::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा. सदस्या)
(पारीत दिनांक :- 01/11/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत कथन केले कि, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व त्याचा विज ग्राहक क्रं. 450011353334 हा आहे. गैरअर्जदाराने दि. 14/4/12 रोजी अर्जदाराकडे विज मिटर क्रं. 0711216430 बसविले. आणि दि. 15/4/12 रोजी विज पुरवठा चालु झाला मिटर लावले तेव्हा मिटर रिडींग 3526 होते अर्जदाराचे लक्षात आले कि, मिटर रिडींग मोठयाप्रमाणात होत आहे म्हणून दि. 17/4/12 व दि. 2/5/12 रोजी मिटर खराब असल्याची तक्रार गैरअर्जदाराकडे दिली तसेच दि. 7/6/12 रोजी गैरअर्जदाराकडे रु. 100 विज मिटर तपासणीचे शुल्क जमा केले. अर्जदाराने पुढे कथन केले कि, गैरअर्जदाराने दि. 26/6/12 रोजी नादुरुस्त मिटरची मौका परिक्षण चौकशी जुने मिटर करुन काढले व त्याजागी दुसरे नविन मिटर क्रं. 9001771793 हे लावले जुने मिटर काढले तेव्हा मिटर रिडींग 5548 हे होते दि. 24/8/12 रोजी गैरअर्जदाराने 117 युनिटचे रु. 540/- चे विज देयक पाठविले. सदर देयक अर्जदाराने भरले त्यानंतर गैरअर्जदाराने 19/10/12 रोजी एकूण 9149 युनिटचे रु. 1,02,710/- चे बिल पाठविले. सदर बिलामध्ये 5980 युनिटची नोंद असल्याने सदर रिडींग अर्जदाराला अमान्य आहे. म्हणून अर्जदाराने दि. 16/11/12 गैरअर्जदाराला रोजी रजि. पोस्टाने नोटीस पाठवून योग्य युनिटचे बिल पाठविण्याचे तसेच बिल रक्कम चार किस्तीत भरण्याची सुट देण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदाराने नोटीस प्राप्त होवूनही नोटीसची पूर्तता केली नाही. अर्जदाराने पुढे कथन केले कि, गैरअर्जदाराने दि. 15/3/13 रोजी अर्जदाराला विज देयकाची थकबाकी न भरल्यास विज पुरवठा खंडीत करण्याचा नोटीस पाठविला. म्हणून अर्जदाराने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल करुन अर्जदाराला दिलेली सेवा न्युनतापूर्ण सेवा अशी घोषीत करावे व जुने मिटर क्रं. 071216450 बद्दल असलेल्या शंकेचे निरसरण करावे व दि. 19/10/12 चे रु. 1,02,710/- बिल रद्द करावे, गैरअर्जदाराने अर्जदाराला नविन मिटर क्रं. 9001771793 मधील मिटर रिडींग मध्ये विज देयक देवून सदर विज देयक भरण्यास चार किस्तीचा कालावधी दयावा व गैरअर्जदाराने अर्जदाराकडे जुने मिटर लावले तेव्हा मिटर रिडींग 3526 होते व मिटर काढले तेव्हा मिटर रिडींग 5548 होते त्यापैकी अर्जदाराने 117 रिडींगचे 540/- देयकाचा भरणा केला तेव्हा विज युनिट 1905 प्रमाणे जुन्या मिटरचे विज देयक देण्यात यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. 10,000/- व तक्रार खर्च रु. 5,000/- ची मागणी केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्र. 10 वर त्याचे उत्तर दाखल केले आहे. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात मान्य केले कि, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे तसेच अर्जदाराचे तक्रारी नंतर दि. 26/6/12 रोजी नादुरुस्त मिटर क्रं. 0711216450 चे मौका परिक्षण चौकशी करुन काढले व त्याजागी दुसरे मिटर क्रं. 9001771793 लावले. तसेच जुने मिटर काढले तेव्हा मिटर रिडींग 5548 होते तसेच नविन मिटर लावल्यानंतर 24/8/12 रोजी 117 युनिटचे रु. 540/- चे विज देयक दिले व ते अर्जदाराने भरले आहे. त्यानंतर गैरअर्जदाराने दि. 19/10/12 रोजी एकूण युनिटचे रु. 1,02,710/- चे बिल पाठविले. परंतु गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात पुढे कथन करुन नाकबुल केले कि, सदर बिलामध्ये जुन्या मिटरचे 5980 युनिटची नोंद आहे. अर्जदार हा स्वच्छ हाताने आलेला नाही अर्जदार त्यास दिलेले बिल भरण्यास तयार झाला परंतु अर्जदाराने बिल 4 हप्त्यात भरण्याची सुट मागीतली आहे परंतु तसे अधिकार गैरअर्जदार यांना नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वापरानुसार विज मिटर तपासले व ते निर्दौष आढळले म्हणून अर्जदाराला दिलेले बिल त्यांनी वापरलेल्या उपयोगाप्रमाणे योग्य आहे म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराला सेवेत कोणतीही न्युनता दिलेली नसल्याने सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
3. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. गैरअर्जदाराने दि. 14/4/12 रोजी अर्जदाराकडे विज मिटर क्रं. 0711216430 बसविले. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून त्याचा विज ग्राहक क्रं. 450011353334 हा आहे. व ही बाब गैरअर्जदार यांना मान्य असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5. अर्जदाराचा अर्ज तसेच अर्जदाराने नि. क्रं. 4 वर दाखल केलेल्या दस्त क्रं. अ- 1 ते अ- 8 या दस्ताऐवजांची व गैरअर्जदाराचा लेखीउत्तर व दस्ताऐवज याची पडताळणी केली असता असे निर्देशनास आले कि, गैरअर्जदार यांनी नि. क्रं. 10 वर दाखल केलेल्या लेखीउत्तरात परि. क्रं. 2 मध्ये मान्य केले कि, ‘’ अर्जदाराच्या तक्रारीनंतर गैरअर्जदाराने दि. 26/6/12 रोजी नादुरुस्त मिटर क्रं. 0711216450 चे मौका परिक्षण चौकशी करुन काढले आणि त्या जागी दुसरे मिटर क्रं. 9001771793 लावले. तसेच जुने मिटर काढले तेव्हा मिटर रिडींग 5548 होते तसेच नविन मिटर लावल्यानंतर 24/8/12 रोजी 117 युनिटचे रु. 540/- चे विज देयक दिले व ते अर्जदाराने भरले आहे. दि. 19/10/12 रोजी एकूण युनिटचे रु. 1,02,710/- चे बिल पाठविले. ‘’ तसेच गैरअर्जदार यांनी नि. क्रं. 16 नुसार दाखल केलेल्या दस्त क्रं. ब – 1 व ब- 2 ची पडताळणी करतांना मिटर फाऊंड ओके असे दर्शविले आहे परंतु अर्जदार यांचे अधि. यांनी युक्तीवादा दरम्यान नमुद केले कि, गैरअर्जदार यांनी सदर मिटरचा अहवाल हा तक्रार दाखल करे पर्यंत दिलेला नव्हता तसेच दि. 03/07/13 रोजी लेखीउत्तर दाखल करतांना सुध्दा सदर दस्ताऐवज दाखल न करता त्यानंतर दि. 14/3/14 रोजी सदर अहवाल दाखल केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने दाखल केलेला मिटरचा अहवाल हा चुकीचा तयार करुन नंतर दाखल केला असल्याने संशयास्पद आहे तसेच सदर अहवाल बरोबर आहे हे गैरअर्जदाराने सबळ पुरावा देवून सिध्द केलेले नाही याशिवाय गैरअर्जदार आपल्या लेखीउत्तरात सदर मिटर नादुरुस्त असल्याचे मान्य करतात व एकीकडे बरोबर असल्याचा अहवाल दाखल करतात. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे कि, सदर मिटर हे योग्य होते व अर्जदाराला विज वापरानुसारच नि. क्रं. 4 वर दाखल केलेले दस्त क्रं. अ – 7 वरील दिलेले विज देयक हे बरोबर आहे हे म्हणणे ग्राहय धरण्यासारखे नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला दोन वेळा अर्ज केल्यानंतरच गैरअर्जदाराने सदर नादुरुस्त मिटर काढून नेले परंतु सदर नादुरुस्त मिटर असल्यावरही त्या कालावधीतील देयक दुरुस्त करुन दिले नाही ही गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति सेवेत दिलेली न्युनता आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांनी अर्जदाराला, अर्जदाराने मागील तीन महिण्यात
वापरलेल्या विजेच्या सरासरीनुसार दि. 19 ऑक्टोंबर 2012 चे विज देयक आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसाचे आत दुरुस्त करुन दयावे.
3) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 01/11/2014