निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 08/03/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2010 तक्रार निकाल दिनांकः- 01/09/2010 कालावधी 05 महिने 03 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 सौ.ज्योत्सना कुंडलिक पुरी. अर्जदार वय 65 वर्षे.धंदा सेवानिवृत्त. अड.जे.एन.घुगे. रा.धनराज भवन.जायकवाडी वर्कशॉपचे पाठीमागे. लोकमान्य नगर.परभणी. विरुध्द 1 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. गैरअर्जदार. (एम.एस.इ.डी.सी.एल.) अड.एस.एस.देशपांडे. व्दारा – डेप्युटी एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. (परभणी.अर्बन रिजन ) परभणी ता.जि.परभणी. 2 सुप्रिन्टेंडेट इंजिनियर.( एस.इ.) परभणी जिल्हा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. (एम.एस.इ.डी.सी.एल.) विद्युत भवन.जिंतूर रोड. परभणी जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) अवास्तव व चुकीच्या विज बिलाबाबत प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घरगुती वापराचे ग्राहक नं 530010198436 अन्वये विज कनेक्शन घेतलेले आहे. माहे सप्टेंबर 09 ते जानेवारी 2010 पर्यंतची बिले चुकीची व अवास्तव रक्कमेची दिली गेली.गैरअर्जदारांनी सप्टेंबर 09 चे 984 युनिटचे 2137/- रु. चे बील दिले,माहे ऑक्टोबर 09 चे 10000 युनिटचे 81,163/- रु चे बील दिले त्यानंतर माहे नोव्हेंबर 09 चे 1769 युनिटचे 13047.75/- रु.चे बील दिले त्यानंतर माहे डिसेंबर 09 चे 1769 युनिटचे 14245/- रु.चे बिल दिले बिलावर रिडींग तपशिला खाली RNA शेरा मारुन रिडींग न घेताच बिले दिली आहेत तसेच बिलावरील मिटरच्या फोटोतील दिसणारे रिडींग व बिलावर नोंदवलेले रिडींग यामध्ये तफावत असल्याचे दिसते.अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की,डिसेंबर 09 पर्यंतची वरीलप्रमाणे चुकीची बिले दिल्यावर पुन्हा माहे जानेवारी 2010 चे 245 युनिटचे रु.752.43 चे बिल दिले.तेही चुकीचे व आवास्तव रक्कमेचे आहे.चुकीची बिले दुरुस्त करुन मिळावीत म्हणून गैरअर्जदाराकडे ता.19/02/09, 05/11/09 रोजी लेखी तक्रार अर्ज दिला होता शिवाय अनेक वेळा समक्ष भेटून ही विनंती केली होती पंरतु गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे शेवटी 21/01/2010 रोजी वकिला मार्फत नोटीस पाठवुन वादग्रस्त बिलामध्ये दुरुस्ती करुन देण्याविषयी कळविले परंतु नोटीस स्वीकारुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.व नोटीसीला उत्तरही पाठविले नाही अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की,ती वृध्द महिला असून रक्तदाबाचा तिला विकार आहे.घरात नवरा बायको असे दोघे तिघेतच लोक राहतात घरात टि.व्हि,इलेक्ट्रीक मोटार,फ्रीज,अशी जास्त विज खर्च करणारी कसलीही उपकरणे नाहीत.असे असतांनाही अवास्तव रक्कमेची बिले देवुन तिला मानसकित्रास दिला त्यामुळे प्रकृतीवर परीणाम झाला त्याला गैरअर्जदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत.गैरअर्जदारांनी वादग्रस्त बिलात दुरुस्ती करुन न दिल्यामुळे ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन माहे सप्टेंबर 09 ते जानेवारी 2010 अखेर गैरअर्जदारांनी दिलेली वादग्रस्त बिले रद्द व्हावीत व प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे बिलांची आकारणी करण्याचे आदेश व्हावेत अर्जदाराने माहे सप्टेंबर 09 च्या भरलेल्या बिलातून प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे आलेल्या बिलाची रक्कम वजा करुन जादा भरलेली रक्कम तिला परत मिळावी त्याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.1,00000/- नोटीस खर्च रु 5000/- अर्जाचा खर्च रु.15000/- गेंरअर्जदाराकडून मिळावा अशी शेवटी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र नि.2 व नि.7 लगत पुराव्याची कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर ता.02/06/2010 रोजी एकत्रितलेखी जबाब ( नि. 16) सादर केला तक्रार अर्जामध्ये त्यांच्या विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारलेली आहे.माहे सप्टेंबर 09 पासुनची दिलेली बिले चुकीची नाहीत.त्याबाबत असा खुलासा केला आहे की, सप्टेंबर 09 चे बिल प्रत्यक्षात आठ महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी 09 ते ऑगस्ट 09 या कालावधीचे आहे.वरील कालावधीत अर्जदारच्या मिटरचे प्रत्यक्ष रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे RNA असा शेरा देवुन सरासरी 58 युनिट विज वापर गृहीत धरुन वरील कालावधीतील बिले दिली होती माहे सप्टेंबर 09 मध्ये प्रत्यक्ष रिडींग पाहिली असता 3136 रिडींग होते त्यापूर्वी फेब्रुवारी 09 मध्ये चालू रिडींग 2152 युनिट होते त्यामुळे दोन्हीतील फरक 984 युनिट सप्टेंबर 09 पर्यंत आला. सप्टेंबर 09 पर्यंतचे 984 युनिटचे बिल देवुन अर्जदासराने त्यापूर्वी एकुण भरलेली रक्कम 1087.24 वजा करुन रु.2140.40 चे बील दिले आहे.ते बरोबर आहे.तसेच त्यानंतरची माहे ऑक्टोबर 09 ते डिसेंबर 09 पर्यंतची बिले ही बरोबरच आहेत.फेब्रुवारी 010 च्या बिलात गैरअर्जदारांनी दुरुस्ती करुन देवुन रुपये 35560/- वजा करुन योग्यते बिल दिले आहे.कारण जानेवारी 2010 मध्ये नवीन मिटरची रिडींग 246 युनिट होती. मिटर जोडला त्यावेळी ओपनिंग रिडींग 01 युनिट होती त्यामुळे 245 युनिटचे रिडींग प्रमाणेच फेब्रुवारी 2010 च्या देयकात बिलाची आकारणी केली आहे.याबाबतीत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही अगर चुकीचे व बेकायदेशिर बिल दिलेले नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि 17 दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड घुगे गैरअर्जदारातर्फे अड देशपांडे यांनी युक्तिवाद केला. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदारांनी अर्जदारांस माहे सप्टंबर 09 ते जानेवारी 2010 या कालावधीतील दिलेले विद्युत देयके रिडींग न घेता चुकीची देवुन सेवात्रुटी केली आहे काय होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे काय अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 ते 2 अर्जदारने घरगुती वापराचे गैरअर्जदारकडून ग्राहक नं 53001098436 नंबरचे विज कनेक्शन घेतलेले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे.प्रस्तुतची तक्रार मुख्यतः गैरअर्जदारकडून माहे सप्टेंबर 09 चे (नि.7/1) देयक तारीख 11/10/09 या वादग्रस्त बिलापासून उपस्थित झालेली आहे.त्यापूर्वीच्या बिला बाबत तक्रार अर्जामध्ये काहीही खुलासा दिलेला नसल्यामुळे अर्जदाराला ती मान्य होती म्हणून तीने नाहरकत भरलेली होती असे अभिप्रेत आहे.अर्जदाराने तक्रार अर्जासोबत माहे सप्टेंबर 09 च्या पहिल्या वादग्रस्त बिलाच्या अगोदरचे प्रत्यक्ष रिडींग प्रत्यक्ष चालू व मागिल रिडींग असेलेले एकही बिल मंचाचे अवलोकनासाठी पुराव्यात दाखल केलेले नाही.अर्जदाराला मान्य असलेली प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे नाहरकत भरलेली दोन तीन बिले पुराव्यात दाखल केली असती तर निश्चितच अर्जदाराच्या घरी प्रत्यक्षात दरमहा नेमका किती युनिट विज वापर होतो हे लक्षात आले असते आणि अर्जदारने सप्टेंबर 09 पासून जानेवारी 2010 पर्यंतची दिलेली बिले चुकीची अथवा अवास्तव रक्कमेची आहेत किंवा काय हेही उघड झाले असते.पुराव्यात नि.17/1 वर दाखल केलेले पहिले वादग्रस्त बलाचे बारकाईने अवलोकन केले असता बिलावर चालु रिडींग 3136 व मागील रिडींग 2151 नोंदवुन एकुण 984 युनिटची आकारणी रु.2140.48 केली आहे.घरामध्ये कोणतीही चैनीची व जादा विज खर्च होणारी उपकरणे नसतांना एक महिन्याचे एकुण 984 युनीटचे दिलेले बिले हे प्रथमदर्शनीच चुकीचे असल्याचे दिसते व सदर बिला मधील रिडींग बाबत शंका आल्या शिवाय राहात नाही.परंतु याबाबत गेरअर्जदारांनी लेखी जबाबात जो खुलासा दिलेला आहे तो लक्षात घेतला असता सदर बिलातील मागिल रिडींग 2152 हे ऑगस्ट 09 या महिन्याचे नसुन ते फेब्रुवारी 09 या महिन्याचे आहे.व फेब्रुवारी 09 ते ऑगस्ट 09 पर्यंत 08 महिन्याचे प्रत्यक्ष रिडींगची वजावट करुन तारीख 11/10/09 च्या देयकात ( सप्टेंबर 09) 984 युनिटची मागील 08 महीन्याची विज वापराची आकारणी केली असली तरी नि.7/1 वरील पहिल्या वादग्रस्त बिला मधील मागील विज वापर या तपशिला खाली माहे ऑक्टोबर 08 ते ऑगस्ट 09 या एक वर्षाच्या कालावधीत गैरअर्जदाराने दिलेले सर्व बिले सरासरी 58 युनिट विज वापर ची आकारणी करुन दिली होती हे तपशिलातून स्पष्ट दिसते. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे सप्टेंबर 09 चे बिल (नि. 7/1) 984 युनिटचे 08 महिन्याचे आहे.म्हणजे 08 महिन्यात दरमहा सरासरी 123 युनिट अर्जदाराच्या घरी विज वापर झाला असे म्हणावे लागेल. परंतु दोन तीन मानणासाच्या कुटूंबात दरमहा 123 युनिट विज वापर करण्यासारखी उपकरणे अर्जदारच्या घरात आहे असा गैरअर्जदारांनी मंचापुढे कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.बिलाचे अवलोकन केले असता अर्जदाराला विज कनेक्शन देत असतांना मंजूर अधिभार.40 कि.वॅ.इतकाच आहे परंतु प्रत्यक्षात त्याही पेक्षा कमी विज वापर होतो हे तक्रार अर्जात व नि.2 वरील शपथपत्रातूनही शपथेवर सांगितलेले असलेल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही दुसरी गोष्ट अशी की, नि.7/1 बिलातील मागील विज वापराच्या तपशिला खाली माहे डिसेंबर 08 ते ऑगस्ट 09 पर्यंत ज्याअर्थी दरमहा सरासरी 58 युनिट विज वापर होतो असे गृहीत धरुन एकवर्षभर रिडींग न घेता बिले दिली आहेत त्याअर्थी अर्जदाराच्या घरी जास्तीत जास्त 58 युनिट पेक्षा युनिट वापर होत नाही असे गैरअर्जदारांनाही मान्य होते म्हणूनच त्यांनी वर्ष भर दरनमहा 58 युनिटचीच बिले दिली असावीत असाच यातून निष्कर्ष निघतो त्यामुळे सप्टेंबर 09 च्या बिलात गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे रिडींग प्रमाणे अर्जदाराने 08 महिन्यात दरमहा 123 युनिट विज वापर केला हे चुकीचे असल्याचे अनुमान निघते.त्यामुळे बिलामध्ये 984 युनिटचा विज वापर केल्याचे दिलेले बिल ग्राहय धरता येणे कठीण आहे.यामुळे अर्थातच माहे सप्टेबर 09 चे बिल चुकीचे रिडींगचे असल्याचे सिध्द होते बिलावर जो मीटर रिडींगचा फोटो छपला आहे त्यामध्ये रिडींगही स्पष्ट दिसत नाही रिडींग बाबत विज कंपनीकडे ग्राहकाच्या वारंवार तक्रारी येत असल्याने रिडींगचे मीटर फोटो छापण्याची कल्पना विज कंपनीने सुरु केली आहे.परंतु त्याबाबतीतही कर्मचा-याकडून निष्काळजीपणा होत असल्याचे दिसते असे खेदाने म्हणावे लागत आहे.गैरअर्जदाराने माहे आक्टोबर 08 पासून ऑगस्ट09 पर्यंत सुमारे एक वर्षभर रिडींग न घेता सरासरी 58 युनिटची बिले देवुन निष्काळजीपणाचा कळसच केला आहे.त्यामुळे याबाबतीत त्यांच्याकडून निश्चितपणे सेवात्रुटी झाली आहे.हे स्पष्ट होते तसेच सप्टेंबर 09 च्या बिला नंतरची त्यापूढील माहे जानेवारी 2010 पर्यंतच्या वादग्रस्त बिलांचे ( 7/2 नि.7/5 ) अवलोकन केले असता असे दिसते की, माहे नोव्हेंबर 09 च्या बिलात देयक तारीख 04/12/09 चालू रिडींगची नोंद नाही मात्र 1709 युनिट विज वापर दाखवुन रु.94220/- चे भसरमसाठ रक्कमेचे बिल दिले आहे माहे डिसेंबर 09 च्या बिलात ( देयक ता.03/01/2010) चालू रिडींग RNA म्हणजे रिडींग उपलब्ध नाही असा शेरा नोंदवुन 1769 युनिटचे रु.108727.33 चे मागील थकबाकीसह भरमसाठ रक्कमेचे बिल दिले आहे.तसेच जानेवारी 2010 च्या बिलात (देयक तारीख 06/02/2010) 245 युनिटचा विज वापर दाखवुन रु.84570/- चे बिल दिले आहे.वरील तिन्ही बिलातील रिडींगची नोंद मनमानी पध्दतीने केली असल्याचे स्पष्ट दिसते कारण सलग तिन्ही महिन्याचेबिलामध्ये चालू रिडींग व मागील रिडींगचा मेळ बसत नाही.वरील प्रमाणे भरमसाठ रक्कमेची बिले दुरुस्त करुन मिळणेसाठी अर्जदारने अनेकवेळा लेखी तक्रारी दिल्या होत्या पण गैरअर्जदारांनी दखल घेतली नाही असे शपथपत्रातून सांगितलेले आहे. हे तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या वादग्रस्त बिलातून उघड झाले आहे अर्जदारने त्यानंतर 21/01/2010 रोजी वकिला मार्फत गैरअर्जदारांना नोटीस पाठविली होती त्याची स्थळप्रत (नि.7/6) दाखल केलेली आहे त्यालाही उत्तर न पाठवता अगर खुलासा न देता गैरअर्जदार आजपर्यंत गप्प राहिले यावरुन अर्थातच जाणून बूजून अर्जदाराचा असाहयतेचा गैरफायदा घेवुन तिला मानसिकत्रास देवुन विनाकारण खर्चात पाडून तिचेवर घोर अन्याय केलेला आहे असे मंचाचे मत आहे.लेखी जबाबात गैरअर्जदारांनी दिलेली बिले रिडींग प्रमाणे योग्य व बरोबर आहे असे म्हंटले आहे मात्र त्या बाबतचा स्पष्ट खुलासा किंवा ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही.तीन्हीही वादग्रस्त बिले चुकीच्या रिडींगची व अवास्तव रक्कमेची असल्याने ती निश्चितपणे रद्द होण्यास पात्र आहे.शिवाय त्यासेवात्रुटीची तदनुषंगीक नुकसान भरपाई अर्जदाराला मिळाली पाहिजे.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या ग्राहक नं 30010198436 वरील माहे सप्टेंबर 09 डिसेंबर 09 अखेर विज वापर केलेली तारीख 11/10/09, ता.04/12/09,ता 03/01/2010 व ता.06/02/2010 ची वादग्रस्त देयके रद्द करण्यात येत आहेत. 3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदाराच्या मिटरचे त्याचे समक्ष फोटोसहीत एक महिना विज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेवुन रिडींग प्रमाणे नवीन दुरुस्त बिल कोणताही दंड व्याज न आकारता द्यावीत. 4 अर्जदाराने माहे सप्टेंबर 09 च्या बिलापोटी जी काही रक्कम अगोदरच जमा केली असेल ती दुरुस्त बिलातून वजा करुन जादा रक्कम उरली असल्यास ती परत करावी.अगर पूढील बिलात समायोजित करावी. 5 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटीची नुकसान भरपाई रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/-आदेश क्रमांक 3 च्या मुदतीत द्यावा.अगर ती नुकसानभरपाई बिलामध्ये समायोजित करावी. 6 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |