Maharashtra

Nagpur

CC/11/547

Smt. Rati Dinesh Choube - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Exe.Engineer - Opp.Party(s)

Adv. Dinesh Choube

26 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/547
 
1. Smt. Rati Dinesh Choube
Vishram Nagar, Wardha Raod
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Exe.Engineer
Congress Nagar,
Nagpur
Maharashtra
2. Jr.Engineer, Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Ajani Sub-Station,
Napgur
Maharashtra
3. Exe.Engineer, Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Gaddigodam, Kamptee Road,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Dinesh Choube, Advocate for the Complainant 1
 ADV.A.M.QUAZI, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक :26/03/2012)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दि.22.09.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          यातील तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक असुन तीचा ग्राहक क्र.410010196713 असुन विजेचा वापर निवासी वापराकरीता  असुन ती नियमीतपणे देयके भरते. तक्रारकर्तीला दि.07.05.2011 ते दि.07.06.2011 पर्यंतचे देयक रु.17,760/- प्राप्‍त झाले, सदर देयक अवास्‍तव वाटल्‍यामुळे ते दुरुस्‍त करुन मिळण्‍याकरीता गैरअर्जदारांकडे अर्ज केला अस‍ता त्‍यांनी रु.16,010/- चे नव्‍याने देयक दिले व ते दि.23.06.2011 रोजी भरलेले आहे. त्‍यानंतर दि.07.06.2011 ते 07.07.2011 पर्यंतचे कालावधीचे रु.2,930/- त्‍यात मागील थकबाकी रु.17,586.86 दाखवून एकूण रु.20,930/- चे देयक दिले आहे. तक्रारकर्तीने, गैरअर्जदारास सदर देयकाची रक्‍कम कमी करण्‍याची विनंती केली व त्‍याप्रमाणे पत्र पाठविले. परंतु गैरअर्जदारांनी सदर पत्राची दखल घेतली नाही व रक्‍कमही कमी करुन दिली नाही तेव्‍हापासुन वादाचे कारण घडल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल करुन माहे जून-जुलै-2011 करीता दिलेल्‍या देयकाची रकमेत दुरुस्‍ती करण्‍याचे गैरअर्जदारांना निर्देश द्यावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावे व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
3.           तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 8 दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
4.          गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांना नोटीस बजावण्‍यांत आली असता त्‍यांनी मंचात हजर होऊन खालिल प्रमाणे आपला जबाब दाखल केलेला आहे.
 
            गैरअर्जदारांनी आपल्‍या जबाबात तक्रारकर्ती त्‍यांची ग्राहक असल्‍याची बाब मान्‍य केली असुन ती नियमीत देयके भरीत असल्‍याची बाब अमान्‍य केलेली आहे. तसेच त्‍यांचेतर्फे तक्रारकर्तीला रु.16,010/- चे विज देयक देण्‍यांत आले होते ते तिला मान्‍य असल्‍यामुळे त्‍याचा भरणा केल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्तीने दि.21.006.2011 चे पत्रानुसार मिटर तपासण्‍याची विनंती केली असता श्री. बाबुराव सुखराम भटकर, कनिष्‍ठ अभियंता हे मिटर तपासणीस गेले तेव्‍हा तक्रारकर्तीचे मिटर 47% संथगतीने फिरत असल्‍याचे आढळले म्‍हणून ते ताब्‍यात घेऊन तक्रारकर्तीस नवीन मिटर बदलवून देण्‍यांत आले. गैरअर्जदारांनी नमुद केले आहे की, त्‍यांनी परिपत्रक क्र.39 कॉम.सर्क्‍युलेशन नं.39 दि.21.07.2006 नुसार 47% मंदगती फरकाचे समायोजन करुन रु.15,479.75 ची आकारणी करण्‍यात आली असुन जुन ते जुलै-2011 च्‍या देयकात देण्‍यांत आले असुन ते देण्‍याची तक्रारकर्तीची जबाबदारी आहे. तक्रारकर्तीने केवळ जुलै-2011 चे देयक टाळण्‍याचे उद्देशाने सदर तक्रार दाखल केलेली असुन त्‍यांचे सेवेत कोणत्‍याही प्रकारची त्रुटी नसल्‍याचे नमुद करुन सदर तक्रार दंडासह खारिज करण्‍याची विनंती मंचास केलेली आहे.
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.03.03.2012 रोजी आली असता दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रकरण निकालाकरीता बंद करण्‍यांत आले. तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
                -// नि ष्‍क र्ष //-
 
6.          या प्रकरणातील गैरअर्जदारांचा लेखी जबाब पाहता त्‍यांचे असे निवेदन आहे की, त्‍यांनी श्री. बाबुराव सुखराम भटकर, कनिष्‍ठ अभियंता यांचे मार्फत सदर मिटरचे निरीक्षण केले असता ते 47% संथगतीने फिरत होते, त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्तीला मागिल कालावधीचे देयक दिले. वास्‍तविक पाहता तक्रारकर्तीच्‍या संबंधीत मिटरची तपासणी गैरअर्जदारांचे विद्युत निरीक्षणकाकडून करुन घेणे जेव्‍हा आवश्‍यक होते व त्‍याचा जो अहवाल येईल त्‍या आधारावर देयकाची आकारणी करणे गरजेचे असतांना त्‍यांनी तसे केले नाही व गैरअर्जदारांनी बसविलेले मिटर हे मुळात योग्‍य होते याबाबत बाबींही सिध्‍द केलेल्‍या नाही. तसेच गैरअर्जदारांनी योग्‍य पध्‍दतीचा अवलंब न करणे व चुकीची देयके देणे हीच त्‍यांचे सेवेतील त्रुटी आहे, करीता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला दिलेले रु.20,930/- चे विवादीत देयक रद्द    ठरविण्‍यांत येते.
3.    गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीकडे जे   नवीन मिटर लावलेले आहे, त्‍या नवीन मीटरचा पुढील एक वर्षाचे कालावधीत    जो वापर आलेला आहे. त्‍याच्‍या सरासरीप्रमाणे पुर्वीच्‍या कालावधीची आकारणी       करुन त्‍याप्रमाणे देयकांची मागणी तक्रारकर्तीकडे करावी, त्‍यानंतरची देयकांची       जबाबदारी तक्रारकर्तीची राहील, तसेच तक्रारकर्तीने जमा केलेली रक्‍कम देयकात समायोजीत करावी.
4.   गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीस       झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी     रु.2,000/-    अदा करावे.
5.    गैरअर्जदार तक्रारकर्तीकडून घेणे असलेली मागील रक्‍कम भविष्‍यकालीन देयकांत समायोजीत करु शकतील. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते     3 यांनी, आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन  30 दिवसांचे आंत करावी.
     
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.