निकालपत्र :- (दि.14.09.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक नं.256740230063 एजी 212 असा आहे. सदर विद्युत कनेक्शन त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करणेसाठी घेतले आहे. सदरचे कनेक्शन हे सिंगल फेजचे असून सदरचे मिटर हे लोड घेवू न शकलेने प्रथमच 00128 या मिटर रिडींगला बंद पडले. याबाबत सामनेवाला यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदारांनी दि.15.03.2004 चे बिल 31.03.2004 रोजी अदा केले आहे. त्यामुळे बाकी रहाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. तसेच, मे 2004 च्या वादळी वा-यामुळे वीज पुरवठयाच्या विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत होत्या. याबाबत तक्रार केली असता सामनेवाला यांनी वीज पुरवठा करणारे सर्व वायर्स तोडून नेले आहेत. अशी वस्तुस्थिती असताना वीज पुरवठयाची तथाकथित बिले तक्रारदारांना पाठवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व रक्कम रुपये 15,160/- चे तथाकथित बिल दाखविले आहे व त्याप्रमाणे थकबाकी भरणेची नोटीस पाठविली आहे. वीज पुरवठा बंद असतानाही खोटया रिडींगची बिले दाखवून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे. सबब, सामनेवाला यांनी दरमहा रुपये 60,000/- प्रमाणे रक्कम रुपये 3 लाख नुकसान भरपाई पाठवावी. मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावा. तसेच, जून 2004 पासून न वापरलेली विद्युत देयके माफ होवून मिळावीत व विद्युत कनेक्शन सुरु करणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मिटरचा फोटो, वायर्स तोडलेचा फोटो, सामनेवाला यांची नोटीस व देयके इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत केलेली विधाने दिशाभूल करणारी आहेत. तक्रारदारांनी दि.06.07.2004 अगर तत्पूर्वी कोणतीही तक्रार केलेली नाही. सन 2004 पासून तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदारांचे कनेक्शनचे विद्युत मिटर नादुरुस्त झालेने डिसेंबर 2005 पर्यन्तची वीज बिले वजाजाता मार्च 2006 ते जून 2009 पर्यन्त सरासरी बिले दिलेली आहेत. फक्त डिसेंबर 2006 मध्ये तक्रारदारांचे वडिल, गावडू पाटील यांचा ग्राहक क्र.256740229758 यांचे नांवे असलेले विद्युत थकबाकी रक्कम रुपये 7,918/- तक्रारदार ग्राहकाचे बिलामध्ये नियमानुसार वर्ग केली आहे. त्यामुळे जून 2009 अखेर व्याजासहीत रक्कम रुपये 16,440/- इतकी विद्युत देयक येणे बाकी आहे. सदरची विद्युत देयके तक्रारदारांनी वेळोवेळी भरलेली नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविलेली आहे. शासन धोरणानुसार शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करता येत नाही. त्यामुळे तक्रारदारांनी मागितलेली नुकसान भरपाई चुकीची आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व नुकसानीदाखल रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली विद्युत देयके, सामनेवाला विद्युत कंपनीने पाठविलेली नोटीस इत्यादीचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांच्या शेतीला पाणी पुरवठा करणेसाठी तक्रारदारांच्या नांवे एक विद्युत कनेक्शन व त्यांच्या वडिलांच्या नांवे दुसरे विद्युत कनेक्शन दिलेचे दिसून येते. तक्रारदारांच्या वडिलांचे नांवे असलेल्या विद्युत कनेक्शनसाठी तक्रारदार हे बेनिफिशिअरी (लाभार्थी) आहेत. तक्रारदारांच्या वडिलांच्या नांवे असलेली विद्युत रक्कमेची थकबाकी तक्रारदारांच्या नांवे वर्ग केली आहे व त्याची मागणी सामनेवाला यांनी केली आहे. बेनिफिशिअरी या नात्याने सदरची थकबाकी भरणेची जबाबदारी तक्रारदारांचेवर येत आहे. सबब, याबाबत सामनेवाला विद्युत कंपनीने केलेली मागणी ही सेवा त्रुटीमध्ये येत नाही असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |