डागामध्ये ब्रम्हा बीजी (2) 24 पॅकेट आहेत. म्हणजे 48 पॅकेट हरवले. यांची किंमती रु.750/- 48 रु.36,000/- होतात. हे मिळावेत अशी अर्जदार यांची मागणी आहे. न्यायाच्या दृष्टीने ही मागणी आम्ही मान्य करीत आहोत. गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहतूकीचा ठेका गैरअर्जदार क्र.2 यांना सर्व महाराष्ट्रासाठी दिलेला आहे व त्यांनी गैरअर्जदार क्र.3,4,5 यांना ठेका दिलेला आहे. त्याअर्थी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची अर्जदाराच्या मालासंबंधी कोणतीही जबाबदारी येत नाही. अर्जदाराचा माल हा परतवाडा येथून अग्रवाल कृषी सेवा केंद्र गैरअर्जदार क्र.4 यांचे मार्फत नांदेडला पाठविला जो की व्हाया औरंगाबाद हून येतो व गैरअर्जदार क्र.5 नी यांची डिलेव्हरी कूरिअर चार्जेस रु.565/- घेऊन 19 डागा पैकी 17 डाग दिले. गैरअर्जदार क्र.3,4,5 यांची एकञित व संयूक्तीकरित्या अर्जदाराच्या मालाची नूकसान भरपाई देण्याची जबाबदारी येते. गैरअर्जदारांनी व्याज मागितले आहे. बँकेच्या दराप्रमाणे व्याज देणे उचित राहील. कारण जो डाग हरविले त्यात गैरअर्जदार यांचे ही नूकसान झालेले आहे. अर्जदारास मानसिक ञासही झालेला असणार, तो माफक देणे उचित राहील. माल कमी देऊन गैरअर्जदार क्र.3,4, 5 यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.3,,4,5 यांनी अर्जदार यांचे सिडच्या नूकसान भरपाई बददल रु.36,000/- व त्यावर दि.29.05.2009 पासून 7 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/-मंजूर करण्यात येतात. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील सौ.सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य |