निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांनी स्वत: व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी निवासी कारणाकरिता सामनेवाला विद्युत कंपनीकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क.2665100884-84 असा आहे. तक्रारदारांनी दरमहा वेळोवेळी विद्युत देयकांचा भरणा केला आहे. असे असताना, दि.25.04.2005 रोजी रक्कम रुपये 4,259.15 पैसे इतकी जादा रक्कम दर्शविली आहे. तसेच, दि.21.02.2006 रोजी दि.3,878.95, तसेच दि.06.06.2006 रोजी रुपये 3,765.54 पैसे व दि.27.06.2006 रोजी रुपये 626.16 पैसे इत्यादी जादा रक्कमा दर्शविलेल्या आहेत. तसेच, मिटर सदोष असल्याने बदलून द्यावे अशी मागणी केली असता रककम रुपये 1,000/- भरणा करुन नविन मिटर देणेत आला. पंरतु, अंतिम रिडींग 8615 ठेवणे आवश्यक असतानाही शुन्य युनिट दर्शविले. तसेच, दि.09.01.2007 रोजी रक्कम रुपये 32,310/- चे देयक दि.10.01.2007 चे देयक रुपये 1,633/-, दि.08.02.2007 चे देयक रुपये 28,382/-, दि.16.02.2007 चे देयक रुपये 29,036.37 पैसे, दि.10.04.2007 चे देयक रुपये 17,175/-, दि.11.04.2004 रोजीचे देयक रुपये 17,710/- अशा रितीने तक्रारदारांना चुकीची देयके दिली होती. त्यानंतर दि.16.02.2007 रोजी देयकामध्ये दुरुस्ती करुन रुपये 1,184.94 पैसे इतकी रक्कम जमा करणेस सांगितले. सदर रक्कम तक्रारदारांनी जमा केली व तक्रारदार हे थकबाकीत आले नाहीत. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सामनेवाला विद्युत कंपनीने रुपये 27,839/- इतकी जादा रक्कम घेतली, ती परत करणेचा आदेश व्हावा. तसेच, शारिरीक मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे; (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना दि.17.02.07, दि.25.04.05, दि.21.02.06, दि.06.06.06, दि.15.11.06, दि.06.02.08 रोजी दिलेले अर्ज, सामनेवाला यांना दि.23.05.07 रोजी पाठविलेली नोटीस, दि.08.02.07 चे बिल, दि.16.09.06 चे बिल, सदरचे बिल भरणा केलेची दि.12.01.07 रोजीची पावती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत सामनेवाला चे ग्राहक मंचाकडे दि.16.04.2008 रोजी सादर केलेला अहवाल, तक्रार क्र.154/2008 चा निकाल, लोकपाल यांचा दि.01.10.08 रोजीचा निकाल, रिमांड होवून काम परत आलेवर मंचाने दिलेला दि.16.12.08 रोजीचा निकाल, सामनेवाला यांचे दि.01.01.09 रोजीचे पत्र, दि.10.09.08 रोजीचे दुरुस्ती बिल, दि.16.12.08 रोजीचे बिल, तक्रारदाराचा वीज वापराचा उतारा, रिट पिटीशननं.1075/95 मधील निकाल इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. यापूर्वी तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीकडील ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेकडे ग्राहक तक्रार क्र.154/2008 दाखल केली होती. सदर तक्रारीमध्ये दि.12.05.2008 रोजी निर्णय होवून तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर केली आहे. सदर निर्णयावरती तक्रारदारांनी Electricity Ombudsman यांचेकडे अपिल दाखल केले होते. सदर अपिलामध्ये आदेश झालेला आहे. प्रस्तुत प्रकरणी उपस्थित केलेला वाद हा याप्रमाणे निर्णित झालेला आहे. सदरच्या अॅथॉरिटी या अर्ध-न्यायिक स्वरुपाच्या आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतूद विचारात घेतली असता सदर कायद्यातील तरतूदी या इतर कायद्यास न्युनतम नसून पुरक आहेत. प्रस्तुत प्रकरणी उपस्थित केलेला वाद हा उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे निर्णित झाला असल्याने सदरचा वाद पुन्हा या मंचात उपस्थित करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |