निकालपत्र :- (दि.20.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी त्यांच्या हॉटेल व्यवसायाकरिता सामनेवाला विद्युत कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क्र.266510305779 असा असून मिटर क्र.31554216 असा आहे. तसेच त्यांचा पूर्वीचा बिघडलेल्या मिटरचा क्र.5531551761 असा होता. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला विद्युत कंपनीकडे मिटर तपासणीबाबत तक्रार केली असता मिटरमध्ये बिघाड असलेबाबत अहवाल आल. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना विद्युत देयके दिलेली आहेत. सदरची देयके चुकीची व अवास्तव आहेत. तक्रारदारांनी होर्डिंगसाठी वीजेचा वापर केलेला नाही. सबब, सामनेवाला यांनी दिलेली अवास्तव व चुकीची देयके दुरुस्त करुन देणेबाबत आदेश व्हावेत. तसेच, सरासरी 240 युनिटप्रमाणे देयके द्यावीत व तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडित करणेत येवू नये याबाबतचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांची वीज पुरवठा बंद करणेबाबतची नोटीस, मिटर तपासणी करुन रुपये 300/- भरलेबाबतची पावती, सामेवाला यांनी दिलेले देयक, सामनेवाला यांचे दुरुस्त बिलासह पत्र, तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे केलेली तक्रार इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत सी.पी.एल., होर्डींगबाबतचे दि.07.04.2007 पत्र, यादी पाठविणेबाबतचे दि.16.05.07 चे पत्र व यादी, तक्रारदारांना दि.02.06.07 रोजी दिलेले पत्र, नविन कनेक्शन बाबतचा अर्ज दि.29.01.08, मिटरबाबतचा दि.03.02.09 रोजीचा अहवाल, दुरुस्ती अहवाल, तक्रारदारांचे दुरुस्त केलेले बिल, मिटर तपासणी अहवाल, अधिकारपत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले. तसेच, उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीकडून घेतलेले विद्युत कनेक्शन हे त्यांच्या लॉजिंग व्यवसायाकरिता घेतलेले आहे. व्यावसायिक कारणाकरिता घेतलेल्या सेवेबाबतचा वाद ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(डी) मधील तरतुदीनुसार ग्राहक वाद होत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत. 3. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |