Maharashtra

Kolhapur

CC/10/35

Chinchmai Sah. Pani Purvatha Sanstha Maryadit, Tarale Khurd, Tal.Radhanagari, Dist.Kolhapur - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., - Opp.Party(s)

A.H.Pattil.

21 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/35
1. Chinchmai Sah. Pani Purvatha Sanstha Maryadit, Tarale Khurd, Tal.Radhanagari, Dist.KolhapurThrough - Shripati Dattatray Saravane, R/o. Tarale Khurd, Tal.Radhnagri, Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Branch Tarabai Park,Executive Engineers Office, Kolhapur2. Maharashtra State Electricty Distribution Co.Ltd.Branch Tarabai Park, Rural Division 2, Tarabai Park, Kolhapur.3. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Sub-Division, Radhanagari through Asst.EngineerRadhanagari, Dist.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.Ashok Patil for the complainant
Adv.Kishor Patil for the opponent No.1 & 2

Dated : 21 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.21.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तसेच त्‍यांचे वकिल गैरहजर, सामनेवाला विद्युत कंपनीच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदार तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला विद्युत कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतलला आहे. त्‍याचा ग्राहक नंबर 265030241413 (जुना ग्राहक नंबर एजी नं.39) असा आहे. तसेच, तक्रारदारांच्‍या स्किमसाठी दुस-या टप्‍प्‍यास 15 अश्‍व शक्‍ती वीज कनेक्‍शन ग्राहक नंबर 2650301570 (जुना ग्राहक नंबर एजी 199) घेतले आहे. सदरचे विद्युत कनेक्‍शन हे तक्रारदार संस्‍थेने त्‍यांच्‍या शेतकरी सभासदांसाठी पाणी पुरवठा करण्‍यासाठी घेतले आहे. दि.25.11.2003 रोजी सामनेवाला कंपनीकडे 80 अश्‍वशक्‍ती ऐवजी 40 अश्‍वशक्‍ती भार मंजूर करावा याकरिता अर्ज व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. सदर अर्जाप्रमाणे दि.02.09.2006 पर्यन्‍त सामनेवाला विद्युत कपंनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. प्रत्‍यक्षात 40 अश्‍वशक्‍ती वीज वापर होत असतानाही पूर्वीप्रमाणेच 80 अश्‍वशक्‍तीदराने वीज आकारणी करुन तशी बिले सालोसाल तक्रारदारांनाकडून सामनेवाला वसूल करत होते. सामनेवाला विद्युत कंपनीने दि.25.11.2003 रोजीच्‍या अर्जावर वीज भार कमी करण्‍याचे दि.08.09.2006 रोजी ठरविले व नविन दराने होणारी जादा अनामत रक्‍कम रुपये 16,800/- भरणेबाबत तक्रारदारांना चुकीचे नांवावर कळविले. त्‍यानुसार दि.25.09.2006 रोजी तक्रारदार संस्‍थेने सदर जादा डिपॉझिट व मिटर टेस्टिंग फी भरणा केली. या रक्‍कमेची डिपॉझिट पावती मात्र सामनेवाला यांनी पूर्वीच्‍याच चिफ प्रमोटर, दत्‍त पाणी पुरवठा या नांवाने दिली. सदरची रक्‍कम तक्रारदारांचे नांवे येणे दाखलवलेली आहे. याचप्रमाणे पूर्वी 80 अश्‍वशक्‍ती प्रमाणे केलेली आकारणी दुरुस्‍ती करुन मिळणेबाबत व पूर्वीची वसुल केलेली रक्‍कम व त्‍यावर येणे असणारे व्‍याज यांची केलेली वसुली परत मिळावी व बिल दुरुस्‍त करुन मिळावी याबाबत तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला कंपनीकडे वेळोवेळी विनंत्‍याचा विचार करणेस नकार दिला व थकबाकी दाखवून दि.01.12.2008 रोजी कनेक्‍शन बंद केले आहे. 
 
(3)        तक्रारदार संस्‍था त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला विद्युत कंपनीने दुस-या टप्‍प्‍यासाठी घेतलेल्‍या वीज कनेक्‍शचे विद्युत देयके मिटर रिडींग न घेता हेतूपूर्वक मिटर लॉक अथवा मिटर बंद असा शेरा मारुन मनमानीपणे सरासरी वीज आकारणी म्‍हणून नियमितपणे वीज बिलाची आकारणी करत आलेले आहेत. सबब, दि.28.05.2004 पासूनची बिले दुरुस्‍ती होवून जादा केलेली आकारणी रद्द करणेत यावी, तसेच वीज बिलावर थकित रक्‍कम दाखवून त्‍यावर केलेली आकारणी रद्द करणेत यावी व जादा अनामत भरलेली रक्‍कम रुपये 16,800/- तक्रारदारांचे खाती जमा करुन द्यावी. कनेक्‍शन-1 चे मार्च 2006 च्‍या बिलाची भरलेली रक्‍कम रुपये 50,000/- चा हिशेब त्‍यांच्‍या खात्‍यावर जमा करणेत यावा. दि.15.12.2008 रोजी भरलेल्‍या बिलातील रक्‍कम रुपये 7,090/- तक्रारदारांचे खात्‍याला बिलापोटी जमा करुन घेणेत यावी. तक्रारदारांचे लाईट बिल खात्‍यावर सप्‍टेंबर 2008, डिसेंबर 2008, मार्च 2008, जून 2009 व इतर बिलांवर सरासरी केलेली आकारणी रद्द करणेत यावी व मिटर रिडींगनुसार वीज बिलाची आकारणी करणेत यावी.  वेळोवेळी मिटर लॉक्‍ड् दाखवून केलेली बिलाची आकारणी रद्द करावी व नि‍यमितपणे रिडींगनुसारच आकारणी करावी असे सामनेवाला यांना आदेश व्‍हावेत.   तसेच,  कनेक्‍शन क्र.2 बाबतची तथाकथित थकबाकी रुपये 32,380/- चा पूर्ण हिशेब होईपर्यन्‍त तक्रारदारांचेकडून रक्‍कम वसुल करु नये. बंद केलेल्‍या काळातील सदर मिटर कनेक्‍शन नं.2 ची वीज आकारणी करणेत येवू नये. तसेच, बेकायदेशीरपणे पूर्वसुचने शिवाय वीज कनेक्‍शन तोडू नये व आर्थिक खर्चात टाकलेबाबत रुपये 1 लाख देणेबाबत सामनेवाला विद्युत कंपनीला आदेश व्‍हावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
 
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार संस्‍थेचा ठराव, तक्रारदार संस्‍थेचे सामनेवाला यांना दि.18.11.2003 रोजी पत्र, 50 केबी पर्यन्‍तचा लहान मोटारीकरिता करावयाचा अर्ज, वीज पुरवठा मागणी अर्ज, वीज पुरवठा मिळवण्‍यासाठी विद्युत ग्राहकांनी सादर करावयाचे प्रमाणपत्राची यादी, साईबाबा इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडील पावती, कोल्‍हापूर इंडस्‍ट्रीयल कार्पोरेशनकडील पावती, तक्रारदार संस्‍थेचे सामनेवाला कंपनीला विद्युत परवाना कमी करणेचे पत्र, विद्युत भार कमी करणेसाठीचा अर्ज, दि.30.06.2006 रोजीचे बिल, दि.30.12.2005 व दि.30.04.2006 रोजीचे बिल, बिलावरील नांव बदलून मिळणेबाबतचा अर्ज, दि.03.07.1991 रोजीची वीज बिल जमा केल्‍याची पावती, मिटर जोडून देणेबाबतचा दि.02.11.2006 रोजीचा अर्ज, दि.25.02.2009 रोजीचे बिल, रुपये 15,000/- व रुपये 35,000/- भरलेची पावती, वीज भार कमी केल्‍याचे दि.28.09.2006 रोजीचे सामनेवाला यांचे पत्र, दि.16,900/- ची पावती, रुपये 40,000/- ची पावती, वीज बिल तक्रारदारांचे नांवे जमा न झालेबाबत तक्रारदारांनी घेतलेली हरकत, सुरक्षा ठेव परत मिळणेसाठी केलेला अर्जदारांचा अर्ज, विद्युत लोकपाल यांचेकडे केलेली केस, ग्राहक मंचाच्‍या आदेशासहीत तक्रार क्र.36/09, साईट तपासणी अहवाल, दि.09.10.2009 रोजीचा आदेश, दि.30.06.2009 रोजीचे बिल, सामनेवाला यांची वीज खंडित करणेबाबतची दि.22.12.2009 रोजीची नोटीस, संस्‍थेचे नांवे कृषी संजिवनी लाभ मिळालेपासूनचा खाते उतारा मिळणेबाबत दिलेला अर्ज दि.23.12.2009, लाईट बिल भरुन घेणे व वीज पुरवठा सरु करणेसाठीचा दि.07.01.2010 रोजीचा अर्ज, दि.07.01.2010 रोजीची पावती, कोटेशन डिमांडची नोट, सर्व्हिस लाईन्‍स शिफ्टींगची संम्‍मती, विद्युत पुरवठा करणेचा अर्ज व विद्युत कंत्राटदाराने द्यावयाचा संच मांडणीचा चाचणी अहवाल, पूर्तता प्रमाणपत्र, दि.07.12.2007 रोजीची पावती, दि.15.09.2003 रोजीचे लाईट बिल, दि.13.04.2005 रोजीची पावती, वीज पुरवठा जागा बदलेल्‍या अर्जाबद्दल पत्र दि.15.07.2006, दि.30.03.2009, 05.02.2009 रोजीची पावती, मिटर टेस्‍टींग लॅबोरेटररी चे दि.21.12.2007 रोजीचे पत्र, सन कॅपॅसिटरचे दि.21.12.2007 रोजीचे पत्र, दि.07.12.2009 रोजीची पावती, दि.19.12.2009 व दि.20.03.08, दि.11.12.2008, दि.16.12.2008 रोजीची पावती, दि.31.03.2009 रोजीचे बिल, दि.07.01.2010 रोजीची वीज पुरवठा खंडित करणेबाबतची नोटीस, ग्रुप ग्रामपंचायत तारळे यांचा दि.24.09.2010 रोजीचा दाखला, दि.10.09.2010 रोजीचा सहाय्यक निबंधक यांचा दाखला इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5)        सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तक्रारदारांची तक्रार खोटी व चुकीची असल्‍याने फेटाळणेत यावी असे कथन केले आहे. तसेच, ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांना दिलेली देयके ही योग्‍य आहेत. तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला वीज कंपनीच्‍या अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, कोल्‍हापूर यांनी दि.08.09.2006 रोजी दिलेल्‍या आदेशाविरुध्‍द ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्‍हापूर परिमंडल यांचेकडे ग्राहक तक्रार अर्ज नं.36/2009 ने तक्रार अर्ज दाखल केलेला होता. सदरचा तक्रार अर्ज दि.04.08.2009 रोजी फेटाळणेत आला व अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, कोल्‍हापूर यांनी दिलेला आदेश कायम करणेत आला. तक्रारदारांनी ग्राहक तक्रार अर्ज क्र.36/09 मधील आदेशाविरुध्‍द नाराज होवून विद्युत लोकपाल, महाराष्‍ट्र राज्‍य, इलेक्ट्रिसिटी रेग्‍युलेटरी कमिशन (MERC) मुंबई यांचेकडे प्रातिनिधीक स्‍वरुपात अपिल नं.120/2009 ने अपिल दाखल केले आहे. प्रस्‍तुतचे अपिल गुण-दोषावर चालून तक्रारदार यांचे अपिल दि.09.12.2009 रोजी नामंजूर करणेत आले आहे. प्रस्‍तुत कामी पूर्वी झालेले आदेश कायम करणेत आले आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द दाखल केलेल्‍या तक्रार अर्जातील व प्रस्‍तुत तक्रार अर्जा‍तील विषय हा एकच आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार चालविणेचा अधिकार या मंचास येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ ग्राहक तक्रार निवारण कक्ष, मंडळ कार्यालय, कोल्‍हापूर यांचा दि.07.05.2009 रोजीचा आदेश, अंतर्गत ग्राहक तक्रार मंच अर्ज क्र.36/09 मधील दि.04.08.2009 रोजीचा आदेश, विद्युत लोकपाल-मुंबई यांचे कोर्टात तक्रारदारांनी दाखल केलेले अपिल नं.120/09 मधील दि.09.12.2009 चा आदेश, तक्रारदार यांच्‍या टप्‍पा क्र.1 चे ग्राहक वीज बिल खातेउतारा, सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे व्‍याज कमी करणेबाबत दिलेला प्रस्‍ताव, सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे वीज भार कमी केले दरम्‍यान वीज बिल कमी करणेस दिलेला दि.30.05.2007 रोजीचा प्रस्‍ताव, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.3 यांचेकडे वीज बिल हप्‍त्‍याने भरणेकरिता दिलेला दि.07.01.2010 रोजीचा अर्ज, तक्रारदार संस्‍थेचे बिल खाते उतारा (सी.पी.एल्.), तक्रारदार संस्‍थेचे वीज कनेक्‍शन क्र.2 चा वीज बिल उतारा (सी.पी.एल्.), दत्‍त सह. पाणी पुरवठा यांचा वीज बिल उतारा (सी.पी.एल्.), दि.30.10.2009 रोजीचे टप्‍पा क्र.1 चे बिल इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(7)        या मंचाने उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उपस्थित केलेल्‍या वादाविषयी तक्रारदार संस्‍थेने सामनेवाल वीज कंपनीच्‍या ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्‍हापूर परिमंडल यांचेकडे ग्राहक तक्रार अर्ज नं.36/2009 ने तक्रार अर्ज दाखल केलेला होता. सदरचा तक्रार अर्ज दि.04.08.2009 रोजी फेटाळणेत आला व अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, कोल्‍हापूर यांनी दिलेला आदेश कायम करणेत आला. तक्रारदारांनी ग्राहक तक्रार अर्ज क्र.36/09 मधील आदेशाविरुध्‍द नाराज होवून विद्युत लोकपाल, महाराष्‍ट्र राज्‍य, इलेक्ट्रिसिटी रेग्‍युलेटरी कमिशन (MERC) मुंबई यांचेकडे प्रातिनिधीक स्‍वरुपात अपिल नं.120/2009 ने अपिल दाखल केले आहे. प्रस्‍तुतचे अपिल गुण-दोषावर चालून तक्रारदार यांचे अपिल दि.09.12.2009 रोजी नामंजूर करणेत आले आहे. प्रस्‍तुत कामी पूर्वी झालेले आदेश कायम करणेत आले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 मधील तरतुदीचा विचार करता तसेच, सामनेवाला वीज कंपनीचे अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, कोल्‍हापूर यांचेकडील कामकाज हे अर्ध-न्‍यायिक स्‍वरुपाचे आहे याचा विचार करता तक्रारदार संस्‍थेने यापूर्वी सामनेवाला कंपनीच्‍या अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, कोल्‍हापूर यांचेकडे तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्‍हापूर परिमंडल यांचेकडे व तदनंतर विद्युत लोकपाल, महाराष्‍ट्र राज्‍य, इलेक्ट्रिसिटी रेग्‍युलेटरी कमिशन (MERC) मुंबई यांचेकडे ज्‍या कारणावरुन दाद मागितली आहे, त्‍याच कारणावरुन पुन्‍हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 खाली तक्रारदार संस्‍थेस या मंचाकडे दाद मागता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
 
आदेश

1)    तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 

2)   खर्चाबाबत आदेश नाहीत.


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT