(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 13/04/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 07.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने हंसापूरी येथील अमित सर्जिकल्स आणि अमित मंडलिक चॅरिटेबल हॉस्पीटल करता स्वतःचे नावे नवीन मीटर लावुन घेण्याकरता गैरअर्जदारांकडे रितसर अर्ज करुन रु.2,540/-डिमांड नोटचे भरुन विज पुरवठा घेतला होता. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याचा विज पुरवठा 15 दिवसांनंतर अपरिहार्य कारण सांगून कुठलीही नोटीस किंवा कल्पना न देता काढून घेतला. तसेच गैरअर्जदारांना वारंवार विनंती करुनही त्यांनी तक्रारकर्त्यास मीटर लावुन विज पुरवठा न दिल्यामुळे दि.14.12.2009 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदारांनी सदर नोटीसला उत्तरही दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन ती व्दारे गैरअर्जदारांनी खंडीत केलेला विज पुरवठा करुन द्यावा व मीटर पुन्हा लावुन देण्याबाबत मंचास विनंती केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे... गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याकडे लावलेले मीटर 15 दिवसांनंतर काढून घेतल्याचे अमान्य केले असुन तक्रारकर्त्याचे घर मालक सौ. शोभा सुर्यवंशी यांनी तक्रारकर्त्या विरुध्द न्यायालयात विवाद सुरु असुन मीटर लावु नये याबाबत अर्ज दिला होता. मा. न्यायालयाने दि.27.05.2009 रोजी घरमालकास त्याचे घरात असलेल्या मीटरवरुन विजेची पूर्तता करावी व विद्युत प्रवाह सुरळीत करावा असा आदेश दिलेला आहे. परंतु तक्रारकर्त्याचे घरमालकाने विद्युत मीटर लावण्यांस हरकत घेतल्यामुळे ते मीटर लावु शकले नसल्याचे गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 4. सदर प्रकरण मंचासमक्ष दि.01.04.2011 रोजी मौखिक युक्तिवादाकरीता आले असता मंचाने गैरअर्जदारांचे वकील हजर झाले असुन त्यांनी पुरसिस दाखल केली, तक्रारकर्ते गैरहजर होते. त्यामुळे मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. गैरअर्जदारांनी नवीन विद्युत मीटर लावुन दिले नाही म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे. सदर तक्रारीला गैरअर्जदारांनी आपले उत्तर दाखल केले असुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे नाकारलेले आहे. गैरअर्जदारांचे वकीलांनी दि.01.04.2011 रोजी पुरसिस दाखल करुन तक्रारकर्त्याकडे पुन्हा मीटर लावुन दिल्याचे नमुद केले आहे. तसेच त्यासोबत पंचनामा दाखल केला असुन त्यावर ग्राहकाची सही असुन साक्षीदारांच्या सुध्दा सह्या आहेत व सदर मीटर साक्षीदारांच्या उपस्थितीत लावुन विद्युत पुरवठा सुरु केल्याचे नमुद केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली मागणी ही सकृत दर्शनी पूर्ण झालेली असुन तक्रारीतील आक्षेपात काहीही तथ्य उरलेले नाही, म्हणून सदर तक्रार निकाली काढण्यांत येते. 6. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे, पुरसिस तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही वरील निष्कर्षांच्या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |