Maharashtra

Bhandara

CC/15/65

Beniram Lalu Parbate - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Asst. Engineer - Opp.Party(s)

Adv. N.P. Rahangdale

15 Jul 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/65
 
1. Beniram Lalu Parbate
R/o. Rajapur, Post - Chikhabasti, Tah. Tumsar, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Asst. Engineer
Gobarwahi, Tah. Tumsar, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd., Through Dy. Exe. Engineer (O & M)
Sub Division, Tumsar, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

आ दे श -

      (पारित दिनांक - 15 जुलै, 2016)

 

 

            तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

  1.        तक्रारकर्ता हा शेतकरी असून शेतीला पाणी पुरवठा करण्‍यासाठी वि.प.कडून मिटर क्र. 7607194741 अन्‍वये 3 एच.पी. विद्युत पंपासाठी विज पुरवठा घेतला आहे.

 

 

            माहे सप्‍टेंबर 2011 मध्‍ये सदर मिटरमध्‍ये बिघाड झाला त्‍याची सुचना तक्रारकर्त्‍याने वि.प.ला देऊनही मिटर दुरुस्‍त करुन किंवा बदलवून देण्‍यात आले नाही. मिटर नादुरुस्‍त असल्‍याची वि.प.ला माहिती असूनही तो दुरुस्‍त न करता “faulty meter”  दर्शवून 1200 ते 1800 युनिट विज वापर दर्शवून वि.प. तक्रारकर्त्‍यास बिलाची मागणी करु लागले. दि.25.07.2012 रोजी रु.2,090/- चे बिल वि.प.ने तक्रारकर्त्‍यास पाठविले.

 

 

                                                दि.12.09.2012 रोजी वि.प.ने तक्रारकर्त्‍यास कळविले कि, मिटरचा एक पाईंट जळाला असून नविन मिटरसाठी रु.3,110/- चा भरणा करावा. सदरची मागणी बेकायदेशीर असल्‍याने तक्रारकर्त्‍याने 06.10.2012 रोजी अधिवक्‍ता श्री. राहांगडाले यांचेमार्फत नोटीस पाठवून मिटर बदलवून देण्‍यास व अवास्‍तव बिल रद्द करुन वास्‍तविक वापराप्रमाणे विज बिल दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली परंतू वि.प.ने नोटीसची पूर्तता केली नाही. त्‍यानंतर वेळोवेळी तक्रारकर्ता नादुरुस्‍त मिटर बदलवून देण्‍याची मागणी करु लागला परंतू वि.प.ने ते दुरुस्‍त केले नाही किंवा बदलवून दिले नाही आणि प्रत्‍येक बिलात अवास्‍तव विज वापर व थकबाकी दर्शवून बिलाची मागणी करीत आले. सदर मिटरचा वापर बंद असतांना दि.29.04.2015 रोजी वि.प.ने थकबाकीसह अवास्‍तव विज वापर दर्शवून रु.19,150/- चे बिल तक्रारकर्त्‍यास पाठविले. वि.प.ची सदरची कृती बेकायदेशीर असून सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब असल्‍याने तक्रारकर्त्‍याने खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

  1. वि.प.ने तक्रारकर्त्‍यास जळालेला मिटर क्र. 7607194741 दुरुस्‍त करुन   द्यावा किंवा त्‍याऐवजी नविन मिटर लावून देण्‍याचा आदेश व्‍हावा.  
  2. Faulty meter चा अवास्‍तव व विज वापर दर्शवून पाठविलेले बिल रद्द करुन      मिटर नादुरुस्‍त होण्‍यापूर्वी जो विज वापर होता त्‍याप्रमाणे बिलाची      आकारणी करण्‍याचा वि.प.ला आदेश द्यावा.
  3. शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.25,000/- देण्‍याचा वि.प.ला आदेश व्‍हावा.
  4. तक्रारीच्‍या खर्च रु.10,000/- मिळावा.

 

 

            तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ कनिष्‍ठ व सहाय्यक अभियंता, तुमसर यांना पाठविलेल्‍या पत्रांच्‍या प्रती व पोचपावत्‍या, ज्‍युनियर इंजिनियर, गोबरवाही यांना पाठविलेल्‍या पत्रांच्‍या प्रती व पोचपावत्‍या, विद्युत देयकांच्‍या बिलाच्‍या प्रती, पोस्‍टाची पावती, पोचपावत्‍या असे दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

  1.        वि.प.क्र. 1 व 2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे.

 

            वि.प.चा प्राथमिक आक्षेप असा कि, तक्रार मुदतबाह्य असल्‍याने ती चालविण्‍याची मंचाला अधिकार कक्षा नाही.

 

            तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने वि.प.कडून 3 एच.पी. विज पंपास विज जोडणी घेतली असून तो वि.प.चा ग्राहक असल्‍याचे मान्‍य केले आहे. तसेच सदर विज जोडणीसाठी तक्रारकर्त्‍याने वि.प.ने मिटर क्र. 7607194741 दिला असून सदर मिटरचा एक पाईंट जळाला असल्‍याचे व त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने वि.प.ला कळवून मिटर दुरुस्‍त करुन द्यावे किंवा नविन मिटर बदलवून द्यावे अशी विनंती केली असल्‍याचे मान्‍य केलेले आहे. वि.प.चे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍यांचा जळालेला मिटर बदलवून देण्‍यासाठी मिटरची किंमत रु.3,110/- भरणा करण्‍याबाबत वि.प.ने दि.12.09.2012 रोजी लेखी कळविले. परंतू तक्रारकर्त्‍याने सदर रकमेचा भरणा केला नाही म्‍हणून जळालेला मिटर बदलवून नविन मिटर देता आला नाही. तक्रारकर्त्‍याचा सदर मिटरवरुन विज वापर पूर्ण बंद असल्‍याचे वि.प.ने नाकबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, मिटर जळालेला असल्‍याने प्रत्‍यक्ष विज वापर नोंदला जात नाही म्‍हणून Faulty meter चे सरासरी विज वापराचे बिल तक्रारकर्त्‍यास देण्‍यांत येते. मात्र तक्रारकर्त्‍याने बिल भरले नसल्‍याने थकीत बिलाची रक्‍कम वाढत असून 29.04.2015 रोजी तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या बिलात (तक्रारकर्त्‍याचा दस्‍तऐवज क्र. 25) 31.12.2014 ते 31.03.2015 या तिन महिन्यातील विज वापर 372 युनिट दाखवून त्‍याचे बिल रु.1028.39 इतकेच आकारले आहे. परंतू पूर्वीची थकबाकी रु.18,117.01 असल्‍याने बिलातील एकूण मागणी रु.19,150.00 इतकी दर्शविली आहे. थकीत बिलाची रक्‍कम देण्‍याची तक्रारकर्त्‍याची कायदेशीर जबाबदारी असून सदर बिलाची वि.प.ने केलेली मागणी कायदेशीर असल्‍याने त्‍याद्वारे सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही. देय असलेली नविन मिटरची व विज वापराची रक्‍कम बुडविण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केली असल्‍याने ती खारीज होण्‍यास पात्र आहे.   

 

 

      वि.प.ने आपल्या लेखी जवाबाचे पुष्‍ट्यर्थ ग्राहकाचे सी पी एल च्‍या प्रती व विद्युत बिलाच्‍या प्रती असे दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

  1. तक्रारकर्त्‍याचे व वि.प.क्र. 1 व 2 चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.

 

            मुद्दे                                              निष्‍कर्ष

 

1) तक्रार मुदतीत आहे काय ?                             होय.

2) वि.प.ने न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केलेला आहे काय ?            होय.

3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?    अंशतः

4) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.  

                                              

-  कारणमिमांसा  -

 

 

  1. मुद्दा क्र.1 बाबतविरुध्‍द पक्षाचे अधिवक्‍ता श्री. निर्वाण यांनी आपल्‍या  युक्‍तीवादात सांगितले कि, तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याचा मिटर सप्‍टेंबर 2011 मध्‍ये नादुरुस्‍त झाला आणि तो दुरुस्‍त करण्‍यासाठी किंवा बदलवून देण्‍यासाठी कळवूनही वि.प.ने तो बदलवून दिला नाही. त्‍यामुळे सदर तक्रारीस कारण नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये घडले असतांना दि.02.09.2015 रोजी म्‍हणून 4 वर्ष 9 महिन्यांची दाखल केलेली सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 ए प्रमाणे तक्रार दाखल करण्‍यासाठी निर्धारीत केलेल्‍या 2 वर्षाच्‍या मुदतीनंतर दाखल केली असल्‍याने मुदतबाह्य आहे म्‍हणून मंचाला सदर तक्रारीची दखल घेऊन चालविण्‍याची अधिकार कक्षा नाही.

 

            याऊलट, तक्रारकर्त्‍याचे अधिवक्ता श्री. राहांगडाले यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले की, तक्रारकर्त्‍यास विज पुरवठा देण्‍यासाठी वि.प.ने पुरविलेल्‍या मिटरची देखभाल व दुरुस्‍ती करण्‍याची जबाबदारी वि.प.ची आहे. त्‍यासाठी कोणताही खर्च देण्‍यास तक्रारकर्ता जबाबदार नसतांना वि.प.ने नविन मिटर लावण्‍यासाठी रु.3,110/- ची मागणी करणे आणि पैसे न दिल्‍याने मिटर आजपर्यंत बदलवून न देणे ही सेवेतील न्‍यूनता आहे. सदर मिटर Faulty असतांना 1800 युनिट इतका अवास्‍तव विज वापर दर्शवून बिलाची मागणी करणे वि.प.ने चालू ठेवले असून सदर रक्‍कम पुढील बिलात समाविष्‍ट करुन वि.प. अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा वापर करीत आहे. अवास्‍तव थकीत बिलासह एकूण रु.19150.00 चा भरणा करण्‍यासाठी वि.प.ने तक्रारकर्त्‍यास दि.29.04.2015 रोजी शेवटची बिल दिले असून तक्रारकर्त्‍याने तक्रारीत सदर बिलास आव्‍हान दिले आहे म्‍हणून तक्रारीस कारण नोव्‍हेंबर 2011 पासून 29.04.2015 पर्यंत व त्‍यानंतरही सतत घडत असल्‍याने दि.02.09.2015 रोजी दाखल केलेली सदर तक्रार मुदतीत आहे.   

 

 

            सदरच्‍या प्रकरणात सप्‍टेंबर 2011 मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या शेतावर लावलेला मिटर जळाला आणि त्‍याबाबतची माहिती तक्रारकर्त्‍याने वि.प.ला दिली परंतू वि.प.ने जळालेला मिटर बदलवून दिला नाही. एवढेच नव्‍हे तर जळाल्‍यामुळे मिटर विज वापर दाखवित नसतांना Faulty meter  दाखवून 30.09.2011 ते 31.12.2011 या कालावधीचे 1200 युनिटचे  रु.432/- चे बिल दि.27.01.2012 रोजी वि.प.ने तक्रारकर्त्‍यास दिले आहे. ते दस्‍तऐवज क्र. 10 वर तक्रारकर्त्‍याने दाखल केले आहे. सदर बिलात ‘मिटर रीडींगचे पाईंट जळले आहे बरोबर रीडींग दाखवित नाही’  असा शेरा वि.प.च्‍या कर्मचा-यांनी नमूद केला आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.21.05.2012 व 20.07.2012 रोजी अनुक्रमे दस्‍तऐवज क्र. 5 व 6 प्रमाणे जळालेला मिटर बदलवून योग्‍य विज वापराचे बिल द्यावे म्‍हणून विनंती केली परंतू वि.प.ने मिटर बदलण्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास 12.09.2012 रोजी रु.3,110/- चा भरणा करण्‍यास सांगितले.  त्‍याबाबत मागणी पत्र दस्‍तऐवज क्र. 11 वर आहे. परंतू तक्रारकर्त्‍याने नविन मिटरचे पैसे भरले नाही म्‍हणून वि.प.ने विज मिटर बदलवून दिले नाही आणि नादुरुस्‍त विज मिटरचे अंदाजे विज वापराचे बिल दिले. ते मान्‍य नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने विज बिलाचा भरणा केलेला नाही. वि.प.ने त्‍यानंतरही Faulty meter न बदलविता अंदाजे विज वापर दर्शवून दर तिमाहीचे बिल तक्रारकर्त्‍यास दिलेले आहे व ते तक्रारकर्त्‍याने न भरल्‍यामुळे सदर रक्‍कम थकीत दर्शवून पुढील कालावधीचे बिल दिलेले आहे. अशाप्रकारे नोव्‍हेंबर 2011 पासून आजपर्यंत वि.प.ने जळालेले विज मिटर बदलवून दिले नाही आणि तक्रारकर्त्‍यास प्रत्‍येकवेळी अंदाजे विज वापराचे बिल दिले असून सर्व थकीत रकमेसह दि.29.04.2015 रोजीच्‍या बिलाप्रमाणे (दस्‍तऐवज क्र. 25) चालू बिल रु.1028/- अधिक थकीत बिल रु.18117.01 अशी एकूण रु.19,150/- ची मागणी केलेली आहे.

 

            तक्रारकर्त्‍याच्‍या शेतावर लावलेला विज मिटर हा वि.प.चा आहे आणि तो नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये जळालेला असल्‍याने तक्रारकर्त्‍याचा योग्‍य विज वापर दर्शवून योग्य बिल काढण्‍यासाठी तो बदलविणे अनिवार्य आहे. जळालेला विज मिटर बदलण्‍याबाबतची कार्यपध्‍दती इलेक्‍ट्रीसिटी रुल्‍स 2007 मध्‍ये खालीलप्रमाणे दर्शविली आहे.

 

 

  •  

 

5.9 Cost of Replacement of Defective / Burnt Meters (a) 3(1) [The cost of replacement of meter shall be borne by the consumer or by the Licensee subject to following conditions:] (b) 3(3) [Deleted] (i) If, as a result of testing, it is established that the meter was burnt due to technical reasons viz. voltage fluctuation, transients etc. attributable to the Licensee the cost of the meter shall be borne by the Licensee. However, if it is established that the meter was burnt due to reasons attributable to the consumer viz. defect in consumer’s installation, connection of unauthorized load by the consumer etc. the cost shall be borne by the consumer. (ii) If it is established, as a result of testing, that the meter was rendered defective due to tampering or any other deliberate act by the consumer to interfere with the meter, the cost of the meter shall be borne by the consumer as above. The consumer shall be assessed under Section 126 of the Electricity Act 2003, and shall be punishable under Section 138 of the Electricity Act 2003. In addition, action as permissible under law shall be taken against the consumer for pilferage and tampering. 50 (c) In case the meter is found burnt and there is reason to believe that an official of the Licensee gave a direct connection, pending replacement of meter, a case of direct theft shall not be booked. Consumer’s complaint for replacement of burnt meter or the complaint regarding disruption in supply of energy shall be considered sufficient for this purpose. (d) In all cases of replacement of a meter, where cost is to be borne by the consumer, he shall have the option to procure the meter and associated equipment himself in accordance with clause 5.2 and 5.4.

 

 

वरील नियमाप्रमाणे ग्राहकाच्‍या तक्रारीवरुन मिटर जळाले असल्‍याचे विज कंपनीस कळाल्‍यानंतर जळालेले मिटर काढून नविन मिटर लावण्‍याची जबाबदारी विज वितरण कंपनीवर आहे. तसेच जर मिटर विद्यूत पुरवठयातील तांत्रिक दोषामुळे जळाले असेल तर नविन मिटर लावण्‍याचा खर्च विज वितरण कंपनीने सहन करावयाचा आहे. मिटर जर ग्राहकाच्‍या मिटरमधील अनावश्‍यक हस्‍तक्षेपामुळे जळाले असेल तर नविन मिटर लावण्‍याचा खर्च विज ग्राहकाने सहन करावयाचा आहे.

 

            सदरच्‍या प्रकरणात विज ग्राहकाच्‍या अनावश्‍यक हस्‍तक्षेपामुळे मिटर जळाले असेल वि.प.चे म्‍हणणे नाही. त्‍यामुळे विद्युत पुरवठयातील तांत्रिक दोषामुळे जळालेले मिटर बदलविण्‍याचा खर्च वि.प.ने सहन करणे आवश्‍यक आहे. मात्र वि.प.ने नविन मिटरच्‍या खर्चाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याकडे मागणी केली आणि त्‍याने ती दिली नाही म्हणून आजपर्यंत जळालेला मिटर बदलून दिला नाही. एवढेच नव्‍हे तर जळालेला मिटर प्रत्‍यक्ष विज वापर दाखवित नसतांना देखील  अवास्‍तविक विज वापर दर्शवून तक्रारकर्त्‍याकडून विज बिलाची मागणी वि.प. सतत करीत आलेला आहे आणि त्‍यासाठी थकीत विज बिलासह दि.29.04.2015 रोजी रु.19,150/- मागणी दस्‍तऐवज क्र. 25 अन्‍वये केलेली आहे म्‍हणून सदर तक्रारीस कारण नोव्‍हेंबर 2011 पासून सतत घडत असल्‍याने दि.09.09.2015 रोजी दाखल केलेली सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 ए प्रमाणे मुदतीत आहे. वरील कारणामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे. 

 

  1. मुद्दा क्र.2 व 3 बाबतइलेक्‍ट्रीसीटी रुल्‍स 2007 च्‍या नियम 5.9 प्रमाणे जर विद्युत पुरवठयातील तांत्रिक दोषामुळे मिटर जळाले असेल तर नविन मिटर लावण्‍याचा खर्च विज वितरण कंपनीने सहन करावयाचा आहे परंतू तसे न करता वि.प.ने सदर खर्च रु.3,110/- ची दस्‍तऐवज क्र. 11 प्रमाणे तक्रारकर्त्‍यास मागणी केली आहे आणि त्‍याने सदर खर्च न दिल्‍यामुळे मिटर न बदलविता अंदाजे विज वापर दर्शवून अवास्‍तविक विद्युत बिलाची मागणी केलेली आहे. सदरची बाब निश्‍चितच सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता जळालेले मिटर वि.प.च्‍या खर्चाने बदलवून मिळण्‍यास पात्र आहे.

 

 

जिथे मिटर जळाल्‍यामुळे योग्‍य रीडींग होऊ शकले नाही तिथे मिटर जळाल्‍यापासून नविन मिटर लावेपर्यंत बिलाची आकारणी कशी करावी हे इलेक्‍ट्रीसिटी रुल्‍स 2007 मध्‍ये खालीलप्रमाणे सांगितले आहे.

 

5.7 Meter (Including MDI) Not Recording (a) The consumer is expected to intimate the Licensee, as soon as he notices that meter has stopped / not recording. 49 (b) If during periodic or other inspection, meter is found to be not recording by the Licensee, or a consumer makes a complaint in this regard, the Licensee shall arrange to test the meter within 15 days. (c) If the meter is actually found not recording it shall be replaced within 15 days of the test. 3(4)[(d) The Consumer shall be billed, for the period between the date of last reading and the date of replacement of the defective meter, on the basis of average consumption and average maximum demand of three billing cycles prior to the last reading. The provisional bills, if any issued, shall be accordingly adjusted. ] (e) In cases where the recorded consumption of past three billing cycles prior to the date meter became defective is either not available or partially available, the consumption pattern as obtained from consumption of the new / repaired meter for three billing cycles shall be taken for estimation of consumption. 3(1) (f) [While calculating the average consumption, due consideration of seasonality of load shall be made and in such cases consumption of previous year for same period shall be taken. Due cognizance to consumption during closure of industry due to shut down /maintenance of plant shall be given by licensee after careful verification of records, or by ascertaining the consumption through check meters during such closure period.]  

 

                   

            वरील नियमाप्रमाणे सप्‍टेंबर 2011 मध्‍ये तक्रारकर्त्‍याचे विज मिटर जळाले असल्‍याने आक्टोबर 2011 ते वि.प.ने नविन मिटर लावेपर्यंतच्‍या कालावधीच्‍या विज वापराची परिगणना करतांना तक्रारकर्त्‍याचा एप्रिल 2011 ते सप्‍टेंबर 2011 मधील सरासरी विज वापर विचारात घेऊन त्‍याप्रमाणे प्रत्‍येक तिमाहीत होणा-या सरासरी विज वापराचे बिल वि.प.ने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश होणे न्‍यायोचित होईल. शिवाय तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मंजूर करणे न्‍याय्य होईल. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

- आ दे श  -

 

 

       तक्रारकर्त्‍याची  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्‍तीकरीत्‍या खालीलप्रमाणे     अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

1.     वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास ऑक्‍टोबर 2011 पासून आतापर्यंत   दिलेली सर्व विज बिले रद्द करुन, एप्रिल 2011 ते सप्‍टेंबर 2011 मधील     सरासरी विज वापर विचारात घेऊन त्‍याप्रमाणे ऑक्‍टोबर 2011 ते डिसेंबर      2011 आणि त्‍यापुढच्‍या प्रत्‍येक तिमाहीच्‍या कालावधीसाठी नव्‍याने बिल निर्गमित करावे आणि सदर बिल प्राप्त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत   तक्रारकर्त्‍याने न चुकता सदर बिलांचा भरणा करावा.  

 

2)    तक्रारकर्त्‍याचा जळालेला मिटर वि.प.ने स्‍व–खर्चाने बदलवून द्यावा. 

3)    वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍यास शारिरीक मानसिक त्रासाबाबत नुकसान       भरपाईदाखल  रु.3,000/- आणि सदर तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.2,000/-      द्यावे.

 

 

4)    वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून एक महिन्‍याचे    आत करावी.

5)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6)    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.  

 

 

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.