जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/228. प्रकरण दाखल तारीख - 09/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. प्रवीण पि. नागनाथराव पालदेवार वय 36 वर्षे, धंदा शेती व व्यापार अर्जदार रा. वसंत नगर, एअरपोर्ट रोड, नांदेड विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, तर्फे कार्यकारी अभिंयता नांदेड. गैरअर्जदार 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, तर्फे कनिष्ठ अभिंयता, चैतन्य नगर रोड, तरोडा बु. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून मौजे तरोडा बु. येथील गट नंबर 218 पैकी प्लॉट नंबर 23 पालदेवार नगर नांदेड येथे बांधकामासाठी विज पूरवठयाची मागणी केली. दि.11.03.2008 रोजी अर्जदार यांला गैरअर्जदार यांनी विज पूरवठा दिला ज्यांचा ग्राहक क्र. 550011127665 असा आहे.अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली की, मागील दोन महिन्यापासून मिटर रिंडीग जास्त येत आहे,यावरुन गैरअर्जदार क्र.2 यांनी बिल दि.7.8.2008 रोजीच्या बिलावर Please send the spot inspection report Sd/- Jr. Engineer MSEDC Dt.27.08.2008 असा शेरा मारलेला आहे. गैरअर्जदाराच्या वतीने मिटरची पाहणी करण्यासाठी कोणीही अधिकारी आले नाही व मिटर रिंडीग बददल कोणतीही तपासणी केली नाही. त्यामूळे पूढे नोव्हेबर 2008 व डिसेंबर 2008 मध्ये मिटर रिंडीग फार जास्त आले म्हणून गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे तक्रार केली. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला मिटर टेस्टींगसाठी रु.100/- बिल दिले ते बिल अर्जदाराने गैरअर्जदाराच्या कार्यालयात भरले. चार्जेस भरल्यानंतर गैरअर्जदाराच्या प्रतिनीधीने ते मिटर एप्रिल 2009 मध्ये काढून नेले व मीटर टेस्टींग करतो असे सांगितले व त्या जागी नवीन मिटर बसविले,ज्यांचा नंबर 02172866 असा आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांना मिटर टेस्टींग बददल केव्हाही नोटीस दिलेली नाही. अर्जदाराच्या अनुपस्थितीत गैरअर्जदाराने मिटरची टेस्टींग केली व त्यांचा अहवाल दि.25.5.2009 रोजी मिटर ओ.के. असल्याचा दिला तो अहवाल अर्जदार यांना ऑगस्ट 2009 मध्ये प्राप्त झाला. अर्जदाराने पून्हा विनंती केली की, आमच्या समक्ष मिटरची टेस्टींग करावी परतु गैरअर्जदारानी आम्ही आपल्या मिटरची पून्हा टेस्टींग करु शकत नाही असे सांगितले.अर्जदाराने डिसेंबर 2008 पर्यतचे सर्व बिले गैरअर्जदार यांचेकडे भरलेले आहेत, सप्टेंबर-ऑक्टोबर 2009 पासून मिटर रिंडीग जास्त येत आहे म्हणून तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही व मिटर बददल रिपोर्ट ओ.के. दिला, म्हणून अर्जदाराने फेब्रूवारी 2009पासून विज बिले भरली नाहीत. अर्जदाराचे बांधकामाचे काम जानेवारी 2009 ते जुलै 2009 पर्यत पूर्णतः बंद होते. तसेच गैरअर्जदाराने ताकीद दिली की, आपण जानेवारी ते जूलै 2009पर्यतची बिले भरल्यासच आपला विज पूरवठा चालू करु असे सांगितले. ऑगस्ट 2009 पासून अर्जदाराने विज पूरवठा नाही व गैरअर्जदाराने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला आहे,असे करुन गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. म्हणून अर्जदाराने तक्रार करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदाराचा विज पूरवठा पूर्ववत पूर्नस्थापीत चालू करण्याचे व अर्जदारासमक्ष मिटर क्र.95603 चे टेस्टींग करुन विज बिल देण्याचे आदेश करावेत तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. कंपनीच्या अधिका-याच्या विरुध्द वैयक्तीक चुकीच्या पदनामाने दाखल केली आहे, विज कायदा 2003 च्या कलम 168 अन्वये विज वितरण कंपनीच्या अधिका-यांच्या विरुध्द वैयक्तीकरित्या कोणतेही प्रकरण दाखल करता येत नाही. अर्जदार हा त्यांनी घेतलेला विज पूरवठा आजही बांधकामाच्या पाण्यासाठी वापरत आहेत हे त्यांनी स्वतः सिध्द करायचे आहे. अर्जदाराने विशिष्ट तारखांना काही रक्कमा भरल्याचा जो उल्लेख केला आहे ते पाहिले असता अर्जदाराने 14 जून 2008 नंतरच्या महिन्याला विजेचे बिल भरलेले नाही. सप्टेबर 2008 च्या नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये विज बिल भरलेले नाही. नोव्हेबर 2008नंतर फेब्रूवारी महिन्यापर्यत विजेचे बिल भरलेले नाही. अर्जदाराच्या मिटर रिंडीग जास्त येते या तक्रारीचे दखल घेऊन अहवाल दिलेला आहे. हे चूक आहे की, नोव्हेंबर व डिसेबर 2008 मध्ये मिटर रिंडीग जास्त आले. एप्रिल 2009 मध्ये मिटर काढून नेले व टेस्टींग करतो असे सांगितले हे म्हणणे चूकीचे आहे. गैरअर्जदार यांच्या पध्दतीनुसार मिटरची तपासणी केली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला मिटर टेस्टींग साठी केव्हाही नोटीस दिलेली नाही हे अर्जदाराचे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराला अशा प्रकारची नोटीस देण्याची आवश्यकता नव्हती. अर्जदाराला त्यामूळे कोणताही ञास झालेला नाही उलट अर्जदाराचे मिटर सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तूमच्या मिटरचा रिपोर्ट ओ.के. आला आहे तूम्ही उर्वरित बिले भरावे हे अर्जदाराचे म्हणणे चूक आहे. अर्जदाराचा विज पूरवठा ऑगस्ट 2009 मध्ये केला या बाबत वाद नाही.ऑक्टोबर 2008 पासून मिटर रिंडीग जास्त येत आहे म्हणून फेब्रूवारी 2009पासून विज बिले भरले नाही ही बाब स्वतः असे दर्शविते की, अर्जदाराला विजेचे बिल न भरता त्या बाबत मागणी करावयाची आहे परंतु अशी मागणी त्यांना करता येणार नाही. हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे की, त्यांचे बांधकाम जानेवारी 2009 ते जुलै 2009 पर्यत पूर्णत बंद होते. अर्जदाराने रक्कम थकीत ठेवल्याकारणाने विजेचे बिल जास्त येते होते. अर्जदारांचा मंजूर भार 10 किलो वॅट होता त्यामूळे त्यांचा उपभोग त्यांच स्वरुपात होतो. अर्जदाराची विज जोडणी परत पूर्वीसारखी करुन देण्यात आलेली आहे. तसेच अर्जदाराचे बिल हे बदललेल्या टेरिफ नुसार बदलण्यात आलेले आहे त्यानुसार अर्जदाराला रु.8050/- चा फायदा झाला आहे. अर्जदाराने मूळ रु.29,150/- जे विज बिल देणे होते ते बिल कमी करुन आता रु.21,100/- करण्यात आलेले आहे. त्यामूळे अर्जदाराला आवश्यक त्या सर्व सवलती देण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांचा विज पूरवठा देखील चालू स्थितीमध्ये आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारे ञास, नुकसान झालेले नसताना देखील त्यांनी चालू असलेल्या