Maharashtra

Kolhapur

CC/10/571

Baburao Devappa patil. - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distrubution Co.Ltd. - Opp.Party(s)

P.B.Jadhav.

29 Jan 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/571
1. Baburao Devappa patil.H.no-122,Kumbharwadi.Tal-Radhanagri.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distrubution Co.Ltd.Sub.Division, Radhanagri, Kolhapur2. Narendrashih Naru.Maharashtra State Electricity Distrubution Co. Ltd., Tarabai Park, Kolhapur, ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.B.Jadhav., Advocate for Complainant
S.D.Potdar, Advocate for Opp.Party

Dated : 29 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.29.01.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांनी सामनेवाल विद्युत कंपनीकडून दि.10.06.2009 रोजी घरगुती वीज कनेक्‍शन घेतले आहे. तक्रारदारांच्‍या घरी दोन टयुबलाईट आणि चार बल्‍ब असा वीज वापर आहे. तक्रारदारांनी दि.28.05.2009 रोजी वीज कनेक्‍शनची डिपॉझिट रक्‍कम रुपये 560/- सामनेवाला यांचेकडे भरली आहे. सदर कनेक्‍शनकरिताचे वीज मिटर सामनेवाला विद्युत कंपनीकडून दि.28.05.2009 रोजी टेस्टिंग करुन घेतले आहे, तदवेळी मिटरचे रिडींग 00004 असे होते. तक्रारदार हे घरगुती वापराकरिता वीज वापरतात. तक्रारदारांचा प्रत्‍येक तीन महिन्‍याला अंदाजे 40 ते 45 युनिट असा वापर होतो. अशी वस्‍तुस्थिती असताना, सामनेवाला विद्युत कंपनीच्‍या रिडरकडून चुकीचे वीज रिडींग घेवून वेळावेळी चुकीची वीज देयके पाठविली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना जुलै 2009 आणि माहे ऑक्‍टोबर 2009 मध्‍ये चुकीची अवाजवी बिले पाठविली. सदर बिलाचे तारखेपर्यन्‍त तक्रारदारांचे कनेक्‍शनचा वापर 2451 युनिट झालेला नाही. त्‍यांनतर सामनेवाला विद्युत कंपनीने एप्रिल 2010 मध्‍ये एकूण वीज युनिट 248 चे बिले तक्रारदारांना दिले. त्‍यानंतर माहे जुलै 2010 मध्‍ये पुन्‍हा एकूण वीज वापर 45 युनिट बिल दिले आणि रक्‍कम रुपये 4,700/- ची वीज आकारणी मागणी केली. परंतु, तक्रारदारांनी दि.08.03.2010 रोजी रक्‍कम रुपये 990/- चे वीज बिल भरले आहे. त्‍यामुळे तक्रारदारांचे वीज कनेक्‍शन घेतलेपासून माहे जुलै 2010 अखेरचे 314 युनिट वीज वापराचा हिशेब होवून त्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून वीज आकार स्विकारणे जरुरीचे होते. परंतु, सामनेवाला वि़द्युत कपंनीने तक्रारदारांना चुकीच्‍या रिडींगच्‍या आधारे अवाजवी व अवाढव्‍य रक्‍कमांची बिल पाठवून मानसिक त्रास दिलेला आहे. याशिवाय सामनेवाला विद्युत कंपनीने दि.20.09.2010 रोजी तक्रारदारांचा विद्युत पुरवठा बंद करुन सेवेतील त्रुटी केली आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे तक्रारी केल्‍यामुळे सामनेवाला यांनी चुकीच्‍या बिलाची बाब मान्‍य करुन पुन्‍हा चुकीची रक्‍कम रुपये 4,470/- चे कोटेशन तक्रारदारांना दिले. सामनेवाला यांनी नोंदविलेले चुकीचे वीज रिडींग पुढीलप्रमाणे :-

अ.क्र.
महिना
रिडींग
1.
जुलै 2009
817
2.
ऑक्‍टोबर 2009
2451 तक्रारदारांचे तक्रारीनुसार रिडींग दुरुस्‍ती 00121
3.
जानेवारी 2010
2451
4.
एप्रिल 2010
248
5.
जुलै 2010
45

 
(3)        सबब, चुकीचे देयके दिल्‍याने झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/-, तक्रारदारांचा विद्युत पुरवठा विनाकारण खंडित केलेमुळे तक्रारदारांचे कुटुंबियाना अंधारात रहावे लागल्‍याने रुपये 25,000/-, तक्रारदाराना सामनेवाला यांचेकडे हेलपाटे मारावे लागले त्‍यापोटी रुपये 480/-, तक्रारीचा खर्च रुपये 5,500/- देणेबाबत तसेच, तक्रारदारांचे माहे जुलै 2010 अखेर 314 युनिटचा वापराचा एकूण वीज हिशेब होवून त्‍याप्रमाणे तक्रारदारांना पूर्वी भरलेला वीज आकाराची रक्‍कम रुपये 990/- वजा होवून वीज देयक तक्रारदारांना देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदारांनी वीज कनेक्‍शनसाठी डिपॉझिट भरलेली पावती, मिटर टेस्टिंग रिपोर्ट, वीज मिटर खरेदी पावती, जानेवारी 2010, एप्रिल 2010, जुलै 2010 ची वीज बिले, कोटेशन इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. तसेच, अवास्‍तव देयके दिलेली नाहीत याबाबत तक्रारदारांचे कथन नाकारले आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी महाराष्‍ट्र विद्युत नियामक आयोग यांचेकडे तक्रार दाखल करणे आवश्‍यक होते. तसेच, विद्युत लोकपाल यांचेकडे रितसर तक्रार देण्‍याचा हक्‍क व अधिकार आहे. या कारणावरुन तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात महाराष्‍ट्र विद्युत नियामक आयोग यांनी स्‍वतंत्र ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्‍थापना केलेली असून प्रस्‍तुतची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतची तक्रार या मंचापुढे चालणे पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        युक्तिवादाचेवेळेस सामनेवाला कंपनीचे प्रतिनिधी, सहा.लेखापाल-श्री.मोहन गणपतराव वणकुद्रे तसेच त्‍यांचे वकिल हजर होते. त्‍यांनी तक्रारदारांच्‍या विद्युत देयक दुरुस्‍त करुन दिलेचे प्रतिपादन केले आहे व नजरचुकीने चुकीचे देयक दिले असलेचे कबूल केले आहे याची न्‍यायिक नोंद हे मंच घेत आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना दि.06.02.2010 रोजी देयक दिलेले आहे. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दि.01.10.2010 रोजी दाखल केलेली आहे व सामनेवाला यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्‍याने तो पूर्ववत सुरु करणेत यावे याबाबत अंतरिम आदेश का पारीत करु नये याबाबत सामनेवाला यांना आदेश करणेत आला. त्‍यानंतर दि.28.10.2010 रोजी तक्रारदारांना विद्युत देयक दुरुस्‍त करुन दिले आहे. याचा विचार करता सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांच्‍या तक्रारीची दखल घेतलेली नाही. तसेच, युक्तिवादाचेवेळेस सहाय्यक लेखापाल-मोहन गणपतराव वणकुद्रे यांनी तक्रारदार हे त्‍यांचेकडे विद्युत देयकाबाबत तक्रार घेवून आल्‍याचे कबूल केले आहे. तसेच, त्‍यांनी वरिष्‍ठांकडे तक्रार करणेबाबत तक्रारदारांना सांगितलेचेही कबूल केले आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी विद्युत देयक दुरुस्‍त करुन देणेस टाळाटाळ केली आहे व प्रस्‍तुतची तक्रार दाखल केल्‍यानंतर विद्युत देयक दुरुस्‍त करुन दिले आहे. वास्‍तविक पहाता, इंडियन इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्‍ट, 2003 यातील कलम 56 याचा विचार करता विद्युत कंपनीने ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करीत असताना 15 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. ग्राहकास नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडित करणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्‍ट, 2003 यातील कलम 56 पुढीलप्रमाणे :-
 
Sec.56 - Disconnection of supply in default of payment - (1) Where any person neglects to pay any charge for electricity or any sum other than a charge for electricity due from him to a licensee or the generating company in respect of supply, transmission or distrubution or wheeling of electricity to him, the licensee or the generating company may, after giving not less than fifteen clear days’ notice in writing, to such person and without prejudice to his rights to recover such charge or other sum by suit, cut off the supply of electricity and for that purpose cut or the generating company through whcih electricity may have been supplied, transmitted, distributed or wheeled and may discontinue the supply until such charge or other sum, together with any expenses incurred by him in cutting off and reconnecting the supply, are paid, but no longer:
 
(8)        उपरोक्‍त विवेचन विचारात घेता विद्युत कंपनीने तक्रार दाखल करेपर्यन्‍त तक्रारदारांना दिलेल्‍या अवास्‍तव देयकाची दुरुस्‍ती केलेली नाही. या मंचाने अंतरिम आदेश का पारीत करणेत येवू नयेत याबाबतचे आदेश केलेनंतर सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांचे देयक दुरुस्‍त करुन दिले आहे. तसेच, सहाय्यक लेखापाल यांनी मंचासमोर कबूल केलेप्रमाणे तक्रारदारांनी बिलाबाबत तक्रार दाखल करुनही त्‍याची दखल न घेता वरिष्‍ठांकडे बोट दाखवून मोकळे होतात व टाळाटाळ करणे तसेच 15 दिवसांची नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडित करणे इत्‍यादीचा विचार करता सामनेवाला यांची सेवेत त्रुटी झालेचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे व सदर त्रुटीची हे मंच गांभीर्याने नोंद घेत आहे. तक्रारदारांना झालेला मानसिक मनस्‍ताप, शारिरीक त्रास, आर्थिक त्रास याचा विचार करता सदर त्रासापोटी रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदरची नुकसान भरपाई ही सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. हे मंच यापुढे असेही स्‍पष्‍ट करते की, सामनेवाला विद्युत कपंनीकडे असलेला पैसा हा सार्वजनिक स्‍वरुपाचा पैसा आहे. त्‍यामुळे सामनेवाला विद्युत कंपनीने त्‍यांच्‍या कर्मचारी/अधिकारी यांचेवर निश्चित करुन त्‍यांच्‍या वेतनातून सदर नुकसान भरपाईची वसुली करावी. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना मानसिक, शरिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्‍त) द्यावेत.

3.    सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT