Maharashtra

Kolhapur

CC/12/310

Mr. Gurudev Pandurang Mane - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.P.B.Jadhav

28 Jun 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/12/310
 
1. Mr. Gurudev Pandurang Mane
At post-Talsande, Tal. Hatkangale,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
for Kodoli Branch,
2. Mr. Ajit Baban Nawale,
At post -Kodoli, Tal. Panhala,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

नि का ल प त्र :- (दि. 28-06-2013) (द्वारा- श्री. दिनेश एस. गवळी, सदस्‍य)

      प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेला आहे.

(1)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-

   तक्रारदार यांचा कौंटुबिक उपजिविकेकरिता घरगुती लघुउद्योग सुरु केलेला असून तक्रारदार स्‍वत: व त्‍यांचे कुटुंबिय काम करतात.  तक्रारदार हे स्‍वयंरोजगाराकरिता आणि कुटुंबाचे उपजिविकेकरिता टाकाऊ कच्‍चा माल वापरुन त्‍यापासून टिकावू उर्जेचे पदार्थ बनविणेचे काम करतात.  वि.पक्ष. नं. 1 ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी असून तक्रारदार हे वि.पक्ष कंपनीचे ग्राहक आहेत.  वि.प. कंपनीकडून विज पुरवठा केलेल्‍या ग्राहकांचे विज मिटरचे रिडिंग डिजिटल कॅमेराव्‍दारे प्रत्‍येक महिन्‍यास रिडिंगप्रमाणे संगणकीय वीज देयक दरमहा ग्राहकांना वि.पक्ष कंपनीकडून पाठविली जातात.  

     तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून दि. 23-12-2011 रोजी विद्युत कनेक्‍शन घेतलेले आहे.  तक्रारदार यांनी वेळोवेळी कोडोली येथील वि.प. कंपनीच्‍या कार्यालयात जावून मीटर रिडिंग घेणेबाबत वेळोवेळी विनंती करुनही वि.प. कंपनीचे कर्मचा-यांनी सहा महिन्‍यापर्यंत विज मीटरचे रिडींग घेणेबाबत निष्‍काळजीपणा करुन त्‍यानंतर तक्रारदारांना प्रथमच एकदम रक्‍कम रु. 1,32,710/- चे दि. 16-06-2012 रोजीचे  विज देयक वि.प. कंपनीने दिले.  व सदर विज देयकामध्‍ये रक्‍कम रु. 12,063/- इतकी रक्‍कम दंडाची Penal Charges म्‍हणून समाविष्‍ठ केली आहे.  त्‍यानंतर वि. प. कंपनीने दि. 17-07-2012 रोजीचे रक्‍कम रु. 92,480/- चे दुसरे विज देयक तक्रारदार यांना दिले व दुसरे  विज देयकामध्‍ये रक्‍कम रु. 648-65 इतकी दंडाची रक्‍कम बेकायदेशीर पणे समाविष्‍ठ केलेली आहे.   त्‍यानंतर दि. 16-08-2012  रोजीचे तिसरे विज देयक रक्‍कम रु. 24,126-48 चे दिले.  व त्‍यामध्‍ये दंडाची रक्‍कम रु. 10,090-15 समाविष्‍ठ केली आहे.

     तक्रारदार यांनी दि. 28-06-2012 रोजी रक्‍कम रु. 50,000/- व दि. 31-07-2012 रोजी रक्‍कम रु. 80,000/- वि.प. कंपनीमध्‍ये  विज आकारापोटी भरणा केलेली आहे.   तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे अन्‍यायकारक दंडाची रक्‍कम रद्द करणेबाबत विनंती करुनही वि.प. यांनी त्‍यास नकार देऊन दि. 30-08-2012 रोजी दंडाची पुर्ण रक्‍कम न भरलेस विज पुरवठा खंडित करणेची भाषा बोलून दाखविली.  विज कनेक्‍शन जोडलेपासून दरमहा मीटर रिडींग घेवून विज देय तक्रारदारांना पाठविणेस सहा महिने विलंब लावून बेकायदेशीर दंडाच्‍या रक्‍कमा विज बिलात समाविष्‍ठ केलेमुळे तक्रारदारांना मानसिक व आर्थिक नुकसानीमुळे प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल करावी लागत आहे.   वि.प. कंपनीने विज जोडणीपासून दरमहा मीटर रिडींग घेऊन नियमित विज देयक देणेस जाणीवपूर्वक निष्‍काळजीपणा केलेमुळे मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानीची रक्‍कम रु. 25,000/- व वि.प. बेकायदेशीरपणे दंडाची रक्‍कम विज देयकात समाविष्‍ठ करुन सेवेतील त्रुटीमुळे झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम रु. 25,000/- व प्रवास खर्च रु. 320/- व तक्रारीचा खर्च रु. 7,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 57,320/-व विज देयकातील दंडाची रक्‍कम रु. 22,801.80 रद्द करावेत व तक्रारदाराचा विज पुरवठा खंडित करुन नये अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.                 

(2)        प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज  दाखल दि. 30-08-2012 रोजी दाखल होऊन दि. 18-03-2013 रोजी स्विकृत करुन वि.पक्ष यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.पक्ष  यांना नोटीस लागू होऊनही त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नसलेमुळे दि. 15-06-2013 रोजी  वि.प. विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला.  तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला व  प्रस्‍तुतचे प्रकरण गुणदोषांवर निकाली करणेत येते. 

(3)  तक्रारदारांने त्‍यांचे तक्रारीसोबत वि.प. कंपनीने पाठविलेले दि. 16-06-2012 रोजीचे पहिले  विज देयक, दि. 17-07-2012 रोजीचे दुसरे देयक, व दि. 16-08-2012 रोजीचे तिसरे देयक व दि. 28-06-2012 रोजी रक्‍कम रु. 50,000/- व दि. 31-07-2012 रोजी रक्‍कम रु. 80,000/- रोजीची विज बिले भरलेच्‍या पोच पावत्‍या, व कार्यकारी अभियंता यांना केलेला दि. 6-08-2012 रोजीचा इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

4)   तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे वकिलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.

                          मुद्दे

1.  वि.पक्ष  विद्युत  कंपनी यांनी  तक्रारदार यांना द्यावयाच्‍या

   सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?                                    ----  होय.

2.  तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळण्‍यास

   पात्र आहे काय ?                                              -----होय.

3. आदेश काय ?                                                 अंतिम आदेशाप्रमाणे.      

                          वि वे च न    

मुद्दा क्र.1:       तक्रारदार यांनी वि.प. विद्युत कंपनीकडून दि. 23-12-2011 रोजी विद्युत कनेक्‍शन घेतलेले आहे.  तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा सुरु केलेनंतर वि.प. कंपनी यांनी कनेक्‍शनबाबत निरिक्षण केलेले नाही.  तक्रारदारांना एकदम सहा महिनेनंतर  पहिले विज देयक दि. 16-06-2012  रोजी  रक्‍कम रु. 1,32,710/- दिले.  व सदर विज देयकामध्‍ये रक्‍कम रु. 12,063/- इतकी रक्‍कम दंडाची Penal Charges म्‍हणून समाविष्‍ठ केली आहे.  त्‍यानंतर वि. पक्ष विद्युत कंपनीने दि. 17-07-2012 रोजीचे रक्‍कम रु. 92,480/- चे दुसरे विज देयकामध्‍ये रक्‍कम रु. 648-65 इतकी दंडाची रक्‍कम बेकायदेशीरपणे समाविष्‍ठ केलेली आहे.  त्‍यानंतर दि. 16-08-2012 रोजीचे तिसरे विज देयक रक्‍कम रु. 24,126-48 चे दिले.  व त्‍यामध्‍ये दंडाची रक्‍कम रु. 10,090-15 समाविष्‍ठ केली आहे.  वास्‍तविक पाहता तक्रारदारांना विद्युत पुरवठा सुरु केलेनंतर एक महिन्‍यानंतर विज मिटर रिडींगची पाहणी करुन पहिले विज देयक देणे हे वि.पक्ष  विद्युत कंपनीवर बंधनकारक असतानासुध्‍दा वि.प. विद्युत कंपनी यांनी तक्रारदारास सहा महिनेनंतर  पहिले विज देयक पाठविले आहे व त्‍यामध्‍ये दंडाची रक्‍कम समाविष्‍ठ केलेली आहे ती अयोग्‍य व चुकीची आहे.  तक्रारदारांच्‍या तक्रारीतील  वि.पक्ष विद्युत कंपनी यांनी पाठविलेली तिन्‍ही देयकांचे या मंचाने अवलोकन केले असता,  पहिले  विज देयक दि. 16-06-2012  रोजी  रक्‍कम रु. 1,32,710/-   त्‍यामध्‍ये रक्‍कम रु. 12,063/- , दि. 17-07-2012 रोजीचे रक्‍कम रु. 92,480/- चे दुसरे विज देयकात रु. 648-65 व दि. 16-08-2012 रोजीचे रक्‍कम रु. 24,126-48 चे तिसरे विज देयकामध्‍ये रक्‍कम रु. 10,090-15 इतकी दंडाची रक्‍कम समाविष्‍ठ केलेली आहे.    वि.प. विद्युत कंपनीने तक्रारदारांना विज देयकातील दंडाची आकारलेल्‍या रक्‍कमेबाबत कोणताही लेखी खुलासा तक्रारदारांनी लेखी कळवूनसुध्‍दा वि. पक्ष विद्युत कंपनी यांनी दिलेला नाही, अथवा  तक्रारदारांना  यांना  आकारणी केलेल्‍या दंड रक्‍कमेबाबत काहीही कळविलेले नाही.  वि.प. कंपनीने तक्रारदारांना  तिन्‍ही  विज  देयकात समाविष्‍ठ केलेली एकूण रक्‍कम रु. 22,801-80 पैसे ही अशी बेकायदेशीर व चुकीची रक्‍कम विज  देयकात समाविष्‍ठ करुन वि.पक्ष विद्युत कंपनी यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. व तक्रारदार यांना नियमित दरमहा विज देयके न देऊन तसेच तक्रारदारांनी दि. 6-08-2012 रोजी लेखी कळवूनही त्‍याची दखल न घेतली नाही त्‍याचप्रमाणे प्रस्‍तुत ग्राहक तक्रारी नोटीसीची बजावणी होऊनदेखील ते या कामी हजर झालेले नाहीत. व संधी असूनदेखील तक्रारदाराच्‍या तक्रारीस म्‍हणणे दाखल केलेले नाही याचा अर्थ असा की, वि.पक्ष विद्युत कंपनी यांनी केलेली विज देयकात केलेली Penal Charges ही अयोग्‍य व बेकायदेशीर आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे वि.प. कंपनी यांनी  सदोष सेवा दिल्‍याने वि.प. कंपनी यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे.    म्‍हणून मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत. 

मुद्दा क्र. 2:    वि. पक्ष विद्युत कंपनी यांनी तक्रारदारांना त्‍यांचा विद्युत पुरवठा सुरु केलेनंतर नियमित दरमहा विज देयके न देता तक्रारदारांना पहिले विज देयक सहा महिनेनंतर देऊन बेकायदेशिररित्‍या विज देयकात दंडाची रक्‍कम रु. 22,801—80 पैसे  समाविष्‍ठ करुन तक्रारदारांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले आहे व तक्रारदारांनी दि. 6-08-2012 रोजी लेखी कळवूनही त्‍याची दखल न घेतलेमुळे तक्रारदारांना यांना मानसिक त्रास झालेला आहे.  तक्रारदार यांना मे. मंचात सदरची तक्रार दाखल करण्‍यास खर्चही करावा लागला.  त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक, आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 500/- मिळण्‍यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे म्‍हणून मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत. 

मुद्दा क्र. 3 :   सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहे. 

                           आ दे श

1.     तक्रारदाराची तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.

2.    वि. पक्ष विद्युत कंपनी यांनी  तक्रारदार यांना दिलेली दि. 16-06-2012, दि. 17-07-2012 व दि. 16-08-2012 रोजीच्‍या तिन्‍ही विज देयकातील समाविष्‍ठ केलेली (Penal Charges) दंडाची आकारलेली एकूण रक्‍कम रु. 22,801-80 पैसे (अक्षरी रु. बावीस हजार आठशे एक ऐंशी पैसे फक्‍त) रद्द करावी.

3.    वि. पक्ष विद्युत कंपनी  यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 1,000/- (अक्षरी रु. एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.500/- (अक्षरी रु. पाचशे फक्‍त) अदा करावेत.

4.    सदरच्‍या निकालपत्राच्‍या  प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना  विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.