ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच, कोंकण भवन, नवी मुंबई. तक्रार क्र. 168/2012 तक्रार दाखल दि. 06/08/2012 आदेश दिनांक – 17/10/2013 श्री. दरगाही हनिफ खान, रा. प्लॉट नं. 11, सेक्टर 6, कोपरखैरणे, नवी मुंबई. ...... तक्रारदार विरुध्द महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीबयुशन कं. लि.तर्फे, डेप्युटी इंजिनिअर एम.एस.आर.डी.सी.एल., तीन टाकी जवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई. 400701. ....... विरुध्दपक्ष समक्षः- मा. अध्यक्ष श्रीमती स्नेहा एस म्हात्रे मा. सदस्य श्री.एस.एस.पाटील उपस्थितीः- तक्रारदारातर्फे अॅड.एम.बी.म्हात्रे हजर. विरुध्दपक्षातर्फे अॅड. अजित नायर हजर. आदेश द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती स्नेहा एस. म्हात्रे (दि. 17/10/2013) 1. सदर प्रकरण तक्रारदाराने वि.प यांचे विरुध्द दि.24/07/2012 रोजी मंचात दाखल केले असुन सदर तक्रारीच्या संचासह वि.प यांना जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली, त्यानुसार दि.15/09/2012 रोजी वि.प च्या वकीलांनी वकालतनामा व सदर तक्रार क्र. 168/2012 खारीज करण्यासाठी अर्ज दाखल केला व त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे दाखल केली.
2. सदर अर्जावर दि.19/10/2012 रोजी तक्रारदाराच्या वकीलांनी प्रतिउत्तर व प्रतिज्ञापत्र दाखल केले. तसेच दि.26/12/2012 रोजी सदर तक्रारीच्या पृष्ठयर्थ काही Citations दाखल केले त्याची प्रत वि.पक्षाच्या वकीलांना देण्यात आली. तक्रारदारांनी सदर अर्जावर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला व दि.04/09/2013 रोजी सदर तक्रार विजेची चोरी या मुद्दावर मंचात दाखल केलेली असल्याने मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही असा युक्तिवाद वि.पक्षाच्या वकीलांनी केला. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकुन प्रकरण दि.17/10/2013 रोजी आदेशासाठी ठेवण्यात आले. 3. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे. तक्रारदार हे एक व्यक्ती असुन त्यांच्या मालकीची (Gr.+1 floor) वास्तु आहे व ती प्लॉट नं. 11, सेक्टर 6, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आहे. सदर जागेमध्ये तक्रारदार वरच्या माळयावर राहतात व तळमजल्यावर ते त्यांच्या उपजीवीकेचे साधन म्हणुन लॉन्ड्री चालवतात. वि.प ही एक कंपनी असुन ते त्यांच्या ग्राहकांना वीज वितरण करण्याचा व्यवसाय करतात. वि.प हे तक्रारदाराना ग्राहक क्र. 000226547487 मिटर नं. 65-02188394 व ग्राहक क्र. 000226547479 व मीटर नं. 5309003955 या द्वारे सन 20/09/2006 पासुन वीजेचे वितरण करतात. तक्रारदारांना सदर वीजेचे वर नमुद केलेल्या मीटर क्रमांकानुसार अनुक्रमे रु 1500/- व रु. 1,000/- असे बील येत असे. 4. दि. 21/12/2011 रोजी तक्रारदारांनी वि.प च्या कोपरखैरणे येथील ऑफिसला तक्रारदाराच्या सदर वास्तुत वीजेचे वितरण होत नसल्याबाबत तक्रार केली. त्यानुसार वि.प कडुन लाईनमन आला व त्यांने तळमजल्यावर असलेला (Coml. Meter for Laundry) बघितला व सदर मीटर क्र..03955 तपासल्यावर तो जळाला असून बदलण्याची आवश्यकता असल्याबाबत तक्रारदाराला वि.प कडुन सांगण्यात आले व आवश्यक ते शुल्क तक्रारदारानी भरल्यावर दि.21/12/2011 रोजी सदर (Coml meter) बदलण्यात आला व सदर जळालेला मीटर वि.प च्या ताब्यामध्ये ठेवण्यात आला. दि.23/12/2011 रोजी दु.3.15 वाजता वि.पक्षातर्फे पुन्हा अधिकारी श्री. प्रविण मारुती दारोली व त्यांचे कर्मचारी तक्रारदाराच्या सदर वास्तुतील मीटरचे निरिक्षण करण्यासाठी आले व त्यांनी कोपरखैरने ऑफिसच्या (तीन दिवस) ताब्यात असलेला जळलेला मीटर तपासणीसाठी आणण्यास सांगीतले व नंतर श्री. दारोली यांनी तक्रारदारांनी सदर मीटरमध्ये फेरफार केलेला असल्याने, तक्रारदार विरुध्द पोलीस कंम्प्लेंट दाखल करुन 29,00,000 चे बील तक्रारदारांना पाठवणार असल्याचे, तक्रारदारांना सांगितले. 5. सदर प्रकाराबाबत तक्रारदार यांनी लॉन्ड्रीसाठी घेतलेल्या coml. मीटरमध्ये कुठलाही दोष नाही व तो कोपरखैरणे ऑफिसमध्ये पाठवेपर्यंत त्यात काहीही दोष नव्हता व त्यामुळे सदर मीटरबद्दल फेरफार केल्याची विरुध्दपक्ष यांनी पोलीस कंम्प्लेंट दाखल करणे किंवा रु.29,00,000/- चे बिल लावणे हा प्रश्न उद्भवत नाही असे नमुद केले. तक्रारदार पुढे म्हणतात की, मीटर क्र. 2188394 हा व्यवस्थित कार्यरत असल्याचे वि.प यांनी यापुर्वी पाठविलेल्या बिलांतुन दिसुन येते, तरीदेखील मीटरबंद आहे व त्यात फेरफार करण्यात आला आहे असे वि.पक्षाने केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे व त्यानुसार वि.प ने तक्रारदाराविरुध्द FIR नोंदविलेली आहे. वर नमुद केल्याप्रमाणे वि.प यांचेकडुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत तक्रारदारांना वि.प यांचेकडुन कुठल्याही प्रकारची नोटीस पाठविण्यात आली नाही म्हणजे वि.प यांचेकडुन Indian Electricity Rules 1910 याचा भंग झाला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. वीजेची चोरी या सदराखाली पाठवलेली दोन बीले अनुक्रमे लॉन्ड्री/दुकान नं. 1 साठी बील रु.6,66,130/- व घराचे बील रु.1,34,382/-, तक्रारदारांना आल्यावर तक्रारदारांनी वि.प ला सदर बील भरण्यासाठी निषेध व्यक्त करुन अनुक्रमे दि.29/12/2011 व 26/12/2011 रोजी दोन्ही बिले भरली व त्यांच्या पावत्या क्र.2419956 व 2525703 वि.प कडुन तक्रारदारांना देण्यात आल्या. 6. तक्रारदार पुढे म्हणतात की, वि.प यांनी तक्रारदाराच्या Residence meter वर Coml Charges/tariff (व्यवसायिक मीटरचा प्रतियुनिट वीज दर) लावल्यामुळे तक्रारदारांना खुपच आर्थिक नुकसान सोसावे लागले व वि.प कडुन पुरवलेली ही सेवा दोषपुर्ण आहे व वि.प अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करतात. तक्रारदार पुढे म्हणतात की सदर जळालेला (Coml. मीटर) बदलल्यानंतर तक्रारदारांना खुपच मोठ्या प्रमाणात वीजेची बीले येऊ लागली, व जानेवारी 2012 ते एप्रिल 2012 पर्यंतची बीले तक्रारदारांनी नियमितपणे वि.पक्षाला भरली आहेत तरी देखील वि.प यांनी तक्रारदारायांना रु.2,09,650/- चे स्प्लीमेंटरी बील पाठवले ते तक्रारदारांनी दि.03/04/2012 रोजी निषेधाद्वारे भरल्यावर वि.प यांनी त्यांची पावती तक्रारदारांना दिली. 7. जानेवारी 2012 मध्ये ग्राहक क्र. 000226547479 बाबत एकुण 6882 (units) साठी एकुण बील रु.66,370/- आकरण्यात आले व त्यावर नोंदविलेला bill meter (D – 5204088) असा आहे, व सदर बिलाच्या मीटरच्या फोटोत (मीटर नं. 3302106) असा दर्शवलेला आहे त्यामुळे सदर चुकीचे बिल आकारणे ही वि.प यांनी तक्रारदारांना दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे मत आहे. व फेब्रुवारी 2012 मध्ये पाठवलेल्या बीलाच्या फोटोत दर्शवलेला मीटर क्र. 6503302106 असा असुन मीटर रिडिंग 2184 असे आहे, म्हणजे वि.प यांनी फेब्रुवारी 2012 चे बील दुरूस्त rectify करणे आवश्यक होते परंतु वारंवार वि.प च्या कोपरखैरणेच्या कार्यालयात भेटी देऊनही वि.प ने त्याबाबत तक्रारदारांना कोणतेही सहकार्य केले नाही. सदर तक्रारचे कारण डिसेंबर 2011 मध्ये घडले आहे कारण दि. 24/12/2011 रोजी दुकान नं. 1 चे रु.6,66,130/- व रु. 1,34,382/- (घरासाठी) असे दोन मीटर्सचे वाढीव बील तक्रारदारांना देण्यात आले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे, व त्यामुळे सदर बीलाबाबत केलेली तक्रार ही विहित मुदतीत दाखल केली असल्याचे तक्रारदारांनी नमुद केले आहे, व सदर तक्रारीचे कारण मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. जळालेला मिटर काढुन नविन इले.मिटर बसवल्यानंतर बीलात दर्शवलेला नविन मिटर नं. व मीटरच्या फोटोवरील मीटर क्र. वेगळा असल्याने वि.प हे चुकीची बिले देऊन तक्रारदारांना दोषपुर्ण सेवा देत आहेत असे तक्रारदारांचे मत आहे. 8. तक्रारदार हे वि.प चे ग्राहक असल्याने त्यांनी वि.प कडुन मिळालेल्या दोषपुर्ण सेवेसाठी वि.प विरुध्द मंचाने खालील आदेश पारित करावे अशी विनंती केली आहे. 1. रु.1,34,382/- (घराचे डिसेंबर 2011 चे बिल ) व रु. 6,66,130/-(दुकान क्र. 1 चे डिसेंबर 2011 चे बिल ) ही रक्कम तक्रारदारांनी वि.प कडे अनुक्रमे दि.26/12/2011 व दि. 28/12/11 रोजी भरली आहे. a) ती रक्कम वि.प ने 12% व्याजाने तक्रारदारांना परत द्यावी. b) तसेच तक्रारदारांनी वि.प कडे भरलेली सप्लीमेंटरी बिलाची रक्कम रु. 2,02,650/- वि.प ने तक्रारदारांना परत द्यावी. तसेच तक्रारदारांना त्यांच्या घरगुती मिटरवर वि.प ने आकारलेले व्यावसायीक दराचे बिल व घरगुती दरानुसार अपेक्षित असलेले बिल व त्यातील फरक यातुन होणा-या एकुण रक्कमेवर वि.प ने तक्रारदाराला 12% प्रमाणे व्याज द्यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच नुकसान भरपाई व मानसिक त्रासा पोटी अनुक्रमे. रु. 5,00,000/- व रु. 50,000/- ची मागणी केली आहे. 9. वि.प ने दि. 15/09/2012 रोजी सदर तक्रारीबाबत खालीलप्रमाणे त्यांचे म्हणणे दाखल केले व तक्रारदाराची सदर तक्रार मंचाच्या अखत्यारीत /कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे खारीज करण्यात यांवी असा अर्ज दिला आहे. वि.प म्हणतात की, तक्रारदाराच्या विरोधात सन 1999 मध्ये देखील अशाच प्रकारे तक्रारदारांनी विजेची चोरी केल्यामुळे वि.प यांनी F.I.R दाखल केली होती परंतु तक्रारदारांनी त्यानंतर सर्व चार्जेस व बिलाचा भरणा केल्यामुळे तक्रारदारांची पुढील कारवायी पासुन सुटका करण्यात आली. तक्रारदारांने सदर विजेच्या चोरीचा प्रकारे सलग दुस-यावेळीकेल्यामुळे त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी. तसेच तक्रारदाराच्या विरोधात विजेच्या चोरी बद्दल वि.प यांनी F.I.R दाखल केल्यामुळे व तक्रारदारांना त्यांच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे तक्रारदारांनी वि.प विरुध्द राग काढण्यासाठी सदर तक्रार क्र.168/2012. मंचात दाखल केली आहे. वि.प पुढे म्हणतात की, वि.प तर्फे फिरत्यापथकाच्या अधिका-यांनी तक्रारदारांचे दोन्ही मिटर चेक केला असता त्यांना तक्रारदार विजेची चोरी करत असल्याबाबत निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तक्रारदारांना समज देऊन त्यानुसार पुढील बिले आकारली आहेत, व मार्च 2011 मध्ये तक्रारदारांना सदर बिलांबाबत समजावुन सांगितल्यानंतर तक्रारदारांनीही सदर बिलाची पुर्ण रक्क्म वि.प यांचे कडे भरलेली आहे तसेच तक्रारदारांनी यापुर्वी कधीच वि.प विरुध्द ते सदोषपुर्ण सेवा देत असल्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी जुलै 2012 मध्ये सदर तक्रार दाखल करण्याचे काहीच कारण उरले नसल्याने सदर तक्रारीची मा. मंचाने दखल घेऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे वि.प च्या अधिका-यांनी कुठल्याही प्रकारे दोषपुर्ण सेवा दिलेली नसुन केवळ विजेच्या चोरीबाबत तक्रादाराविरुध्द F.I.R दाखल करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे त्यामुळे तक्रारदारांनी त्याबाबत योग्य त्या न्यायालयात दावा दाखल करावा असे म्हटले आहे. 10. तक्रारदारांनी वि.प च्याम्हणण्यावर प्रतीउत्तर व लेखी युक्तिवाद दाखल केला व त्यात वि.प ने दाखल केलेले कैफियतीतील सर्व मुद्दयांबाबत आक्षेप नोंदवुन ते नाकारले आहेत. तक्रारदारांनी सन 20/01/2006 पासुन वि.प ने इलेक्ट्रिक सप्लाय दिला असुन यापुर्वी 1999 मध्ये वि.प ने तक्रारदाराविरुध्द दाखल केलेल्या F.I.R चा सदर प्रकरणात काहीच संबंध नाही. तसेच दि.21/12/2011 रोजी वि.प च्या फिरत्या पथकाने तक्रारदाराच्या मिटरची तपासणी केली असता व तो जळालेला आढळल्याने त्याच्या ऐवजी नवीन मीटर वि.प च्या अधिका-यांनी त्याच दिवशी म्हणजे दि. 21/12/2011 रोजी योग्य ते शुल्क आकारुन तक्रारदाराला लावुन दिला. व सदर जुना जळालेला मिटर दि. 21/12/2011 व 23/12/2011 पर्यंत वि.पच्या ताब्यात असल्यानेवि.प यांनीच त्यात काहीतरी फेरफार करुन आपल्याविरुध्द विज चोरीचा खोटा आरोप केला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे तसेच पंचनाम्यावर पंचांची सही नाही किेवा सदर फेरफार केलेला मिटर (Tampered meter) वि.प यांनी पुर्ननिरिक्षणासाठी एम. अॅन्ड टि लॅबमध्ये पाठवणे आवश्यक असतांना तो पाठवलेला नाही व तक्रारदारास पाठवलेले बिल त्यांनी निषेध व्यक्त करुन त्यांच्या लॉंड्री व्यवसायाचे आर्थिक नुकसान होऊ नये या हेतुने भरले असल्याचे नमुद केलेले आहे. व वि.प यांनी तीन दिवस त्यांच्या ताब्यात जळलेला मीटर ठेवणे व मीटर निरिक्षणासाठी M & T लॅब मध्ये न देणे ही दोषपुर्ण सेवा आहे असे म्हटले आहे व वि.प ने वरच्या मजल्यावरील रेसिडेंशियल मीटरवर, कमर्शिअल मीटरच्या वीज दरानुसार बील आकारणे ही त्रुटीपूर्ण सेवा आहे, तसेच जानेवारी 2012 मध्ये आकारलेले बिल चुकीच्या पध्दतीने आकारले आहे कारण त्यातील मीटर क्रमांक वेगळा व फोटोतील मीटर क्रमांक वेगळा आहे असे नमूद केले आहे. 11. तक्रारदाराची तक्रार त्यासोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे व पंचनामा, बील, मीटरचे फोटो, तक्रारदाराचा वि.प शी झालेला पत्रव्यवहार व प्रतिउत्तर तसेच लेखी युक्तिवाद व वि.प यांचा तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची दि. 15/09/12 रोजीचा अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे तसेच (u/sec. 135 of Electricity Act नुसार) flying Squad ने दिलेला रिपोर्ट, पंचनामे इं. चे अवलोकन केले असता तक्रारीचे निराकरण करताना मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला. मुद्दा क्रमांक - 1. तक्रारदाराची सदर वीजेच्या चोरी बाबतची तक्रार मंचाच्या अखत्यारीत / कार्यक्षेत्रात येते का ? तसेच तक्रारदारांनी तक्रार करण्यासाठी नमूद केलेले बिलांच्या रकमेचे कारण तक्रार दाखल करताना अस्तित्वात आहे का ? उत्तर नाही मुद्दा क्रमांक - 2. तक्रारदार वि.प कडुन काही नुकसान भरपाई किंवा तक्रारीत नमूद केलेल्या प्रार्थनेनुसार मंचाकडून दिलासा मिळण्यास पात्र आहेत का ? उत्तर नाही. विवेचन मुद्दा क्र. 1 व 2 – तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीत ते वरच्या मजल्यावरील वास्तुत राहतात व तिच्या खालच्या मजल्यावर ते त्यांच्या उपजीवीकेचे साधन म्हणुन लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात असे नमुद केले आहे व तक्रारदारांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना लॉन्ड्री साठी दिलेल्या मीटरचा क्र. 03955 (for shop no.1) असा होता. व ग्राहक क्र. 000226547479 असा होता. सदर मीटरसाठी विरुध्दपक्ष यांचेकडून 7.5 k.w. साठी (3 फेजसाठी) पर्यंतचा वीजपुरवठा मंजूर करण्यात यावा व तक्रारदारांच्या वरच्या मजल्यावरील रहात्या घराचा मीटर क्र. 2188394 (for flat) व ग्राहक क्रमांक 000226547487 असा असून त्यासाठी 1 k.w. (1 फेजसाठी) पर्यंतचा वीजपुरवठा मंजूर करण्यात यावा असे दोन्ही मीटरच्या डिमांड नोटमध्ये नमूद केले आहे. परंतु नंतरच्या काळात सदर मीटर्सचा वापर तक्रारदार पूर्णपणे commercial purpose साठी करायला लागल्याचे सन 2011 च्या बिलांवरुन दिसून येते. सदर बिलांपैकी माहे डिसेंबर 2012 च्या बिलांचे निरिक्षण केले असता तक्रारदाराने त्यांच्या घरासाठी घेतलेल्या मीटरसाठी मंजूर भार 1 k.w. असताना त्यांनी 5.62 k.w. इतकी वीज खर्च केल्याचे दिसते. तसेच सदर बिलावर विरुध्दपक्षाच्या भरारी पथक अधिका-यांचा खालीलप्रमाणे शेरा दिसतो. “ Assessment towards theft of energy u/s. 135 of Electricity Act, 2003 for period of 2 years, as per checking report dt. 23/12/2011 from Flying squad, Thane.” व सदर बिलाची Net Assessment रक्कम रु. 1,34,382/- इतकी दाखविली आहे. सदर बिल तक्रारदाराने विरुध्दपक्षाला भरल्याची पावती नि. 21 वर अभिलेखात उपलब्ध आहे. त्याप्रमाणे तळमजल्यावरील लॉन्ड्रीचे दुकान नं. 1 बाबत ग्राहक क्र. 000226547479 असा आहे व नि. 23 वर असलेल्या दि. 24/12/11 च्या बिलाचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्षाचा खालीलप्रमाणे शेरा दिसतो. “Assessment towards theft of energy u/s. 135 of Electricity Act, 2003 for period of 2 years, as per checking report dt. 23/12/2011 from Flying squad, Thane.” (Bill as per Net Assessment is Rs. 6,66,130/- including cost of three phase meter Rs. 3110/-) सदर बिलदेखील तक्रारदार यांनी दि. 28/12/11 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे पूर्णपणे भरल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी दिलेल्या पावतीची प्रत नि. 24 वर अभिलेखात उपलब्ध आहे. त्यामुळे सदर दोन्ही बिले भरल्यानंतर तक्रारदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीचे कारण अस्तित्वात आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. (No Cause of action survives.) सदर दुकान क्र. 1 ला सदर बिलात दर्शविलेला मंजूर भार 7.5 k.w. असून देखील संलग्न भार 27.38 k.w. (dtd. 24/12/2011) असल्याचे दिसून येते. व दि. 20/03/12 रोजीच्या M.S.E.D.Co. Ltd., च्या तक्रारदारांना पाठविलेल्या पत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदारांना दुकानासाठी 7.5 k.w. एवढा विजभार मंजूर केला असताना दि.13/03/12 रोजी विरुध्दपक्षाच्या अधिका-यांनी केलेल्या मीटरच्या निरिक्षणावरुन तक्रारदार 39.44 k.w. इतका वीजभाराचा वापर करीत असल्याचे सदर पत्रात नमूद केले आहे व त्यानुसार दि. 13/03/12 रोजीचे Provisional Bill रु. 2,09,650/- तक्रारदारांना विरुध्दपक्षाने दिलेले आहे व सदर बिल वर नमूद तारखेपासून 15 दिवसांत विरुध्दपक्षाकडे तक्रारदारांनी न भरल्यास विजप्रवाह खंडित करण्यात येईल अशी तक्रारदारांना ताकीद दिली आहे. नि. 24 वर दि. 20/03/12 चे तक्रारदारांचे दुकानाचे क्र. 1 वरील पत्त्याचे बिल असून त्यावरील मीटर क्रमांक जरी वेगळा दिसत असला तरी ग्राहक क्रमांक हा तक्रारदारांना दिलेल्या दुकानाच्या मीटरचाच आहे व त्यात तक्रादारांनी एकूण 39.34 k.w. इतकी संलग्न वीज भार वापरल्याचे दिसते. तसेच नि. 32 व 33 वर श्री. विलास घनःश्याम रांगोळे व श्री. मंगेश बाबाजी छत्तर यांची सही असलेला दि. 23/12/11 रोजीचा पंचनामा अभिलेखात उपलब्ध आहे. सदर पंचनाम्यात तक्रारदारांचा मीटर क्रमांक 2188394, ग्राहक क्रमांक 000226547487/5 चे मीटर रीडींग – 7634 k.w. आढळल्याचे नमूद केले आहे व सदर मीटर ग्राहकासमोर तपासले असता, प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी वापराची नोंद मीटरमध्ये होण्यासाठी बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे मीटर चालू – बंद करुन वीजचोरी केल्याचे तक्रारदाराने कबूल केल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारदाराचे कृष्णा क्लिनर्स या नांवाचे दुकान क्र. 1 ग्राहक क्र. 000226547479 (नवीन) मीटर क्र. 5204088 च्या पंचनाम्यात खालील बाबी आढळल्या. ग्राहकाचा जुना मीटर क्र. 03955 जळाल्याच्या तक्रारीवरुन नवीन मीटर क्र. 05204088 बसविण्यात आला म्हणून सदर जुना मीटर जो कार्यालयात जमा केलेला होता तोच मीटर तपासणी करीता मागविण्यात आल्यानंतर त्याची ग्राहक व पंचासमक्ष तपासणी केली असता, सदर मीटर क्र. 03955 ची क्षमता 10.40 AMP रिव्होल्यूशन 416.6 पल्सेस होते व त्यावरील मीटर रिडींग हे दिसत नव्हते. सदर मीटर पूर्णपणे हाताळलेला असून मीटर बॉडीचे दोन्ही स्टिकर्स सील हे फाटल्यामुळे नंबर दिसत नव्हते. मीटर बॉडीवर ब-याच ठिकाणी स्क्रॅचेस असून स्क्रू - कॅप तोडलेले दिसत होते व स्क्रू एका पेस्टने चिकटवल्याचे स्पष्ट दिसत होते. मीटरच्या आतील भागात रिमोट कंट्रोलचे कीटस् आढळून आले असून तक्रारदार त्यांना पाहिजे तेव्हा हे कीटस् ऑपरेट करुन मीटर रिडींगची नोंद होणार नाही याची व्यवस्था करीत व त्याला पाहिजे तेव्हा मीटर रिडींग चालू ठेवत असे व त्याची नोंद घेत असे याबाबत सदर पंचनाम्यात नमूद केले आहे. अशा प्रकारे तक्रारदाराने त्याच्या मीटर्सचा वापर स्वतःच्या सोयीनुसार व मोठया प्रमाणात तसेच व्यावसायिक हेतूने केलेला आहे हे स्पष्ट होते. तसेच सदर पंचनाम्यात तक्रारदार / ग्राहकाविरुध्द Electricity Act, 2003 च्या कलम 135 अन्वये सदर प्रकरणांत क्रिमिनल चौकशी चालू असून ग्राहकांस सदर विजचोरी बाबत विजचोरी बिल व तडजोड बिलाची रक्कम नक्की करुन सदर बिल 3 दिवसांत भरण्याची ताकीद देण्यात आल्याचे दिसते. सदर पंचनाम्यावर पंचाच्या, साक्षीदारांच्या तसेच स्वतः ग्राहकाच्या सह्या आहेत. यावरुन तक्रारदार यांनी वीजेची चोरी केल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदाराच्या विरुध्द F.I.R. दाखल झाली असून त्याबाबत पुढील कारवाई Electricity Act, 2003 च्या कलम 135 अन्वये चालू असल्याचे दिसते. तक्रारदारांची तक्रार वर नमूद केलेली परिस्थिती पहाता खालील दोन मुद्यांनुसार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरील असल्याने फेटाळण्यात येते. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत ते उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सदर लॉन्ड्रीचा वापर करीत असल्याचे नमूद केले आहे व त्यासाठी त्यांनी दुकान नं. 1 साठी 7.5 k.w. इतका विजभार मंजूर करुन घेतल्याचे Demand notice व इतर कागदपत्रांवरुन दिसून येते परंतु प्रत्यक्षात तक्रारदार सदर लॉन्ड्रीसाठी 39.34 k.w. इतका संलग्न विजभार वापरीत असल्याचे विजबिलांच्या निरिक्षणावरुन दिसून येते. तसेच घरासाठी 1 k.w. वीजभार मंजूर झालेला असताना तक्रारदार 7.5 k.w. इतका वीजभार वापरीत असलेले दिसतात, यावरुन तक्रारदार फार मोठया प्रमाणात मनुष्यबळ वापरून अर्थार्जनाच्या व व्यावसायिक दृष्टीने सदर लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात व तो केवळ उदरनिर्वाहासाठीच मर्यादित आहे. (small scale business) असे म्हणणे योग्य होणार नाही. तसेच एवढया मोठया प्रमाणात लॉन्ड्री व्यवसाय करताना तक्रारदारांनी Remote चा वापर करुन विज मीटरचे रिडींग कमी / जास्त करणे किंवा मीटर आपल्या सोयीनुसार चालू / बंद ठेवणे इत्यादी गोष्टी केल्याचे दिसून येते व तक्रारदारांनी ते मान्य केल्याचे पंचानाम्यात दिसून येते. यावरुन सदर व्यवसायामागील तक्रारदारांचा हेतू हा पूर्णपणे (commercial) व्यावसायिक स्वरुपाचा असल्याने ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार ग्राहक होऊ शकत नाहीत. तसेच तक्रारदारांविरुध्द विजचोरी बाबत विरुध्दपक्ष यांनी F.I.R. दाखल केली असून त्यांच्याविरुध्द Electricity Act, 2003 च्या कलम 135 अन्वये पुढील कारवाई चालू असताना तक्रारदारांची तक्रार ग्राहक मंचात चालविणे योग्य नाही व त्याबाबत मंचाला कायदेशीर अधिकार / कार्यक्षेत्र (Jurisdiction) नाही. तसेच तक्रारदाराने विरुध्दपक्षा विरुध्द केलेले आरोप हे विरुध्दपक्षाने त्यांच्यावर आकारलेल्या बिलांच्या रकमेबाबत तसेच विरुध्दपक्षाने Electricity Act, 2003 च्या कलम 135 अन्वये पुढील कारवाई करण्यापूर्वी तक्रारदारांना कोणतीही कायदेशीर नोटीस बजावली नाही व यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना सदोषपूर्ण सेवा दिली आहे याबाबत केल्याचे दिसते. त्यामुळे सदर तक्रार ही तक्रारदाराने विरुध्दपक्षा विरुध्द त्यांनी तक्रारदारांना विज वितरण बंद करणे किंवा इतर काही सदोषपूर्ण सेवा देणे याबाबत दाखल केलेली नाही. व विरुध्दपक्षाने कलम 135 अन्वये कारवाई करताना तक्रारदारांना नोटीस न बजावणे, व तक्रारदारांचा जुना जळालेला मीटर M & T लॅबमध्ये तपासणीकरीता न पाठविणे इत्यादी बाबी ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये सदोषपूर्ण सेवा दिली म्हणून म्हणणे योग्य होणार नाही व तक्रारदार विरुध्दपक्ष यांनी त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दोषपूर्ण सेवा दिली आहे हे सिध्द करु शकलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करुन खालील मुद्यांवर फेटाळण्यात येते. सदर तक्रार नामंजूर करताना मंचाने खालील SLP चा विचार केला. IN THE SUPREME COURT OF INDIA CIVIL APPELLATE JURISDICTION CIVIL APPEAL NO. 5466/12 (Arising out of SLP-C-NO. 35906 of 2011) V.P. Power Corporation Ltd., & others ...... Appelants V/s. Anis Ahmad ....... Respondent With 1. C.A. No. 5467- 5468 of 2012 (@ SLP (c) No. 18284 – 18285/2008) 2. C.A. No. 5469 of 2012 (@ SLP (c) No. 14306 /2009) 3. C.A. No. 5470 of 2012 (@ SLP (c) No. 33557 /2011) 4. C.A. No. 5471 of 2012 (@ SLP (c) No. 33558/2011) 5. C.A. No. 5472 of 2012 (@ SLP (c) No. 33559/2011) 6. C.A. No. 5473 of 2012 (@ SLP (c) No. 33560/2011) 7. C.A. No. 5474 of 2012 (@ SLP (c) No. 33561/2011) 8. C.A. No. 5475 of 2012 (@ SLP (c) No. 33562/2011) ( In these SLPs orders passed by the Hon. National Commission are set aside & the appeals filed by the service providers are allowed.) In these appeals question involved are – a) Whether complaints filed by the respondent before the Consumer Forum constituted under CPA-1986 were maintainable & b) whether the Consumer Forum has jurisdiction to entertain a complaint filed by a consumer or any person against the assessment made u/s. 126 of Electricity Act, 2003 or action taken u/s. 135 to 140 of Electricity Act, 2003. It was held by Hon. Supreme Court – 1. Consumer Forum constituted under the CPA Act, 1986 would have jurisdiction to entertain only the complaints filed by consumer of electricity alleging any defect or deficiency in supply of electricity or alleging adoption of any unfair trade practice by the supplier of electricity. The Consumer Forum established under the consumer protection act have no jurisdiction over the matter relating to the assessment of charges for unauthorised use of electricity, tampering of meters etc. as also over the matters which fall under the domain of special courts constituted under the Electricity Act, 2003. Case of Rakhi Ghosh (C.A. No. 5469 OF 2012) (@ SLP 14306 OF 2009) In this case complainant was running a husking mill with connected load of 20 H.P. He challenged the bill raised by West Bengal State Electricity Board which was raised on the ground of unauthorised extension of load of 8 H.P. It was held that consumer was enjoying industrial connection & therefore does not fall within the definition of consumer, under CPA Act, 1986. It was further alleged that a police case has already been lodged against complainant for theft of electricity therfore, the Consumer Forum has no jurisdiction to entertain the application. Case of Zulifikar (C.A. No. 5471 OF 2012) (@ SLP 33558 OF 2011) In this case U.P. Power Corporation Ltd., filed objections raising question of maintainability of complaint on the ground that complainant had commercial connection & hence does not fall within the definition of consumer at her inspection by enforcement squad & engineers (raids) on premises of complainant, it was found that 4 leads of PVC cable of electricity line was cut & bypassing the same, 5.76 kw load was being used by the complainant illegally. Thus, theft of electricity does not amount to deficiency in service; therefore the Consumer Forum does not have the jurisdiction to entertain the petition regarding theft of electricity under Consumer Protection Act, 1986. यावरुन सदर प्रकरणात मंच खालील निष्कर्षाप्रत आले आहे. 1. तक्रारदार हे ग्राहक नाहीत. त्यांचा हेतू पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपाचा आहे व केवळ उदरनिर्वाहापुरता त्यांचा व्यवसाय मर्यादित नाही. 2. तक्रारदारांविरुध्द FIR दाखल केलेली असल्याने व त्यांच्या विरुध्द Electricity Act, 2003. च्या कलम 135 अन्वये कारवाई चालू असल्याने सदर प्रकरणात दखल देण्याचे मंचास अधिकार नाहीत. सबब, अंतिम आदेश पारीत करण्यात येतो. अंतिम आदेश 1. तक्रारदारांची तक्रार क्र. CC/168/12 ही ग्राहक मंचाच्या अखत्यारीत येत नसल्याने विरुध्दपक्षाचा दि. 15/09/2012 रोजीचा अर्ज मंजूर करुन, तक्रारदारांची तक्रार खारीज करुन नामंजूर करण्यात येते. 2. खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतःचे स्वतः करावे. ठिकाण :- कोकण भवन - नवी मुंबई दिनांक :- 17/10/2013. (एस.एस.पाटील) (स्नेहा एस.म्हात्रे) सदस्य अध्यक्षा अति जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे, |