(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 23 मे 2011)
अर्जदार यांनी, सदर तक्रार माहे डिसेंबर 2009, जानेवारी 2010, फेब्रूवारी 2010 व एप्रिल 2010 चे अवाजवी व चुकीची आकारणी केलेली बिले रद्द करण्यास व प्रत्यक्ष विज वापराप्रमाणे योग्य विद्युत बिल देण्यास, तसेच सदोष मिटर बदलवून त्याठिकाणी नविन मीटर लावून देण्यास, तसेच, माहे डिसेंबर 2009 च्या चुकीच्या बिलाची भरलेली रक्कम परत करण्यास, तसेच खंडीत केलेला विज पुरवठा पुर्ववत चालू करुन देण्याकरीता दाखल केली आहे.
... 2 ... (ग्रा.त.क्र.8/2011)
सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आला. तक्रार मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व गैरअर्जदार यांनी दि.30.4.2011 ला नि.10 नुसार तक्रार मागे घेण्याबाबत संयुक्त सहीने पुरसीस दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार आज हजर होऊन नि.11 नुसार सदर मामल्यात आपसी समझौता झाला असल्याने तक्रार मागे घेत आहे, या आशयाची संयुक्त पुरसीस दाखल केली. अर्जदारास, नि.10 व 11 चे पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केली असता तक्रार काढून टाकण्यात यावे असे सांगीतले.
अर्जदार यांनी नि.10 व 11 नुसार तक्रार मागे घेण्याची पुरसीस दाखल केल्यामुळे, तक्रार अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज.
( Complainant disposed by way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :- 23/05/2011.