(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 30 मार्च 2011)
अर्जदार यांनी, सदर तक्रार, गैरअर्जदारांचे विरुध्द दाखल केली आहे. सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. सदर तक्रार, न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये समझौता झालेला आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपसी समझौता झाल्यामुळे अर्जदार आपली तक्रार मागे घेत आहे, या आशयाची संयुक्त पुरसीस नि.17 नुसार दि.30.3.2011 रोजी मंचात दाखल केली. अर्जदार यास, पुरसीस मधील मजकुरा बाबत विचारणा केली असता, त्यांनी समझौता झाल्यामुळे तक्रार काढून टाकण्यात यावे, असे सांगीतले.
... 2 ... (ग्रा.त.क्र.2/2011)
अर्जदार यांनी, नि.17 नुसार तक्रार परत घेतल्याने, तक्रार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज.
(By way of withdraw)
(2) अर्जदार, गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/3/2011.