Maharashtra

Ratnagiri

EA/6/2015

Mrs. Munira Ahamad Phirfire - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distributors Co. - Opp.Party(s)

K.A.Joshi

30 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Execution Application No. EA/6/2015
( Date of Filing : 23 Mar 2015 )
In
Complaint Case No. CC/13/7
 
1. Mrs. Munira Ahamad Phirfire
101, Al-Axa Apartment, Bhendi Naka. A/p Tal. Chiplun Dist. Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distributors Co.
A/p Tal. Chiplun Dist. Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
  Mr. V.A.Jadhav PRESIDENT
  Mr. D.S.Gawali MEMBER
 
For the Appellant:K.A.Joshi, Advocate
For the Respondent:
Dated : 30 Aug 2018
Final Order / Judgement

- आदेश नि.1 वर-

( दि.30-08-2018)

 

द्वारा : मा. श्री. व्‍ही. ए. जाधव, अध्‍यक्ष.

 

1) प्रस्‍तुत प्रकरणी फिर्यादी यांनी दि. 23-03-2018 रोजी नि.12 वर अर्ज दाखल करुन मुळ तक्रार अर्ज क्र.7/2013 वर या मंचाने दिलेल्‍या न्‍यायनिर्णयाविरुध्‍द सामनेवाला महाराष्‍ट्र राज्‍य विदयुत वितरण कंपनी, चिपळूण यांनी मा.राज्‍य आयोग यांचेकडे अपिल नं. 534/2015 दाखल केले होते.  सदर अपिल मा.राज्‍य आयोग यांनी दि.7-02-2018 रोजी फेटाळून लावले असून सामनेवाला यांनी मा.राज्‍य आयोगाचे आदेशानंतर या मंचामध्‍ये जमा केलेली संपूर्ण रक्‍कम फिर्यादी यांना मि‍ळावी अशी विनंती केली.  सामनेवाला यांनी रक्‍कम रु. 25,000/- व रक्‍कम रु. 1,20,691/- अशी रक्‍कम मंचामध्‍ये जमा केलेली असून सदर रक्‍कमा हया स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया, रत्‍नागिरी येथे अनुक्रमे दि.19-03-2015 व दि. 25-06-2015 रोजी मुदत ठेव योजनेमध्‍ये गुंतविले असलेबाबतचा अहवाल मा.प्रबंधक यांनी सादर केला. सदर अर्जावर नि.14 प्रमाणे सामनेवाला यांनी सदर जमा असलेली रक्‍कम फिर्यादी यांना देणेस हरकत नाही असे म्‍हणणे दि.11-07-2018 रोजी दिले आहे.  या मंचाने दि. 11-07-2018 रोजी मंचाकडे जमा असलेली रक्‍कम त्‍यावरील व्‍याजासहीत अदा करावी असा आदेश पारीत केला.

 

2) फिर्यादी यांनी दि. 30-08-2018 रोजी नि.15 वर पुरशीस दाखल करुन मुळ तक्रार अर्ज क्र. 7/2013 चे अंतिम निकालाप्रमाणे सामनेवाला यांनी मंचाकडे जमा केलेली एकूण रक्‍कम रु.1,45,691/- व त्‍यावरील व्‍याज फिर्यादी यांचे बॅंक खात्‍यामध्‍ये जमा झालेले असून आता फिर्यादी यांची सामनेवाला विरुध्‍द कोणतीही मागणी शिल्‍लक राहिलेली नाही. त्‍यामुळे सदरची दरखास्‍त निकाली करण्‍यास फिर्यादी यांची कोणतीही हरकत नाही असे पुरशीसमध्‍ये नमूद केले आहे. सदर पुरशीसवर दरखास्‍तदार यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री.अहमद अब्‍दुल्‍ला फिरफिरे व त्‍यांचे वकील के.ए. जोशी यांची सही आहे.  सदर पुरशीस मंचाने पडताळून मान्‍य केलेली आहे.  सबब, आदेश खालीलप्रमाणे.

                       - आ दे श-

 

(1)  फिर्यादीने फिर्याद मागे घेतलेने फौजदारी प्रक्रिया सहिंता कलम 257 अन्‍वये फिर्याद निकाली करणेत येते.

(2)  आरोपीची निर्दोष मुक्‍तता करणेत येते.

(3)  आरोपीने दिलेला व्‍यक्‍तीगत जातमचुलका व जामीनकदबा रद्द करणेत येतो. 

(4)  या आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकांराना विनामुल्‍य देणेत याव्‍यात.      

 

 
 
[ Mr. V.A.Jadhav]
PRESIDENT
 
[ Mr. D.S.Gawali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.