विज पूरवठयाची पूर्नस्थापना करण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार रु.10,000/- सह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदार यांचे वकिलांनी घेतलेला आक्षेप हा कंपनीच्या अधिका-याच्या विरुध्द वैयक्तीक चूकीच्या पदनामाने तक्रार केली आहे. जो की विज कायदा 2003 कलम 168 अन्वये करता येणार नाही. यात तक्रार अर्जात पदनाम कंपनीच्या वतीने असे म्हटले आहे. अधिका-यांचे वैयक्तीक नांव लिहीलेले नाही. त्यामूळे ही तक्रार वैयक्तीक कंपनीच्या अधिका-यांच्या विरुध्द आहे असे म्हणता येणार नाही. या कारणाने गैरअर्जदार यांचा आक्षेप नाकारण्यात येतो. अर्जदाराने विज पूरवठा हा त्यांचे साईड वरील बांधकामासाठी पाणी पाहिजे म्हणून विज मोटारीसाठी घेतलेला आहे. बांधकाम हे ज्या वेगाने चालू आहे त्या वेगाने बिल येणार, मध्येच अर्जदार म्हणतात की, त्यांनी काही महिने बांधकाम बंद ठेवले होते परंतु या बाबीचा कोणताही पूरावा समोर आलेला नाही. अर्जदाराची विज देयके पाहिली असता मिटर रिंडीग ही प्रोग्रेसिंव्ह आहे. मिटर रिंडीग प्रमाणेच देयके दिली गेलेली आहेत. यात मे, 2008 चे विज देयक बघीतले असता मिटर रिंडीग मागील रिंडीग 2097 व चालू रिंडीग 2097 म्हणजे 0 यूनिट म्हणजे एकूण वापर सरासरीचे आधारावर 100 यूनिटचे बिल दिलेले आहे ते रु.1910/- आहे ते अर्जदाराने भरलेले आहे. यानंतर जून 2008 चे हे ही बिल सरासरी वर 100 यूनिटचे बिल दिलेले आहे. जूलै 2008 ची रिंडीग प्रमाणे वापर हा फक्त 53 यूनिटच आहे व तेवढेच बिल दिलेले आहे. सप्टेंबर 2008 मध्ये विज वापर हा मिटर रिंडीग प्रमाणे 290 यूनिटचा दाखवलेलो आहे हे रिंडीग प्रोग्रेसिव्ह आहे हे रु.4300/- असले तरी यात थकबाकी रु.17514/- दाखवलेली आहे. ऑक्टोबर 2008 चा विज वापर 287 यूनिटचा व यांचे बिल रु.4344/-हे मागील थकबाकीसह रु.26,244/- अर्जदाराने दि.20.10.2008 रोजी पर्यत भरलेले आहे. यानंतर नोव्हेबर 2008 मध्ये 423 यूनिट चा वापर दाखवलेला आहे. डिसेंबर 2008 मध्हये 385 यूनिटचा वापर दाखवलेला आहे. हे दोन्ही बिले एकदाच दि.12.9.2008 रोजीला रु.12600/- भरलेले आहेत. म्हणजे इथपर्यत अर्जदाराची तक्रार नसावी. यानंतर फेब्रूवारी 2009 ला विजेचा वापर 317 यूनिटचा वापर व मार्च,2009 व एप्रिल 2009 चे बिले नाहीत. मे,2009 मध्ये विजेचा वापर 343 यूनिटचा, यात परत रु.25,250/- ची थकबाकी आलेली आहे. जून,2009 मध्ये 654 यूनिटचा विज वापर, जूलै 2009 मध्ये 306 यूनिटचा विज वापर, ऑगस्ट,2009 मध्ये फक्त 76 यूनिटचा विज वापर झालेला आहे. ही सर्व रिंडीग प्रोग्रेसिव्ह आहे. यात परत थकबाकी रु.33,862/- ची दाखवलेली आहेत. म्हणजे अर्जदाराने मागील बिले भरलेले नाहीत. अर्जदार म्हणतात की, त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत पण गैरअर्जदार यांचेकडे एकही तक्रार अर्ज दिल्याचे दिसत नाही किंवा तसा तक्रार अर्ज या प्रकरणात दाखल ही नाही. फक्त Spot Inspection करा असा शेरा दिला. मे,2008 व जून,2008 या महिन्याचे सरासरी यूनिट चे बिल दिलेले आहे. मिटर जर व्यवस्थित आणि चांगले असेल तर नंतर ही रिंडीग प्रोग्रेसिव्ह दाखवलेली आहे म्हणजे मिटरचे रिंडीग हे पूढे आलेले आहे. म्हणून सरासरीच्या आधारावर