::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 20.11.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 व 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याचे मालकीचे वडगांव चंद्रपूर येथील घरी विज मिटर क्र.0011445439, ग्राहक क्र. 450010547313 चे कनेक्शन घेतले. अर्जदार हा विज बिलाचा नियमितपणे भरणा करीत होता. अर्जदाराचे विज मिटर क्र.0011445439 मध्ये बिघाड आल्यामुळे सदरहू विज मिटर फास्ट फिरत असल्यामुळे डिसेंबर 2012 एक महिण्याचे विज बिल 1224 युनीटचे रुपये 12,750/- चे चुकीचे बिल अर्जदारास देण्यात आले. याबाबत गैरअर्जदाराकडे दि.20.12.2012 ला तक्रार केली. गैरअर्जदाराने अर्जदारास डिसेंबर 2012 चे विज बिल दुरुस्त करुन 1000/- चे बील दिले. गैरअर्जदाराने जानेवारी 2013 चे रुपये 14,380/- चे विज बिल अर्जदारास दिले. गैरअर्जदाराने जानेवारी 2013 चे बिल दुरुस्त करुन रुपये 1000/- दिले व अर्जदाराने देयकाचा भरणा केला. गैरअर्जदाराने विज मिटर क्र.0011445439 काढून त्याचे ऐवजी नवीन विज मिटर क्र.6502096033 अर्जदाराचे घेरी लावून दिला. गैरअर्जदाराने नवीन विज मिटर क्र.6502096033 लावून दिल्यानंतर 40 युनीट विज वापर दर्शविला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास दि.12.3.2013 ला थकीत रीडींगचे बिलाचा भरणा 15 दिवसाचे आंत करावा असे पञ पाठविले. अर्जदाराने दि.18.3.2013 रोजी गैरअर्जदाराकडे तक्रार दिली व जुने विज मिटर क्र.0011445439 मध्ये बिघाड आल्यामुळे फास्ट फिरत होते व त्यामुळे डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 मध्ये दर्शविलेली रिडींग ही चुकीची असून, गैरअर्जदाराने लावून दिलेल्या नवीन विज मिटर क्र. 6502096033 प्रमाणे सरासरी विज बिल देण्यात यावे व विज पुरवठा खंडीत करुन नये असे कळविले होते. गैरअर्जदाराने मार्च2013 चे विज बिल सुध्दा जुन्या चुकीच्या रिडींगचा समावेश करुन रुपये 36,750/- चे अर्जदाराला दिले. अर्जदाराचे जुने विज मिटर क्र.0011445439 गैरअर्जदाराने काढून नेले व त्याची तपासणी अर्जदारासमक्ष जाणीवपूर्वक केली नाही व जुने विज मिटर ओ.के. असल्याचे पञ दि.17.3.2013 ला अर्जदारास पाठविले. त्यामुळे, गैरअर्जदाराने अर्जदाराचा विज मिटर खंडीत करु नये. मार्च 2013 मध्ये रुपये 36,750/- दिलेले विज बिल दुरुस्त करुन नवीन विज मिटर क्र. 6502096033 प्रमाणे सरासरीविजबिल अर्जदाराला गैरअर्जदाराने द्यावे असे आदेश व्हावा. गैरअर्जदाराने अर्जदारास शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/-, नुकसान भरपाईपोटी रुपये 20,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा, अशी मागणी केली.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 17 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तर, नि.क्र.13 नुसार 1, नि.क्र.19 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.12 नुसार दाखल लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराचे विद्युत पुरवठयाचे मिटर जलद गतीने फीरत असल्याची तक्रार प्राप्त होताच गैरअर्जदार यांनी या तक्रारीवर कारवाई करुन विद्युत भाराची चौकशी व विद्युत मिटरचीतपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सदरील मिटर निर्दोष आढळून आले. या तपासणीबाबत अर्जदार यांनी तक्रार दाखल करेपावेतो कुठलाचा आक्षेप नोंदविला नाही. अर्जदारास दिलेली सुट म्हणजे मीटर तपासणीचा रिेर्पाटे येईपावेतो आर्थिक भूर्दंड पडू नये हा हेतु होता. अर्जदारास दिलेले बिल योग्य आहे. अर्जदाराकडे निघत असलेली थकीत बिलाची रक्कम ही सार्वजनिक रक्कम होय. करीता अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार रिजॉईन्डर शपथपञ सोबत 4 दस्ताऐवज, नि.क्र.16 नुसार 17 नुसार 9 दस्ताऐवज, नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल लेखीउत्तर, शपथपञ, दस्ताऐवज व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे :
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
3) आदेश काय ? :अंतीम आदेश प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याचे मालकीचे वडगांव चंद्रपूर येथील घरी विज मिटर क्र.0011445439, ग्राहक क्र. 450010547313 चे कनेक्शन घेतले. अर्जदार हा विज बिलाचा नियमितपणे भरणा करीत होता. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेला अर्ज व दस्ताऐवजाची पडताळणी करतांना असे दिसून आले कि, माहे डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 विज देयकाची दुरुस्ती गैरअर्जदाराने अर्जदाराला करुन दिली व त्याप्रमाणे अर्जदाराने विज देयक भरले. परंतु त्यानंतर गैरअर्जदाराचे लाईनमन यांनी अर्जदाराच्या घरी येवून अर्जदाराचे मि�टर व विज वापर यांची पाहणी करुन मि�टर मध्ये बिघाड आहे असे सांगून अर्जदाराच्या घरी नविन मि�ट बसवून दिले. सदर नविन मि�टर बसवितांना व जुने मि�टर काढतांना गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या जुन्या मि�टरचा कोणताही पंचनामा न करता व मि�टर सिलबंद न करता काढून नेला. व तसेच नविन मि�टर बसवून कोणताही अहवाल अर्जदाराला दिला नाही. या अर्जदाराच्या कथनावर गैरअर्जदारानी त्यांच्या लेखीउत्तरात कोणताही खुलासा केला नाही किंवा त्याबद्दल तक्रारीत कोणताही पुरावा दाखल केला नाही. याउलट गैरअर्जदाराने त्यांच्या लेखीउत्तरात कबुल केले कि, अर्जदाराचा विज वापर हा नविन मि�टर प्रमाणे40 युनिट यावरुन असे स्पष्ट होते कि, अर्जदाराचा एकंदरीत विज वापर नविन मि�टरच्या युनिट वापराप्रमाणे आहे. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराचे जुने मि�टर मध्ये बिघाड असल्यामुळे माहे डिसेंबर 12 व जानेवारी 13 या बिलांमध्ये अर्जदाराला दुरुस्ती करुन दिली आणि ते अर्जदाराने भरले असूनही गैरअर्जदाराने मार्च13 च्या विज देयकात वरील दोन महिण्याच्या रिडींगचे समावेश करुन जास्ती रक्कमेचे विज देयक देवून अर्जदाराप्रति सेवेत न्युनता दर्शविली व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
// अंतीम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेल्या माहे डिसेंबर – 12 व जानेवारी –
13 चे देयक नविन बसविलेल्या विज मि�टरच्या रिडींगच्या व तसेच
अर्जदाराने भरलेली रक्कम त्यात समाविष्ठ करुन आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दुरुस्त करुन दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने रु.
5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,500/-आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 20.11.2014