Maharashtra

Kolhapur

CC/09/576

Akaram Ramchandra Varute. - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distrubaution co - Opp.Party(s)

P.B.Jadhav.

17 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/576
1. Akaram Ramchandra Varute.Kasba Bid.Tal-Karvir.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distrubaution co Koge.Tal-Karvir.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.B.Jadhav., Advocate for Complainant

Dated : 17 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

संयुक्‍त निकालपत्र :- (दि. 17/07/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

     

(1)        प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारीमध्‍ये सामनेवाला हे एकच आहेत व वादविषयातही साम्‍य असलेने दोन्‍ही तक्रारीमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहोत.

(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदारचा लेखी युक्‍तीवाद दाखल. तक्रारदाराचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला.

          

                सदरची तक्रार सामनेवालांनी वीजपुरवठयासाठी पुरवलेल्‍या निकृष्‍ट विद्यूतवाहक तारा तक्रारदाराचे ऊस पिकावर पडून नुकसान झालेमुळे दाखल केलेली आहे.

 

(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :-ग्राहक तक्रार क्र.576/09 व 577/09 मधील नमुद तक्रारदार हे कसबा बीड ता. करवीर जि.कोल्‍हापूर येथील रहिवाशी असून ते सदर ठिकाणी शेती करतात. त्‍यावर त्‍यांचे कुटूंबाची उपजिवीका चालवतात.

ग्राहक तक्रार क्र.576/2009:- अ) तक्रारदाराची नमुद ठिकाणी गट नं.30 क्षेत्र 16आर शेतजमीन असून सदर जमिनीत तक्रारदाराचे ऊसपीक होते.सामनेवाला ही वीज पुरवठा करणारी कंपनी आहे. यातील तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत. नमुद कंपनीचे विद्यूत खांब हे तक्रारदाराचे तसेच त्‍यांना लागून शेजारील शेतक-यांचे शेतामध्‍ये आहेत.सदर खांबावरुन(पोल) विद्यूत वाहक तारांमधून ग्राहकांना वीज पुरवठा करतात.

           ब) सामनेवालांच्‍या निकृष्‍ट दर्जाच्‍या विद्यूत वाहक तारा दि.30/10/2008 रोजी तुटून शॉर्ट सर्कीट होवून त्‍यामधील ठिणग्‍या तक्रारदाराचे ऊस पिकावर पडल्‍यामुळे तक्रारदाराचे संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाले. सदर तक्रारदाराचे 16 आर क्षेत्रामध्‍ये उत्‍कृष्‍ट ऊसाचे पिक पिकवले होते. सदरचे संपूर्ण पिक आगीत भस्‍मसात झाले आहे. त्‍यामुळे तक्रारदारचे मानसिक संतूलन बिघडून विलक्षण मानसिक त्रास झालेला आहे.

 

           क) तक्रारदाराचे ऊस पीक  जळलेबाबत गावकामगार तलाठी कसबा बीड यांचे समोर पंचनामा झालेला आहे. तसेच तलाठी यांनी नमुद घटनेबाबत जबाब नोंदविला आहे. तसेच सामनेवाला कंपनीच्‍या विद्यूत निरीखण विभागाने वीजग्राहकचे शॉर्टसर्किटमुळे तक्रारदाराचे ऊस पीक जळीत झालेबाबतचा अभिप्राय दि.17/03/2009 रोजी दिलेला आहे. तक्रारदाराचे रक्‍कम रु.22,000/- चे नुकसान झाले आहे. त्‍याबाबतचा पंचनामा, जबाब, अभिप्राय इत्‍यादी कागदपत्रे पाठवून सामनेवालांकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता सामनेवालांनी रक्‍कम अदा करणेस टाळाटाळ केली. सबब सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले.सबब तक्रारदारची तक्रार मंजूर होऊन ऊस पिकाची नुकसानी रक्‍कम रु.22,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-त्‍यावर व्‍याजाची रक्‍कम रु.2,000/-, व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,500/- असे एकूण रक्‍कम रु.42,500/- सामनेवालांकडून 15 टक्‍के व्‍याजाने वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे.

