Maharashtra

Kolhapur

CC/11/315

Uttam Bhabutmal Parmar - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co. - Opp.Party(s)

P.B.Jadhav

06 Jan 2012

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/315
1. Uttam Bhabutmal Parmar290 C Bhausingji Road,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distribution Co.City Division,Zonal Office,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
M.B.Patil , Advocate for Opp.Party

Dated : 06 Jan 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06/01/2012) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकला.
 
           प्रस्‍तुतची तक्रार ही सामनेवाला यांनी चुकीच्‍या बिलाची आकारणी केली असलेने दाखल केली आहे.
          
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :- तक्रारदार रहात असलेले रेणूकाप्रसाद अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.2 मध्‍ये सामनेवाला यांचेकडून वीज कनेक्‍शन घेतले होते. त्‍याचा ग्राहक क्र.266516094222 असा आहे. तक्रारदाराने वेळोवेळी वीज देयके भरलेली आहेत. सामनेवाला यांनी वर नमुद वीज कनेक्‍शन कायम स्‍वरुपी बंद असलेल्‍या कालावधीमध्‍ये त्‍यांचे कर्मचा-यांनी अन्‍य त्रयस्‍त वीज ग्राहकाचे वीज रिडींग बेकायदेशीरपणे तक्रारदाराचे बीलामध्‍ये समाविष्‍ट करुन तक्रारदाराकडून जबरदस्‍तीने न वापरलेल्‍या वीज आकारापोटी रु.7,060/- वसुल केलेले आहेत. तसेच तक्रारदाराचे इतर मिळकतीमधील वीज कनेक्‍शन खंडीत करणेची धमकी दिलेली आहे. सदर रक्‍कम दि.01/1/2009 रोजी पावती क्र.एमआर-92776 अन्‍वये तक्रारदाराकडून भरुन घेतलेले आहेत. सदर बाब लक्षात आलेवर तक्रारदाराने सामनेवालांकडे बिलाचे दुरुस्‍तीबाबत दि.13/04/2009 व दि.05/11/2009 रोजी लेखी अर्ज देऊन सदर भरुन घेतलेल्‍या रक्‍कमेची मागणी केली. तक्रारदाराने वेळोवेळी सामनेवालांचे श्री कोळी, रेडेकर यांच्‍या सदर बाब लक्षात आणून देऊन तसेच सदर बाब प्रत्‍यक्षात घडलेचे निष्‍पन्‍न होऊनदेखील प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरण सामनेवाला यांनी केली नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवालांकडून तक्रारदारास विनावापर वीजची रक्‍कम रु.7,060/- तसेच वीज कनेक्‍शन खंडीत करणेची धमकी देऊन दिलेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.25,000/-, व्‍यवसायातील बहुमोल वेळ खर्च करुन सामनेवालांकडे फे-या माराव्‍या लागलेने वाहन पेट्रोलसह खर्च रु.3,500/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,500/- अशी एकूण रक्‍कम रु.41,060/- सामनेवालांकडून वसूल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3) तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ वीज बील, सामनेवाला यांचेकडे दिलेल्‍या तक्रारीच्‍या सत्‍यप्रती इत्‍यादी कागदपत्रे जोडलेली आहेत 
 
(4)        सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सिक्‍वेलमध्‍ये तक्रारदाराची थकबाकी होती. तक्रारदाराने 12/12/2007 मध्‍ये रु.140/- दि.09/04/2008 रोजी रु.410/- भरले त्‍यावेळी त्‍याचेकडून रु.2828.86पै. अधिक विलंब आकार 12.51 पै. असे एकूण 2841.37पै. इतके थकबाकी येणे होती. नोव्‍हेंबर-08 मध्‍ये विलंब आकारासहीत रु.7,057.20/- इतकी थकबाकी होती. सदर रक्‍कम न भागवलेने तक्रारदाराचा वीजपुरवठा बंद करणेत आला. तदनंतर दि.01/1/2009 रोजी तक्रारदाराने सामनेवालांकडे रु.7,060/- इतकी रक्‍कम भरली व वीज पुरवठा पुन्‍हा सुरु करणेबाबत अर्ज केला. त्‍यामुळे एप्रिल-09 पासून पुन्‍हा वीज कनेक्‍शन सुरु करुन दिले. तसेच मिटर दुरुस्‍त करुन पुन्‍हा जुलै-09 मध्‍ये बसवले त्‍यावेळी मागील बंद काळातील सरासरी युनिटमधील फरक काढून जुन-09 व जुलै-10 अनुक्रमे रु.1276.16पै. व रु.1687.42पै. इतकी क्रेडीट ऑग्‍स्‍टर-09 मध्‍ये दिलेली आहे. तदनंतर तक्रारदाराने वेळचेवेळी बील भरणेचे सुरु केले व त्‍याची कोणतीही माहिती न देता प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे. सामनेवाला यांनी अन्‍य कोणाही इसमाचे रिडींग घुसडलेले नाही. निव्‍वळ गैरसमजुतीने सदरचा अर्ज दाखल केला आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा व तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रु.5,000/- कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍टे देणेबाबत हुकुम व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ सीपीएल, दि.02/11/2011 रोजी तक्रारदारास पाठवलेले पत्र, रु.7,150/- जमा करुन दुरुस्‍त केलेल्‍या बीलाची अस्‍सल प्रत इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
 
(6)         तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे तसेच दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांनी केलेला युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निर्माण होतात.
 
1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                --- होय.
2) काय आदेश ?                                        ---शेवटी दिल्‍याप्रमाणे       
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदार रहात असलेले रेणूकाप्रसाद अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.2 मध्‍ये सामनेवाला यांचेकडून वीज कनेक्‍शन घेतले होते. त्‍याचा ग्राहक क्र.266516094222 असा आहे. सदर वीज कनेक्‍शनची देयके वेळोवेळी तक्रारदाराने भरलेली आहेत. दाखल सीपीएल वरुन मिटर ब्रॅन्‍ड नं.1 वर 76/315330785 तसेच 90315337786 अशा दोन क्रमांकाची नोंद केलेली आहे. पैकी तक्रारदाराचा मिटर ब्रॅन्‍ड नं. 76/315330785 आहे. सदर ब्रॅन्‍डवर कोणतीह थकबाकी दिसून येत नाही. मात्र तक्रारदाराचे नमुद कंझ्युमर नंबरवर सदर ब्रॅन्‍ड नंबर व्‍यतिरिक्‍त असणारा 90315337786 मिटर प्रमाणे बिलाची आकारणी केलेचे दिसून येते ही बाब दाखल सीपीएल वरुन निर्विवाद आहे. सबब त्रयस्‍त इसमाच्‍या मिटर रिडींगची आकारणी तक्रारदाराचे खातेवर केलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सदर घटना मानवी चुकीमुळे होऊ शकते. मात्र सदर चुकीची दुरुस्‍त करणेची संधी सामनेवाला यांना तक्रारदाराने दि.13/04/2009 व 05/11/2009 अन्‍वये लेखी तक्रार अर्ज दाखल करुन दिलेली होती. तसेच सदरची बाब निदर्शनास आणून देखील सामनेवालांचे कर्मचा-यांनी त्‍यास दाद दिलेली नाही. त्‍यामुळे नाईलाजास्‍तव मे. मंचामध्‍ये तक्रारदारास प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. या वस्‍तुस्थितीकडे मे. मंचाचे लक्ष वेधले आहे. सदर चुक सामनेवालांकडून घडूनही प्रस्‍तुत प्रकरणी सीपीएलची व तक्रारदाराच्‍या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता तक्रारदाराची तक्रार खोटी असलेबाबत म्‍हणणे दाखल केलेले आहे. सीपीएल वरुन सत्‍य वस्‍तुस्थिती नि‍दर्शनास आणलेवर दि.02/11/2011 चे पत्राने सामनेवाला यांनी त्‍यांची चुक मान्‍य करुन रु.7,161.50पै. पुढील वीज देयकातून समायोजीत करत असलेबाबत कळवलेले आहे. प्रस्‍तुत पत्र या प्रकरणी दाखल आहे. तसेच प्रस्‍तुत रक्‍कम समायोजीत केलेबाबत बिलाची अस्‍सलप्रत प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली आहे.
 
           दाखल कागदपत्रे व विस्‍तृत विवेचनावरुन सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला केवळ त्रयस्‍त इसमाच्‍या मिटरची तक्रारदाराकडून रु.7,060/- वसुल करुन घेतलेले आहेत. तसेच तत्‍पुर्वी त्‍याचे वीज कनेक्‍शन खंडीत केलेले होते. प्रस्‍तुतची रक्‍कम तक्रारदारास भरणेस भाग पाडले. प्रस्‍तुत तक्रार मे. मंचात दि.27/06/2011 रोजी दाखल झालेनंतर दि.16/12/2011 रोजी तक्रारदाराकडून भरुन घेतलेल्‍या रक्‍कमेपोटी रु.7,161.50पै. नमुद बीलामध्‍ये समायोजीत केलेली आहे. सबब तक्रारदाराने रु.7,060/- इतक्‍या रक्‍कमेची केलेली मागणीची सामनेवालांकडून पूर्तता झाली असलेने सदर मागणीबाबत आदेश करता येणार नाही. मात्र  सदर चुकीची दुरुस्‍ती सामनेवाला यांनी तक्रारदाराने त्‍यांचेकडे प्रथमत: तक्रार दाखल केलेबरोबर करावयास हवी होती. ती केलेली नाही. तसेच मे; मंचात तक्रार दाखल झालेनंतरसुध्‍दा 6 महिन्‍याचा कालावधी घेतलेला आहे. सबब सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तसेच त्‍याचे तक्रारीचे निराकरण सामनेवाला यांनी न केलेमुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे त्‍यास भाग पडले. सबब तक्रारदार मानसिक, शारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे मारलेल्‍या फे-याबाबत वाहन पेट्रोल खर्चाची मागणी केलेली आहे. ती मानसिक व शारिरीक त्रासामध्‍ये समाविष्‍ट आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 
 
 
                                आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त)  व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT