::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 11/11/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले कि, अर्जदार हा गैरअर्जदाराकडून घरगुती वापराकरीता विज कनेक्शन घेतले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला दि. 20/06/13 चे बिल हे विज 849 युनिट मासीक वापर दाखवून अर्जदाराकडून जास्त रुपये मागण्यात आले. म्हणून अर्जदाराने नविन मिटर लावून देण्याबाबत गैरअर्जदाराला विनंती केली व सदर बिल दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. गैरअर्जदाराने अर्जदाराकडे असलेला मिटर काढून नविन मिटर बसवून दिला परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराला प्रत्येक वेळी वरील नमुद असलेल्या वादग्रस्त देयकाची रक्कम समाविष्ट करुन नियमित देयक देत होते. अर्जदाराने त्यासंदर्भात गैरअर्जदाराकडे वारंवार तोडी व लिखीत स्वरुपाने तक्रार केली व त्या तक्रारीवर गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दिलेले वादग्रस्त बिल दुरुस्त करुन दयावे तसेच शारिरीक व मानसिकञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 8 नुसार आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराचे जुने मिटर काढून दुरुस्तीत असलेला नविन मिटर लावण्यात आले. तसेच अर्जदाराच्या तक्रारीनुसार अर्जदाराचे विज बिल दुरुस्त करण्यात आले. व अर्जदाराला सुधारीत देयक दि. 18/02/14 रोजी देण्यात आले. सदर सुधारीत देयकामध्ये अर्जदाराने वादग्रस्त देयकापोटीची जास्त भरलेली रक्कम समायोजित करुन उरलेली रकमेचे विज देयक देण्यात आले. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतेही सेवेत ञुटी किंवा न्युनतापूर्ण सेवा दिली नाही अथवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही. गैरअर्जदाराने सदर तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही.
गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही.
आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार हा गैरअर्जदाराकडून घरगुती वापराकरीता विज कनेक्शन घेतले आहे. ही दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराचे जुने मिटर काढून सुस्थीतीत असलेला नविन मिटर लावण्यात आले. तसेच अर्जदाराच्या तक्रारीनुसार अर्जदाराचे विज बिल दुरुस्त करण्यात आले. व अर्जदाराला सुधारीत देयक दि. 18/02/14 रोजी देण्यात आले. सदर सुधारीत देयकामध्ये अर्जदाराने वादग्रस्त देयकापोटीची जास्त भरलेली रक्कम समायोजित करुन उरलेली रकमेचे विज देयक देण्यात आले. ही बाब अर्जदाराने नि. क्रं. 9 वर दाखल शपथपञ मधील परि. क्रं. 04 वर मान्य केलेली आहे. सबब मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा किंवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 11/11/2014