 

ग्राहक तक्रार क्र.577/2009 :- नमुद तक्रारदाराचे गट नं.31 क्षेत्र 52 आर शेतजमीन आहे. नमुद क्षेत्रापैकी तक्रारदार क्र.1 यांचे 30 आर, तक्रारदार क्र.2 व 3 यांचे प्रत्‍येकी 11 आर असे आहे. दि.30/10/2008 रोजी विद्यूत वाहक तारा तुटून शॉर्टसर्कीट होऊन त्‍यामधील ठिणग्‍यामुळे तक्रारदारांचा नमुद क्षेत्रातील पिक जळून खाक झाला आहे. योग्‍य कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे पाठवून मागणी करुनही नुकसनभरपाई रक्‍कम दिलेली नाही.सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदारास जळीत ऊसपिकाची नुकसान भरपाईची रककम रु.62,000/-मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/-नुकसानीवरील व्‍याजापोटी रक्‍कम रु.2,000/-तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,500/- असे एकूण रक्‍कम रु.97,500/- द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याजासह सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे.

 

(4)        दोन्‍ही तक्रारीमध्‍ये तक्रारदाराने तक्रारींसोबत शेताचा 7/12 उतारा, तक्रारदारांचा जबाब, तक्रारदारांचे ऊस पिकाचे नुकसानीचा पंचनामा, सामनेवाला यांचे निरिक्षकांचा अभिप्राय, दैनिक लोकमतमधील बातमीचे कात्रण इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

(5)        सामनेवाला यांनी दोन्‍ही कामात दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदारांची तक्रार खोटी व लबाडीची असून त्‍यातील सर्व मजकूराचा सामनेवाला इन्‍कार करतात. तक्रारदाराची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. तक्रार अर्जातील कलम 1 मधील शेतजमिनीवर तक्रारदारांच्‍या कुटूंबाची उपजिवीका अवलंबून आहे ही मजकूर धादांत खोटा आहे. कलम 2 ते 6 मधील मजकूर मान्‍य व कबूल नाही. तक्रारदाराची सामनेवाला विज कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी आलेनंतर सामनेवाला वीज कंपनीतर्फे त्‍याची सखोल चौकशी होऊन वेळोवेळी कंपनीचे आवश्‍यक विभागाकडे नुकसानभरपाईसंबंधी पत्रव्‍यवहार केला गेला आहे. क्र.काअ/ग्रावि/जेई/कअ(वा)/5811 दि.11/09/2009 चे पत्राप्रमाणे सामनेवाला कंपनीने तक्रारदारास कागदपत्रांची पूर्तता करणेसाठी कळवले होते. मात्र तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता न केलेने तक्रारदारास नुकसानभरपाई देता आली नाही. सामनेवाला कंपनीने रक्‍कम देणेस टाळाटाळ केलेली नाही. तक्रारदारांचा सामनेवालांकडे नुकसान भरपाईचा अर्ज प्रलंबीत आहे. कागदपत्रांची पूर्तता अदयाप केली तरी योग्‍य व कायदेशीर नुकसान भरपाई तक्रारदारास मिळू शकली असती व आजही आहे. सामनेवाला कंपनीच्‍या अधिका-यांना त्रास देणेसाठी तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन कंपनीस विनाकारण खर्चात पाडले आहे.

 

(6)        सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार ग्राहकांनी महावितरण कंपनीने निकृष्‍ट दर्जाच्‍या विद्यूत वाहक तारांमुळे दि.30/10/2008 रोजी शॉर्ट सर्कीट झाल्‍याचे आपल्‍या तक्रारीत नमुद केलेले आहे. परंतु तक्रारदारांचा गट नं.30 व 31 क्षेत्रातील 11 केव्‍ही उच्‍चदाब विद्यूत वाहिनीसाठी वापरण्‍यात आलेल्‍या(AAAC)(ऑल अ‍ॅलॉय अ‍ॅल्‍यूमिनिअम कंडक्‍टर)या कंडक्‍टरची 65अंश सेल्सिअस तापमानास विद्यूतवाहनक्षमता 110 अ‍ॅम्‍पीयर इतकी आहे. तसेच सदरचा कंडक्‍टर शॉर्ट सर्कीटने तुटल्‍यानंतर 33/11 केव्‍ही कोगे उपकेंद्रातील 11 केव्‍ही बहिरेश्‍वर फीडर उपकेंद्रातील सुरक्षाव्‍यवस्‍थेसाठी बसवलेले रिले कार्यान्‍वीत होऊन दुपारी 01.15 वाजता ट्रिप झाला. त्‍यामुळे 11 केव्‍ही बहिरेश्‍वर फीडर पूर्णपणे बंद झाला व याची नोंद दि.30/10/2008 रोजीच्‍या कोगे उपकेंद्राच्‍या लॉगशीटमध्‍ये करण्‍यात आली आहे. यावरुन महावितरण कंपनीने उपकेंद्रातील सुरक्षाव्‍यवस्‍थेसाठी बसलेले रिले सक्षम व व्‍यवस्थितपणे कार्यान्‍वीत असल्‍याचे सिध्‍द होते. त्‍यामुळे सामनेवाला कंपनीच्‍या निष्‍काळजीपणे अगर दुर्लक्षामुळे  शॉर्ट सर्किट झालेले नसून तक्रारदार ग्राहकाचे नुकसान झालेले नाही. तसेच वरील गोष्‍टीवरुन हेही स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला कंपनीने निकृष्‍ट दर्जाच्‍या विद्यूत वाहक तारा वापरलेल्‍या नव्‍हत्‍या व नाहीत. सबब, झालेल्‍या अपघातास व नुकसानीस सामनेवाला

 कंपनीला अगर तिचे कोणत्‍याही अधिकारी कर्मचारी यांना दोषी धरता येणार नाही. सदर कामी तहसिलदार अगर तलाठी अगर शासकीय अधिकारी यांनी नुकसान भरपाईबाबत कोणताही अहवाल दिला नसलेने सुध्‍दा तक्रारदारांचा अर्ज विचारात घेता येणार नाही.

 

(7)        वीजेची तारेचे शॉर्ट सर्किट होवून तक्रारदार ग्राहकाचा ऊस जळला ही गोष्‍ट पूर्णपणे अपघाती असून सामनेवाला कंपनी त्‍यास जबाबदार नाही असे अपघात होवू नयेत यासाठी सामनेवाला कंपनीकडून नेहमीच योग्‍य ती काळजी घेतली जात असते. पंरतु वादळ वारे, वावटळ, पाऊस इत्‍यादी नैसर्गिक घटनामुळ असे शॉर्ट सर्किटचे प्रकार अगर विद्यूत प्रवाहामुळे नुकसान होणेचे प्रकार होवू शकतात. त्‍यासाठी सामनेवाला कंपनी अगर तिचे अधिकारी, कर्मचा-यांना जबाबदार धरता येणार नाही.

 

(8)        तक्रारदार हे नुकसान झाले म्‍हणतात ते नुकसान शाबीत करणेची जबाबदारी संपूर्णपणे तक्रारदाराची असून सदर कामी तक्रारदारांनी नेमके नुकसान किती व कसे झाले? यासाठी कागदोपत्री कोणताही पुरावा आणलेला नाही. तसेच जळालेले ऊस पिक तक्रारदाराचे होते व कोणत्‍या कारखान्‍यास त्‍याचे गळतीचा करार होता किंवा नाही व ऊस पिक जळालेनंतर ते कोणत्‍या कारखान्‍यास अगर गु-हाळास गाळपास घातेल अगर त्‍याची विल्‍हेवाट काय लावली व त्‍या ऊसाचे वजन किती झाले व त्‍यातून तक्रारदार ग्राहकाला किती रक्‍कम आली, याविषयी कोणताही पुरावा मे.कोर्टासमोर तक्रारदार ग्राहकाने हेतुपुरस्‍सर आणलेला नाही. यावरुनही स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार मे. कोर्टासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेले नाहीत आणि तक्रारदाराची तक्रार पोकळ व दिशाभूल करणारी असलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी. तक्रारदारांनी जळालेल्‍या ऊस पिकाचे काय केले. याबाबत स्‍पष्‍टीकरण मे. कोर्टासमोर येणेसाठी योग्‍य ते आदेश व्‍हावेत. तक्रारदाराने सामनेवाला यांना नाहक आर्थिक नुकसानीत टाकलेने तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रक्‍कम रु;5,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.

 

(9)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.

 

(10)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्‍डर, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षास येतात.

1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                                      --- होय.

2) तक्रारदार हे नुकसानभरपाई पोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत का?--- होय.

3) काय आदेश ?                                                                                        --- शेवटी दिलेप्रमाणे

मुद्दा क्र.1:- अ)सामनेवाला कंपनीचे विद्यूत खांब प्रस्‍तुत तक्रारीतील तक्रारदारांच्‍या     (शेतक-यांच्‍या) शेतजमीनीत होते व आहेत. सदर खांबावरुन उच्‍च दाबाच्‍या विद्यूत तारा तुटून शॉर्ट सर्किट झाले. त्‍यामुळे ठिणग्‍या उडून तक्रारदारांचे शेतजमीनीतील ऊस पिक जळून खाक झालेले आहे. ही घटना दि.30/10/2008रोजी दुपारी 1वाजता घडलेली आहे व त्‍याबाबत तक्रारदारांचे गावकामगार तलाठी क.बीड ता.करवीर यांचेसमोर दि.31/10/2008 रोजी जबाब नोंदविणेत आले आहेत. तसेच त्‍याचदिवशी ग्राहक तक्रार क्र.576/2009 मध्‍ये नुकसानीबाबतचा पंचनामा गावकामगार तलाठी तसेच दोन पंचांसमोर झालेला आहे व तक्रारदाराचे 16 आर क्षेत्र पूर्णत: बाधीत असलेने ऊस पिक जळाल्‍याने नुकसानीची रक्‍कम अंदाजे रु.22,000/- ची मागणी केली आहे.

 

           ब) ग्राहक तक्रार क्र.577/2009 मध्‍ये गावकामगार तलाठी तसेच पंच यांचेसमोर पंचनामा केला आहे. यामध्‍ये तक्रारदाराचे गट नं.31 मधील 52.6 आर मधील क्षेत्रापैकी तक्रारदार क्र.1 चे 30 आर तक्रारदार क्र; 2व 3चे प्रत्‍येकी 11 आर क्षेत्र बाधीत होऊन ऊस जळून रक्‍कम रु.62,000/- चे नुकसान झालेचे नमुद आहे.

 

           क) तसेच प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारीत विद्यूत निरिक्षक कोल्‍हापूर यांनी दि.30/10/2008 च्‍या तक्रारदाराचे ऊस जळीताबाबतचा अभिप्राय दि.17/03/2009 रोजी सहा अभियंता , महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी उपविभाग फुलेवाडी जि.कोल्‍हापूर यांना पाठवला असून त्‍यामध्‍ये वीजवाहकामध्‍ये शॉर्टसर्कीट झालेने ऊसावर ठिणगी पडून ऊसाचे जळीत झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. याची प्रत पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे व तक्रारदारांना पाठविलेबाबतची नोंद आहे. तसेच दि.01/11/2008 च्‍या दैनिक लोकमत या वृत्‍तपत्रामध्‍ये अपघाताबाबतचे फोटोसहीत सविस्‍तर वृत्‍त दिलेले असून सदर वृत्‍तामध्‍ये एकंदरीत रुपये दोन लाखाचे नुकसान झालेचे नमुद आहे. सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेत निरीक्षण विभागाने अभिप्राय दिलेला नव्‍हता व नाही असे नमुद केले आहे. मात्र विद्यूत नि‍रीक्षकाचा अभीप्राय प्रस्‍तुत कामात दाखल आहे. सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणणेत असे शॉर्ट सर्कीट वादळ, वारे,वावटळ व पाऊस इत्‍यादी नैसर्गिक घटनामुळे घडू शकतात. सबब सामनेवालांना जबाबदार धरता येणार नाही असे नमुद केले आहे. परंतु सदरची घटना ऑक्‍टोबर महिन्‍यात घडलेली असल्‍यामुळे सदर महिन्‍यात अशी काही घटना घडली असलेबाबतचा स्‍वयंस्‍पष्‍ट पुरावा सामनेवालांनी प्रस्‍तुत तक्रारीत दाखल केलेला नाही. सबब सामनेवालांचा सदर आक्षेप हे मंच विचारात घेत नाही.  

 

           ड) सामनेवालांनी वीज पुरवठा केलेल्‍या विद्यूत तारांच्‍या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून तक्रारदारचे ऊसाचे पीक जळलेले आहे ही वस्‍तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे नुकसानीबाबत मागणी केलेचेही सामनेवालांनी लेखी म्‍हणणेत मान्‍य केले आहे. तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केली नसल्‍याने नुकसानभरपाई देता आली नाही असे नमुद केले आहे. याचा विचार करता सामनेवालांना काय कागदपत्रे हवीत याबाबत कळवलेचे कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत.सामनेवाला कंपनीच्‍या विद्यूत तारांच्‍या शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्‍या पडून तक्रारदारांचे ऊस पिक जळाले आहे व तक्रारदाराने नुकसानीची मागणी करुनही सामनेवालांनी ती दिलेली नाही ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  

 

मुद्दा क्र.2 :- अ) प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारीत दाखल 7/12 उताराच्‍या सत्‍यप्रतीमध्‍ये ऊस पिकाची नोंद आहे. सबब नमुद गट क्रमांकाच्‍या शेतजमिनीमध्‍ये तक्रारदाराने ऊस पिक घेतलेले होते ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. गावकामगार तलाठी व दोन पंचानी पंचनामा केलेला आहे. गावकामगार तलाठी हे संबंधी शेती-पिकपाणी-पिक उत्‍पादन-उतारा या बाबत त्‍यांना त्‍या त्‍या शेतीच्‍या क्षेत्रानुसार माहिती असते. शेती व उत्‍पन्‍न याबाबतचे ज्ञान असते. याचा विचार करता त्‍यांनी व पंचांनी नुकसान भरपाईची निश्चित केलेली रक्‍कम योग्‍य असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांचे विद्यूत निरीक्षक यांनी दि.17/03/2009 रोजी दिलेल्‍या अभिप्रायाचा विचार करता सदर तारखेनंतर तक्रारदार सदर रक्‍‍कम व्‍याजासहीत मिळणेस पात्र आहेत.

 

           ब) सामनेवालांनी जळीत ऊसाचे काय केले? याबाबतचा मुद्दा हे मंच फेटाळत आहे. कारण गळीत हंगामापूर्वी ही घटना घडली असून ऑक्‍टोबर महिन्‍यात गळीत हंगाम सुरु रहात नाहीत. सबब असा जळका ऊस कारखाना अथवा गु-हाळावर घालण्‍यायोग्‍य तो राहीला किंवा घातला असेल तर ती शाबीतीची जबाबदारी सामनेवालांची आहे सदरची बाब सामनेवालांनी शाबीत केलेली नाही. सबब सदरचा मुद्दा हे मंच फेटाळत आहे.

 

           क) सबब गावकामगार तलाठी व दोन पंचाचे पंचनाम्‍यात नमुद निश्चिती केलेली नुकसानीची रक्‍कम व्‍याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच पुढील पुर्वाधारचा आधार घेत आहे.

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI -The Assistant Executive Engineer, Hubali & Others Vs. Sri Neelakanta Goiuda Siddanagouda Patil - Revision Petition No.37 of 2002,  Decided on 11/02/2002

A) Consumer Protection Act, 1986 section 21(1)(0)- Services- deficiency - electricity - loose electric wire hanging over the complainant’s filed - sparking from electric wire- loss of sugarcane crops, coconut trees and chikku trees - whether there was deficiency of service on the part of the opposite party in pot providing safe electric current through wire- yes- awarded comnpensation with interest.

B) Consumer Protection Act, 1986-section 21(b) - jurisdiction - opposite party was deficient in service in not providing safe electric current through wire - awarded compensation with interest- revision - no error found in the order of District Forum as affirmed by State Commission dismissed.

मुद्दा क्र.3:- सामनेवालांचेकडून तक्रारदार शेतक-यांना वेळीच जर नुकसानभरपाई मिळाली असती तर तक्रारदारांना सदरच्‍या तक्रारी दाखल कराव्‍या लागल्‍या नसत्‍या.सबब सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                                आदेश

 

1)  तक्रारदारांच्‍या तक्रारी मंजूर करण्‍यात येतात.

 

2) सामनेवालांनी ग्राहक तक्रार क्र.576/2009 मधील तक्रारदारांना रक्‍कम रु.22,000/- व ग्राहक तक्रार क्र.577/2009 मधील तक्रारदारांना रक्‍कम रु.62,000/-  अदा करावेत व सदर रक्‍कमांवर दि.17/03/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

3) सामनेवाला यांनी प्रत्‍येक तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- अदा करावेत.

 

 

 

 

       .

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT