Maharashtra

Bhandara

CC/15/57

Shri Ramesh Manikrao Sawarkar, Through Subhash Karemore - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Asst. Engineer - Opp.Party(s)

09 Aug 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/57
 
1. Shri Ramesh Manikrao Sawarkar, Through Subhash Karemore
R/o.Subhash Ward, Bela, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Asst. Engineer
Office - Shahapur, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 Aug 2016
Final Order / Judgement

श्री. हेमंतकुमार पटेरीया, सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये.

 

                         -  आ दे श -

                        (पारित दिनांकः 09 ऑगस्‍ट, 2016)

 

 

      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

  1.               तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक असून त्‍यांचा ग्राहक क्र. 436040007311 आहे. तक्रारकर्त्‍याने सदर ग्राहक क्रमांकाप्रमाणे वि.प.कडून 24.12.2014 मध्‍ये विज पुरवठा  घेतला आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याने दि.09.03.2015 ला राघोर्ते बोरवेल्‍स अँड पंप्स, भंडारा यांचेकडून 0.75 हॉ.पॉ. चा CRI कंपनीचा मोटरपंप विकत घेतला. तक्रारकर्त्‍याचे घराचे प्रत्‍यक्ष बांधकामास दि.15.03.2015 पासून सुरुवात केली. परंतू वि.प. यांनी देयक दि.17.03.2015 कालावधी 05.02.2015 ते 05.03.2015 पर्यंतचे रक्‍कम रु.1,720/- चे तक्रारकर्त्‍यावर बजावले. वि.प.चे प्रतिनीधी श्री. फालके, लाईनमन यांनी विजेच्‍या देयकाचा भरणा करण्‍याकरीता रु.1,000/- नेले, पंरतू भरणा केल्‍याबाबतची रीतसर पावती दिली नाही.   

 

                  वि.प.कडून तक्रारकर्त्‍यास दि.17.04.2015 ला 05.03.2015 ते 05.04.2015 या कालावधीचे रु.2,760/- चे आणि 05.04.2015 ते 05.05.2015 कालावधीचे रु.3,820/- चे  विजेचे देयक प्राप्‍त झाले.   

 

                  उपरोक्‍त विजेचे देयक जास्‍त असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.28.04.2015 रोजी सहाय्यक अभियंता यांना संबंधित बिलाबद्दल विचारणा केली असता त्‍यांनी मिटर फॉल्‍टी असू शकते असे सांगितले. तक्रारकर्त्‍याने दि.29.04.2015 रोजी वि.प.ला मिटर चाचणीकरीता व स्‍पॉट व्‍हेरिफिकेशनकरीता अर्ज केला. वि.प.च्‍या कर्मचा-यांनी दि.16.05.2015 ला जुने मिटर काढून त्‍याचदिवशी नविन मिटर जोडले. तक्रारकर्त्‍याला दि.05.05.2015 ते 05.06.2015 पर्यंतचे विज देयक प्राप्‍त न झाल्‍याने तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त कालावधीचे ड्युप्‍लीकेट देयक वि.प.कडून घेतले. तक्रारकर्त्‍याला देयक दि.15.07.2015 ला रु.25,290.94 चे विजेचे देयक प्राप्त झाले. सदर देयकामध्‍ये विज वापर हा 15 युनिट दर्शविण्‍यात आला होता.   याआधिचे देयक हे वापरापेक्षा अधिक रकमेचे असल्‍याने तक्रारकर्त्‍याusने त्‍याचा भरणा dन करता सदर देयकाची पडताळणी करावी अशी विनंती वि.प.ला केली, परंतू वि.प.ने त्‍यास प्रतिसाद न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

                           वि.प. यांनी विवादित देयकाची रक्‍कम माफ करुन शारिरीक         व मानसिक त्रासापोटी रु.20,000/-  तक्रारकर्त्‍यास द्यावे.

 

               तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ विद्युत देयकांच्‍या बिलाच्‍या प्रती, अर्ज, मिटर टेस्‍टींग बिल असे दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

  1.               वि.प. यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. त्‍यांचा कायदेशीर आक्षेप असा कि, तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या तक्रारीत महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लिमि., यांना विरुध्‍द पक्ष म्‍हणून जोडले नसून कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना वि.प. दर्शवून त्‍यांच्‍याविरुध्‍द सदरची तक्रार दाखल केलेली आहे. वि.प. हे स्‍वतंत्र अस्तित्‍व असलेले व्‍यक्‍ती असून एम एस ई डी सी एल ही स्वतंत्र कायदेशीर अस्तित्‍व असलेली कंपनी सेवादाता (Service Provider) असल्‍याने सदर सेवादाता कंपनीस सदर तक्रारीत विरुध्‍द पक्ष न केल्‍याने सदरची तक्रार कायद्याने चालणारी नाही. तसेच सदरची तक्रार ग्राहक तक्रार नाही.

 

                              वि.प.चे पुढे म्‍हणणे असे की, तक्रारकर्ता वि.प.चे ग्राहक आहे.                   वि.प.चे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचे नविन घर बांधकामासाठी                   फेब्रुवारी 2015 मध्‍ये (कालावधी 05.02.2015 ते 05.03.2015) विज वापरली                      आहे त्‍या अनुषंगाने देयक त्‍यांना देण्‍यात आले. थकबाकी जास्‍त झाल्‍याने                               MSEDCL चे प्रतिनीधीने तक्रारकर्त्‍याला विज बिल भरावयास सांगितले.                                तक्रारकर्त्‍याने अधिक रकमेचे थकबाकी असलेले बिल भरण्‍यास असमर्थता                                     दर्शविली. तक्रारकर्त्‍याने रु.1,000/- विज देयक भरण्‍याकरीता वि.प.च्‍या                           प्रतिनीधीला दिले. रु.1,000/- चा भरणा वि.प.ने स्विकारला आहे.

 

                              तक्रारकर्त्‍याचे विनंतीनुसार जुने इलेक्‍ट्रीक मिटर क्र. 870179                     काढून नविन मिटर क्र. 4277298 बसविण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने विज                                     वापराचे बिल भरलेच नसल्‍याने जुलै 2015 पर्यंतचे रु.25,730/- चे विज बिल                            थकबाकीसह तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आल्‍याचे वि.प.ने मान्‍य केले आहे. वि.प.चे                          म्‍हणणे असे की, स्‍पॉट व्‍हेरीफिकेशन केल्‍यावर तक्रारकर्त्‍याने विजेचा वापर हा                      घराचे बांधकामासाठी केल्‍याचे दिसून आले. तक्रारकर्त्‍याने विज बिल कमी                            करण्‍यासाठी विनंती केली. परंतू तक्राकर्त्‍याने विजेचा वापर केलेला असल्‍याने                    तो मिटर रीडींगप्रमाणे विजेचे देयक भरण्‍यास जबाबदार आहे, म्‍हणून विजेचे              बिल कमी करता येत नाही. तक्रारकर्त्‍याने विजेचे बिल न भरल्‍याने थकबाकी                  वाढली आहे. तक्रारकर्त्‍याने प्रत्यक्ष वापरलेले विज बिल भरण्‍याची जबाबदारी               टाळण्‍यासाठी खोटी तक्रार केली असल्‍याने ती खारीज करावी अशी विनंती                                     वि.प.ने केली आहे.

 

                       3.                 तक्रारकर्त्‍याचे व वि.प.चे कथनावरुन खालील मुद्दे                             विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा                    खालिलप्रमाणे.

 

            मुद्दे                                      निष्‍कर्ष

 

 

  1. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या सेवादाता

कंपनीला तक्रारीत विरुध्‍द पक्ष म्‍हणून सामिल न केल्‍याने

              (Misjoinder of parties)तक्रार खारिज होण्‍यास पात्र आहे काय ?     नाही.

2) वि.प.ने न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केलेला आहे काय ?               होय.

3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?        अंशतः

4) आदेश काय ?                                अंतिम आदेशाप्रमाणे. 

 

                                              

-  कारणमिमांसा  -

 

 

4.          मुद्दा क्र.1 बाबतविरुध्‍द पक्षाचे अधिवक्‍ता श्री. निर्वाण यांचा युक्‍तीवाद असा कि, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कं.लि. (MSEDCL) ही कायद्याने अस्तित्‍वात आलेली स्‍वतंत्र व्‍यक्‍ती  (Juristic Person) आहे. सदर कंपनी विज वितरणाचा व्‍यवसाय करीत असून तक्रारकर्ता सदर कंपनीचा विज ग्राहक आहे. वि.प. हे MSEDCL चे अधिकारी असले तरी तक्रारकर्ता व त्‍यांचेमध्‍ये ग्राहक आणि सेवादाता असा संबंध नाही व त्‍यांचेकडून सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही. सदर तक्रारीत विज सेवा पुरविणा-या MSEDCL ला विरुध्‍द पक्ष म्‍हणून सामिल केलेले नसल्‍याने केवळ वि.प. विरुध्‍द दाखल केलेली सदरची तक्रार कायद्याने चालू शकणारी   (Maintainable) नाही. आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍ट्यर्थ  त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयाचा दाखला दिलेला आहे.

 

F.A.No. A/06/1672, Mr. Vasant Chintaman Kshirsagar vs. Dy. Div. Engineer, MSEB (decided on 04.01.2012)  

 

सदर प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने Dy. Div. Engineer, MSEB, Nashik यांच्‍याविरुध्‍द विज पुरवठा पूर्ववत जोडून द्यावा यासाठी दाखल केलेली तक्रार जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने खारीज केली होती. सदर आदेशाविरुध्‍द तक्रारकर्त्‍याने मा. राज्‍य आयोगाकडे केलेले अपील खारीज करतांना राज्‍य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“In the instant case, though the consumer complaint was filed for alleged deficiency in disconnecting the electricity supply of the complainant without notice, the consumer complaint would lie at the most against electricity Supply Company. The complaint is not filed against it. Dy. Divisional Engineer of said company is certainly an independent, separate and distinct juristic person than the company itself in view of Sec. 2 (1) (m) of the Consumer Protection Act, 1986. Said company is not a party to the dispute. Under the circumstances, the dismissal of the consumer complaint with penal cost cannot be faulted with and thus. We find that appeal is devoid of any substance.”

                        

 

                  सदर प्रकरणातदेखील सहाय्यक अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लिमिटेड, शाखा शहापूर, जि. भंडारा यांना विरुध्‍द पक्ष केले असले तरी MSEDCL यांना विरुध्‍द पक्ष केले नसल्‍याने वरील निर्णयाचे आधारे तक्रार खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे अधिवक्‍ता श्री. निर्वाण यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले.

 

5.                याऊलट, तक्रारकर्त्‍याचे प्रतिनीधी सुभाष कारेमोरे यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले कि, MSEDCL ही सेवादाता कंपनी विज वितरणाची सेवा पुरविण्‍याचा व्‍यवसाय करीत असली तरी ती सजीव व्‍यक्‍ती नसून केवळ  Juristic Person असल्‍याने विरुध्‍द पक्ष हेच सदर कंपनीच्‍या वतीने विज वितरण व विज बिल वसुलीचे काम करतात, म्‍हणून MSEDCL साठी सदर तक्रारीत त्‍यांना वि.प. म्‍हणून दर्शविले आहे. त्‍यामुळे तक्रारीत किंवा वि.प.च्‍या बचावात कोणताही गुणात्‍मक बदल झालेला नाही. ग्रा.सं.अ.चे कलम 2 (1) (m) मध्‍ये दिलेल्‍या व्‍याख्‍येप्रमाणे Person या संज्ञेत, फर्म, अविभक्‍त हिंदू कुटूंब, सहकारी संस्‍था आणि व्‍यक्‍तींचा अन्‍य समुह समाविष्‍ट असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू फर्म किंवा कंपनीचे प्रतिनिधीत्‍व कोणी करावे हे स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍यामुळे वि.प.सहाय्यक अभियंता, यांना MSEDCL कं. चे प्रतिनीधी दर्शवून दाखल केलेल्‍या तक्रारीस कोणतीही कायदेशीर बाधा पोचत नाही.

 

6.                उभय पक्षांचा युक्‍तीवाद आणि दाखल दस्‍तऐवजांचा विचार करता असे दिसून येते कि, MSEDCL ही Juristic Person असली तरी ती सजिव व्‍यक्‍ती नसल्‍याने भंडारा जिल्‍ह्यात तिचे विज वितरण व बिल वसुली इ. कार्य सहाय्यक अभियंताचे मार्फतीनेच करीत असते. म्‍हणून केवळ MSEDCL ला विरुध्‍द पक्ष दर्शवून सदर तक्रारीची कारवाई पूर्ण करता आली नसती म्‍हणून MSEDCL चे भंडारा जिल्‍ह्यातील Principal Officer असलेल्‍या सहाय्यक अभियंता, यांना MSEDCL भंडारासाठी तक्रारीत वि.प. म्‍हणून जोडले आहे. जर MSEDCL ला विरुध्‍द पक्ष म्‍हणून दाखविले असले तरी तिचा विरुध्‍द पक्ष म्‍हणून खालीलप्रमाणेच उल्‍लेख करावा लागला असता - 

 

MSEDCL

मार्फत सहाय्यक अभियंता,

शहापूर, जि. भंडारा

 

याऐवजी सदर तक्रारीत -

 

सहाय्यक अभियंता,

MSEDCL

 

असे वि.प.चे नाव नमूद केले असल्‍याने MSEDCL च्‍या बचावात कोणताही गुणात्‍मक फरक पडत नाही व केवळ तेवढ्याच तांत्रिक कारणाने तक्रारकर्त्‍याची ग्राहक तक्रार Non-joinder   किंवा Mis-joinder of necessary parties च्‍या तत्‍वाने खारीज करता येणार नाही. अशा तांत्रिक कारणाने तक्रार खारीज केल्‍यास ते नैसर्गिक न्‍यायाच्‍या व ग्राहक हिताच्‍या विरुध्‍द होईल, म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

 

7.    मुद्दा क्र. 2 बाबत -  सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने ग्राहक क्रमांक           436040007311 प्रमाणे विज पुरवठा डिसेंबर 2015 मध्‍ये घेतला, तेव्‍हा त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या खाली प्‍लॉटवर घराच्‍या बांधकामासाठी वि.प. MSEDCL यांनी मिटर क्र. 3900870179 लावून दिला. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे की, त्‍याच्‍या खाली प्‍लॉटवर 24.12.2014 ला विज जोडणी घेतली आणि 25.03.2015 पासून बांधकामास सुरुवात केली. वि.प.च्‍या मिटर रीडरने प्रत्‍यक्ष मिटर तपासणी करुन वापरलेल्‍या युनिटची नोंद न घेता कधी कुलूप बंद तर कधी इनएक्‍सीसीबल दाखवून मार्च 2015, एप्रिल, 2015 आणि मे. 2015 मध्‍ये सरासरी 100 युनिटचे बिल दिले. तक्रारकर्त्‍याचे घरी लावलेला मिटर सदोष असल्‍याने तक्रारकर्त्‍याने दि.29.04.2015 रोजी वि.प.कडे दस्‍तऐवज क्र. 10 प्रमाणे अर्ज केला. वि.प.ने सदर मिटर दि.16.05.2015 रोजी तपासणीसाठी काढून नेला त्‍यावेळी रीडींग 100 (इनअॅसेस) युनिट होते. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे घरी नविन मिटर क्र. 58-04277298 लावला. सदर मिटरचे माहे जुलै 2015 ते ऑगस्‍ट 2016 चे मिटर रीडींग (विज वापर युनिट) खालील तक्‍यात नमूद केले आहे.   

 

  

 

देयक दिनांक

  •  

मिटर क्रमांक

एकूण विज वापर

पूर्णाक देयक

  1.  

05.02.2015 ते 05.03.2015

  1.  

100 युनिट (locked)

  1.  
  1.  

05.03.2015 ते 05.04.2015

  1.  

100 युनिट (Inacess)

  1.  
  1.  

05.04.2015 ते 05.05.2015

  1.  

100 युनिट (Inacess)

  1.  
  1.  

05.05.2015 ते 05.06.2015

  1.  

2498 युनिट

  1.  
  1.  

05.06.2015 ते 05.07.2015

  1.  

15 युनिट

  1.  
  1.  

05.07.2015 ते 05.08.2015

  1.  

19 युनिट

  1.  
  1.  

05.08.2015 ते 05.09.2015

  1.  

12 युनिट

  1.  
  1.  

06.09.2015 ते 06.10.2015

  1.  

13 युनिट

  1.  
  1.  

06.10.2015 ते 06.11.2015

  1.  

36 युनिट

  1.  
  1.  

04.11.2015 ते 04.12.2015

  1.  

45 युनिट

  1.  
  1.  

Upto 17.03.2016

  1.  

67 युनिट

  1.  
  1.  

Upto 18.04.2016

  1.  

109 युनिट

  1.  
  1.  

Upto 17.05.2016

  1.  

131 युनिट

  1.  
  1.  

Upto 16.06.2016

  1.  

139 युनिट

रु.33,900/-

  1.  

Upto 18.07.2016

  1.  

107 युनिट

रु.34,950/-      

 

          तक्रारकर्त्‍याच्‍या घरी जून, 2015 मध्‍ये लावलेल्‍या मिटरच्‍या अचूकतेबद्दल उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याचे प्‍लॉटवर डिसेंबर, 2014 मध्‍ये मिटर लावल्‍यापासून मे, 2015 पर्यंत एकूण विज वापर 2498 युनिट म्‍हणजे दरमहा सरासरी  500 सुनिट आकारलेला आहे. वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा मिटर 15.06.2015 रोजी तपासणीसाठी काढून नेला. मात्र त्‍याची तपासणी 22.07.2015 रोजी केली आहे आणि मिटर 5.04 टक्‍के कमी गतीने चालत असल्‍याचे नमूद केले आहे. मात्र मिटर तपासणीचे वेळी हजर राहण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याला कोणतीही नोटीस दिली असल्‍याबाबत वि.प.ने पुरावा दाखल केलेला नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याच्‍या अपरोक्ष केलेली मिटर तपासणी व त्‍याचा अहवाल ग्राह्य धरता येणार नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍यास सदोष मिटर रीडींगवर आधारित बिलाची मागणी करण्‍याची आणि तक्रारकर्त्‍याने सदर बिल योग्‍य विज वापराप्रमाणे दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती करुनही ते दुरुस्‍त करुन न देण्‍याची वि.प.ची कृती निश्चितच विज ग्राहकाप्रती सेवेतील न्‍यूनता आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

 

8.          मुद्दा क्र. 3 व 4 बाबत – मुद्दा क्र. 1 च्‍या विवेचनात नमूद केल्‍याप्रमाणे 24 डिसेंबर 2014 पासून मे, 2015 पर्यंतच्‍या विज वापराची प्रत्‍यक्ष परिगणना करण्‍यासाठी मंचाकडे कोणतीही सामुग्री उपलब्‍ध नाही. परंतू तक्रारकर्त्‍याने घर बांधणीसाठी केलेला विज वापर लक्षात घेता वरील तक्‍त्‍यांत नमूद शेवटच्‍या 5 महिन्‍यांचा सरासरी विज वापर 110 युनिट लक्षात घेता त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विज पुरवठा घेतल्‍यापासून म्‍हणजे जानेवारी, 2015 ते मे, 2015 या पाच महिन्‍यांचा सरासरी मासिक विज वापर 110 युनिट गृहित धरुन जानेवारी, 2015 ते 5 जून, 2015 या कालावधीचे पाच महिन्‍याचे सुधारीत विज देयक देण्‍याचा व दि. 17 जूलै, 2015 चे 2498 युनिटचे विज देयक रद्द करण्‍याचा वि.प.ला आदेश देणे न्‍यायोचित होईल, म्‍हणून मुद्दा क्र. 3 व 4 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत. 

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.           

 

- आ दे श  -

 

 

       तक्रारकर्त्‍याची  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत तक्रार       वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्‍तीकरीत्‍या खालीलप्रमाणे  अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

1)     वि.प.यांनी तक्रारकर्त्‍याचे 24.12.2014 ते 05.06.2015 या       कालावधीचे   मासिक सरासरी 110 युनिटचे विज वापराचे नविन बिल तक्रारकर्त्‍यास    द्यावे आणि दि.17.06.2015 रोजीचे 2498 युनिटचे बिल रद्द करावे..    

2)    वरीलप्रमाणे वि.प.ने दिलेल्‍या 24.12.2014 ते 05.06.2015 या   कालावधीच्‍या दिलेल्‍या बिलाचा भरणा तक्रारकर्त्‍याने  सदर बिल प्राप्‍त झाल्‍यापासून सात दिवसांचे आत करावा.

 3)   सदर आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विज बिलाचा भरणा केल्‍यास    वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा विज पुरवठा खंडित करु नये. 

 4)   वि.प.ने तक्रारकर्त्‍यास शारिरीक मानसिक त्रासाबाबत नुकसान     भरपाईदाखल  रु.3,000/- आणि सदर तक्रारीच्‍या खर्चादाखल   रु.2,000/-   द्यावे. 

 5)   वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून एक      महिन्‍याचे आत करावी.

 6)   उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 7)   तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.  

 

 

 

       

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.