दिलेली दोन महिन्याचे यूनिट पूढे मिटर रिंडीग मध्ये आल्या कारणाने या दोन महिन्याचे विज बिल कमी करणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने मिटर नेऊन त्यांची तपासणी पण केलेली आहे. अर्जदाराचा आक्षेप आहे की, त्यांना मिटर तपासणी करताना नोटीस दिलेली नाही किंवा त्यांचे समोर मिटर तपासलेले नाही. मिटर तपासणी करण्यासाठी अर्जदारांना हजर राहण्याविषयी नियमाप्रमाणे नोटीस देणे आवश्यक आहे पण अशी नोटीस जरी दिली नसली तरी गैरअर्जदार यांना लॅबोरटरी मध्ये सिरीज मध्ये पाच-पाच मिटरची टेस्ट केलेली आहे. त्यात त्यांना अर्जदाराचे विज मिटर हे ओ.के. आढळलेले आहे. उलट गैरअर्जदार यांची मिटर बददल काहीही तक्रार नाही. अर्जदारच मिटरची तक्रार करतात. कोणताही आधार नसताना केवळ तोंडी बोलण्यावरती आम्ही बांधकाम बंद केले वा चालू केले हे म्हणून काल्पनिक बोलण्यावर त्यांना आक्षेप घेता येणार नाही. त्याविषयी ठोस पूरावा दयावा लागेल. बांधकामाला मिटर घेतलेले असताना ते कमर्शियल नसून त्यांस घरगूती विजेचा दर लावावा असे म्हटले आहे. तरी गैरअर्जदार यांनी यांत जी आर प्रमाणे मिटर रिंडीग चे दर कमी करुन अर्जदाराचे बिल हे जवळपास रु.8050/- कमी केलेले आहे. एवढी रक्कम अर्जदाराची कमी झालेली आहे, तरी तूम्ही म्हणतात त्याप्रमाणे सूरुवातीची सरासरीची बिले भरली, मिटर ओ.के. असेल तर हे दोन सरासरीची बिले जे की, मे,2008 चे बिल रु.1910/- दि.14.6.2008 ला भरलेले आहे व जून,2008 चे बिल रु.1510/- जे की, दि.12.8.2008 ला भरलेले आहे. एकूण रक्कम रु.3420/- अजून कमी करणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांनी रु.21026/- च्या थकबाकीसह हिशोब दिलेला आहे. त्यातून अजून रु.3420/- कमी केल्यास रु.17,680/- अर्जदारास भरणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या हिशोबानुसार यात अजून 200 यूनिटची दूरुस्तीसाठी रु.3420/- कमी करुन दूरुस्तीचे बिल अर्जदारास देण्यात यावे, ते बिल भरणे अर्जदारास बंधनकारक राहील. गैरअर्जदारांनी मिटर टेस्टींगच्या वेळेस नोटीस न पाठवून नियमांचा भंग केला म्हणून त्यासाठी रु.1000/- दंड करण्यात येतो. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 1.मिटर टेस्टींग परत करण्यासाठीची विनंती अमान्य करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत त्यांनी ग्राहक क्र.550011127665 आर वर सूधारित जे बिल दिलेले आहे त्यात अर्जदार यांनी भरलेली रक्कम कमी म्हणजे त्यांनी दिलेल्या एकूण बिलाच्या रु.39,100/- यातून अर्जदाराने भरलेले रु.18,000/- कमी केले असता रु.21100/- व यातून रु.3420/- कमी करुन दूरुस्तीचे देयक रु.17,680/- दयावे व ते बिल अर्जदाराने ताबडतोब भरावे. 3. आदेशाच्या दिलेल्या वेळेपर्यत गैरअर्जदार यांनी विज पुरवठा सुरु ठेवावा. यानंतर अर्जदार यांनी वर दिलेली रक्कम वेळेत भरली नाही, तर नियमाप्रमाणे गैरअर्जदार कार्यवाही करु शकतील. 4. गैरअर्जदाराने सेवेतील ञूटीबददल दंड म्हणून रु.1000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.1,000/- अर्जदारांना दयावेत, ही रक्कम गैरअर्जदार यांना विज देयकात समायोजित करता येईल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |